Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खाजगी वृत्त वाहिन्यांच्या चर्चा

य
योगेश कोकरे
Sun, 10/16/2016 - 13:53
🗣 45 प्रतिसाद
आज काल रोज रात्री कोणत्या ना कोणत्या वृत्त वाहिन्यांचा चर्चासत्र पाहत असतो . त्यात तो anchor मस्त पैकी सूटबूट घालून tv च्या मध्यभागी दिसत असतो . एकाबाजूला एखाद्या पक्षाचा प्रवक्ता दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षाचा प्रवक्ता असतो.त्याच्या शेजारी एखादी तठस्थ व्यक्ती दाखवायची म्हणून एखादी राजकीय अभ्यासक (जो तठस्थ असेल याची खात्री नाही) . त्यात देशाच्या संरक्षणाचा विषय असेल तर एखादी सैन्यातील निवृत्त व्यक्ती (सैन्याचा गणवेश, टोपी ,झुपकेदार मिश्या ) हिचा समावेश असतोच . मग तो आंचोर(anchor ) विषयाला सुरवात करताना थोडी पार्श्वभूमी मांडतो , विडिओ दाखवतो ,ऑडिओ ऐकवतो , आणि मग चर्चेच्या फैरी झाडायला सुरवात होते . विषयाच्या बाजूने बोलणारे त्याचे समर्थन करतात , विरोधक त्याचा जमेल तास विरोध करतात. त्याच वेळी हे anchor एखाद्याला "तुमचे हे बरोबर आहे तुमचे हे चुकीचे आहे , तुमची बेताल वक्त्यव्य बंद करा. काही वृत्त वाहिन्यांमध्ये तर बोलावलेल्या व्यक्तींना चर्चेतून हाकलून दिल्याच्या घटना आहेत. अर्णब गोस्वामी , निखिल वागले हे त्यातलेच एक उदहारण आहे . मला एकाच प्रश्न पडतो कि चर्चे मध्ये anchor लोक दुसर्यांना चूक किंवा बरोबर कसं काय ठरवतात .(म्हणजे स्वतः न्यायाधीश होऊन व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होयच्या आधी हे लोक फाशी देऊन मोकळे होतात . ते या चर्चेत स्वतःची मते पण मांडतात . मग जर त्यांना स्वतःची मते मांडायची असतील तर anchor ची खुर्ची सोडून वक्त्याच्या खुर्चीत का नाहीत बसत ? किंवा स्वतःचा एकपात्री प्रयोग का नाही ठेवत ? आणि कोण चूक कोण बरोबर हे त्यांनी ठरवणे योग्य आहे का ? तसेच आलेल्या पाहुण्यांचा अपमान करून त्यांना हाकलून देणे हे पत्रकारितेचता संहिते मध्ये बसते का ? TRP मिळवण्याच्या ओघात ते पत्रकारिते चा खून करत आहेत का.? मिपाकरांनी यावर आपले मत व्यक्त करावे .....

प्रतिक्रिया द्या
7838 वाचन

💬 प्रतिसाद (45)
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 10/16/2016 - 14:46 नवीन
प्रत्येक पक्षाच्या वक्त्याला आपला आपला पक्ष मांडण्याची संधी असते, त्यामुळे टीव्ही सारख्या माध्यमातुन, ते त्वेषाने बोलणारच." अपनी अपनी डफली, अपना अपना राग " त्यात नवीन ते काय ? सुत्र-संचालन करणारी व्यक्ती बहुतेक , सर्वसामान्य जनतेला काय वाटते असा मुद्दा सुरु करुन विषयास सुरवात करीत असते. वाद-विवाद सुरु केल्याशिवाय, सत्य बाहेर येत नाही, असं आम्ही सुद्धा, दोन शेजार्‍यांच्या भांडण्याच्या अनुभवातुन जाणु शकतो. शिवाय सुत्र-संचालन करणारी व्यक्ती, अगदी ' नीर-क्षीर-विवेक युक्त ' आणि ' सर्व गुण संपन्न ' अगदी तटस्थ च असली पाहिजे असा आग्रह धरण्यात काय अर्थ आहे ? किती वाहिन्या वा व्रुत्तपत्रे आपला ' कुणाच्या अध्यात ना मध्यात ' असा बाणा टिकवून ठेवू शकतात. फक्त कोणाची मते आपल्याला पटत नाही म्हणून, चर्चेतून, बाहेर काढणे अयोग्य आहे हे योग्य आहे.
  • Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द Sun, 10/16/2016 - 15:07 नवीन
असल्या चर्चा नन्तर अमुक % लोक होय आणि तमुक % लोक नाही अशा प्रकारचे मतदान दाखवतात, पण एकुण किती लोकानी यात भाग घेतला हे कधीच सान्गत नाहीत .
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 10/16/2016 - 15:49 नवीन
सोडाहो, वाहिन्यांच्या चर्चा शुद्ध भंपकपणा आहे, असल्याचं तर जाहिरात मिळवणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या मनोरंजन मालिका आहेत, मी तर सहा वर्षे सोडून दिलंय हे बघणे, त्यापेक्षा मिपावर भारी चर्चा होतात, ज्ञान मिळते, चढाओढ होते, माजा येते, तेही आपल्या सवडी व वकूबानुसार...
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 10/17/2016 - 05:11 नवीन
शिवाय माईक नक्की कुणाकडे आहे तेही कळत नाही बर्याच दा सूत्रसंचालक हा धागा टंकून जे गायब होतो ते थेट शतकानंतरच परततो. काही चर्चा या थोड्याश्या केकता कपूरच्या मालिकेसारख्या चालतात.म्हणजे मूळ धागाविषय अलगद बाजूला टाकून इतर प्रतिसादातली वेचक कथानके इतकी मोठी होतात की अख्या मालेकेत ही नक्की कुणाची मूळ गोष्ट होती आणि मुख्य कथानायक/नायिका कोण होते याचा थांगपत्ता शेवटपर्यंत लागत नाही.शिवाय मिपा चर्चत जाहीरातीचा व्यत्यय नाही/वेळेचे बंधन नाही.लै म्हणजे लै फायदे (घेणारे)आहेत. कुठलीही केबल नसलेला मिपा प्रेक्षक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 10/16/2016 - 16:12 नवीन
त्यात देशाच्या संरक्षणाचा विषय असेल तर एखादी सैन्यातील निवृत्त व्यक्ती (सैन्याचा गणवेश, टोपी ,झुपकेदार मिश्या ) हिचा समावेश असतोच . हा तपशील बरोबर आहे का? कारण माझ्यामाहिती प्रमाणे निवृत्त अधिकाऱ्यांना १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अन इतर कुठला रेजिमेंटल , युनिट लेव्हल कार्यक्रम असल्याखेरीज गणवेश घालायची परवानगी नसते. सेम नियम अर्धसैनिक बळे तसेच सामान्य पोलीसाना सुद्धा लागू असतो.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 10/16/2016 - 19:35 नवीन
सैन्यातले लोक कुठलाही मुफ्ती पोषाख गणवेशाइतकाच दिमाखात घालतात. त्यामुळे त्यांना तसं वाटलं असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
य
योगेश कोकरे Sun, 10/16/2016 - 20:21 नवीन
खूप वृत्त वाहिन्यांवर निवृत्त कर्नल आपली सैन्यातील टोपी घालून येतायत आणि भाषण ठोकतायत . आणि जर ते नियम तोडत असतील तर कोणताही पत्रकार त्यांना ते सांगू शकतात . पण त्या अधिकार्यांना विरोध म्हणजे देशाला विरोध असा काही प्रमाणात समाज पसरवला गेलाय. आपल्या इथं कायद्याचं पालन आपल्या हिशोबाने ,सोयीने करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/17/2016 - 06:40 नवीन
सैन्यातील टोपी ? :O हे काहीतरी नवीनच वाचतोय, एखादे उदाहरण द्याल जमले तर, विडिओ किंवा फोटो वगैरे अशी विनंती करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
प
प्रसाद_१९८२ Mon, 10/17/2016 - 07:51 नवीन
या खालील दुव्यात जो फोटो आहे तशी टोपी ते म्हणत असावेत. https://goo.gl/photos/xcVCbYoWdFSij7EB8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
य
योगेश कोकरे Mon, 10/17/2016 - 09:00 नवीन
अश्या प्रकारचे सैनिकी गणवेश घालून चर्चेमध्ये जाण्यामागे काय उद्देश असावा ? म्हणजे आम्ही सैन्यामध्ये काम केले आहे हे दाखवण्याचा उद्धेश असावा का कि लोकांना आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलावा , म्हणून असे करतात . (**टीप: इथे सैनिकांना दुखावण्याचा काही उद्देश नाही फक्त उत्सुकता म्हणून विचारले ....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/17/2016 - 09:23 नवीन
पुन्हा एकदा स्पष्ट करतो, हे "सैनिकी गणवेश" नाहीत, तर मिळालेली वैयक्तिक शौर्य पदके वगैरे नीट कॅरी करायला असलेले कपडे होत, कोणीही असे कपडे घालू शकतो, अर्थात त्याला जस्टिफाय करणारी पदके वगैरे असली तर त्याला उठाव येतो इतकेच, उरला प्रश्न का घालून येतात, तर एखादा माणूस ज्याने बॉम्ब गोळ्यांच्या धुरळ्यात काम केले आहे पदके जिंकली आहेत त्याला न्युज चॅनलवाले "एक्स्पर्ट" म्हणून बोलावतात, त्यात त्याने त्याची वैयक्तिक पदके अन त्यांना सपोर्टींग कपडे घातल्यास त्यात नक्की प्रॉब्लेम काय असू शकतो हे अधिक उलगडलेत तर पुढे बोलायला सोपे पडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
स
सतिश गावडे Mon, 10/17/2016 - 19:11 नवीन
पुण्यातील एका कट्ट्याला एक निवृत्त वायूसेना अधिकारी असलेले ओक काका शर्टला "विंग कमांडर" चा बिल्ला लावून आले होते ते आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/17/2016 - 09:17 नवीन
सदर टोपी ही भारतीय थल, नौ, वायूसेनेची किंवा त्यांच्या कुठल्याही शाखेची किंवा कुठल्याही अर्धसैनिक बळाची अधिकारीक अधिकारीक टोपी नसून, ती ओर्नामेंटल कॅप आहे सदर टोपी सारखी दिसणारी टोपी ऐरफोर्स किंवा नेव्हल एअर आर्म चे अधिकारी घालताना दिसतात खरे पण त्यांच्यावर अधिकारीक लोगो असले उदाहरणार्थ स्कॉडरन लोगो किंवा ऐरफोर्स/नेव्ही लोगो असला तरच ती अधिकारीं टोपी म्हणवते, अश्या टोप्या फक्त सद्ध्या सर्व्हिस मध्ये असणारे फोर्सचे अधिकारी/प्रवक्ते वगैरे घालू शकतात, इतर कोणीही नाही. त्यामुळे निवृत्त अधिकारी टीव्ही कार्यक्रमात "सैन्याच्या" टोप्या घालून बसतात, हा आरोप किंवा विधान निराधार ठरते, आर्मी ची फॉर्मल टोपी खालील प्रमाणे असते, हिला पिक्ड कॅप असे म्हणतात, अन ही (लोगो असो वा विना लोगो) सार्वजनिक ठिकाणी कोणालाही घालायची परवानगी नसते, पिक्चर वगैरे चे शूटिंग हा वेगळा भाग झाला अगदी निवृत्त अधिकारीही ती घालू शकत नाहीत Image removed. दुसरी टोपी म्हणजे बेरे (beret) Image removed. ही टोपी फॅशन जगतात प्रसिद्ध असून अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स फोटोग्राफार्स ही घालतात, जोवर हिच्यावर आर्मी, फोर्सचा युनिटचा अधिकारीक लोगो नसतो तोवर ही कोणीही घालू शकते फोर्सचा लोगो लावून घालणे मनाई आहे, तसेच कुठल्याही निवृत्त अधिकाऱ्याने ही टीव्ही कार्यक्रमात घातल्याचे माझ्या निरीक्षणात नाही, असल्यास मला कृपया दुरुस्त करावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ब
बोका-ए-आझम Mon, 10/17/2016 - 09:30 नवीन
Ad world मधले बरेच लोक घालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
य
योगेश कोकरे Mon, 10/17/2016 - 13:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/17/2016 - 13:05 नवीन
??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
य
योगेश कोकरे Mon, 10/17/2016 - 13:25 नवीन
Image removed. यांनी हि टोपी घातलेली आहे ती कोणत्या प्रकारात बसते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 10/17/2016 - 16:44 नवीन
फोटो दिसत नाहीये कोकरे साहेब, पण जर वरचाच फोटो परत पोस्ट केला असलात तर ती टोपी अधिकारीक टोपी नाही इतके मी सांगू शकतो. तेच मी वरच्या पोस्ट मध्ये सुद्धा स्पष्ट केले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
स
सुबोध खरे Mon, 10/17/2016 - 16:57 नवीन
जनरल शेकटकर साहेबानी घातलेली टोपी हि अधिकृत नाही पसरंतु त्यावर ३ तारे आहेत ( तीन तारांकित जनरल किंवा लेफ्टनंट जनरल). बरेच निवृत्त लष्करी अधिकारी अशा कार्यक्रमाला विशेषज्ञ म्हणून किंवा निवृत्त सैनिकांच्या कार्यक्रमाला/ मेळाव्याला जातात तेंव्हा आपली एक ओळख म्हणून अशी टोपी घालतात. (मला थोडासा हा गर्वाचा भाग वाटत असे परंतु प्रत्यक्ष अशा लोकांना भेटल्यावर तो गर्व नसून अभिमान आहे असे जाणवले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
य
योगेश कोकरे Mon, 10/17/2016 - 17:31 नवीन
म्हणजे ती तीन स्टार ची टोपी अधिकृतरीत्या सार्वजनिक कार्यक्रमात घालू शकतात ते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 10/19/2016 - 07:03 नवीन
जनरल शेकटकर साहेबानी घातलेली टोपी हि अधिकृत नाही हे वरच लिहिलेले आहे. बाकी तुम्ही पंचतारांकित टोपी घाला सार्वजनिक समारंभात. काटेरी मुकुट पेलवला पाहिजे लेना क्या देना क्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
स
सुबोध खरे Wed, 10/19/2016 - 07:05 नवीन
जनरल शेकटकर http://cfass.org.in/db-shekatkar-biodata.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 10/17/2016 - 17:08 नवीन
http://www.dnaindia.com/locality/sites/default/files/styles/news_slider/public/newsimage/cover%20pic_5.jpg?itok=5JWAlLIQ आर्मी एव्हिएशन कोअर च्या पीक कॅप्स पहा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टोपीला( कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल, लेफ्ट जनरल आणि जनरल) लाल फीत असते आणि कॉलर वर लाल निशाण असतात. मेडिकल कोअर च्या टोपी(पीक कॅप) वर किंवा बेरे वर असा पितळी बिल्ला असतो. http://1.bp.blogspot.com/-J7llFMWMIkU/VPlvarPXxRI/AAAAAAAAB1A/4TJ2KQc7wPs/s1600/Armed_Forces_Medical_Services_logo.jpg असा बिल्ला प्रत्येक कोअरचा असतो पण तो फक्त कर्नल हुद्यापर्यंत असतो आणि ब्रिगेडियार आणि वरच्या अधिकाऱ्यांच्या टोपीला बापूसाहेबांनी दाखवलेला लाठी आणि तलवारीचाच बिल्ला असतो. या टोपीला पण लाल फीत आहे आणि तेथे लाठी आणि तलवार आहे म्हणजे हि टोपी ब्रिगेडियर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मराठमोळा Sun, 10/16/2016 - 23:57 नवीन
खाजगी वृत्तवाहिन्या पाहणे तद्दन मूर्खपणा आहे असे माझे मत आहे त्यामुळे बर्‍याच वर्षांपासून पाहणे बंद केले आहे. चीडचीड, संताप आणि भिती निर्माण करणे, टीआरपी खेचणे, बातम्या मॅनिप्युलेट करून लोकांना मूर्ख बनवणे आणि वरीष्ठांकडून मिळालेला अजेंडा चालवणे हा त्यांचा नित्यक्रम आहे. थोडाफार जो सेंस असतो त्यासाठी ९० टक्के फालतुपणा बघणे नको वाटते. याऐवजी मोबाईलवर हवे ते फीड्स सबस्क्राईब करून हवे तेवढेच वाचणे सोपे जाते. बाकी चर्चांसाठी मिपा/व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप कधीही उत्तम. :)
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 10/17/2016 - 07:30 नवीन
अर्णब निखिल वागळे ह्यांचा कार्यक्रम बघण्यापेक्षा रिकाम्या भितीकडे तोंड करून ३० मिनिटे बसावे जास्त ज्ञानार्जन होईल. अर्णब चे समाधान एकच आहे बरखा दत्त, प्रणव रॉय, सागरिका घोष, राजदीप ह्या सारख्या ठोंब्यांच्या चॅनलचे दर्शक त्याने हिरावून घेतले आहेत. NDTV आणि अर्णब ह्यांचात चॉईस असेल तर अर्नब ला पाहावे.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 10/17/2016 - 08:02 नवीन
खालील लेख अमेरिकन टीव्हीवर दिसणार्‍या याच निरिक्षणाबद्दल आहे. पण हा लेख भारतीय टीव्हीला देखील लागू पडतो. http://www.economist.com/news/business/21708718-some-americans-are-getting-rich-pushing-politics-extremes-business-outrage
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 10/17/2016 - 08:02 नवीन
आणि प्रेक्षक फक्त ऐकायचे. आज सोशल मिडियामुळे लोक एखाद्या बातमीवर प्रतिक्रिया देऊ शकतात. वाद घालू शकतात. ट्विटरसारख्या माध्यमातून बातम्यांमधल्या माणसांशी सरळ संपर्क साधू शकतात. इंटरनेट आता हातातील मोबाईलवर आल्यामुळे हे सगळं प्रवास करता करता करु शकतात. परिणामी वृत्तवाहिन्यांची जनमत ' बनवण्यात ' जी मक्तेदारी होती तिला आव्हान मिळालं आहे. त्यामुळे काहीही करा पण प्रेक्षक खेचून आणा असं चालू आहे. अर्णब किंवा वागळ्यांनी अपमानित केलेले अनेक पाहुणे परत येतातच. यावरून असं म्हणायला हरकत नाही की आपल्याला जरी त्यांच्यातले वादविवाद खरे वाटत असले तरी ते scripted आणि pre-determined असू शकतात. एकंदरीत ही इंटरनेटमुळे प्रभावित झालेल्या वाहिन्यांची केविलवाणी धडपड आहे. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 10/17/2016 - 08:11 नवीन
अर्णबच्या कार्यक्रमात बसायचा दर रु. ७०००० प्रति तास आहे असं कुठशी ऐकलं आहे. ( बहुधा प्रशांत भूषण यांनी ट्वीट केलेलं. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्रसाद_१९८२ Mon, 10/17/2016 - 08:35 नवीन
अर्णबच्या कार्यक्रमात बसायचा दर रु. ७०००० प्रति तास आहे असं कुठशी ऐकलं आहे. << हे सत्तर हजार रुपये न्युज चॅनल चर्चेला बसणार्‍या व्यक्तिला देते की चर्चेला बसणार्‍यां व्यक्तिने न्युज चॅनला द्यायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Mon, 10/17/2016 - 08:58 नवीन
न्युज चॅनल चर्चेला बसणार्‍या व्यक्तिला देते. उदा पाकिस्तानी लोक जे येऊ बसतात त्यांना शिव्या खायच्या बदल्यात ताशी ७०००० रु मिळतात. त्या शिवाय का येतील ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
य
योगेश कोकरे Mon, 10/17/2016 - 09:03 नवीन
भारी आहे राव ....लोक इथे वारंवार अपमानित होण्यासाठी कसे काय जाऊ शकतात याचे थोडाफार प्रमाणात उत्तर मिळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
व
वटवट Mon, 10/17/2016 - 09:06 नवीन
मी तर अश्या चर्चा फक्त भाषा सुधरवण्यासाठीच बघतो...
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 10/17/2016 - 18:44 नवीन
बापू, खरे साहेब, सैन्यबद्दलचे डिटेलिंग सामान्यांना तुमच्या एक टक्काही ठाऊक नसते, हे लक्षात घेता कोकरे जे म्हणतायत त्याकडे सामान्य माणूस म्हणून बघावे, तांत्रिक बाजू महत्वाची नाही तर पेहरावाचा जो परिणाम ती व्यक्ती बोलत असलेल्या मुद्यांच्या प्रभावावर होतो ते महत्वाचा, i hope i am making sense!
  • Log in or register to post comments
य
योगेश कोकरे Mon, 10/17/2016 - 20:27 नवीन
डांगे बरोबर बोललात .....त्यांच्या पेहवरावाचा परिणाम त्यांच्या बोलण्यावर होतो कि नाही हे महत्वाचे (माझ्या मते इतका होत नाही ) ..... पण पेहेरावाचा लोकांवर परिणाम व्हावा , आपल्याला वर्गाला नजरेने बघितले जावे असा तर विचार नाही ना होत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
शाम८२ Mon, 10/31/2016 - 18:12 नवीन
रवीश कुमार प्राइम टाइम कि रिपोर्ट हे दोन्ही कार्यक्र्म छान आहेत. खासकरून तो जो इंट्रो सांगतो प्राइम टाइम च्या सुरवाती ला खूप अभ्यास करून सांगतो. सामान्य माणसाला कळेल असे बांधणी असते. मला तरी वयक्तिक कधी वाटले नाही की तो सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांची बाजू घेत आहे. अर्णब व झी टीव्ही चे anchor बायस पणे भाजप ची बाजू घेतात. अर्णब तर भाजी मार्केट चालवल्या प्रमाणे ८-९ लोक बोलावतो आणि स्वतः नायाधीश असल्या प्रमाणे सर्व ठरून खरे कोठे करून टाकतो. vyapam whistleblower ची सुरक्षा पहा आणि या फडतूस अर्नब ला कमांडो. आजकाल मोदी भक्त्त आणि भाजप चा विरोध म्हणजे राष्ट्रविरोधी झाले आहे आणि सुस्ती करणारे राष्ट्रप्रेमी. Image removed. Image removed. जाताजाता विकिपीडिया मधून पत्रकारिता चे बेसिक ऑबजेक्टिव्ह Journalistic objectivity requires that a journalist not be on either side of an argument. The journalist must report only the facts and not a personal attitude toward the facts. टीप मी कोणत्या ही पार्टी चा चमचा नाही बाकी मिपाकरांनी यावर आपले मत व्यक्त करावे .
  • Log in or register to post comments
प
प्रसन्न केसकर Tue, 11/01/2016 - 10:41 नवीन
फुटलो....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम८२
स
संदीप डांगे Tue, 11/01/2016 - 13:47 नवीन
काही चुकलं का त्यात? दुरुस्त करा बघू पटापट... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Tue, 11/01/2016 - 14:31 नवीन
नाही, प्रतीसादकाच फार काही चुकल नाही फक्त विकीसारख्या सोर्सावरून गहन विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला. मुळात कोणतीच बातमी पूर्णपणे तटस्थ, निष्पक्ष कधीच असू शकत नाही. काही प्रमाणात संबंधित पत्रकाराच्या मतांचा, पूर्वग्रहांचा, समजांचा प्रभाव असतोच. शिवाय प्रकाशनाचे मालक, प्रकाशक, वाचक, जाहिरातदार, नेते, एकूणच समाज यांचाही मोठा परिणाम बातम्यांवर पडतोच. दुसरे म्हणजे एखादी व्यक्ती पत्रकार झाली म्हणजे तिने स्वत:ची मते बाळगूच नयेत किंवा ती व्यक्त करूच नयेत ही अपेक्षा पत्रकारितेच्या मुलभूत उद्देशाबाबतच घोर अज्ञान दाखवते. बातमीत किंवा लेखात मते असू शकतात पण त्यांना बळकटी आणण्यासाठी तथ्ये बदलणे कितपत योग्य याबाबत मतभेद असू शकतात. तिसरे म्हणजे ज्या चर्चांबाबत इथे बोलणे सुरु आहे त्या चर्चा बातम्या नाहीत तर मते व्यक्त करणारे कार्यक्रम आहेत. वृत्तपत्रातल्या बातम्या आणि लेख किंवा अग्रलेख याबाबत जो न्याय लागू होतो तोच इथेही होतो. चौथे म्हणजे फक्त एखादा विशिष्ठ अँकर त्याची मते व्यक्त करतो आणि इतर करत नाहीत असेही नसते. प्रत्येक अँकरला तो होस्ट करत असलेल्या कार्यक्रमात त्याची मते व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असते आणि ते मिळत नसेल किंवा त्याला वापरता येत नसेल तर अशी होयबा व्यक्ती अँकर म्हणूनच नाही तर पत्रकार म्हणूनही काम करण्यास सर्वस्वी अपात्र असते. अर्णब किंवा वागळे त्यांची मते व्यक्त करतात तसेच इतर अँकर, अगदी रविशकुमार देखील त्यांची मते अशा कार्यक्रमांमध्ये व्यक्त करत असतातच. प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते आणि ती कुणाला आवडू किंवा नावडू शकते एवढेच. असहिष्णुता या विषयावर रविशकुमारने त्याची मते अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली होती आणि त्याने त्याची ती व्यक्तिगत मते चर्चेच्या कार्यक्रमात व्यक्त करूनही त्याच्या विरोधी मत नोंदवण्याची संधी कुणालाही मिळालेली नव्हती हे इथे लक्षात घेणे महत्वाचे आहे. एकूण इथे प्रश्न अँकरने व्यक्त होणे या संदर्भात नाही तर त्या कार्यक्रमात तो कसा व्यक्त होतो, त्या कार्यक्रमाचे स्वरूप कसे आहे हा आहे. अर्थात हे सर्व तो कार्यक्रम ज्या व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला असतो त्यावरून देखील ठरते. म्हणूनच न्यूज अवर किंवा सवालला इतर कोणत्याही चानेलवरील चर्चेच्या कार्यक्रमाहून जास्त टीआरपी मिळतो. अर्थात आता अर्णबने त्याचा राजीनामा जाहीर केलेला आहेच. त्यामुळे तो न्यूजअवर होस्ट करणार नाही हे स्पष्ट आहे. त्याचा परिणाम चानेलवर कसा आणि काय होतो ते यथावकाश कळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
य
यशोधरा Tue, 11/01/2016 - 14:48 नवीन
प्रसन्नदा, कसे आहात? बरं वाटलं तुम्हांला मिपावर पुन्हा पाहून. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Tue, 11/01/2016 - 14:50 नवीन
सध्या बाकीचेच एवढे लिखाण होते की इतर कुठेच काही वेगळ लिहिता येत नाही. पण मी मजेत. बाकी तू कशी आहेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Tue, 11/01/2016 - 14:53 नवीन
मजेत आहे :) येत रहा आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
स
संदीप डांगे Tue, 11/01/2016 - 15:04 नवीन
अतिशय उत्तम प्रतिसाद, तसेच आपण स्वतः एक पत्रकार असल्याने थेट त्याच क्षेत्रातल्या व्यक्तिकडून आल्याने अधिक विश्वासार्ह. धन्यवाद! थोडासा मतभिन्नता एवढीच की प्रतिसादकर्त्याने जे उद्धृत केले आहे ते विधान 'आदर्श पत्रकारितेकडून अपेक्षा' असे आहे व आपले विवेचन हे 'परखड जमिनी सत्य' सांगणारे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
प
प्रसन्न केसकर Tue, 11/01/2016 - 15:27 नवीन
आदर्श पत्रकारिता, हिणकस पत्रकारिता असे काही नसते. पत्रकारिता सगळी सारखीच, मग ती मटा/लोकसत्ता/सकाळने केलेली असो किंवा संध्यानंद/पुण्यनगरी/नवाकाळने. शेवटी जो जे वांछील तो ते लाहो हेच खरे. पत्रकारितेचा एकमेव धर्म म्हणजे वाचकानुनय आणि पत्रकाराचा एकमेव देव म्हणजे त्याचा वाचक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/01/2016 - 15:38 नवीन
पत्रकारितेचा एकमेव धर्म म्हणजे वाचकानुनय आणि पत्रकाराचा एकमेव देव म्हणजे त्याचा वाचक. >> रोचक आहे हे. वाचकानुनय चा अर्थ माझ्यामते वाचकांच्या आवडीनुसार लिहिणे, छापणे. पत्रकार ज्या बलात्कार, खून, दरोड्यांच्या, भ्रष्टाचाराच्या बातम्या देतात त्या वाचकांना आवडतात असे समजायचे का? टैम्सने अर्धवस्त्रांकित स्त्रियांचे फोटो टाकणे, संध्यानंदने आंबटशौकिनांसाठी कथा छापणे हे सर्व पत्रकारितेत येते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न केसकर
क
कंजूस Tue, 11/01/2016 - 13:59 नवीन
कुठल्याही चर्चेत संरक्षण दलाच्या निवृत्ताना बोलवूच नये.सेवेत असताना जी ओर्डर म्हणून अमलात आणलेली असते त्याची आताच्या गोष्टींशी तुलना काथ्याकूट कशाला? कारण आताचे सेवेत असलेले त्यावर बोलू शकत नसतात.आमदार खासदारांनाही त्यांचे अधिकृत व्यासपीठ आहे तिकडेच ते बरे. चर्चा व्यासपीठ हे सामान्यांसाठी ठेवले पाहिजे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा