पोलीस यंत्रणा नेहमी व्हिलन सारखी का वागते?
खूप दिवस ही मळमळ मनात खदखदत होती... मिपाचा हा प्लॅटफॉर्म एखादा विषय चर्चिण्यासाठी अगदी योग्य आहे. आणि मुळात, मला माझे मत बदलायचे आहे ह्यासाठी हा विषय मी इथे मांडत आहे...
पोलीस कायद्याचे रक्षक आहेत. ते आपल्यासाठी आहेत. ते आपल्यासाठी त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. ते खूप हालअपेष्टा सोसत असतात. त्यांचा पगार खूप कमी असतो. तरी ते आपल्यावर उपकारासारखं काहीतरी करत असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आपण पोलीस मित्र म्हणून वागलं पाहिजे. आपलं संरक्षणखातं आणि पोलीस खातं एकंच काम करतं. ते बाहेरच्या शत्रूंच्या विरोधात लढतात आणि हे आतल्या शत्रूंच्या विरोधात... वगैरे वगैरे... लहानपणापासून हेच ऐकत आलोय. वर्तमानपत्रातून... रेडिओवर... चर्चासत्रांतून... सोशल मीडियातून हाच सूर दिसतो. पण माझं निरीक्षण खूप वेगळं आहे. कदाचित सगळ्यांचंच तेच निरीक्षण असेल.
१. पोलीसखातं महसूल खात्यासारखंच अत्यंत करप्ट आहे. बहुतेक पोलिसांचं पोट उगाच वाढलेलं नसतं. जे उन्हातान्हातून ट्रॅफिक आणि गर्दी कंट्रोल करतात ते जास्त करून झीरो पोलीस असतात, कॉन्ट्रॅक्टबेसिस वरचे. तेही अधूनमधून हात मारतच असतात. पुण्यात जवळपास बर्याच पोलीस स्टेशन जवळ ऑनलाईन मटका जोरात चालतो. तिथले पोलीस आंधळे नसतात. दणक्यात मलिदा मिळतो... अगदी कमिशनर पर्यंत हे पैसे जातात असं ऐकलंय... नॉन-करप्ट पोलीस माझ्यातरी पाहण्यात नाही. आमच्या गावातल्या एका पोलिसांचं प्रकरण तर विधानसभेत गाजलं होतं.. आता त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत.
२. पोलीस कधीही आपले मित्र म्हणून वागत नाहीत. उलट त्यांचे हात मोकळे करायचे साधन म्हणजे सामान्य जनता, बऱ्याचदा असंच त्यांचं वर्तन असतं. अश्यातला माझा अनुभव सांगतो.. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रकरण घडलं होतं. मुलीच्या तक्रारीवरून मुलाला वाकड पोलीस चौकीवर बोलावलं. तिच्या नुसत्या तक्रारी वरून मुलाला बेदम मारलं.. एक दिवस कस्टडीत पण होता तो. आम्ही फॅकल्टी म्हणून तिथे गेलो होतो. त्यांनी आम्हाला विचारलं "इथे कशाला #$%$ घालायला आला आहात?" आम्ही म्हणालो कि आमचा विद्यार्थी आहे तो म्हणून आलोय. मग ते म्हणाले "मग काय त्याला आमच्या $%# वर बसवू" आंम्ही म्हणालो "अहो तो मुलगा लहान आहे हो आणि काहीच चौकशी नं करता का त्याला मारताय?" त्यांनी आमचा अजून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि आमच्या अंगावर "जाता कि नाही आता" म्हणून आले. आम्ही निघालो. दुसर्या दिवशी त्याला बेल मिळाली. एक आठवड्यात त्याने कॉलेज मधून टीसी घेतला. कॉलेजची बदनामी नको व्हायला म्हणून आम्हाला शांत बसायला सांगितलं गेलं. निदान मला तरी तुलनेने कायदे जरा जास्त माहिती आहेत. काय उपयोग? फाटायची ती फाटलीच कि... सामान्य माणसाची काही वेगळी गत असते? नुसत्या तक्रारीवरून कुठलीही चौकशी नं करता मारहाण करायचा त्यांना परवाना दिलेला असतो.
३. कुठलाही नवीन कायदा पास झाला कि ह्यांना चरायला कुरण सापडतं. ह्यांना खायच्या संधी मिळतात. साधारण आरोपी जरी असला तरी त्याला नं मारण्यासाठीसुद्धा पोलीस पैसे घेतात. बलात्काराचा आरोपी असला तर विचारायलाच नको. त्यातल्यात्यात जेंव्हा डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट पास झाल्यापासून तर त्यांना दाबून पैसे कमावण्याची संधी प्राप्त झालीये. एका केसमागे कित्येक लाख मिळतात, तेही बिनबोभाट... खरंतर इतकि उदाहरणे मला व्यक्तिशः माहित आहेत पण असल्या गोष्टींचे पुरावे नसतात कधीच म्हणून इथे लिहिता येत नाहीत... जर कोणी गरीब ह्या भानगडीत फसला तर मेलाच म्हणून समजा... हे खातं गरिबांसाठी नाही... आताच ट्रॅफिकरुल्स अजून कडक केलेत आणि दंडाची रक्कमपण वाढलीये...सो.. पोलिसांचा भाव पण वाढलाय.
४. जेल ऍडमिनिस्ट्रेशन आणि तिथे चालणारे गोंधळ ह्यावर तर एक मोठा प्रबंध होऊ शकेल. श्रीमंत आणि सेलिब्रिटी गुन्हेगारांना प्रचंड ऐषाराम कसा मिळतो आणि त्यावर कसं त्यांचं अर्थपूर्ण जीवन अवलंबून असतं हे सर्व ओपन सिक्रेट आहे. अबू सालेम ने जेलमधला महागडा असा टीव्ही फोडला होता. कोण त्याला बोलल्याचं ऐकिवात नाही. त्याने त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती, हे चालवून घेतलं जातं? त्यांच्यादृष्टीने देशद्रोही बिशद्रोही असलं काही नसतं... त्यांचा देश आणि धर्म एकंच... पैसा.
५. काही पोलिसांना मारलं कि लगेच सगळ्या देशातून पोलिसांच्या बाजूने आवाज सुरु लागला. अर्थात मी पोलिसांना मारण्याच्या बाजूने अजिब्बात नाही. पण त्याहीपेक्षा पोलिसांनी निरपराध लोकांना बेदम मारहाण केल्याची असंख्य उदाहरणे मी पहिली होती, पाहत आहे. त्यांना असे लायसन्स दिली आहेत.
६. गेल्या महिन्यात बाणेरच्या यशदामध्ये माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग दिग्दर्शित आणि लिखित "क्या यही सच है" ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग होते. तेंव्हा मी आमच्या कॉलेजच्या मुलांना घेऊन तिथे गेलो होतो. चित्रपट तांत्रिक आणि अभिनयाच्या बाबतीत फार काही उच्च वगैरे नाही. अगदीच साधारण आहे. पण ज्या काही गोष्टी दाखवल्या त्या खूप हॉरिबल होत्या. काही गोष्टींचा अंदाज येणं वेगळं आणि त्याच गोष्टी खऱ्या आहेत ह्याची खात्री होणं वेगळं. कमिशनरच्या नेमणुकीला स्पॉन्सर लागतात आणि त्याचा जो काही रेट असेल तो ते स्पॉन्सर देतात, हे मला नवीन होतं. चित्रपट दाखवून झाल्यावर मी खुद्द वाय.पी. सिंग ह्यांनाच मी प्रश्न विचारला होता कि, जर एव्हढं हे खातं भ्रष्ट आहे तर आम्ही त्याच्यावर विश्वास का आणि कसा ठेवावा? त्यावर त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ टाळली. मला काय ते उत्तर मिळायचं ते मिळालं.
७. बांधकाम क्षेत्रात आज कित्येक अंडरवर्ड डॉन्सचे पैसे गुंतले जात आहेत आणि पुण्यात तरी बहुतेक एजंट्सना ते माहित आहे. पोलिसांना माहित नसेल?
८. अंतर्गत सुरक्षा खरंच ते सांभाळतात? ह्यावर मला खरंच शंका आहे. कारण पोलीस खातं हे नेहमी नेहमी विकलं जाऊ शकणारं खातं आहे.
९. मुळात मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच.
ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत.
(माझी ही मते फक्त पोलिसांसंबंधीच आहेत)
💬 प्रतिसाद
(118)
S
sश्रिकान्त
Mon, 10/17/2016 - 09:20
नवीन
आदर त्यांचाच करायचा आसतो जो दुसर्याचा करतो. पोलीसानी कदी दसर्याचा आदर केला का? सनीयर िसटीजन आसो वा महीला आसो, य
पोलीसांना काही फरक पडत नाही आपमान करताना.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/17/2016 - 09:32
नवीन
मुळात तुमचा विचार
मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच.
असे आहे त्यात तुम्ही "माझे विचार बदलायला मळमळ काढतोय" वगैरे म्हणताय, हे काँट्राडिक्शन काही खास पचले नाही, त्यामुळे तुम्हाला चार मुद्दे सांगून काही खास हाती येऊन मला काही नवे शिकता येईल असेही वाटत नाही, तस्मात तुमच्या धाग्यावर तुम्हाला आवडेल असेच बोलून मी रजा घेतो,
"सगळे पोलीस हरामखोर असतात, १००% पोलीस ऐदी ऐतखाऊ अन जनतेचे दुश्मन असतात, त्यांचे सख्य फक्त पैश्याशी असते"
धन्यवाद.
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 09:34
नवीन
धन्यवाद..
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 10/17/2016 - 09:45
नवीन
याला पोलिसही अपवाद नाहीत. मला पोलिसांचे चांगले-वाईट असे दोन्हीही अनुभव आहेत. त्यामुळे मी टोकाची भूमिका घेणार नाही.
त्या मुलाने काहीही केलं नव्हतं आणि मुलीची तक्रार विनाकारण होती असं म्हणायचंय का तुम्हाला?
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 11:02
नवीन
चूक दोघांचीही होती... पण काहीतरी चौकशी करायला हवी होती ना? काहीच ना चौकशी करता केवळ मुलगी म्हणते म्हणून मारणं कितपत योग्य?
- Log in or register to post comments
व
वरुण मोहिते
Mon, 10/17/2016 - 10:53
नवीन
चांगले वाईट सगळेच असतात त्याला पोलीस पण अपवाद नाहीत तुम्ही म्हणालात ना चांगले हि अनुभव आहेत ते पण लिहा त्यांचं मनोबल वाढेल अजून . लोकं पण याला कारणीभूत आहेत म्हणून असं चालू आहे. वाईट आहे अगदी शिळफाट्याला रात्री 3-4 मध्ये एका तथाकथित भाईची लोकं महिन्यातून डान्सबारला एकदा यायची परवानगी मिळायची त्यांना याला मी साक्षीदार आहे तळोजा जेल मधून यायची .पण तसेच 10-10 दिवस एक गुन्हा असेल तरी पैसे न घेता काम करणारे पोलीस आहेत कि त्यामुळे आपल्याला विश्वास आहे. काही झालं तरी ते हि चांगलं काम करतात काही अपवाद असतील पण सर्वसकट अस बोलून काही होणार नाही . तुमचेही काही मुद्दे बरोबर असतील ते नंतर बोलूच
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/17/2016 - 10:56
नवीन
मला वैयक्तीकरीत्या पोलीसांचे आलेले अनुभव अतिशय वाईट होते असे सखेदाने सांगतो .
तरीही उडदामाजी काळेगोरे असावे आणि काही पोलीस चांगले असावेत अशी आशा करतो .
पोलीस आणि सैन्यामधे खूप फरक असतो .
तळेगाव टोलनाक्याला एक भीषण अपघात झाला होता . आम्ही अँब्यूलन्सला फोन केला आणि जवळच्या चौकीकडे मदत मागितली तर ते आमच्या हद्दीत नाही असा उत्तर देउन तो पोलीस निवांत बसला होता . बर्याच विनंती नंतर डाफरला पण आला नाही किंवा कंट्रोल रूम ला कळवले नाही.
त्याच वेळी तिथे सीआरपीएफ चा ट्रक चालला होता , त्या जवानांनी गर्दी बाजूला करून जखमींना बाहेर काढून त्याच ट्रकमधून दवाखान्यात अॅडमिट केला. पोलीसदलामधे शिस्तीचा अभाव दिसतो .
सतीश शेट्ट्यी हत्येप्रकरण वाचलात तर ह्या सीस्टीमला लागलेली कीड किती भयंकर आहे ते समजेल .
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 11:16
नवीन
अशातला एक अंगावर शहारे आणणारा अनुभव सांगतो..
माझ्याच विद्यार्थ्याचा आहे. त्याचा एक जबर्दस्स्त अपघात झाला होता. दुचाकीवरून जाताना गाडी घसरली. सोबतचा ऑन द स्पॉट गेला. ह्याचं डोकं फुटलं. एक डोळा फुटून बाहेर आला. रस्त्यावर रक्तच रक्त. तडफडायचं पण त्राण नव्हतं त्याच्यात. फक्त पोट तेव्हढं हलताना दिसत होतं... त्याच्या दुर्दैवाने त्याला शुद्ध होती. तसा तो पडलेला असताना एक पोलीस आला आणि त्याच्या अंगावर कापड टाकलं, मेला म्हणून... एक रिक्षावाला बाजूने जात होता. त्याने ते बघितलं. तो त्या पोलिसाला म्हणाला कि अहो तो मेला नाहीये... तेंव्हा तो पोलीस म्हणाला कि जावा तुम्ही एव्हढं डोकं फुटल्यावर कोणी जिवंत नसतं राहात... मरेलच थोड्यावेळात... हे सगळं ते पोरगं बघत होतं बरं, ऐकत होतं बरं... विचार करा काय वाटलं असेल त्याला.... शेवटी त्या रिक्षावाल्यानेच त्याला ऍडमिट केलं... आभाळाभरून खर्च आला आणि ते पोरगं वाचलं... काही दिवसात त्याच्या डोळ्यावर पण ऑपरेशन होईल.... ते पोरगं जेंव्हा मला सांगत होतं तेंव्हा मला थरथर सुटली होती अंगाला...
इतकं असंवेदनशील आणि संतापजनक उदाहरण माझ्या पाहण्यात नाही...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 10/17/2016 - 11:58
नवीन
समोरचा पोलिस या टाईपचा आहे / नाही / कधीकधी या टाईपचा हे कसे समजणार...सामान्य माणसांना काडीचीही किंमत नाहीये
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 12:13
नवीन
प्रचंड सहमत---
म्हणजे सामान्य माणसाने सुद्धा आपली किंमत वाढवावी..
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 12:16
नवीन
हे व्हॅल्यू ऍडिशन कुठे करून मिळतं?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/17/2016 - 13:15
नवीन
एखादा तरी क्लासमेट, जवळचा मित्र, नातेवाईक पोलीसात असावा.
इतरही भरपूर मार्ग आहेत. ते झेपत नाहीत मध्यमवर्गाला.
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 13:22
नवीन
अहो ते सामान्य माणसाबद्दल बोलत आहेत... ज्यांचे लग्गे असतात ते सामान्य असतात होय?
ते तर असामान्य कॅटेगरीतले...
- Log in or register to post comments
C
chitraa
Mon, 10/17/2016 - 11:23
नवीन
आमच्या हद्दीत नाही म्हटले की त्याला कोणाच्या हद्दीत येते विचारुन त्याचा फोन नंबर मागायचा... त्यांच्याकडे असेल तर ते देतात. बहुतेक वेळा ते देतातच... मग त्याना फोन करायचा.
एम एल सी इन्फोर्मेशनला हे आम्ही असेच करतो. त्यात पोलिसांचा दोष नसतो
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/17/2016 - 11:50
नवीन
सर्व प्रयत्न केले होते . असो !
पुढच्या वेळी मदत करताना हद्द , १०० नंबर इत्यादी लक्षात ठेवेन.
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 12:08
नवीन
पोलीस मॅन्युअल नुसार एका पोलीस स्टेशनच्या हददीत जर गुन्हा घडला तर दुसर्या पोलीस स्टेशनचे पोलीस त्याची दखल घ्यायला नकार नाही देऊ शकत... झिरो एफ आय आर त्यासाठीच असतो.... जस्टीस वर्मा कमिटीच्या रिपोर्ट मध्ये ही शिफारस केली गेली.. आता तो कायदा आहे... आणि असं ना केल्यावर तो गुन्हा आहे सीआरपीसी नुसार सहा महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते प्लस खात्याची कारवाई वेगळी...
सो...
ठरवा आता पोलिसांचा दोष असतो कि नसतो ते...
- Log in or register to post comments
C
chitraa
Mon, 10/17/2016 - 12:21
नवीन
ते सगळं थेरॉटिकल आहे.
त्यापेक्षा आपण कुठल्या हद्दीत येतो , त्य पोलिस स्टेशनला जावे.
ते झिरो नंबर वगैरे काही स्पेशल सिचुएशनला असते... उदा. पेशंट लोणावळ्याला पडला... नातेवाइकानी त्याला डायरेक्ट चेंबूरच्या हस्पिटलात आणला. आता चेंबुरचा डॉक्टर लोणावळा पोलिसाना कसं बोलावणार ? म्हणुन चेंबुरचेच पोलिस एम एल सी करतात.
पण डायमंड गार्डनजवळ पेशंट पडला तर त्याची अर्धी हद्द गोवंडीत व अर्धी चेंबुरात येते... तिथे झिरोचा फंडा घेउन चेंबुर पोलिसला गेलात आणि ते जर गोवंडी हद्दीत असेल , तर तो ऐकणार नाही , तो गोवंडीतच जायला सांगतो.
( गावांची नावे केवळ उदाहरणादाखल वापरली आहेत. )
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 12:24
नवीन
तुमचं चालू द्या हवं तसं.... नेहमीप्रमाणे..
फक्त एक सांगतो सगळे कायदे आधी थेरॉटिकलच असतात.. नंतर प्रॅक्टिकलमध्ये येतात.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 11:41
नवीन
100 नंबर वर कॉल केला तर कंट्रोल रूम ला हमखास दखल घ्यावीच लागते. नेमकं आपण तेच करत नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/17/2016 - 11:45
नवीन
हे केला होता .
फोन लागला नाही.
बर्याच वेळेस १०० नंबर लागत नाही.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 11:54
नवीन
माझ्या मते तरी शक्यता खूप कमी आहे की 100 नंबर फोन नाही लागला.
पण तुम्हाला अनुभव आला असेल तर असू शकेल, हा विश्वास आहे तुमच्यावर.
ज्यावेळेस अशी एखादी घटना घडत/घडलेली असते आणि आपल्याला निर्णय घेता येत नसेल तर सर्व आपत्कालीन क्रमांकावर जरून फोन करून कळवा, नक्की दखल घ्यावीच लागते हे माझ्या अनुभवरून मी सांगत आहे.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 12:06
नवीन
ही सर्वाना कळकळीची विनवणी आहे.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Tue, 10/18/2016 - 06:29
नवीन
माझा अनुभव जरा वेगळा आहे. 100 नंबर ला सलग 3-4 वेळा कॉल करूनही उचलला गेला नव्हता.
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 10/17/2016 - 12:10
नवीन
बर्र... हा घ्या फर्स्ट हँड अनुभव..
मागच्या महिन्यात मी आणि एक मित्र पुणे-खंबाटकी घाट-पुणे अशा प्रॅक्टीस राईडसाठी सायकलने जात होतो.
शिरवळच्या अलिकडे नीरा नदी लागते, ती नदी ओलांडल्यानंतर सातारा जिल्ह्यात आपण प्रवेश करतो. त्या हद्दीच्या बोर्डनंतर काही मीटर्स अंतरावर आम्हाला एका ट्रकने मागून धडक दिली, सायकलींनी सगळा धक्का सहन केला आणि दोघेही खाली पडलो. मित्राला भरपूर मुका मार आणि खरचटले. मलाही मुकामार लागला, किरकोळ खरचटले.
ट्रक पुढे निघून गेला.
मी मित्र तसा ठीक आहे हे बघून एक अनोळखी दुचाकी थांबवली आणि ट्रकचा पाठलाग केला व ४ किमी अंतरावर ट्रक थांबवला.
ट्रक ड्रायव्हरला खाली घेतले आणि पब्लीकने त्याला मारहाण करू नये याची काळजी घेत पहिला १०० नंबरला कॉल केला.
१०० नंबर चे उत्तर - हा फोन पुणे शहर ला लागला आहे, अपघात आमच्या हद्दीत झाला नाहीये, पुणे ग्रामीणला फोन करा. (पुणे ग्रामीणचा नंबर दिला)
पुणे ग्रामीणचे उत्तर - हा अपघात सातारा जिल्ह्यात झाला आहे, आमच्या हद्दीत नाही, सातारा जिल्ह्याला फोन करा.
(सातारा जिल्हा पोलीस ठाण्याचा नंबर दिला)
सातारा जिल्हा पोलीस ठाण्याचे उत्तर - हा अपघात शिरवळ हद्दीत झाला आहे, शिरवळ पोलीस ठाण्याला फोन करा.
मग मी वैतागून विचारले, ते पण मीच करू का? तुम्ही माझा नंबर घ्या आणि शिरवळ पोलीसांना फोन करायला सांगा
थोड्या वेळात शिरवळ पोलीसांचा फोन - कुठे येवू...? (१०० नंबरला फोन केल्यापासून १५ मिनीटांनंतर)
मी पत्ता सांगितला..
आणखी २० मिनीटांनी पुन्हा फोन - कुठे येवू..?
(मित्राला आणखी जास्त वेळ एकटे सोडणे शक्य नसल्याने मी ट्रक ड्रायव्हरला आणि तेथे अचानक उगवलेल्या एका गुंठामंत्र्याला घेवून अपघातस्थळी परत येत होतो. )
मग पोलीसांना सांगितले की "आता आमचे आम्ही बघतो, तुम्ही येवून काय करणार..?"
"बरं.." म्हणाले आणि फोन ठेवला. नंतर काहीही फोन नाही किंवा काय झाले ते विचारण्यासाठीही फोन नाही.
आपले सरकार पोर्टलवर ही घटना टाकली, १६ दिवसांचा समस्या निवारण कालावधी आहे, एक महिना झाला तरी अजून उत्तर नाही.
मग अशा अनुभवांनंतर पोलीसांचा आदर किंवा मान का राखला जाईल..? आमच्या ठिकाणी एखाद्या बड्या नेत्याचा मुलगा असता तर सगळे पोलीस नेत्यांच्या पाया पडत गेले असते याबद्दल शंका आहे का..?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 10/17/2016 - 12:17
नवीन
बाब्बो...ट्रकवाल्याला भर दिवसा समोरुन जाणार्या २ सायकली दिसत नाहीत?
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 10/17/2016 - 12:32
नवीन
वयक्तीक अनुभवातून एक्च गोष्ट लक्षात आली की त्यांचे ब्रीद वाक्यात थोडीशी (उलटापालट)दुरुस्ती करून काय्म अंगिकारले आहे.
खलनिग्रहणाय सतरक्षणाय.
माझ्या आईला आलेला अनुभव उपायुक्त (तत्कालीन) फरासखाना स्टेशनमधला नुसता संतापजनक नाहीच तर अत्यंत माजुर्रडा आणि अधिकाराचा प्रचंड माज (हे कुठे जाणार आहेत असा) होता.
ज्यांच्यावर आरोप आहेत त्याच आरोपींच्या गाडीतून रोज (नित्यनेमाने) चौकी पोलीस न्यायालयात येत असत्,व अगदी सलगीमेने आरोपींबरोबर फिरताना पाहिले आहे.चौकीत तक्रार घेतानाही शिताफीने ज्यांच्याविरूद्ध तक्रार आहे त्यांनाच (हळूच सहय्यकाला सांगून) ,बाहेर पाठवून बोलावून घेतले व माझ्यावर तक्रार देऊ नये असा (निर्लज्ज) दबाव आणला गेला.
इतके असूनही काही (एखादाच) सहृदय्,सुशील पोलीस असेल तर तो फक्त त्याच्या घरच्या संस्काराने असेल आणि त्याला फक्त त्यालाच माझा सलाम असेल (एकून दहापैकी नऊ अनुभव घृणास्पद्/कटु) आलेला आहे.
त्यामुळे त्यांच्याबद्दल कणव अनुकंपा सहानुभुती अजिबात नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल कणव अनुकंपा सहानुभुती अजिबात नाही, सैन्याबद्दल जितके तुरळक वाईट वाचले जाते त्याहीपेक्षा अगदी कमी पोलीसांबद्दल चांगले वाचले/सांगीतले जाते.
अर्थात पोलीसांनाही पैश्यासमोर्/माजासमोर अश्या बाबींची कधी फिकिर्/तमा/पर्वा असेल असे वाटत नाही,पुढेही वाटेल असे वाटत नाही.
मुर्दाड्+लाचखाऊ आणि रानटी पोलीसानुभावने उद्वीग्न नाखु
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 13:37
नवीन
पोलिसांनी मुर्दाड् आणि रानटी असायलाच पाहिजे गुळगुळीत राहून नाही चालणार, असा माझं वैयक्तिक मत आहे.
लाच खाऊ बद्दल तुमच्या बरोबर.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/17/2016 - 13:41
नवीन
मुर्दाड् चा अर्थ काय आहे ??
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 13:45
नवीन
संवेदना नसणारा...
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 13:43
नवीन
हो लाच खाऊ बद्दल एकदम लेटेस्ट किस्सा--
खराडी वाघोली रस्त्यावरील जकात नाक्यावर आज जी वाहने चेकिंग चालू होती त्यातील प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला रु.10,000 टार्गेट आहे, ते पूर्ण केल्यावरच घरी जायचं. SP चा (आभासी) आदेश आहे. निवडणूक आल्या आहेत ना.
सगळ्यांना वाटतंय दिवाळी आली म्हणून स्वतःचे खिसे भरतात.
(चेष्टा नाही करत खरंच आहे )
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/17/2016 - 13:48
नवीन
हे बरंय राव.
आता कॉन्स्टेबलांचा नाविलाज पासून पीएसाय एपीआय, पीआय, एसीपी, डीसीपी करण्यापेक्षा डायरेक्ट मोदीकाकांनाच जबाबदार धरावं आपण हे उत्तम.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 13:58
नवीन
अहो अभ्या जी...
खरंच त्यांना रु. 10,000 टार्गेट आहे, पैसे नक्की कोठे जाणार आहेत हे नाही माहित त्या पामरांना.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/17/2016 - 14:01
नवीन
माहीताय की सोयरे.
सगळे माहीती आहे, मुद्दा हा की जबाबदार धरता येत नै ना कुणाला.
रांजण तर भरलेत खड्याने, पाप घ्यायचे कुणी?
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 14:07
नवीन
त्यांचं म्हणणंय कि सामान्य माणसाने किंमत आणि हिम्मत वाढवावी.... नाहीतर मोदी जबाबदार...
चालायचंच
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 14:12
नवीन
<<<<<<त्यांचं म्हणणंय कि सामान्य माणसाने किंमत आणि हिम्मत वाढवावी>>>>>>
एक्साक्टली....!!
<<<<<नाहीतर मोदी जबाबदार...>>>
या महान आत्म्याला या मध्ये नका ओढू. (त्यांचा संबंध मी इथे जोडण्याचा प्रयत्न नाही करत, कृपया याची नोंद घ्यावी )
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/17/2016 - 14:19
नवीन
सोबत ओळखी ही.
फ्लॅट २४ तास बंद करुन फेस्बुकावर फ्रेंडसलिस्ट वाढवण्यापेक्षा असली ओळखी/कामाच्या ओळखी वाढवाव्यात.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 10/17/2016 - 14:46
नवीन
=))
- Log in or register to post comments
व
वगिश
Mon, 10/17/2016 - 20:27
नवीन
म्हणजे ज्याची कुणाशी ओळख नाही त्याने मुकाट्याने अन्याय सहन करावा? काही लोक भिडस्त स्वभावाचे असतात, त्यांच्या व्यवसाय /नोकरीतही त्यांचा जास्त लोकांपर्यंत संपर्क येत नाही त्यांनी काय करावे??
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 10/18/2016 - 07:20
नवीन
त्यांनी भिडस्त राहू नये. श्रीयुत अभ्या यांना व्यनी करून त्यांचा क्लास लावावा.
:))
- Log in or register to post comments
प
पुंबा
Tue, 10/18/2016 - 11:00
नवीन
नुसत्या ओळखींचा फायदा शुन्य आहे. पैसा हवा.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 10/17/2016 - 14:25
नवीन
नगर रोडवरच्या जकात नाक्यावर दिवसाला दहा हजार रुपये टार्गेट??
मिपाचाच जन्म होऊन दहा वर्षं झाली. मिपाकर त्याआधीच जन्माला आले होते हो!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 10/17/2016 - 14:28
नवीन
१० प्रत्येकी हो.
आता टोळी कीती जणाची आहे त्यावर डिपेंडस. आक्खा ट्रूप लावला असेल तर काय सांगता येतंय.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 10/17/2016 - 15:56
नवीन
ठीके ना. प्रत्येकी दहापण फारच कमी झाले.
नगर रोडवरच्या फॅक्ट्रीज पाहिल्यास तर वेकफील्ड, जॉन डियर (सणसवाडी), ट्रँटर (बहुतेक सणसवाडीच), इंटरव्हेट, माणिकचंद, फियाट, बेकर गॉजेस, डेन्सो, यामाझाकी मझाक एवढ्यांशी तर माझाच या ना त्या मार्गे संबंध आलाय. आणखी कितीतरी असतील.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 11:31
नवीन
मुद्दा 1-नॉन-करप्ट माणूस मी तरी अजून पृथ्वीतलावर पाहिला नाही . कोणीच धुतल्या तांदळाचे नाही मीपण नाही तुम्ही पण. जर तुम्ही जुगाराचे अड्डे पाहत असाल तरी तुम्ही कधी ही त्याबद्दल तक्रार केली नसणार. त्यामुळे पोलिसांना नैतिकता शिकवण्याचा आपल्या अधिकाराला मर्यादा येतात.
मुद्दा 2- भविष्यात तुमच्या बाजूच्या मुलीने तक्रार केली आणि त्यावर काहीच कारवाई नाही केली तर तुम्हीच पुन्हा ओरड कराल. मुळात तुम्ही असल्या प्रकरणामध्ये मध्ये पडायलाच नव्हतंच पाहिजे. आणि पडायचं होतं तर वकिला मार्फत पोलीस स्थानकात गेला असता तर ही शिव्या खायची वेळ तुमच्यावर आलीच नसती. शिव्या देणे हे जरी तुम्हाला अपमानास्पद वाटत असले तरी "इट इज द लान्गव्हेज ऑफ फोर्स". आर्मी मध्ये तर 28-29 राज्यातील 28-29 हजार प्रकारच्या शिव्या दिल्या जातात.
मुद्दा 3- या मध्ये फक्त पोलिसच नाहीत..वकील, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, टॅक्स कॉन्सुलटन्ट आणि ज्याला चरायला रान मिळतं ते सर्वच करतात. मुद्दा 1 मध्ये सांगितलंच आहे.
मुद्दा 4-सर्वानी किती ही डिंग्या हाकल्या तरी सर्वांचा कमी अधिक प्रमाणात देश आणि धर्म एकंच... पैसा
मुद्दा 5-तुम्हाला शिव्या दिल्यावर तुम्ही कसे मिपावर येऊन कळवळु लागला अगदी सेम तसेच. अर्थात मी पोलिसांनी तुम्हाला शिव्या देण्याच्या बाजूने अजिब्बात नाही. पण त्याहीपेक्षा काही मिपाकरांनी निरपराध लोकांना बेदम शाब्दिक मारहाण केल्याची असंख्य उदाहरणे मी पहिली होती, पाहत आहे. त्यांना असे लायसन्स दिली आहेत काय?
मुद्दा 6- शेवटी पिचरच तो
मुद्दा 7- कायदेशीर बाबी बाबत कोणी तज्ज्ञ मिपाकर उत्तर देतील
मुद्दा 8- अभ्यास वाढवा
मुद्दा 9- तुम्हाला कोणा बाबत आदर आहे कृपया यावर पण एक धागा काढा म्हणजे आम्हाला आम्हाला पण मळमळून आमचे मत परिवर्तन करण्यासाठी मदत होईल.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 10/17/2016 - 11:49
नवीन
>>>नॉन-करप्ट माणूस मी तरी अजून पृथ्वीतलावर पाहिला नाही
बरेचजण नॉन करप्टेड असतात . तुम्हाला भेटला नाही याचा अर्थ दृष्टी किंवा संगत सुधारा.
पहिल्या मुद्द्या नंतर बाकी मुद्दे गैरलागू आहेत.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 10/17/2016 - 12:38
नवीन
सहमत आहे.
जास्त मोठा पृथ्वीतल बघायच्या कामाला लागा.
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 11:50
नवीन
मुद्दा १ - नॉन करप्ट ही संज्ञा मी पैशाच्याच संदर्भात वापरली आहे... मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात एकही नवा वा जुना पैसा कुणालाही चारलेला नाही... तुमच्यासमोरची एक नॉन-करप्ट व्यक्ती मी... पोलिसांचं ड्युटी मॅन्युएल मधली गोष्ट आहे जुगारावर नियंत्रण आणणे... मला माझा जीव प्यारा आहे म्हणून मी तक्रार करू शकत नाही. हा डिफेन्स पोलिसांना लागू होत नाही. त्यांना तसे अधिकार असतात, सामान्य माणसांना नसतात.
मुद्दा २ - तुमच्या जास्त माहितीसाठी सांगतो. मी स्वतः वकीलच आहे. लॉ कॉलेज मध्ये प्राध्यापक आहे सध्या. त्यामुळे कुठे काय आणि कसं करायचं हे मला माहित आहे. माझा विरोध शिव्या द्यायला नाही तर तो कोणालाही द्यायला आहे.. (डिफेन्स आणि पोलीस वेगवेगळे ... गल्लत नको)
मुद्दा ३ - प्रत्येक माणसाची समाजात पत आणि स्थान हे वेगवेगळं असतं... एक पेशंट चुकीचा तपासला गेला तर त्या वैयक्तिक व्यक्तीला हानी होते आणि एक गुन्हेगार जर जाणून बुजून सोडला तर समाज धोक्यात जातो... (अर्थात पेशंट चुकीचा तपासण्याचं मी समर्थन करत नाही... हे विशेष सांगणे नं लगे)
मुद्दा ४ - विषय हा कमी अधिक प्रमाणाचा नाही तर सर्वस्वाचा आहे...
मुद्दा ५ - नॉट रिलीव्हन्ट
मुद्दा ६ - अभ्यास वाढवा जमल्यास (जमल्यास वायपी सिंग पण सर्च करा)
मुद्दा ७ - निकाली निघालाय..
मुद्दा ८ - तो तर चालूच असतो सतत माझा... सल्ल्याबद्दल आभारी आहे.
मुद्दा ९ - त्याबद्दल मी आधीच लिहिलं आहे, नंतर पण लिहीन... जमल्यास वाचा... प्रतिसाद नाहीत दिला तरी चालेल.
- Log in or register to post comments
व
विशुमित
Mon, 10/17/2016 - 12:04
नवीन
माझ्या ऐकीव माहिती नुसार वकील आणि पत्रकार लोकांचं पोलिसांबरोबर विळ्या भोपळ्याचा नातं असतं म्हणतात.(कृपया हा. घ्या.)
जर तुम्ही वकील आहात म्हणत असाल तर मला नाही वाटत कोण्या पोलिसांची टाप असेल तुम्हाला किंवा तुमच्या विध्यार्थ्याला शिविगाळ करण्याची.
पोलीस असे का वागतात हे वकील असणाऱ्या माणसाला काही वेगळं सांगायची गरज आहे, असे नाही वाटत.
बाकी चालू द्यात...
- Log in or register to post comments
व
वटवट
Mon, 10/17/2016 - 12:15
नवीन
वकील आणि पोलीस ह्यामध्ये कधीच विळ्याभोपळ्याचे सख्य नसतं दादा... ते दोघे हातात हात घालून जात असतात सगळीकडे... नाहीतर दोघांचाही अवघड होइल...
जर तुम्ही वकील आहात म्हणत असाल तर मला नाही वाटत कोण्या पोलिसांची टाप असेल तुम्हाला किंवा तुमच्या विध्यार्थ्याला शिविगाळ करण्याची.
>>> आता शिवीगाळ झाली ह्याची ऑडिओ क्लिप नाही ओ काढली मी नाहीतर इथे नक्की टाकली असती..
पोलीस असे का वागतात हे वकील असणाऱ्या माणसाला काही वेगळं सांगायची गरज आहे, असे नाही वाटत.>> म्हणून तर मी माझे अनुभव टाकलेत.. आणि निरीक्षण पण नोंदवलय.
- Log in or register to post comments
म
मोदक
Mon, 10/17/2016 - 12:17
नवीन
हा प्रसंग घ्या..
नो पार्किंगमधल्या दुचाकी उचलणार्या टेम्पोने नेहमीप्रमाणे वेड्यावाकडया पद्धतीने दुचाकी उचलल्या आणि नेमका तोच टेम्पो सिग्नलला माझ्या शेजारी येवून थांबला.
नजरेच्या टप्प्यात एक घड्याळाचे चित्र असलेली स्विफ्ट नो पार्किंग बोर्डच्या बरोब्बर खाली उभी होती.
पोलीसाला खुण करून विचारले
"हे तुमच्या हद्दीत येत नाही का..?"
तो म्हणला, "ते आपले काम नाही"
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »