Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पोलीस यंत्रणा नेहमी व्हिलन सारखी का वागते?

व
वटवट
Mon, 10/17/2016 - 08:40
🗣 118 प्रतिसाद
खूप दिवस ही मळमळ मनात खदखदत होती... मिपाचा हा प्लॅटफॉर्म एखादा विषय चर्चिण्यासाठी अगदी योग्य आहे. आणि मुळात, मला माझे मत बदलायचे आहे ह्यासाठी हा विषय मी इथे मांडत आहे... पोलीस कायद्याचे रक्षक आहेत. ते आपल्यासाठी आहेत. ते आपल्यासाठी त्यांचे कर्तव्य पार पाडत असतात. ते खूप हालअपेष्टा सोसत असतात. त्यांचा पगार खूप कमी असतो. तरी ते आपल्यावर उपकारासारखं काहीतरी करत असतात. आपण त्यांचा आदर केला पाहिजे. आपण पोलीस मित्र म्हणून वागलं पाहिजे. आपलं संरक्षणखातं आणि पोलीस खातं एकंच काम करतं. ते बाहेरच्या शत्रूंच्या विरोधात लढतात आणि हे आतल्या शत्रूंच्या विरोधात... वगैरे वगैरे... लहानपणापासून हेच ऐकत आलोय. वर्तमानपत्रातून... रेडिओवर... चर्चासत्रांतून... सोशल मीडियातून हाच सूर दिसतो. पण माझं निरीक्षण खूप वेगळं आहे. कदाचित सगळ्यांचंच तेच निरीक्षण असेल. १. पोलीसखातं महसूल खात्यासारखंच अत्यंत करप्ट आहे. बहुतेक पोलिसांचं पोट उगाच वाढलेलं नसतं. जे उन्हातान्हातून ट्रॅफिक आणि गर्दी कंट्रोल करतात ते जास्त करून झीरो पोलीस असतात, कॉन्ट्रॅक्टबेसिस वरचे. तेही अधूनमधून हात मारतच असतात. पुण्यात जवळपास बर्याच पोलीस स्टेशन जवळ ऑनलाईन मटका जोरात चालतो. तिथले पोलीस आंधळे नसतात. दणक्यात मलिदा मिळतो... अगदी कमिशनर पर्यंत हे पैसे जातात असं ऐकलंय... नॉन-करप्ट पोलीस माझ्यातरी पाहण्यात नाही. आमच्या गावातल्या एका पोलिसांचं प्रकरण तर विधानसभेत गाजलं होतं.. आता त्यांना आमदारकीची स्वप्ने पडत आहेत. २. पोलीस कधीही आपले मित्र म्हणून वागत नाहीत. उलट त्यांचे हात मोकळे करायचे साधन म्हणजे सामान्य जनता, बऱ्याचदा असंच त्यांचं वर्तन असतं. अश्यातला माझा अनुभव सांगतो.. आमच्या कॉलेजमध्ये एक प्रकरण घडलं होतं. मुलीच्या तक्रारीवरून मुलाला वाकड पोलीस चौकीवर बोलावलं. तिच्या नुसत्या तक्रारी वरून मुलाला बेदम मारलं.. एक दिवस कस्टडीत पण होता तो. आम्ही फॅकल्टी म्हणून तिथे गेलो होतो. त्यांनी आम्हाला विचारलं "इथे कशाला #$%$ घालायला आला आहात?" आम्ही म्हणालो कि आमचा विद्यार्थी आहे तो म्हणून आलोय. मग ते म्हणाले "मग काय त्याला आमच्या $%# वर बसवू" आंम्ही म्हणालो "अहो तो मुलगा लहान आहे हो आणि काहीच चौकशी नं करता का त्याला मारताय?" त्यांनी आमचा अजून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि आमच्या अंगावर "जाता कि नाही आता" म्हणून आले. आम्ही निघालो. दुसर्या दिवशी त्याला बेल मिळाली. एक आठवड्यात त्याने कॉलेज मधून टीसी घेतला. कॉलेजची बदनामी नको व्हायला म्हणून आम्हाला शांत बसायला सांगितलं गेलं. निदान मला तरी तुलनेने कायदे जरा जास्त माहिती आहेत. काय उपयोग? फाटायची ती फाटलीच कि... सामान्य माणसाची काही वेगळी गत असते? नुसत्या तक्रारीवरून कुठलीही चौकशी नं करता मारहाण करायचा त्यांना परवाना दिलेला असतो. ३. कुठलाही नवीन कायदा पास झाला कि ह्यांना चरायला कुरण सापडतं. ह्यांना खायच्या संधी मिळतात. साधारण आरोपी जरी असला तरी त्याला नं मारण्यासाठीसुद्धा पोलीस पैसे घेतात. बलात्काराचा आरोपी असला तर विचारायलाच नको. त्यातल्यात्यात जेंव्हा डोमेस्टिक व्हायोलन्स ऍक्ट पास झाल्यापासून तर त्यांना दाबून पैसे कमावण्याची संधी प्राप्त झालीये. एका केसमागे कित्येक लाख मिळतात, तेही बिनबोभाट... खरंतर इतकि उदाहरणे मला व्यक्तिशः माहित आहेत पण असल्या गोष्टींचे पुरावे नसतात कधीच म्हणून इथे लिहिता येत नाहीत... जर कोणी गरीब ह्या भानगडीत फसला तर मेलाच म्हणून समजा... हे खातं गरिबांसाठी नाही... आताच ट्रॅफिकरुल्स अजून कडक केलेत आणि दंडाची रक्कमपण वाढलीये...सो.. पोलिसांचा भाव पण वाढलाय. ४. जेल ऍडमिनिस्ट्रेशन आणि तिथे चालणारे गोंधळ ह्यावर तर एक मोठा प्रबंध होऊ शकेल. श्रीमंत आणि सेलिब्रिटी गुन्हेगारांना प्रचंड ऐषाराम कसा मिळतो आणि त्यावर कसं त्यांचं अर्थपूर्ण जीवन अवलंबून असतं हे सर्व ओपन सिक्रेट आहे. अबू सालेम ने जेलमधला महागडा असा टीव्ही फोडला होता. कोण त्याला बोलल्याचं ऐकिवात नाही. त्याने त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती, हे चालवून घेतलं जातं? त्यांच्यादृष्टीने देशद्रोही बिशद्रोही असलं काही नसतं... त्यांचा देश आणि धर्म एकंच... पैसा. ५. काही पोलिसांना मारलं कि लगेच सगळ्या देशातून पोलिसांच्या बाजूने आवाज सुरु लागला. अर्थात मी पोलिसांना मारण्याच्या बाजूने अजिब्बात नाही. पण त्याहीपेक्षा पोलिसांनी निरपराध लोकांना बेदम मारहाण केल्याची असंख्य उदाहरणे मी पहिली होती, पाहत आहे. त्यांना असे लायसन्स दिली आहेत. ६. गेल्या महिन्यात बाणेरच्या यशदामध्ये माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंग दिग्दर्शित आणि लिखित "क्या यही सच है" ह्या चित्रपटाचे स्क्रिनिंग होते. तेंव्हा मी आमच्या कॉलेजच्या मुलांना घेऊन तिथे गेलो होतो. चित्रपट तांत्रिक आणि अभिनयाच्या बाबतीत फार काही उच्च वगैरे नाही. अगदीच साधारण आहे. पण ज्या काही गोष्टी दाखवल्या त्या खूप हॉरिबल होत्या. काही गोष्टींचा अंदाज येणं वेगळं आणि त्याच गोष्टी खऱ्या आहेत ह्याची खात्री होणं वेगळं. कमिशनरच्या नेमणुकीला स्पॉन्सर लागतात आणि त्याचा जो काही रेट असेल तो ते स्पॉन्सर देतात, हे मला नवीन होतं. चित्रपट दाखवून झाल्यावर मी खुद्द वाय.पी. सिंग ह्यांनाच मी प्रश्न विचारला होता कि, जर एव्हढं हे खातं भ्रष्ट आहे तर आम्ही त्याच्यावर विश्वास का आणि कसा ठेवावा? त्यावर त्यांनी थातूरमातूर उत्तर देऊन वेळ टाळली. मला काय ते उत्तर मिळायचं ते मिळालं. ७. बांधकाम क्षेत्रात आज कित्येक अंडरवर्ड डॉन्सचे पैसे गुंतले जात आहेत आणि पुण्यात तरी बहुतेक एजंट्सना ते माहित आहे. पोलिसांना माहित नसेल? ८. अंतर्गत सुरक्षा खरंच ते सांभाळतात? ह्यावर मला खरंच शंका आहे. कारण पोलीस खातं हे नेहमी नेहमी विकलं जाऊ शकणारं खातं आहे. ९. मुळात मला पोलिसांबद्दल अजिब्बात आदर वगैरे नाही. उलट माझी सटकते, नेहमीच. ही सर्व माझी वैयक्तिक मते आहेत. (माझी ही मते फक्त पोलिसांसंबंधीच आहेत)

प्रतिक्रिया द्या
20390 वाचन

💬 प्रतिसाद (118)
व
वटवट Mon, 10/17/2016 - 12:21 नवीन
हा हा हा हा.... प्रसंग डोळ्यासमोर आणून पाहिला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 10/17/2016 - 12:29 नवीन
असे लै प्रसंग आहेत. कार्बाईन लटकावून सायकल ट्रॅकमधून बिनदिक्कतपणे चुकीच्या साईडने गाडीने येतात आणि विचारले तर नेहमीचे उत्तर असते, "इमर्जन्सी आहे" स्वारगेटच्या वाहत्या ट्रॅफिकमध्ये वन वे रस्त्यावर काहीही सूचना न देता, डायरेक्ट यु टर्न मारणार्‍या महिला कॉन्स्टेबल.. वरचे लोक चांगले असतीलही पण आपण डायरेक्ट वरच्या लोकांपर्यंत जावूनही फार फायदा होत नाही. तळातल्या याच गणंग लोकांकडून आपले काम थांबवले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
व
विशुमित Mon, 10/17/2016 - 12:34 नवीन
साहेब ...वरचे लोक चांगले असते तर ह्या खालच्या लोकांची काय बिशाद अशी वागण्याची. खालचे आणि वरचे लोक असे संबोधून नवा जातीवाद निर्माण होण्याची भीती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
वटवट Mon, 10/17/2016 - 12:53 नवीन
विशुमितजी... आता ह्यात जात कोठून आली? दादा.. मनापासून विनंती आता ह्यात जात आणू नये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
च
चिनार Mon, 10/17/2016 - 12:58 नवीन
वटवट भाऊ.. तुम्हाला गम्मत कळली का ?...जात आली पण अजून 'साहेब' नाही आलेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
व
वटवट Mon, 10/17/2016 - 13:17 नवीन
हम्म्म... येतील लवकरच... मग विषय राहिला बाजूला ह्यांचीच ओढाओढी सुरु होईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
व
विशुमित Mon, 10/17/2016 - 12:29 नवीन
धनुष्यबाण , कमळ, हत्ती असला असता तर लगेच कारवाई झाली असती हेच सूचित करायचं दिसतंय तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Mon, 10/17/2016 - 12:46 नवीन
तुमच्या वाक्यातून "धनुष्यबाण, कमळ, हत्ती असला तरी चुकीला चूकच म्हटले जाते, आणि कोणाचाही काका, पुतण्या असला तरी दोषींवर कारवाई केलीच जाते" असा संदेश जात आहे. जरा विचार करून फाटे फोडा हो... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ब
बोका-ए-आझम Mon, 10/17/2016 - 16:24 नवीन
मी असं म्हणेन की प्रत्येकाची किंमत असते. एखादा non-corrupt आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ एकच. त्याची किंमत जास्त आहे एवढंच. आता याला cynical म्हणा किंवा काहीही. So, there can be non-corrupt people but no one is non-corruptible
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
वटवट Mon, 10/17/2016 - 16:43 नवीन
अगदी... पाणी आहे ते घाण होऊ शकण्याच्या शक्यतेवरच.... फक्त... प्रत्येकाने आपापले पाणी ठरवावे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माझीही शॅम्पेन Mon, 10/17/2016 - 11:32 नवीन
माझा कोणाही पोलिसा विषयी आकस नाही पण तुम्ही मांडलेले बरेचसे मुद्दे खरे आहेत मागे कुठे तरी वाचल होत , पोलिस म्हणजे भारतातील सर्वात संघटित गुन्हेगारी संघटना आहे म्हणून. असो अभावानेच चांगले अनुभव सुद्धा येतात जो पर्यंत पोलिसांच्या कंट्रोलस नेत्यांच्या हातात आहेत तो पर्यंत काही खर नाही :(
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 10/17/2016 - 12:45 नवीन
दोन वर्षांपूर्वी घरातील दागिने आणि मोबाईल दिवसाढवळ्या चोरीला गेले. मोबाईल ट्रेकिंगमुळे काही दिवसांनी चोर पकडले गेले. चोर म्हणजे आठवी-नववीतले 2 पोरं होते. मुलांनी गुन्हा काबुल केला पण दागिने मिळाले नाहीत ! या केसमध्ये एकदोन पोलीस नसून स्वतः पोलीस कमिशनरसुद्धा इन्व्हॉल्व होते. पोलिसांच्या मते : ही मुलं अतिशय बदमाश असून अजिबात सहकार्य करत नाहीत. खोटंनाटं सांगतात. मुलं लहान असल्यामुळे थर्ड डिग्री वापरता येत नाही. त्यामुळे दागिने कुठे आहेत हे आम्हाला कळू शकत नाही. चौदा-पंधरा वर्षांच्या मुलांकडून पोलीस माहिती काढू शकत नसतील हे ज्याला पटते त्यांनी पोलिसांचा जयजकार करावा.
  • Log in or register to post comments
C
chitraa Mon, 10/17/2016 - 12:58 नवीन
अरेरे ! मोदी येउनही असेच आहे ?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Mon, 10/17/2016 - 13:11 नवीन
हजारात एखादा चांगला नेक बंदा असतो, तोही कसा ड्युटी करत असेल उरलेल्या ९९९ जणात कोण जाणे. बाकी माझ्या इथे ३-४ पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे (खाजगी) आहेत. तिथल्या प्रशिक्षणार्थींचा आत्तापासूनचाच माजुर्डेपणा पाहून पुढे कशा टाइपचे पोलीस पाहायला मिळतील त्याचा अंदाज आलेला आहे. माणूस चांगला अथवा वाईट ह्याचे जे मीटर दुसर्‍याला जज करताना लावतो ते पार गंडलेले आहे. पोलीस हे तर गंडलेल्या मीटरांसोबतच जास्त काळ असलेने त्याबाबतीत काही बोलणे अवघड झालेले आहे.
  • Log in or register to post comments
व
वटवट Mon, 10/17/2016 - 13:26 नवीन
मी त्याच नेक बंद्याच्या शोधात आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 10/17/2016 - 13:35 नवीन
आम्हाला माहीतीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
व
विशुमित Mon, 10/17/2016 - 14:07 नवीन
पोलीस यंत्रणा नेहमी व्हिलन सारखी का वागते? या धागा शीर्षका खाली विचारण्यात आलेला प्रश्न बाबतची उत्तर दिली तर एक सकस चर्चा होईल असं वाटतं, नाही तर कोणी एकचं पोलिसांची बाजू घेणार आणि बाकी त्याच्यावर तुटून पडणार यात काही हाशील नाही. अशी काय कारणं असतील ज्यामुळे पोलीस यंत्रणा व्हिलन सारखी वागत असतील ?? 1)सामाजिक कारण 2)राजकीय कारण 3)नैतिक कारण 4)कायदेशीर कारण 5)व्यक्तिसापेक्ष कारण 6)भौतिक कारण 7)पारिवारिक पार्श्वभूमी चे कारण 8)अजून काही इतर कारण
  • Log in or register to post comments
व
वटवट Mon, 10/17/2016 - 14:15 नवीन
कसंय विशुमित जी... ज्यांना पोलिसांची बाजू घ्यायची आहे ना त्यांनी कारणे द्यावीत.... जे पोलिसांच्या ह्या वर्तनाचे बळी आहेत किंवा ज्यांना त्यांचं वागणं पटत नाही ते कशाला कारणं देतील... आणि कारणं दिली तर चूक बरोबर मध्ये परावर्तित होत नाही... नाहीतर प्रत्येक गुन्हेगार असंच म्हणत फिरेल कि मी काही हा गुन्हा विनाकारण केलेला नाहीये. शिव्या घालण्याऐवजी माझी कारणं समजून घ्या... हे असं नाही ना चालत?
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 10/17/2016 - 14:25 नवीन
हेच्च म्हणतो..कारण काहीही असलं तरी सामान्य माणसाला पोलीस खात्याचा उपयोग तर होतंच नाही उलट त्रास होतो. पोलिस खातं ज्या उद्देशानं स्थापन करण्यात आलं आहे ते दूरच राहिलं..अर्थात हे वाक्य अन्य कितीतरी खात्यांविषयी पण तितकंच खरं आहे. पण पोलिसखात्याचा संबंध नागरिकांच्या सुरक्षेशी आहे. आणि सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असलं पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
व
विशुमित Mon, 10/17/2016 - 14:22 नवीन
<<<<<<<<जे पोलिसांच्या ह्या वर्तनाचे बळी आहेत किंवा ज्यांना त्यांचं वागणं पटत नाही ते कशाला कारणं देतील... आणि कारणं दिली तर चूक बरोबर मध्ये परावर्तित होत नाही...>>> -- सहमत
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 10/17/2016 - 14:23 नवीन
<<<<जे पोलिसांच्या ह्या वर्तनाचे बळी आहेत किंवा ज्यांना त्यांचं वागणं पटत नाही ते कशाला कारणं देतील... आणि कारणं दिली तर चूक बरोबर मध्ये परावर्तित होत नाही...>>>> --सहमत
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Mon, 10/17/2016 - 14:50 नवीन
मोबाईल सरळ सरळ चोरीला गेला तरी हरवला आहे अशी तक्रार नोंदवायला सांगतात !!!
  • Log in or register to post comments
म
मोदक Mon, 10/17/2016 - 14:52 नवीन
कारण त्यांना "किती चोर्‍या झाल्या आणि त्यातल्या किती उघडकीस आल्या" याचा रिपोर्ट द्यावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
स
संदीप डांगे Mon, 10/17/2016 - 17:24 नवीन
जास्त काही सांगत नाही, टेराबाईटी होईल, एका कमिश्नराच्या कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होते काही काळ, त्यामुळे गाळ किती, चिखल किती, चांगले स्वच्छ पाणी किती याचे फर्स्ट हॅन्ड अनुभव आहेत, अर्थात लेखातल्या मुद्द्यांशी सहमत, वेळ मिळाल्यास अधिक लिहीन.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Mon, 10/17/2016 - 17:41 नवीन
डांगेजींना प्रत्येक गोष्टीत फष्ट ह्यांड अनुभव कस्काय असतात? पोलीस, कॉर्पोरेट जगत, राजकीय जगत, शिक्षण जगत अनेक प्रकारच्या धाग्यांवर यांचे फष्ट ह्यांड अनुभव असतात. बराच लोकसंग्रह दिसतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 10/17/2016 - 19:46 नवीन
आम्ही लिहितो, इतर लिहीत नैत. अनुभव प्रत्येकाकडे असतातच. बाकी आमची लाईफष्टुरी अंमळ डिफ्रंट असल्याने आश्चर्य वाटणे साहजिक आहे, आत्मचरित्र लिहू तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
न
नाखु Tue, 10/18/2016 - 05:17 नवीन
आमच्या साठी राखून ठेवणे आपल्या सहीसक्ट... चौकशी : नाव नोंदणी कुठे चालू आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 10/17/2016 - 17:26 नवीन
बाकी घाटपांडे सर खुद्द dipartment वाले, त्यांचे अनुभव इतर कुणापेक्षाही जास्त विश्वासू असतील..
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/18/2016 - 12:04 नवीन
अहो आम्ही बिनतारी पोलीस म्हणजे बिनविषारी सापासारखे. भ्रष्टाचार अनास्था सगळीकडे भरलेली आहे. निवृत्त झाल्यावर ही आम्हाला त्रास होता व आहे. पहा http://bintarijagat.blogspot.in/2007/08/blog-post.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Tue, 10/18/2016 - 12:55 नवीन
तुमच्या ब्लॉग वरचा मिपाचा दुवा मिसळपावा.कॉम असा आहे.. तो सवडीने नीट कराल का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/18/2016 - 13:02 नवीन
धन्यवाद! दुरुस्ती केली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ज
जानु Mon, 10/17/2016 - 17:59 नवीन
एकदा दुपारी घरीच सुटीवर होतो. मुलाच्या शाळेतील एक बाई एका रिक्शात बसलेल्या होत्या. तो रिक्शावाला त्यांना मोबाईल वर काहीतरी दाखवत होता. ती बाई गयावया करुन बोलत होती. आमच्या वरच्या घरातील बाईने सदर बाब सांगितली. मी जोशात पोलिसांना फोन करुन बोलावले. दोन पोलिस गाडीवरुन आले आणि त्याला घेउन गेले. बाईला थांबायला सांगितले. पण बाई गायब. दोन तीन दिवसांनी माझ्या स्वयंपाकाच्या रुमची काच रात्री १० च्या आसपास दगड मारुन फोडली गेली. तपास केला तर तोच माणुस होता असे समजले. मुले आणि सौ घाबरले. मग मी ती घटना सांगितली. सौ आणि मुलांकडुन अजुन उपदेशाचे डोस घेतले. असे काही अत्यंत घाणेरडे अनुभव या खात्याने दिलेत. त्यांच्यावर होणार्‍या हल्याबद्दल अजिबात आश्चर्य वाटले नाही. आणि वाईटतर त्याहुन नाही. असतील काही चांगले पण ते गुलबकावलीचे फुल. कोणी पाहिले?
  • Log in or register to post comments
र
रविकिरण फडके Mon, 10/17/2016 - 18:28 नवीन
पण पोलीस विनोदीसुद्धा असतात हो. साधारण दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर उभी केलेली एक मोटार गाडी आमच्या कॉलनीतून रात्रीच्या वेळेस चोरीला गेली. मालक सकाळी बाहेर येऊन पाहतो तो मोटार गायब. मग पोलिसात तक्रार इ. सोपस्कार झाले. काही महिन्यांनी गाडी कुठेतरी सोडून दिलेले मिळाली आणि त्यानंतर त्या मालकाच्या पोलीस स्टेशनला फेऱ्या सुरु झाल्या. कशाला? तर कुणी संशयित आरोपी मिळाला की पोलीस मालकाला बोलवायचे, चोराची ओळखपरेड व्हायची. बिचारा मालक मेटाकुटीस आला; तो घरात झोपलेला असताना गाडी रस्त्यावरून चोरीला गेली तर कसा ओळखणार तो चोराला? पण पोलिसांना काही हे पटत नाही. ते आपले बोलवीत राहतात गाडीच्या मालकाला. दोन तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मुलाची नवीन कोरी व महागडी सायकल चोरीला गेली. मी विचारलं तू तक्रार केलीस का पोलिसात? तेव्हा त्याने मला वरील किस्सा सांगितला. 'मेरा भारत महान' असे म्हणून मी त्याचा निरोप घेतला, आणखी काय?
  • Log in or register to post comments
म
मनो Mon, 10/17/2016 - 22:05 नवीन
चांगले पोलीस ... वारजे पोलीस चौकीतले डी टी चव्हाण आणि कॉन्स्टेबल कदम रात्री 2 ते 7 पाच तास काम करूनही त्यांनी एकही रुपया घेतला नाही - आम्ही स्वखुशीने देऊनही. सविस्तर लिहितो नंतर, पण इतक्या वाईट अनुभवांमध्ये एक तरी चांगला असावा म्हणून टाकली प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 10/17/2016 - 22:41 नवीन
जास्त अनुभव नाही पोलिसांचा. एकदा कोथरूडमध्ये बाईक वर थांबलो होतो सिग्नलला. एक रिक्षावाला मागून येऊन धडकला. त्याच्या हेडलाईटची काच फुटली. वर माझ्याकडेच 200 रु. भरपाई मागू लागला. देणार नाही बोलल्यावर 'अमके तमके साहेब माझ्या ओळखीचे आहेत. फोन करीन बोलला.' मी पण बोललो 'कर फोन आणि बोलावं तुझ्या साहेबाला.' हा फोन लावतोय तर नंबर 'आऊट ऑफ सर्विस' :) मग मीच 100 नंबर वर फोन केला. 5 मिनिटात 2 बीट मार्शल आले. तिथून सगळी वरात चौकीत. 'कितीही वेळ काथ्याकूट होऊ दे. एक पैसा पण देणार नाही. मला घरी जायचे अजिबात घाई नाही' असे स्पष्ट्पणे बोललो. रिक्षावाला पण कंटाळला नंतर. 200 रु. भरपाई मागण्याच्या नादात बिचाऱ्याचा 2 तास धंदा बुडाला. पोलीस पण कंटाळले. 100 नंबर वर फोन करून बोलावले असल्याने गुन्हा नोंद झाला होता. मग आमची एकमेकांबद्दल काहीही तक्रार नाही ह्या स्टेटमेंट वर सही घेऊन जायला सांगितले. :)
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 10/17/2016 - 23:42 नवीन
मला तर पोलिसांची दयाच जास्त येते. हजारो निरर्थक कायदे बजावण्याची ह्यांच्यावर जबाबदारी. ह्या पैकी अनेक कायदे तर एकदम मुंडू लेव्हल चे असतात. पासपोर्ट व्हेरिफिकेशन ह्यातील पहिल्या नंबर वर आहे. आमचे एक स्नेही पासपोर्ट करून देण्याचा धंदा चालवतात. तर म्हणे पोलिसांना महिन्याला अमुक इतकी रक्कम दिली कि कुणाचाही पासपोर्ट वेरिफिकेशन थे थांबवून ठेवत नाहीत. सगळ्यांत भिकार कायदा कुठला असेल तर "दारू पिऊन चालवण्याचा". म्हणजे कायदा बरोबर असला तरी तोंडाचा वास घेण्याचे जे काम काही पोलीस करतात हे मानवी अधिकारांचे उल्लंघन असेच समजले पाहिजे (दोघां साठी). कायदा केला आहे तर किमान पोलिसांना ब्रेथ एनएलझेर तरी द्या. फायदा एक कि तरी वाट्टेल तशी गाडी दुचाकी चालवली तरी महिलांना मात्र पोलीस थांबवू शकत नाहीत !
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 10/17/2016 - 23:50 नवीन
पोलीस खाते राज्य सरकारच्या हातांत ठेवायचा जो नियम आहे जो बहुदा ब्रिटिश सरकार साठी बरोबर होता कारण मूठभर सत्ताधारी लोकांना इतर जनतेची गळचेपी करणे सोपे जात होते. राज्य पोलिसांची संख्या कमी करून खरे तर नगरपालिका, ग्रामपंचायत ह्यांना आपले छोटे पोलीस ठाणे चालविण्याची मुभा असली पाहिजे. बहुतेक मुंडू लेव्हल ची जी कामे असतात ती तरी सहजगत्या होतील. भाडेकरू ओळख, नोकर ओळख, पासपोर्ट व्हेरिफिकेशन, समन्स बजावणे इत्यादी इत्यादी जी फुटकळ कामे असतात ती कमी खर्चांत लोकल बॉडी जास्त चांगल्या पद्धतीने करू शकत त्या शिवाय चांगली सर्व्हिस नाही मिळाली तर आम्ही लोकल प्रतिनिधींना भेटून किमान तक्रार तरी करू शकतो.
  • Log in or register to post comments
व
वटवट Tue, 10/18/2016 - 04:00 नवीन
अगदीच अपवाद सोडला (तोही रिमूव्ह केला जाईल लवकरच) तर एकही कायदा निरर्थक नाही. आणि पोलीस खाते जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात जर दिले. सरळसरळ ते ताटाखालचं मांजर होऊन बसेल. आमदार आणि नगराध्यक्ष अनभिषिक्त सम्राट होतील तालुक्याचे जे अत्यंत धोकादायक आहे... अंमलबजावणी करणारं खातं आणि कायदे बनवणारं खातं ह्यामध्ये अंतर असायलाच हवं...नाहीतर गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड होतील... असं मला वाटतं. आणि जेव्हढे जास्त कायदे तेव्हढे त्यांचे इन्कम सोर्स जास्त हे खरं...
  • Log in or register to post comments
ब
बापू नारू Tue, 10/18/2016 - 06:22 नवीन
आत्तापर्यंतच्या आयुष्यात तर यांचा फक्त त्रासच झालाय ,आंदोलने-दंगली होतात तेव्हा सगळ्यात जास्त तोडफोड हीच मंडळी करते आणि नाव आंदोलकांचं लावून मोकळे होतात ,कोल्हापूर मधील शेतकरी आंदोलनावेळी प्रत्यक्ष पाहिलं होत ,एकाही आंदोलकाने कोणत्याही गाडीची तोडफोड केली नव्हती ,यांच्याच पार्किंग van मधून रस्त्यावरील 2-wheeler भरून-भरून पोलीस स्टेशन मध्ये आणून 5-6 जण लोखंडी रॉड ने त्या चेपवत होते. हि जात किती नीच असते हे त्यावेळी चांगलच अनुभवलं .
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Tue, 10/18/2016 - 08:27 नवीन
वरळीला पासपोर्ट औफिस आणि परीसरात रात्री अपरात्री नेहमी वाटमारी व्हायची. पोलिसात गेल्यावर थातुरमातूर लिखापढी करून फिर्यादीला परत पाठवले जायचे. तक्रारीवर कधीच कार्यवाही केली जात नव्हती. कारण? वाटमारी करणारे पोलिसांचीच मुलं, वरळीच्या पौलिसकैंपात राहणारी.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Tue, 10/18/2016 - 08:27 नवीन
मावळच्या गरीब शेतक-यांमागे धाऊन गाेळीबार करणारे आझाद मैदानात महिला पाेलिसांची अब्रु वाचवू शकले नाहीत. तिथे का ह्यांना लकवा मारला हाेता? संपादित प्रतिसाद लिहिताना सभासदांनी भान राखावे अशी किमान अपेक्षा आहे. : संपादक
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 10/18/2016 - 09:55 नवीन
??? माफ करा, पण पोलीसांच्याबद्दल तुम्हाला कितीही राग असला तरी हा प्रतिसाद पटला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 10/18/2016 - 10:11 नवीन
असे प्रतिसाद नकोतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पुंबा Tue, 10/18/2016 - 11:02 नवीन
तुकाराम ओंबळे, करकरे, साळस्कर, कामटे हेदेखील पोलीसच होते. या प्रतिक्रियेशी तिव्र असहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
न
नाखु Tue, 10/18/2016 - 08:55 नवीन
प्रतिक्रिया किमान "पोलीसांच्या भावाने/मुलाने/मित्राने" वाचल्यावर किमान पोलीसाम्बद्दल सर्वांची फक्त भ्र्ष्ट(लाच खाणारा) अशी नसून अमानवी/घृणास्पद वागणूक देणारा आणि उपद्रवी/माजुरडा (प्रंसगी राजसत्तेसमोर/गुंडासमोर्/पैशासमोर लाळघोट्या) आहे हे पुन्हा पुन्हा अनुभवले आहे म्हणून अत्यंतीक तिडीकेने लिहिल्या आहेत. अपवादात्म्क चांगले अनुभव असतील तर नावानिशी प्रसिद्द करावेत भांगेत तुळस पहायला हवीच की सगळ्यांना !!!!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 10/18/2016 - 09:38 नवीन
काेणताही पाेलिस मेल्याची बातमी मी वाचतो तेव्हा मला खूप समाधान वाटते. असेच समाधान नक्सली, दहशतवादी, पाकिस्तानी इत्यादींना ही वाटते, विकृती एट इट्स बेस्ट. असो, जास्त बोलून उपयोग नाहीये इथे तरीही राहवले नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 10/18/2016 - 09:54 नवीन
आपापले अनुभव आहेत बापू, ज्यांना तुळस मिळत नाही त्यांच्या भावना विकृत वाटणे साहजिक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुबोध खरे Tue, 10/18/2016 - 10:20 नवीन
बापूसाहेबांशी सहमत निर्ढावलेला गुन्हेगार किंवा दहशतवादी मारला गेला तर त्याचे समाधान वाटणे एक गोष्ट आहे पण एखादे लहान बालक मग ते पाकिस्तानी जरी असेल तरीही त्याच्या मृत्यू बद्दल समाधान वाटणे बरोबर नाही. "कोणताही" पोलीस मेल्या बद्दल "समाधान वाटणे" हि आत्यंतिक प्रतिक्रिया आहे आणि वाईट अनुभवातून गेल्यामुळे भावनेच्या भरात श्री राम राम यांनी हि प्रतिक्रिया दिली असावी असे मी समजतो. पण जर थंड डोक्याने विचार केल्यावर त्यांना "तसेच" वाटत असेल तर मात्र ते विकृतीचे लक्षण समजावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 10/18/2016 - 10:40 नवीन
सहमत आहे,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Tue, 10/18/2016 - 09:57 नवीन
परवाचीच गोष्ट, एक पोलीस नो हेल्मेट, नंबर नसलेली, काहीतरी 'आई' असे लिहिलेली बुलेट चालवत जात होता, कोणाला जाब विचारावा याबद्दल!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा