Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तू नाहीस ...

क — कवि मानव, Mon, 10/17/2016 - 13:01
तू येणार नाहीस हे माहित असताना, मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी गेलो होतो, न पुन्हा एकदा मैफिल जमवावी म्हणून, जुन्या आठवणींना नव्याने हाक देत होतो !!१! संध्याकाळ डोक्यावरून हळूहळू सरत होती, धरणीने आकाशाला दिलेलं आलिंगन पाहून भारावलो होतो, न आपण एक असण्याच्या एखादा तरी पुरावा म्हणून, तिथल्या दगडांवर आपले दोघांचे नाव कोरत होतो !!२!! सरोवराचा गारवा अंगाला भिडत होता, तु जवळ होतीस त्या आठवणींनी उब घेत होतो, जड पावलांनी घरी परतल्या हे कळलं की, मी उगाच तुझ्या आठवणींचे ओझे वागवत होतो !!३!! त्या रात्री झोप वैरी झाली होती, उघड्या डोळ्यांनी तुझ्या आठवणींच्या स्वप्नात बुडालो होतो, रात्रभर चमचमणाऱ्या तारे पाहून असमाधानी राहिलो, कारण मी अमावसेच्या रात्री चंद्र शोधत होतो !!४!! आठवणींना आठवत प्रहर झाली होती, बर्याच दिवसांनी रीयाजा करता तानपुरा घेतला, तर आयुष्याच्या तुटलेल्या तारांवरती, आपल्या विरहाची भैरवी गात होतो !!५!! तू येणार नाहीस हे माहित असताना...........

प्रतिक्रिया द्या
1160 वाचन

💬 प्रतिसाद (2)
र
राजेंद्र देवी Mon, 10/17/2016 - 13:22 नवीन
कविता आवडली... छान आहे....
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Mon, 10/17/2016 - 13:33 नवीन
_/\_ हलकी फुलकी :))
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा