Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिसत जावं माणसानं

म — मंदार दिलीप जोशी, Mon, 10/17/2016 - 15:19
हल्ली मोबाईल आणि सोशल मिडियामुळे भेटीगाठी अधिकच दुर्मीळ होऊ लागल्या आहेत. याच विषयावर एका मित्राने आज एक सुंदर हिंदी कविता पाठवली आणि विषय जिव्हाळ्याचा असल्यानं चटकन मराठी रुपांतर/भाषांतर सुचलं. आधी मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता असं देतो आहे. हिंदी कवी कोण ते मात्र समजू शकलं नाही. मराठीत रूपांतर करताना एक कडवं अधिकचं जोडलं आहे. दिसत जावं माणसानं - © मंदार दिलीप जोशी http://mandarvichar.blogspot.com/2016/10/blog-post.html कालगतीच्या तीव्र प्रवाही पोहत जावं त्वेषानं क्षणभंगुर जीवनात या पण दिसत जावं माणसानं आठवणींचा साठा मोठा क्षणात विस्कटू नये कधी मैत्र जीवांचे होऊन हृदयी बोलत जावं माणसानं हसर्‍या चेहर्‍यांमागे काही दु:ख मानसी बाळगती हात घेऊन हाती मित्राचा बसत जावं माणसानं प्रत्येकाचे दु:ख वेगळे विषाद निराळा असतो रे मित्रांचंही जगणे थोडं वाटून घ्यावं माणसानं कोण कुठवर सोबत असतो कोणा असते ठावूक ते भेटण्याची कारणे नित्यनूतन विणत जावी माणसानं ओझरती कधी भेट घडावी रंगवावी मैफिल कधी कधी हाकेसरशी खिडकीत दिसत जावं माणसानं भेटीगाठीतून आठवणींचा साठा ताजा ठेवावा म्हणून म्हणतो उगाचच्या उगाच सुद्धा दिसत जावं माणसानं ------------------------------ © मंदार दिलीप जोशी http://mandarvichar.blogspot.com/2016/10/blog-post.html अश्विन कृ. २, शके १९३८ ------------------------------ मूळ हिंदी कविता: मिलते जुलते रहा करो धार वक़्त की बड़ी प्रबल है, इसमें लय से बहा करो, जीवन कितना क्षणभंगुर है, मिलते जुलते रहा करो। यादों की भरपूर पोटली, क्षणभर में न बिखर जाए, दोस्तों की अनकही कहानी, तुम भी थोड़ी कहा करो। हँसते चेहरों के पीछे भी, दर्द भरा हो सकता है, यही सोच मन में रखकर के, हाथ दोस्त का गहा करो। सबके अपने-अपने दुःख हैं, अपनी-अपनी पीड़ा है, यारों के संग थोड़े से दुःख, मिलजुल कर के सहा करो। किसका साथ कहाँ तक होगा, कौन भला कह सकता है, मिलने के कुछ नए बहाने, रचते-बुनते रहा करो। मिलने जुलने से कुछ यादें, फिर ताज़ा हो उठती हैं, इसीलिए यारों नाहक भी, मिलते जुलते रहा करो। - कवी अज्ञात

प्रतिक्रिया द्या
1681 वाचन

💬 प्रतिसाद (3)
क
कवि मानव Mon, 10/17/2016 - 16:17 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Tue, 10/18/2016 - 06:13 नवीन
मराठी आवृत्ती आणि मग त्याची मूळ हिंदी कविता दोन्ही उत्तम...
  • Log in or register to post comments
न
नित्य नुतन Tue, 10/18/2016 - 11:03 नवीन
अप्रतिम ... अगदी मनातलं लिहिलंय
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा