Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

न्युरोलॉजी हॉस्पिटल

न — निल्स्पंदन, Wed, 10/19/2016 - 11:10
न्युरोलॉजी हॉस्पिटल एक जागा जेथे क्षणाक्षणात परिस्थिती बदलते पेशंटची आणि साहजिकच नातेवाईकांची. वेटिंग रूम, एक अनोळखी लोकांचा परिवार एक जागा जेथे होत असते, ईमोशन्सची, परिस्थितिची देवाणघेवाण. चार वर्ष बेड वर असलेल्या ओंकार ची आई, वाट बघतेय, त्याच्या तोंडून एक शब्द ऐकण्याची. बाविशीतल्या तिवारीचे वडिल सर्वांसोबत आनंद व्यक्त करताहेत, त्याने तीन महिन्यांनी दिलेल्या थोड्याशा प्रतिसादाची. गावाकडचा नाले, देव नामाचा जप करतोय, आई कोमातून बाहेर येण्यासाठी. केअरटेकर विठ्ठल, रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त आणि चांगली कालजी घेतोय एका बाबांची. काय चूक त्या माऊलीची, जिला सांगितले होते की, तिच्या लेकराला फक्त खरचटलंय, पण त्याचा निर्जिव देह पडला होता आय सी यु त डॉक्टरांच्या शेवटच्या प्रयत्नांच्या गराड्यात. मानाचा मुजरा, हॉस्पिटल च्या स्टाफ ला, जे वागताहेत प्रत्येक नातेवाईकाशी हसतमुखाने, फक्त त्यांचं दु: ख हलकं होण्यासाठी.... बरेच खिन्न चेहरे, बरेच दु: ख लपवत हसणारे चेहरे, एकमेकांना धीर देत, वाट बघताहेत वेटिंग रूम मधील वेटिंग संपण्याची...आणि आपलं माणूस बरा होण्याची...... वेटिंग आणि फक्त वेटिंग.... ..निल्स्पंदन

प्रतिक्रिया द्या
1011 वाचन

💬 प्रतिसाद (2)
ब
बाजीप्रभू Wed, 10/19/2016 - 11:23 नवीन
छान! आवडली.
  • Log in or register to post comments
न
निल्स्पंदन Wed, 10/19/2016 - 12:04 नवीन
धन्यवाद बाजीप्रभू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा