Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शेळीपालन (गोट फार्मिंग)

ट
टर्मीनेटर
गुरुवार, 10/20/2016 - 07:54
🗣 7 प्रतिसाद
इथे कोणी शेळीपालन ह्या व्यवसायात आहे का? किंवा कोणाच्या परिचयातील व्यक्तींचा गोट फार्म आहे का? मी त्या व्यवसायात पदार्पण करत आहे त्यासाठी प्रत्यक्ष अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे म्हणतोय. तसेच कोणी ह्या व्यवसायात असतील तर त्यांच्याकडून खरेदी देखील करता येईल.
वर्गीकरण
काथ्याकूट

प्रतिक्रिया द्या
6528 वाचन

💬 प्रतिसाद (7)
द
दिलीप सावंत गुरुवार, 10/20/2016 - 08:25 नवीन
शेळी पालन हा एक खूप चांगला यवसाय आहे. शेळ्या आणि बोकड यांचे एक वेगळे अर्थशास्त्र तर आहेच, पण त्याचे जीवशास्त्रही विचारात घेणे आवश्यक आहे. बर्‍याच शेतकर्‍यांना आपल्याजवळची शेळी कोणत्या जातीची आहे हे माहीत नसते.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 10/20/2016 - 08:33 नवीन
पण आमच्या गावाकं लय शेरडा हायेत.... ज्यो पोऱ्या साळत जात न्हाय त्यो शेरडाकं जातोय. लय शिंपल अंडस्ट्यांडींग आस्तय बगा बाप - लेकात आमच्या गावाकं! ;) Sandy
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 10/20/2016 - 09:40 नवीन
शासकीय मार्गदर्शन व मदत मिळते, ती शोधावी. गोटफार्म वाल्यांची माहिती देतो लवकरच!
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 10/20/2016 - 11:36 नवीन
माझ्या माहितीनुसार पुण्याला वारजे इथे, मंगेशकर हॉस्पिटल जवळ बाएफ रिसर्च फौंडेशनचे प्रशिक्षण केंद्र आहे जिथे शेळीपालन करण्याचे प्रशिक्षण उपलब्ध आहे. शेळीपालन, व्यवसाय उत्तम असून ह्यात लक्षात ठेवण्यालायक मुद्दे (अगदी मूलभूत) खालील प्रमाणे १. शेळीची प्रजाती आपण जिथे पालन करू इच्छित त्यानुसारच ठरवावी, महाराष्ट्रात उस्मानाबादी शेळी (काळी) उत्तम असते, पण शेळी पासून दुग्धोत्पादन घ्यायचे असल्यास जमनापारी शेळी उत्तम असेल, पण त्या शेळीला खास व्यवस्था (वातावरण नियंत्रण वगैरे) कराव्या लागतील २. काहीही झाले तरी शेळीचं खांड जिथे ठेवाल ती जागा कटाक्षाने कोरडीच राखली गेली पाहिजे, बांबूचे मूत्र झिरपणारे फ्लोरिंग ह्या करता उत्तम असेल, त्या शिवाय ठराविक काळाने स्वच्छता अन लेंडी सफाई करण्याची सोय असावी ३. शेळ्या खेळकर असतात त्यामुळे त्यांच्यासाठी थोडी का होईना बागडायला जागा ठेवावी, बंदिस्त शेळीपालन मी तरी प्रेफर करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/20/2016 - 09:47 नवीन
टिव्हीवर झी मराठीवर 'सुवर्ण कोकण' नांवाचा कार्यक्रम लागतो. त्यांच्या अशा विषयांवर कार्यशाळा असतात. तिथे मार्गदर्शन नक्कीच मिळू शकेल. लाभ घ्यावा.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 10/20/2016 - 10:40 नवीन
स्वतः जाऊन या भेट द्या या ठिकाणी आणि मग ठरवा. नव्या व्यवसायाला शुभेच्छा... शहरी चाकरमानी नाखु बिनशेतीवाला
  • Log in or register to post comments
ए
एकनाथ जाधव गुरुवार, 10/20/2016 - 13:37 नवीन
http://www.loksatta.com/lokshivar-news/goat-farming-by-maharashtra-farmer-1297726/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा