Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"स्व"....

म — माम्लेदारचा पन्खा, Sat, 10/22/2016 - 12:13
कोणी शब्दबंबाळ...कोणी गोष्टीवेल्हाळ .... कोणी अर्थजंजाळ...कोणी नुसतेच पाल्हाळ.... व्यक्ती असतील वेगवेगळ्या पण वागणूक तीच..... जगात काय तो एकटा शहाणा मीच ! एक आपला "स्व" मोठा , बाकी कस्पटासमान..... आपण त्यांच्याबरोबर नाही हे इतरांचेच नुकसान !? आपण काय म्हटले .....त्याने हाती काय लागले ? का म्हणून सगळेचजण आपल्याशी असे वागले ? जमत असेल तर एकदा तटस्थपणे करावा विचार..... स्वत:ला थोडे बाजूला ठेवून विचार करावा सारासार..! सगळेच काहीतरी म्हणतात म्हणजे त्यात काही तथ्य आहे माणूस आहोत,माणुसकीने वागू...बाकी सगळे मिथ्य आहे जेव्हा वेळ पडेल तेव्हा "स्व"नाही ..स्वभाव कामी येतो "स्व" मध्येच अडकलात तर....पण लक्षात कोण घेतो ????

प्रतिक्रिया द्या
5526 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अश्विनी वैद्य Sat, 10/22/2016 - 13:27 नवीन
सुंदर कविता... आवडली... मोजक्या शब्दांत अचूक मांडलेली भावना पोचली.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 10/23/2016 - 05:01 नवीन
तुमच्या काव्याच्या शिर्षकात दोन चुका आहेत.
"स्व"....
१. स्व ला अवतरणांची गरज नसते. २. स्व हे फक्त एक टींब असते. चार नाही. :प तुम्ही जी कविता लिहीली आहे ती खोट्या स्व बद्दल आहे.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/23/2016 - 05:05 नवीन
खरा स्व कधी जागवायचा ते आपल्या हातात असतं.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
माम्लेदारचा पन्खा Sun, 10/23/2016 - 05:07 नवीन
माहितीबद्दल आपले शतश:आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Sun, 10/23/2016 - 13:11 नवीन
बाब्बो, आता तुम्ही कविता पण करणार...कविता भारी जमलीये
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 10/24/2016 - 05:44 नवीन
इक्डे पण घुसले तर !!! छान आहे चालू द्या
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा