Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कातर वेळ

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Sun, 10/23/2016 - 07:31
कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- संध्याकाळची ती वेळ एकटाच खिडकीत उभा राहून नुकत्याच अवतरलेल्या चंद्राकडे पहात उभा होतो कशी कोण जाणे पण तुझी आठवण त्या भरून आलेल्या ढगांबरोबर वाहत आली --- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- आभाळ इतकं भरलं ढगांनी इतकी दाटीवाटी केली की त्यांना आभाळ पुरेना कोणता ढग कोणत्या ढगात विलीन होतोय तेच कळेनास झालं आणि मग गडगडाटाने सारा आसमंत भरुन गेला या सगळ्या गोंधळात तो चंद्र दिसेनासा झाला अन् उगाच जीव कासाविस झाला ---- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- पाहता पाहता त्या ढगांना ओझं असह्य होऊन त्यांनी शरणागती पत्करली जश्या समुद्राच्या लाटां वर लाटा येतात किनार्‍यावर तश्या धारांवर धारा बरसायला सुरवात झाली आसुसलेल्या धरेवर मला कळेचना की असं थांबून थांबून का बरसतोय आज पाऊस मध्येच चंद्रही डोकावत होता तो ही बहुतेक गोंधळला होता बावरला होता ---- कातर वेळी आभाळ भरुन येणं फार वाईट असतं ---- मग क्षणात पाऊस थांबला थैमान शांत झालं कोणीतरी वेदना शोषून घ्यावी तसे ढगही नाहीसे झाले आभाळं मोकळं झालं चंद्र आपलं शितल तेज पुन्हा ओतायला लागला तेव्हा अचानक माझं लक्ष खिडकीच्या काचेवरील माझ्याच प्रतिबिंबाकडे गेले माझेच डोळे मला रिकामे रिकामे वाटायला लागले त्या मोकळ्या झालेल्या आभाळासारखे ---- कातर वेळी आभाळ भरुन येणं अन् अश्या वेळी तुझी आठवण येणही फार वाईट असतं |- मिसळलेल्या काव्यप्रेमी -| (२३/१०/२०१६)

प्रतिक्रिया द्या
1943 वाचन

💬 प्रतिसाद (8)
ए
एस Sun, 10/23/2016 - 08:50 नवीन
ही कविता तितकीशी पोहोचली नाही. काहीशी कृत्रिम पावसासारखी वरवरच बरसून गेली. काही पाऊस नुसताच देह भिजवतात. आतून माणूस लख्ख कोरडाच राहतो. कवितांचंही तसंच असतं का?
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 10/23/2016 - 09:03 नवीन
श्री.एस यांना कदाचित कवितेच्या वृत्तबद्धतेबद्दल किंवा गेयतेबाबत म्हणायचे असावे असे वाटते.... भारलेली कातरवेळ.... कातरवेळी कशामुळे गं मी मला हरवुन जातो आसवांच्या संगतीने मी तुझ्या स्मृतींत न्हातो
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 10/23/2016 - 09:39 नवीन
मुक्तछंद, रिस्की छंद! Sandy
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 10/23/2016 - 12:04 नवीन
एंडिंग नोट आवडली.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 10/24/2016 - 05:49 नवीन
एका अजरामर लेखाची आठवण काढ्ली नेमके शीर्षकही तेच आहे. नक्की काय गौडबंगाल आहे याचा शोध घेणे आले.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Tue, 10/25/2016 - 10:48 नवीन
अप्रतीम...आवडली..भरुन आलं...
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 10/25/2016 - 11:12 नवीन
अप्रतिम लिहिलय मिका. आवडलं लेखन.
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Tue, 10/25/2016 - 11:44 नवीन
कातरवेळी बसलो होतो आठवणींचा पिंजत कापूस... तशात पाऊस! हि गुरु ठाकूर ची कविता आठवली... छान लिहिलीये आपणही...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा