Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

जन्मभर

श — शार्दुल_हातोळकर, Sun, 10/23/2016 - 08:14
नेसत्या वस्त्रानिशी मी हा असा आता निघालो ना कळे जन्मामध्ये या काय मी कमवुन गेलो? झाकण्या लाखो उणिवा केवढी केली शिकस्त दाटले आभाळ होते मी दिखाव्यात व्यस्त ल्यायलो रेशीम वस्त्रे घ्यावया सन्मान खोटा भाळलो का मी कळेणा पाहता त्या चोरवाटा जे मुळी नव्हतेच माझे वाहिले आयुष्य त्यांना वंदिले समजुन सूर्य त्या भ्रमाच्या काजव्यांना जाहला सूर्यास्त जेव्हा पांगले सारे घरोघर मग जणू मिटताच डोळे जाणिला गुंता खरोखर जन्मभर केला दिखावा मानुनी आयुष्य त्याला खेळ सारा जीवनाचा तो चितेवर ज्ञात झाला - शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
1972 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 10/23/2016 - 08:19 नवीन
फार सुंदर... वृत्तबद्ध रचनांची गेयता मला फार आवडते.. तश्या रचना बाधंण आम्हाला जमत नाही याच वाईट वाटत...
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 10/23/2016 - 08:37 नवीन
तुमचा मनमोकळा आणि दिलखुलास प्रतिसाद आवडला ! प्रत्येक कवी हा आपापल्या पद्धतीने कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो. माझ्या आठवणीप्रमाणे बहुतेक प्रा. राम शेवाळकरांनी म्हटले होते "प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो आणि प्रत्येक रसिक हा मुका कवीच असतो !"
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Sun, 10/23/2016 - 08:42 नवीन
प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो आणि प्रत्येक रसिक हा मुका कवीच असतो !
वाह!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
च
चांदणे संदीप Sun, 10/23/2016 - 09:33 नवीन
आवडली! तुमची कविता वाचून हिन्दीतले सुप्रसिद्ध कवि हरिशंकर परसाई यांची एक कविता मला आठवली. क्या किया आज तक क्या पाया? मैं सोच रहा, सिर पर अपार दिन, मास, वर्ष का धरे भार पल, प्रतिपल का अंबार लगा आखिर पाया तो क्या पाया? जब तान छिड़ी, मैं बोल उठा जब थाप पड़ी, पग डोल उठा औरों के स्वर में स्वर भर कर अब तक गाया तो क्या गाया? सब लुटा विश्व को रंक हुआ रीता तब मेरा अंक हुआ दाता से फिर याचक बनकर कण-कण पाया तो क्या पाया? जिस ओर उठी अंगुली जग की उस ओर मुड़ी गति भी पग की जग के अंचल से बंधा हुआ खिंचता आया तो क्या आया? जो वर्तमान ने उगल दिया उसको भविष्य ने निगल लिया है ज्ञान, सत्य ही श्रेष्ठ किंतु जूठन खाया तो क्या खाया? - हरिशंकर परसाई Sandy
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 10/23/2016 - 12:07 नवीन
@जे मुळी नव्हतेच माझे वाहिले आयुष्य त्यांना वंदिले समजुन सूर्य त्या भ्रमाच्या काजव्यांना››› सुंदर.! @जाहला सूर्यास्त जेव्हा पांगले सारे घरोघर मग जणू मिटताच डोळे जाणिला गुंता खरोखर››› लाजव्वाब! @जन्मभर केला दिखावा मानुनी आयुष्य त्याला खेळ सारा जीवनाचा तो चितेवर ज्ञात झाला››› कळस! __/\__
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ Sun, 10/23/2016 - 14:05 नवीन
खुप सुंदर काव्य ! कवी तूम्ही इथे ह्रदय स्पर्शून बोलून जाता अन् आम्ही निःशब्द होतो...स्तब्ध होतो !!
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 10/23/2016 - 14:46 नवीन
संदीपजी, आत्मबंध, गौरीजी मनापासुन धन्यवाद. @संदीपजी - खुपच छान हिंदी कविता.... @आत्मबंध - अतोनात उर्जा देणारा प्रतिसाद.... @गौरीजी - कवितेचा सच्चा गौरव....
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Tue, 10/25/2016 - 10:47 नवीन
अप्रतीम...आवडली..
  • Log in or register to post comments
व
वैभव पवार Tue, 10/25/2016 - 10:52 नवीन
खुप छन!
  • Log in or register to post comments
व
वैभव पवार Tue, 10/25/2016 - 10:52 नवीन
खुप छान!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 10/25/2016 - 11:57 नवीन
अर्थगर्भ आशय भिडून गेला.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 10/25/2016 - 19:58 नवीन
मनापासुन धन्यवाद मंडळी !
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा