मुख्यमंत्री कायद्याची दलाली करत आहेत का ?
स्वभावाला औषध नसते त्याप्रमाणे केजरीवालने काही तरी मूर्खपणाचे विधान केले, आप चा कुणी आमदार विनयभंगाच्या आरोपात गुंतला, काँग्रेस वाल्याने राहुल गांधींची स्तुती केली, राहुल गांधींनी बोबड्या बोलांत काही तरी घोळ केला, भाजप वाल्यानी विलेक्शन जवळ येताच राम नाम घेतले आणि राज ठाकरे ह्यांनी गुंडगिरी करून शेवटच्या वेळी शेपूट खाली घातली ह्यांत आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. संघ वाल्यानी शेपूट आधीपासून ठेविले अनंते तैसेचि ठेवावे नावाने गुंडाळून ठेवले असल्याने त्यांनी कितीही निष्क्रियता दाखवली तरी आश्चर्य नाही.
पण मुखमंत्र्यांनी जाहीर रित्या धमकी देणाऱ्या गुंडाची भेट घेऊन मनधरणी वगैरे करावी हे थोडे आश्चर्यकारक वाटले. त्यातल्या त्यांत खंडणी आर्मी फंडाला वगैरे देण्याचा तोडगा म्हणजे तर कायदा धाब्यावर बसवण्याचे काम वाटते. मुख्यमंत्र्यानी आपली ऑफिस ची शपथ तर तोडली आहेच त्याशिवाय फुटकळ गुंडापुढे जाहीर रित्या लोटांगण घालून खंडणी वसुलीला legitimacy दिली आहे असेच वाटते. हेच सर्व कार्य गुपचूप पडद्या मागे केले असते तरी विशेष आश्चर्य नव्हते.
ह्या मुळे इतर गुंडाना बळ चढणार आहे पण असले तोडगे काढायला मुख्यमंत्र्याना भाड्यावर घ्यायला सर्वानाच परवडेल असे नाही.
ह्यापुढे सर्वच पातळीवर नगरपालिका, पंचायत, जिल्हा, शहर वार्ड इत्यादी ठिकाणी हे असले फडनसवी दलाल उत्पन्न होऊन कायद्याची दलाली करतील असे वाटते. येथील विचारवंतांना काय वाटते ?
ह्या शिवाय आता राज ठाकरे (आणि इतर स्वयंघोषित गुंड मंडळींनी) फडणवीसांशी वाटाघाटी करून आपले रेट कार्ड करावे काय?
१. मेहंदी हसनची गझल ऐकली : १००० प्रत्येक गाण्यामागे रुपये आर्मी फंडाला द्यावे.
२. आफ्रिदीची विनोदी इंग्रजी ऐकली : १०० रुपये आर्मी फंडाला द्यावे.
३. पाकिस्तानी एंटरटेनमेंट चा अनलिमिटेड पॅक हवा असेल तर महिन्याला ५० हजार रुपये आर्मी फंडाला द्यावे.
४. महिलांनी फवाद खानचे विडिओ पहिले तर तितकाच वेळ अण्णा हजारे ह्याचे असम्बन्ध भाषण youtube वर ऐकावे.
५. पण ह्या सर्व गोष्टी करण्याआधी राज ठाकरे ह्यांच्य कडून NOC आणणे भाग आहे आणि हाताळणी (manhandling) फी म्हणून १% देणे आवश्यक आहे.
चीन विरोधी सुद्धा वातावरण असल्याने खालील तोडगे सुद्धा कदाचित फडणवीसांनी आधीच प्री-अप्रूव्ह करावेत.
१. हक्का नूडल्स खाल्यानंतर पतंजली गोमुत्राची एक बाटली घेऊन तोंड साफ (gargle) करावे.
२. जॅकी चेन/ब्रूस ली किंवा इतर कुंग फु चा चित्रपट पहिला तर त्या नंतर रामदेव बाबा ह्यांचे कपालभाती किमान २ तास पाहावे नाही तर राजीव दीक्षित ह्यांचे वाह्यात कॉन्स्पिरसी थेअरी विडिओ किमान १ तास पाहावेत.
३. घरी फेंगशुई विषयक गोष्टी असतील ३००० रुपये खर्चून नजर रक्षक यंत्र आणि ५००० रुपये खर्च करून श्री यंत्र सुद्धा ठेवावे.
आपले काही धोरण नसेल तर इतर लोक आपल्या तोंडांत आपले धोरण कोंबतात आणि ते चालविण्याशिवाय इतर उपाय राहत नाही. सध्या हिंसक प्रवृत्ती असणाऱ्या संघटना, कोर्टांत धुमाकूळ घालणाऱ्या संघटना, मीडिया कंट्रोल करणारे दलाल इत्यादी लोक सरकारला वाट्टेल तसे फिरवत आहेत असे वाटते.
बाकी लेख भारी सहनाताई! ;)म्हणजे लेखातील प्रत्येक मुद्द्याशी तुम्ही सहमत आहात असे गृहीत धरावे का?जे कुठेच नाहीत (उदा. राहुल गांधी, कान्हयाकुमार व तत्सम) त्यांच्यावर टीका हवीच असेल तर ते द्वेषस्वरूप आहे!चला आता एक नक्की झाले. निवडणूकीत हार झाली की कोणताही गोंधळ घाला, सगळे गुन्हे माफ ! =)) =)) =))