पाककृती

चिकनची खेकडा भजी

Primary tabs

Onion Chicken Pakodas

साहित्य
६०० ग्रॅम चिकन लेगपीस, स्किन सकट
१ गड्डी लसूण, सोलून, बारीक चिरून
१ इंच आलं, बारीक चिरून
२ ते ३ हिरव्या मिरच्यां, बरीक चिरून
२ कांदे, पातळ उभे चिरून
१ मोठा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर
१ चमचा हळद
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा ओवा
१/२ वाटी बेसन
३ मोठे चमचे कॉर्नफ्लार
१ १/२ चमचा मीठ
तळायला तेल

कृती

चिकन धुवुन कोरडे करून घ्या. मायक्रोवेव्ह, ओव्हन मोड मध्ये १७०/१८० डिग्री ला प्री-हिट करून घ्या. चिकन चे लेग पीस ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे भाजायला लावा.

आलं, लसूण बारीक आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. कांदे पातळ उभे चिरून घ्या. कांद्याला, सगळे मसाले (लाल मिरची पावडर, हळद, बिर्याणी मसाला/गरम मसाला), ओवा, आलं, लसूण, हिरवी मिर्ची आणि १ चमचा मीठ लावून बाजूला ठेवा.

Step1 Step2Step3 Step4Step5

चिकन भाजून झालं कि गार करून हाडं, स्किन आणि चरबी टाकून द्या. शिजलेले बोनलेस चिकन श्रेड करून घ्या.

Step6 Step7

चिकन कांद्याच्या मिश्रणात टाकून, ते निट मळून घ्या. ह्यात आता ३ चमचे कॉर्नफ्लॉर, आणि लागेल तसं बेसन घालून, मिश्रण भज्यांच्या पीठ सारखे करून घ्या. चव बघून लागल्यास मीठ घाला.

Step8 Step9

कढईत तेल गरम करून, भज्या थापून, मध्यम आचेवर तळून घ्या. गरमागरम चिकन खेकडा भजी तळून मीठ लावलेल्या मिरच्या सोबत खायला घ्या!

STep10 Step11Step12

[चिकन लेगपीस ओव्हन मध्ये नं भाजता, प्रेशर कुकर मध्ये सुद्धा एक शिट्टी देऊन शिजवून घेऊ शकता. मी कोथिंबीर घालायचं विसरलो, ती सुद्धा बारीक चिरून घालू शकता. मिश्रण नीट मिळून येण्यासाठी, थोडं पाणी घातलं तरी चालेल, मला लागला नाही, कारण कांद्याला पाणी सुटतं, तेवढा पुरेसा आहे. तळताना फार वेळ तळावे लागत नाही, तुम्ही कांदा जितका पातळ चिराल तेवढ्या पटकन ह्या भज्या शिजतील, कांदा, लसूण, मिरच्या आणि आलं चिरायला मी मांडोलीन/स्लाईसर वापरला].

Onion Chicken Pakodas

शब्दबम्बाळ

अगागागागा!!!
जीव घेता कि काय अहो आता!

अरिंजय

वाखु साठवली आहे. भेटल्यावर आठवण करुन दिली जाईल. न मिळाल्यास कट्टी केली जाईल.

एक नंबर !

कांद्याची भजी आणि फ्राईड चिकन दोन्हीही आवडतात, त्यामुळे हा प्रयोग एक नंबर असल्याबद्दल शंकाच नाही !

रॉजरमूर

भारीच ............

चिकन भाजून झालं कि गार करून हाडं, स्किन आणि चरबी टाकून द्या. शिजलेले बोनलेस चिकन श्रेड करून घ्या.

चिकन कशाने किसले ?

एअर फ्रायर वर भारी होतील ना ही भजी ?
नुसती भजी खाऊन उपयोग नाही सोबत दुसरे ही काही लागेल .

केडी

चिकन कशाने किसले ?

चिकन स्किन सकट कमी तापमानाला ऑन-दि-बोन शिजवल्यामुळे अतिशय मऊसूद शिजते. गार झाल्यावर हाताने श्रेड करता येते.

एस

प्रचंड चिडचिड होते असे धागे पाहिले की...

चाणक्य

तर बुवा फटु बघुनच खलास होतो या माणसाचे. च्यायला!

अजया

सगळ्या बिचाऱ्या मिपासदस्यांवर इमोसनल अत्याचार झालेला पाहुन ड्वाले पानावले ..

दक्षिणा

मी चिकन खात नाही पण तुम्ही टाकलेल्या फायनल डिश चा फोटो तोम्पासू आहे

मराठमोळा

केवळ क्लास...
पुन्हा एकदा कल्पकतेला सलाम. रेसेपी आणि चित्रे खास. _/\_ याबरोबर मिरची-पुदीन्याची चटणी मस्त जोड देईल.

केडी

...नक्कीच भारी लागेल ह्या सोबत.

आनंदी गोपाळ

मायक्रोवेव्ह, ओव्हन मोड मध्ये १७०/१८० डिग्री ला प्री-हिट करून घ्या. चिकन चे लेग पीस ओव्हन मध्ये ४० ते ४५ मिनिटे भाजायला लावा.

ओव्हन मोडमधे मायक्रोवेव्ह.. ओटीजी चालेल का?

केडी

माझ्याकडे OTG नाहीये, त्यामुळे माव्हे चा वापर.

Nitin Palkar

या डिशच्या नावामध्ये खेकडा कशाकरता?

मनीषा

बेसन च्या ऐवजी थोडा जाड रवा आणि ब्रेड क्रमस वापरले तर ही भजी छान क्रिस्पी होतात.

सौन्दर्य

वर्णन आणि चित्रे बघूनच तोंडाला पाणी सुटले, लवकरच कार्यास लागले पाहिजे, ही जाणीव झाली.

सप्तरंगी

मस्त आहेत फोटोज. बाय द वे , मी airfryer मध्ये बाकरवडी केली, १ चमचा तेलात, मस्त झाली नक्की तरी करून बघा के डी !

केडी

मस्त आयडिया! करून बघेन नक्की!

नूतन सावंत

कोलंबी,तिसऱ्या,कालवं इ. वापरून केली होती,पण चिकन घालून कधी नव्हती केली.आयडीआ छान आहे.