Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोणती बाईक घ्यावी?

स
संदीप डांगे
Tue, 10/25/2016 - 18:07
🗣 270 प्रतिसाद
मित्रो! मी गेले कित्येक वर्षे दुचाकी फारशी चालवली नाहीये, वीसेक वर्ष आधी लुना (ब्रह्मे फेम), राजदूत (300-400 किमी) नंतर बजाज प्लॅटिना (500 किमी), होंडा सीबीआर 250 (100 किमी), स्टारसिटी(100 किमी), ऍक्टिवा (100 किमी) अशी अनुभव गंगाजळी आहे, होंडा युनिकोर्न घेणार होतो, फायनल झाले होते, त्याच दिवशी बाळराजे येण्याची चाहूल लागली आणि पूर्वीच ठरवल्यानुसार कि पत्नीस अशा अवस्थेत बाईकचे धक्के नको म्हणून प्लॅन बदलून लांसर घरी आणली, ;) आताशा एक बाईक असावी अशी गरज भासत आहे, पण दुचाकीबद्दल विचारच टाकून दिल्याने बरीच वर्षे ह्या क्षेत्रातले फॉलोअप घेतलेले नाहीत, त्यामुळे माहिती न के बराबर! तसेच आता बाजारात इतके ऑप्शन्स आलेत कि गोंधळायला झाले आहे. तस्मात बाईकविषयी चांगली माहिती असलेल्या मिपाकर मित्रांना सल्ला मागतो आहे, मदत करावी. माझी उंची 5'6", वजन 94 kg (पाच वर्षांपासून अगदी मेंटेन आहे, एक ग्राम इकडे तिकडे नाही). ;) माझी गरज: शहरात फिरायला, सामान वगैरे आणायला. खेड्यापाड्यातल्या कसल्याही रस्त्याला (माझ्या वजनासकट) सांभाळून घेणारी, लॉंग हायवे ड्राइव्ह ला आरामदायक बजेट: बजेटचे नक्की नाही, परवडत नसल्यास थोडं थांबायची तयारी आहे, अगदीच दीडदोन लाखवालीही नकोय, नैयेत माझ्याकडे, ;) मायलेजपेक्षा कम्फर्ट, पॉवर व स्टाईलला महत्त्व देतो. मेंटेनन्स मध्ये रडवणारी नको. बजाज अवेंजर मनात बसलीये, थोडीशी चालवली होती, बुलेटची इच्छा फार पण अभी टेम नै आया वैसा! बाकी नवीन तत्सम गाड्यांची माहिती नाही तेव्हा त्या देखील ट्राय करण्यास हरकत नाही, कृपया मार्गदर्शन करा... (विंग्रजी शब्दांबद्दल माफी)

प्रतिक्रिया द्या
86717 वाचन

💬 प्रतिसाद (270)
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/12/2022 - 09:04 नवीन
चेसुगु, बाइक्स वर एक चांगला माहितीपूर्ण धागा येऊ द्याच.
धन्यवाद. पण मी ऑ.१९९७ - फे.२०११ या कालावधीत बुलेट ३५० चालविली मग दहा वर्षांहून अधिक काळ बाईकला अजिबात हात लावला नाहीये आणि त्यानंतर आता थेट दिवाळी २०२१ पासून होण्डा सीबी ३५० हायनेस, येझदी रोडस्टर, रेनेगेडे, डॉमिनॉर ४०० या बाईक्स फक्त टेस्ट राईड पुरत्याच चालविल्यात. डिस्क ब्रेकची सवय नाही त्यामुळे त्याच्यावर विसंबून राह्यचं धाडस होत नाही. त्यामुळेच अगदीच चिटकून बाईक न चालविता जरा जास्तच अंतर राखल्याने येझदीच्या टेस्ट राईडला (चिंचवड - भक्ती शक्ती - चिंचवड या १० किमी च्या टप्प्यात) ९२ पेक्षा जास्त वेग घेता आला नाही. इतर राईडर्सनी याच टप्प्यात ११०+ वेग जमविला होता. इतर अनेक बाईक्सचा फक्त वेबसाईट व यूट्यूब व्हीडीओज् पाहून अभ्यास चालू आहे. गेल्या महिन्यात तर्कवादींनी रिटायर्ड केलेली त्यांची पंधरा वर्षे जुनी सीडी डॉन एकाच दिवसात चारशे एकतीस किमी चालविली आणि असं वाटलं की जरा अधिक शक्तीची बाईक असती तर एकूण प्रवासाचा वेळ तीन चार तासांनी कमी झाला असता. तेव्हा एखादी जास्त शक्तीची बाईक घ्यावी असा विचार चालू आहे पण इतरांप्रमाणे मला चालवायला जमेल का? ही शंका असल्याने अंतिम निर्णय होत नाहीये. नव्या बाईकला अडीच लाख खर्च करणे थोडे अवघड वाटतेय. त्यापेक्षा ६० / ७० हजार खर्चून गाजराची पुंगी वाजवावी का असा एक विचार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख
प
प्रचेतस Tue, 04/12/2022 - 09:08 नवीन
आता १५० सीसीच्या वरील सर्वच बाईक्स डिस्क ब्रेक विथ abs येतात त्यामुळे बिनधास्त घ्या, abs मुळे बाईक न घसरता जागच्या जागी उभी राहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चेतन सुभाष गुगळे Tue, 04/12/2022 - 09:18 नवीन
ते ठाऊक आहे पण मला सवय* नाही ना? इतर चालक जसे पुढच्या वाहनाच्या अगदी जवळ गेल्यावर ब्रेक मारतात तसे करायला मला प्रचंड भीती वाटते. मी आपला पन्नास फूट अलीकडीच ब्रेक मारतो (खरे तर तेही क्वचितच, बहुतेकदा थ्रोटलच कमी करतो त्यामुळे ब्रेकिंग फारसे करतच नाही) आणि पिक स्पीड लवकर गाठू शकत नाही. त्यामुळे जास्त ताकदीची बाईक घेतल्यावरही तीची संपूर्ण ताकद वापरली जाईल का? हा प्रश्न पडला आहे. *मधल्या काळात मी जवळपास १ लाख किमी अंतर प्रवास आणि त्यातही एक वर्षे रोज निगडी-शिरूर--निगडी असा रोजचा १६० किमी प्रवास एल एम एल सिलेक्ट टू या स्कुटरवर (१९९८ मॉडेल) केला आहे. या वाहनाचे ब्रेक अतिशय साधे आहेत आणि त्यांच्या भरोशावर किसिंग डिस्टन्स मेंटेन करुन वाहन चालविणे शक्य नाही. त्यामुळेच मला आता अचानक एबीएस डिस्क ब्रेक याची सवय स्वतःला लावताच येत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
च
चौथा कोनाडा Wed, 04/13/2022 - 09:08 नवीन
सहमत. ज्या लोकांना अडथळ्याच्या आधी काही मिटर ब्रेक वापरण्याची सवय असते त्यांना डिस्क ब्रेकचे कचाकच दाबणे त्यामुळे पुढे तोल जाणे हे अडचणीचेच. मी ही त्यातलाच एक. डिस्क ब्रेकची दुचाकी अधूनमधून चालवत असल्याने त्या ब्रेकिंगची सवय व्ह्यायला वेळ लागतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
स
सुबोध खरे Wed, 04/13/2022 - 15:41 नवीन
हात कापला तर ती चूक धारदार सुरीची नसून वापरणार्यांची आहे. डिस्क ब्रेक हे ड्रम ब्रेक पेक्षा जास्त परिणामकारक असतात म्हणूनच एकाच गाडीचे डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक व्हर्जन पण असते आणि अर्थात डिस्क ब्रेक साठी जास्त पैसे मोजावे लागतात. ए बी एस हि त्याच्या पुढची पायरी आहे ( antilock braking system) मुळे जीव वाचतात हि वस्तुस्थिती आहे. https://www.cartoq.com/abs-saves-lives-5-times-motorcycle-abs-saved-their-riders-from-accidents-in-india-video/ डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक आहेत म्हणून ते खापर डिस्क ब्रेकवर फोडणे हीच मूलभूत चूक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 04/14/2022 - 19:37 नवीन
डिस्क ब्रेक कचाकच लावणारे चूक आहेत म्हणून ते खापर डिस्क ब्रेकवर फोडणे हीच मूलभूत चूक आहे.
हे खापर कोणी फोडलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 04/15/2022 - 07:12 नवीन
याचं कारण असं की मी डिस्क ब्रेकच्या भरोशावर फारसा विसंबून राहत नाही डिस्क ब्रेकची सवय नाही त्यामुळे त्याच्यावर विसंबून राह्यचं धाडस होत नाही. इतर चालक जसे पुढच्या वाहनाच्या अगदी जवळ गेल्यावर ब्रेक मारतात तसे करायला मला प्रचंड भीती वाटते. मी आपला पन्नास फूट अलीकडीच ब्रेक मारतो पुण्यात पन्नास फूट अगोदर ब्रेक लावला तर तुमच्या आणि पुढच्याच्या मध्ये ७-८ वाहने तरी घुसतील आणि तुम्हाला दोन्ही पाय बाजूला ठेवूनच स्कुटर चालवायला लागेल एल एम एल सिलेक्ट टू या स्कुटरवर (१९९८ मॉडेल) केला आहे. या वाहनाचे ब्रेक अतिशय साधे आहेत आणि त्यांच्या भरोशावर किसिंग डिस्टन्स मेंटेन करुन वाहन चालविणे शक्य नाही. त्यामुळेच मला आता अचानक एबीएस डिस्क ब्रेक याची सवय स्वतःला लावताच येत नाहीये. हि सर्व आपलीच विधाने आहेत ना? मग उगाच कचाकच हा शब्द नाही म्हणून छिद्रान्वेषी पण कशाला करताय? आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला झेपत तर नाही परंतु मीच हुशार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चेतन सुभाष गुगळे Fri, 04/15/2022 - 08:58 नवीन
स्वतःला सवय नाही हे मी मान्य केलं तर मी आधुनिक तंत्रज्ञानावर खापर फोडल्याचं कसं सिद्ध होतं? मला सवय नाही कारण असे वाहन अजून मी खरेदीच केलेले नाही. इतरांचं वाहन ट्रायल / टेस्ट राईड करिता चालवताना मला जपूनच चालवावं लागणार. स्वतः खरेदी करुन चालवेल तेव्हा कदाचित वेगळी परिस्थिती असू शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कंजूस Fri, 04/15/2022 - 03:52 नवीन
प्रवचनं देत moto ride (अवांतर )
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sat, 04/16/2022 - 08:11 नवीन
मुंबई पुण्यात वाहन चला ग्रीन सिग्नल होण्याची पण वाट बघत नाहीत.अगदी उतावीळ झालेले असतात. त्या मुळे सर्व गाड्यांचा 0 ते 30 पर्यंत जो pickup असतो.तो खूप कमी करून 1km per hour ह्या हिशोबात च ठेवावा. खूप बेशिस्त पण वाढला आहे.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Sat, 04/16/2022 - 16:14 नवीन
सुबोध खरे आणि चेतन खरे साहेबांच्या जुगलबंदीत मुळ विषय काय हेच विसरायला झाले :) मग पुन्हा लेखाचे शीर्षक वाचले.
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 04/16/2022 - 16:20 नवीन
सुबोध खरे आणि चेतन खरे साहेबांच्या
नाही हो खरे ते एकटेच (त्यांच्यामते जगात एकटेच) मी मात्र चेतन सुभाष गुगळे. चेतन खरे नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 01/04/2023 - 07:47 नवीन
क्लासिक लिजेंड्स ची येझदी रोडस्टर ही ३३४ सीसीची बाईक घेतली आहे. बाईक सोबत २४ महिने / २४००० किमी अशी वॉरंटी आहे. त्याचप्रमाणे मी एक्स्टेंडेट वॉरंटी घेतली असल्याने आता एकूण वॉरंटी ही ४८ महिने / ५०००० किमी आहे. सात महिन्यांमध्ये बाईक चार हजार किमी चालवून झाली आहे. कालावधी आणि अंतर फारसे नसल्याने उत्पादक कंपनी, बाईक आणि वितरक व त्यांची सेवा दुरुस्ती इत्यादींबद्दल इतक्यातच कोणताही अभिप्राय देणे मला उचित वाटत नाही. वाठार तर्फ वडगाव (कोल्हापूर) ते रावेत (पिंचिं - पुणे) हा प्रवास तीन तासांत सलग पूर्ण केला. सरासरी वेग ताशी ऐंशी किमी इतका राहिला. यात धोकादायक आणि खोटे असे काहीच नाही हे यावेळी कॅप्चर केलेल्या व्हिडीओ क्लिप्समधून सहज सिद्ध होईल. https://www.youtube.com/@velocityverified309/videos
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 01/04/2023 - 08:19 नवीन
ग्रेट! +१ आपली आणि आपल्या बाईकची कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे ! या प्रवासावर वेगळा धागा काढावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 01/04/2023 - 09:50 नवीन
पण स्वतंत्र धागा काढावा इतका काही हा प्रवास उल्लेखनीय नव्हता. तेव्हा पुन्हा कधीतरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
च
चौथा कोनाडा Fri, 01/06/2023 - 08:22 नवीन
ठीक आहे. तुमचा "कोल्हापूर-पुणे, ३ तासात" हा येझदी रोडस्टर बाईक वरून हा व्हिडिओ यू ट्यूब वर नुकताच पाहिला,.... भारी आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
च
चेतन सुभाष गुगळे Sat, 01/07/2023 - 13:11 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
स
सुबोध खरे Wed, 01/04/2023 - 14:53 नवीन
डिस्क ब्रेक आणि ए बी एस वाली गाडी चालवून आता कसं वाटतंय ते सांगा. एल एम एल आणि येझदी रोडस्टर मधला फरक किती जास्त आहे हे आता तुम्हाला जाणवले असावे. अचानक दगड / खड्डा/ माणूस आलेला असता पटकन ब्रेक मारल्यावर गाडी घसरत नाही कि तशी भीती वाटत नाही हे आता आपल्याला जाणवले असावे. येझदी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायक गाडी आहे आणि रस्त्यावर स्थिर राहते. अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा
  • Log in or register to post comments
च
चेतन सुभाष गुगळे Wed, 01/04/2023 - 18:15 नवीन
धन्यवाद. हा फरक अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. पण चटकन या तंत्रज्ञानावर भरोसा ठेवत केवळ चाचणीच्या पाच दहा किमी अंतरात वाहनाचा वेग जास्त ठेवायची हिंमत होत नव्हती. आता सराव झाल्यावर ऐंशी - नव्वद चा वेग सहज पकडता येतो आणि त्यावर सलग वाहन चालविता देखील येते आहे. अर्थात एक महत्त्वाचा जाणवलेला फरक आणि ज्यांना ठाऊक नसेल त्यांच्या करिता सावधगिरी म्हणून हा माझा अनुभव - पार्किंगमध्ये गाडी लावताना मी इंजिन कधीच सुरू ठेवत नाही. ते जे काही दहा पंधरा मीटर अंतर वाहन मागे पुढे / डावी - उजवीकडे करायचे असेल ते वाहनावर न बसता वाहनाच्या डाव्या बाजूने ते धरत हाताने ढकलूनच करतो. अशा वेळी अनेकदा पुढचा ब्रेक मारावा लागतो कारण तो उजव्या हातात असतो. मागचा ब्रेक पायाने वापरायचा असल्याने तो वापरता येत नाही. हे जेव्हा मी माझ्या जुन्या बुलेट किंवा एलएमएल स्कूटर बाबत करायचो तेव्हा काहीच अडचण यायची नाही. येझदी रोडस्टर सोबत हे करताना चुकून जरी पुढचा ब्रेक जास्त जोरात दाबला गेला तर गाडी घसरुन पडायची शक्यता असते कारण डिस्क ब्रेक हा चटकन लागतो (शिवाय पार्किंगमध्ये सिरॅमिकची फरशी आहे) आणि वाहन हाताने ढकलताना आपण लावलेल्या बलामुळे वाहनाचा जो काही पाच दहाचा वेग असतो तो त्वरीत शून्यावर येतो कारण या वेगाला डिस्क ब्रेक जरी काम करीत असले तरी एबीएस बंद असते त्यामुळे वाहन कमी वेगात असताना पुढचा ब्रेक लिवर दाबू नये तर त्याला दोन बोटांनी केवळ अलगद स्पर्श करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चेतन सुभाष गुगळे Mon, 01/29/2024 - 18:31 नवीन
https://youtu.be/XBVEbS1pnxw Counter Steering Technique Details in Marathi काउंटर स्टीअरिंग तंत्रज्ञान मराठीत सविस्तर Counter Steering Technique Details in Marathi Hope understanding this technique will help in improving driving skills and minimising the chances of accidents. काउंटर स्टीअरिंग तंत्र मराठीत सविस्तर हे तंत्र समजून घेणे वाहन चालविण्यातील कौशल्य सुधारण्यास आणि त्यायोगे अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदतीच ठरेल अशी आशा आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा