Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाळी (कविता)

श — शार्दुल_हातोळकर, गुरुवार, 10/27/2016 - 19:20
लोपला अंधार सारा, माखली तेजात नगरी उजळले सारेच रस्ते, वाहती आनंदलहरी लागले लाखो दिवेही, जाळण्या काळोख सारा धुंद तो आला सुगंध, कुठुनसा घेऊन वारा शोभतो आकाशकंदिल, टांगला उंचावरी टाकला दारी सडाही, बांधले तोरण दारी होई ते अभ्यंगस्नान, लावुनी उटने सुगंधी तप्त ते पाणी पहाटे, चढविते न्यारीच धुंदी बोचरी थंडी गुलाबी, फुलविते रोमांच अंगी रांगोळी दारामधे ती, रंगुनी साऱ्याच रंगी रोषणाई हा खरोखर, प्राण या दिपोत्सवाचा शुभशकुनी सोनकिरणे, नाश करिती दानवांचा चाहती आबालवृद्ध, गोड खाऱ्या त्या फराळा वाढवी गोडी सणाची, मित्र नि आप्तांचा मेळा काय मी वर्णु दिवाळी, सोहळा परमोच्च आहे मानवाच्या संगतीने, देवसुद्धा वाट पाहे जे भुकेले भोवताली, पोरके असती किती वाटुया आनंद त्यांना, एवढी तुम्हा विनंती - शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
18985 वाचन

💬 प्रतिसाद (7)
ग
गौरी कुलकर्णी २३ गुरुवार, 10/27/2016 - 20:12 नवीन
खुप छान कविता.... शेवटच्या चार ओळी ह्या दिवाळीचा खरा अर्थ सांगून जातात. सर्वांना दिपावलीच्या तेजोमय शुभेच्छा ! आपणां सर्वांचे आयुष्य त्या दिव्यांप्रमाणे लख्ख उजळावे , हिच त्या परम मंगल ईश्वराला प्रार्थना !!!
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 10/27/2016 - 20:18 नवीन
दीपावलीच्या शुभेच्छा तुम्हाला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/28/2016 - 02:24 नवीन
अप्रतिम.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र देवी Fri, 10/28/2016 - 04:43 नवीन
एकदम मस्त... दीपावलीच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Fri, 10/28/2016 - 09:22 नवीन
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! ही दिवाळी आपणा सर्वास मंगलमय जावो आणि आपणास सुख, समृद्धी, आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !! __/\__
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 10/28/2016 - 09:26 नवीन
धन्यवाद! आपणास व आपल्या कुटुंबियांनाही दीपावलीच्या अनेकानेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
ह
हतोळकरांचा प्रसाद Sat, 10/29/2016 - 04:51 नवीन
व्वा!! खूप छान! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा