Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ताज्या घडामोडी - ३

श
श्रीगुरुजी
Mon, 10/31/2016 - 15:46
🗣 314 प्रतिसाद
ताज्या घडामोडी - १ ताज्या घडामोडी - २ मागील धाग्यात ३००+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा उघडत आहे.

प्रतिक्रिया द्या
66485 वाचन

💬 प्रतिसाद (314)
श
श्रीगुरुजी Mon, 10/31/2016 - 15:56 नवीन
काल मध्यरात्री भोपाळ येथीत तुरूंगात असलेल्या सिमीच्या ८ संशयित दहशतवाद्यांनी मध्यरात्री एका रक्षकाची हत्या करून तुरूंग फोडून पलायन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या शोधावर जाऊन ते जिथे लपले होते ती जागा शोधून काढली व त्यांच्याशी झालेल्या चकमकीत सर्व ८ संशयित दहशतवादी ठार झाले. अपेक्षेप्रमाणे हे एनकाऊंटर बनावट असावे असा संशय काँग्रेस, आआप व माकपच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. सर्व संशयित दहशतवादी मुस्लिम असल्याने त्यांची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. यापूर्वीही बाटला हाउसमधील चकमकीत मारल्या गेलेल्या २ दहशतवाद्यांच्या मृत्युबद्दल काँग्रेसने गळा काढला होताच. मला व्यक्तिशः हे संशयित दहशतवादी मारले गेल्याचे अजिबात दु:ख नाही. परंतु यावेळी घडलेल्या घटनाक्रमात पूर्ण सुसंगती दिसत नाही. काहीतरी मिसिंग आहे. नक्की काय घडले ते काही दिवसात बाहेर येईलच. SIMI activists’ jailbreak: Encounter, contradictions, politics and all that happened today
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Mon, 11/14/2016 - 16:07 नवीन
नोटा रद्द करण्याच्या धुमश्चक्रीत एक वेगळी बातमी - भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याविरूद्ध केलेल्या प्रतिकारात ७ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यु झाला आहे. पाकिस्तानने ७ सैनिक मारले गेल्याची कबुली देऊन खालील बातमीत त्यांचे फोटो व नाव छापले आहे (केजरीवाल, निरूपम इ. नी पुरावे मागू नयेत म्हणून हे जाहीर केले असावे) In the line of fire: Pakistani soldiers who were killed last night त्याच संबंधी अजून एक बातमी - Seven Pakistan Army soldiers killed in 'unprovoked' Indian firing across LoC: ISPR या बातमीखाली अनेक पाकिस्तानी वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातील खालील प्रतिक्रिया रोचक आहे.
Candyman about 7 hours ago Pakistan is dealing with a completely different neighbour this time now. Wisdom says, as a CBMs, both the states should take steps that demonstrate they are serious about peace in the region.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 11/15/2016 - 17:19 नवीन
झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर ५ वर्षांची बंदी ! चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय. नोटबंदीचा निर्णय अंमलात आणतानाच आधिच देशाची आणि व्यवस्थेची तारांबळ उडत आहे. हा निर्णय थोडा लांबविला असता तर आभाळ कोसळण्यासारखी परिस्थिती नव्हती. विरोधकांच्या आणि माथेफिरुंच्या हातात आयतं कोलीत मिळणार की राडा करायला पैसे असणार नाही म्हणून ही वेळ साधली कोणास ठाऊक !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/16/2016 - 10:50 नवीन
या निर्णयाकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले दिसते. इतर राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. नोटा बदलण्याच्या गोंधळात हा निर्णय दुर्लक्षिला जाईल हे ओळखून बंदी घातलेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
न
नाखु Wed, 11/16/2016 - 10:56 नवीन
बरोबर आहे नोटांचा धुरळा बसेपर्यंत कदाचीत बातमी शिळी होईलही !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/26/2016 - 16:38 नवीन
+१११ आपले काळे पैसे वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आणि / किंवा आपले राजकिय भांडवल वाचविण्याची धडपड करण्याच्या गडबडीत कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याला झाकीर नाईकबद्दल उमाळा आलेला दिसत नाही ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ध
धर्मराजमुटके Wed, 11/16/2016 - 11:00 नवीन
या निर्णयाकडे माध्यमांनी दुर्लक्ष केलेले दिसते. इतर राजकीय पक्षांनीही प्रतिक्रिया दिल्याचे दिसले नाही. नोटा बदलण्याच्या गोंधळात हा निर्णय दुर्लक्षिला जाईल हे ओळखून बंदी घातलेली दिसते.
तसं झालं तर ठीक आहे मात्र सध्याच्या गोंधळाचा फायदा किंवा नोटबंदीचे कारण वरवर दाखवून विघातक तत्त्वांनी अराजक माजवू नये हीच इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी Mon, 11/21/2016 - 19:20 नवीन
The Reserve Bank of India (RBI) has proposed opening of "Islamic window" in conventional banks for "gradual" introduction of Sharia-compliant or interest-free banking in the country.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 11/21/2016 - 22:34 नवीन
लोकहो, ट्रंप निवडून आलेत आणि त्यांना रशियाशी सहकार्य करायचंय. म्हणून बाल्टिक देशांना म्हणे रशियाचा धोका वाटतोय. इथे बातमी आहे : http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-38051155 च्यायला, ट्रंप नाटोचं महत्व कमी करणार म्हणून कुणाच्या तरी पोटात दुखू लागलंय. आता ओबामा जरी नाटोची भलामण करीत युरोपभर फिरंत असला तरी त्याचा भरवसा कोणालाच वाटंत नाहीये. नाटोवाल्यांची जाम गोची झालीये. उपरोक्त लेखात बाल्टिक देशांना भीती घातलीये, की रशिया विस्तारवादी आहे. क्रीमिया जसा ताब्यांत घेतला तसेच बाल्टिक प्रदेश रशियन लोकसंख्येच्या जोरावर ताब्यांत घेतले जातील, असा युक्तिवाद आहे. पण युक्रेनमध्ये दंगल माजवण्यासाठी रीतसर निवडून आलेल्या यानुकोव्हीचला बंडखोरांनी हुसकून लावलं याविरुद्ध बीबीसी चकार शब्द काढायला तयार नाही. शिवाय, बाल्टिकांना रशियाच्या विस्तारवादाची भीती घालतांना बीबीसीला पोलंडच्या विस्तारवादाचा सोयीस्कर विसर पडला आहे. १९३८ च्या आसपास पोलंडच्या सर्वेसर्वा जनरल स्मिगली-रिड्झ ने लिथुआनिया काबीज केला होता हे आजून लोकांच्या स्मरणात आहे. त्यावेळेस कुठे गेला होता राधासुता (= ब्रिटन) तुझा धर्म? ब्रिटनसारख्या बेभरवश्याच्या देशावर विश्वास ठेवण्यापेक्षा बाल्टिक देशांनी रशियाशी सलोख्याचे संबंध राखलेले काय वाईट? निदान काहीतरी तोडगा तरी मिळेल. याउलट ट्रंपमुळे नाटोचा म्हणावा तेव्हढा उपयोग नाही. नाटोमुळे फक्त तणावच वाढेल. अशी एकंदरीत बाल्टिकांची धारणा आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 11/22/2016 - 10:44 नवीन
३ दिवसांपूर्वी भारतातील काही राज्यात ४ लोकसभा व १४ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक झाली. त्याची मतमोजणी आज आहे. ६ महिन्यांपूर्वी आसाम, तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी व बंगाल मध्ये विधानसभेची निवडणुक झाली होती. त्यावेळी जो ट्रेंड होता तोच या पोटनिवडणुकीत कायम राहिला आहे. ज्या पक्षाने ६ महिन्यांपूर्वी विधानसभेत बहुमत मिळविले होते, त्यांच्याच बाजूने पोटनिवडणुकीचे निकाल लागले आहेत. या व्यतिरिक्त त्रिपुरा मध्ये २ जागांवर विधानसभेची पोटनिवडणुक होती व मध्य प्रदेश मध्ये १ लोकसभा व २ विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुक होती. त्रिपुरामधील दोन्ही जागांवर सत्ताधारी माकपने विजय मिळविला आहे. यापैकी एका मतदारसंघात भाजपच्या मतात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य प्रदेशातील सर्व जागा भाजपनेच जिंकल्या आहेत. मध्य प्रदेश मध्ये डिसेंबर २०१३ मध्ये विधानसभा निवडणुक व मे २०१४ मध्ये लोकसभा निवडणुक झाली होती. सुमारे अडीच ते तीन वर्षानंतर सुद्धा तिथे भाजपचा प्रभाव टिकून आहे. मध्यंतरी गाजलेल्या व्यापम घोटाळ्यामुळे व ८ नोव्हेंबरला जाहीर केलेल्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा भाजपच्या मतदारांवर प्रतिकुल परीणाम झालेला दिसत नाही. महाराष्ट्रात विधानपरीषदेच्या ६ जागांसाठी निवडणुक होती. या ६ पैकी ५ जागा राष्ट्रवादीकडे होत्या व १ जागा भाजपकडे होती. परंतु आजच्या निकालानुसार काँग्रेसने २, भाजपने २, शिवसेनेने १ व राष्ट्रवादीने फक्त १ जागा जिंकली आहे. विधानपरीषद निवडणुकीत जनमानसाचे प्रतिबिंब उमटत नाही. परंतु या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला झटका मिळाला आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 11/26/2016 - 12:29 नवीन
दिलीप पाडगावकर वारले. देशद्रोही टोळक्यासोबत पाकिस्तानात जाणारे हेच ते (मध्यभागी उभे आहेत). Image removed. -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/30/2016 - 10:33 नवीन
काल पुन्हा एकदा भारताच्या लष्करी तळावर हल्ला होऊन भारताचे दोन अधिकारी व पाच जवान मारले गेले. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भारतीय भूभागात असलेल्या लष्करी तळावर अतिरेकी इतक्या सहज पद्धतीने येऊन हल्ला करून अनेकांना मारू शकतात याचे खेदपूर्वक आश्चर्य वाटते. कोठेतरी, काहीतरी नक्की चुकत आहे. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 11/30/2016 - 16:27 नवीन
पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते. गुर्जी, तसे पाहता तुमच्याशी संवाद साधायचा नाही असे ठरवले होते, पण माझ्या कामसंबंधीत तुम्ही बोलल्यामुळे आता बोलतोय. आपण एक काम करू, आम्ही ठेवतो वर्दी उतरवून, बाकी उच्चपदस्थ लष्करी अधिकारी, सामरिक निर्णयकार, सुप्रीम कमांडर, न्यूक्लियर ट्रायड, प्रधानमंत्री सगळे जाऊ दे झिलप्या झाडायला, तुम्हाला वाटतंय न क्षेपणास्त्र डागायची वेळ आली आहे, या मग आता तुम्हीच इथे बटन दाबायला क्षेपणास्त्र प्रणालीचे! कसे? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 11/30/2016 - 18:39 नवीन
तुमच्याकडून अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती. टकाच्या एका धाग्यात वर्णन केलेल्या प्रकारचाच हा प्रतिसाद आहे. सुज्ञांस अधिक सांगणे नलगे! बाकी इतर जे काही तुम्ही ठरविले आहे, त्यास फाट्यावर मारण्यात येत आहे याची आपणास जाणीव आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 11/30/2016 - 18:48 नवीन
वर्मावर लागलेलं दिसतंय! असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 11/30/2016 - 18:58 नवीन
नाही हो. अजिबात नाही. तुमच्या असल्या (टकाने वर्णन केलेल्या प्रकारच्या) प्रतिसादांची सवय आहे मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुज्ञ Wed, 11/30/2016 - 21:03 नवीन
सगळे जाऊदे झिलप्या झाडायला? असे गुरुजींचे म्हणणे आहे असे का वाटले साहेब आपल्याला? पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते. या वाक्यातून तसा अर्थ निघतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/01/2016 - 03:15 नवीन
अरेच्या, सुज्ञ न हो तुम्ही साहेब? घ्या समजून, त्यातूनही आमचीच चूक दिसली तर आम्ही मूर्ख समजून आमच्या तोंडीच लागू नका कसे! सुज्ञपणा असेल तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/01/2016 - 03:30 नवीन
बाकी चाय से ज्यादा किटली कायकू गरम है ये कोडं सुटेलां नई है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/01/2016 - 04:34 नवीन
1 2
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 21:00 नवीन
नाही पण बापूसाहेब एक सांगाच . कोठेतरी, काहीतरी नक्की चुकत आहे. पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते या गुरुजींच्या या वाक्यांमधून आपल्याला गुरुजींनी बाकीच्या लोकांना ( सैनिक , पंतप्रधान वगैरे ना) काही काम नाही आणि क्षेपणास्त्रे डागणे वगैरे सगळे सोप्पे असते असे म्हटलेले का आढळले ? मुद्दाम विचारतोय . एक अभ्यास म्हणून . बाकी कौन किससे गरम हे तुम्ही तो पूर्वीचा एका सदस्यांवरचा श्लेष ओळखलात तेव्हाच आमी ओळखले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सचु कुळकर्णी Wed, 11/30/2016 - 19:08 नवीन
पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागायची वेळ आली आहे असे वाटते.
झिलप्या झाडणे लय दिवसान वाचला न बाप्पा हा वाक्यात उपयोग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 11/30/2016 - 19:15 नवीन
सोपं नाहीच हो ते. कुठून तरी फ्रस्ट्रेशन आणि संताप बाहेर काढायचा असतो. म्हणून असं लिहिलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/01/2016 - 03:17 नवीन
त्या झिलप्या घाला चुलीतनी, थुमीच लै दिवसानं दिसले न राज्येहो, तुमची सय येत राह्यते येत जाव माणसानं दिवसातून एकडाव अटीसा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
स
सचु कुळकर्णी गुरुवार, 12/01/2016 - 05:53 नवीन
आपल मत पटत नाय ना बाप्पा अथिसा कोनाले म्हनुन आपुन गप पडेल असतु वाचन मोड मंदि. तुमि राज्या पुन्याले येनार होता, सारी सोय करेल हाय अभ्याले सांगुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 12/01/2016 - 06:09 नवीन
सारे प्लॅन कॅन्सल झाले ना हो, पुन्याले आलो तर तुम्हाले अन नाखु काकाले भेटल्या बगर थोडीच जाईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचु कुळकर्णी
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 16:59 नवीन
आमी..??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 12/02/2016 - 03:41 नवीन
तुम्ही पण हो दादा! असे कसे म्हणता देवा, ओम सायकलेश्वराय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे Wed, 11/30/2016 - 16:06 नवीन
सर्वोच्च न्यायालयाने चित्रगॄहात खेळ सुरु होण्याआधी राष्ट्रगीत वाजवावे असा आदेश दिला आहे. हे तर आधीपासून होते आहेच ना? मग नव्याने काय बदल किंवा सुरुवात करायला सांगितली आहे न्यायालयाने?
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 11/30/2016 - 16:18 नवीन
अतिशय भंपक निर्णय. केवळ लोकानुनय करणारा. चित्रपट बघायला जाणाऱ्यांनी राष्ट्रगीत ऐकावे हे किती arbitrary आहे. म्हणजे याच न्यायाने सर्कस, नाटक, तमाशा, खेळाचे सामने इ. बघायला जाणाऱ्यांना अशी सक्ती नसावी आणि केवळ चित्रपटगृहांनाच हा नियम हे गैर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रगीत वाजवूनच फक्त राष्ट्रीय भावना दिसते का? राष्ट्रभक्ती हे महान मूल्य आहे, त्याला असं symbols नि मर्यादित करायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अर्धवटराव Wed, 11/30/2016 - 17:50 नवीन
तसंही शाळा समाप्तीनंतर राष्ट्रगीताचा फारसा संबंध येत नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/01/2016 - 03:28 नवीन
बहुतेक सक्तीने आधी फक्त महाराष्ट्रात लागू होता, आता संपूर्ण भारतात लागू केला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 03:48 नवीन
हो का? मला नव्हते माहित. तरीच म्हटलं एवढा गदारोळ का चाललाय अचानक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
व
वरुण मोहिते गुरुवार, 12/01/2016 - 06:33 नवीन
पण आता राष्ट्रगीत चालू असताना फक्त तिरंग्याचं चित्र दाखवा असा निर्णय आहे . बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे देशभक्ती व्हिडीओ दाखवायचे ते नको फक्त तिरंगा दाखवा असा निर्णय आहे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 06:39 नवीन
तेच म्हटलं, आधी तर सगळीकडेच दाखवायचे. आताच काय नवीन घडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/01/2016 - 06:57 नवीन
नक्की माहित नाही पण ती याचिकाच यासाठी होती कि - "भारतातील सर्व सिनेमाग्रहांमध्ये राष्ट्रगीत सिनेमाआधी लावणे अनिवार्य करावे आणि त्याचा एक प्रोटोकॉल असावा". तिरंगा दाखवणे, राष्ट्रगीत चालू असताना सिनेमागृहाचे दरवाजे बंद करणे शिवाय राष्ट्रगीताचे नाटकीय रूपांतर न करणे वगैरे प्रोटोकॉल अंतर्गत ठरवले गेले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
आ
आनंदयात्री गुरुवार, 12/01/2016 - 16:18 नवीन
तामिळनाडू मधल्या कमुठी इथला ६४८ मेगावॅटचा सोलार ऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित झाला त्यासंदर्भातील हि बातमी. http://thenextweb.com/insider/2016/11/30/india-solar-power-plant-huge/ या बातमीत नॅशनल जिऑग्राफिकच्या मेगास्ट्रक्चर्स या मालिकेतला या प्रकल्पासंदर्भातला डॉक्युमेंट्री व्हिडीओहि जोडलेला आहे. तो अवश्य पाहावा. अदानी उद्योगसमूहाकडे उत्तम अभियंत्यांबरोबर चांगल्या प्रोजेक्त मॅनेजर्सचीही उत्तम टीम असावी असे म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा गुरुवार, 12/01/2016 - 20:49 नवीन
छान बातमी आहे. भारतात वीज क्षेत्रात मोठे बदल गेल्या ४ वर्षात झाले आहेत आणि मोठे बदल येवू घातले आहेत. UPA च्या शेवटच्या काळात कोळश्याच तुटवडा झाल्यामुळे मोठे वीज संकट (किंवा वीज टंचाई) निर्माण झालेली. UPA ने शेवटच्या काळात पाऊले उचलाय चालू केलेली परंतु खरा बदल पियुष गोयल यांनी घडवून आणला. मोदी सरकार मधील अत्यंत कार्यक्षम मंत्री पण प्रसिद्धी पासून सतत दूर. हवामानविषय झालेल्या अंतराष्ट्रीय करारामुळे भारतास कोल्श्यावर अवलंबित्व हळू हळू कमी करून अपारंपरिक आणि अणु उर्जेवर भर द्यावाच लागणार आहे. वीज क्षेत्रातील अजून काही उत्तम बदलाच्या बातम्या सापडल्यास लिंक देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Fri, 12/02/2016 - 16:01 नवीन
या माहितीसाठी धन्यवाद. खालची फर्स्टपोस्टची लिंक भारत सरकारच्या रुफटॉप सोलर प्रोजेक्टबद्दल माहिती देते. अदानी आणि इतर एनर्जी कंपन्यांचे मार्केट शेअरबद्दलचे स्टॅट्स अतिशय इंटरेस्टिंग आहेत. http://www.firstpost.com/business/adanis-largest-solar-power-project-in-tn-is-good-but-rooftop-solar-is-the-way-ahead-3017408.हटमळ ह्या सोलार आणि रिन्यूएबल एनर्जी प्रकल्पाचा (100GW) मूळ आराखडा UPA सरकारच्या काळात झाला असावा असे मानून चालतो आहे. त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. (कोणते मंत्री किंवा कोणते ब्युरोक्रॅट्स). याबद्दल काही माहिती मिळाल्यास नक्की सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमितदादा
आ
आनंदयात्री Fri, 12/02/2016 - 16:07 नवीन
हटमळ (html) लिंक चुकली आहे :-). कृपया खालची लिंक वापरावी. http://www.firstpost.com/business/adanis-largest-solar-power-project-in-tn-is-good-but-rooftop-solar-is-the-way-ahead-3017408.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
स
सुबोध खरे Fri, 12/02/2016 - 07:52 नवीन
अदानी उद्योगसमूहाकडे उत्तम अभियंत्यांबरोबर चांगल्या प्रोजेक्त मॅनेजर्सचीही उत्तम टीम असावी असे म्हणायला हरकत नाही. आजकाल असे म्हणणे म्हणजे बुर्ज्वा प्रतिगामी आणि भांडवदारांशी साठगाठ असल्याचे मानले जाते. अडानी, अंबानी इ उद्योजक आणि त्यांनी घेतलेली कर्जे याबद्दल गळा काढणे हे पुरोगामित्वाचे लक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 12/02/2016 - 11:55 नवीन
सहमत! आणि अशा गळे काढणाऱ्यांची तथाकथित कर्जघोटाळेबहाद्दर किंवा सरकारमित्र उद्योजकांची यादी अंबानी-अदानी यापलीकडे जात नाही. कारण सोपे दिसते - मोदी गुजरातचे, अंबानी गुजरातचे, अदानी गुजरातचे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 17:50 नवीन
हे गणित सोडवा बॉ कोणीतरी... http://indianexpress.com/article/india/what-black-money-government-may-be-in-for-shock-4404514/
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 12/01/2016 - 19:26 नवीन
संदीप डांगे, स्पष्टीकरण ढिसाळ आहे आणि युक्तिवाद अनाकलनीय. त्यामुळे निष्कर्ष कशाच्या जोरावर काढला ते कळंत नाहीये. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 20:24 नवीन
माझंही तेच मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:21 नवीन
हे गणित सोडवा बॉ कोणीतरी...
८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतला निम्मा कालावधी सुद्धा संपलेला नाही. हा कालावधी संपू देत आणि नंतरच निष्कर्ष काढणे योग्य होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 10:28 नवीन
म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी? तसेही तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Fri, 12/02/2016 - 10:32 नवीन
म्हणजेच निर्णय चांगला कि वाईट हे 31 डिसेंम्बर नंतर ठरणार आहे , मग तो चांगलाच आहे असं मानण्याची घाई का करावी? मग याच लॉजिकने "निर्णय चुकले" म्हणून कशाला आकांडतांडव करत आहात..? थांबा की ३१ पर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 10:34 नवीन
तीनही मुख्य उद्देश तोंडावर आपटले आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:36 नवीन
असं तुम्हाला वाटतंय. इतरांना नाही. चष्मा काढा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा