Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फटाके आणि दिवाळी..

व
वटवट
Tue, 11/01/2016 - 06:59
🗣 95 प्रतिसाद
चला दिवाळी संपतीये... बरेच पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र आता सुटकेचा निःश्वास सोडत असतील. मला माहितीये, नव्हे नव्हे खात्री आहे, कि ह्या दिवाळी नंतर ते सर्वजण पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरणार आहेत. स्वतःच्या गाड्या भंगारात टाकतील. आजूबाजूचा परिसर अजिब्बात घाण करणार नाहीत. थुंकणं तर सोडाच पण दुसरं जर कोणी थुंकताना दिसलं तर त्याच्या थूतरीत द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांची जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे काही झालं तरी विकणार नाहीत कारण इलेक्ट्रॉनिक कचरा ही एक अतिशय भीषण समस्या आहे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी आता पूर्णपणे शाकाहारी व्हायचं ठरवलं आहे. कारण कुत्र्या-मांजरांना होणार त्रास बघून कशाला कोंबड्या, बोकडं वगैरे वगैरे कापून खायचं असे विचार त्यांच्या मनात जोरजोरात घोळत आहेत. ते एसीत चुकूनसुद्धा बसणार नाहीत. सिनेमा हॉल मध्ये गेल्यावर एक तर आंदोलन करून एसी बंद करायला लावतील नाहीतर. मल्टिप्लेक्सवर आजन्म बहिष्कार टाकतील.. पुण्यातल्यांसाठी अलका, विजय, निलायम, लक्ष्मीनारायण आहेच कि आणि अगदी तिकीट नाहीच मिळालं तर बुधवारातलं वसंत टॉकीज जिंदाबाद म्हणतील. ज्याप्रमाणे दिवाळीतल्या फटाक्यांचा आणि हिंदुधर्माचा काहीच संबंध नाही त्याप्रमाणे गुरांच्या निरपराध कत्तलीचा आणि मुस्लिम धर्माचा, वेगवेगळ्या चमत्काराचा आणि ख्रिश्चन संत पदाचा काहीच संबंध नाही हेही त्यांनी मान्य केलंय... पण त्यांच्या संदर्भातली लहान मुले जरा गोंधळातअसतील... त्यांच्यासाठी खेळायला मैदानं, शिवारं कोणी ठेवली नाहीत, तिथे सोसायट्या केल्या थोरांनी. पोहायला विहिरी ठेवल्या नाहीत. त्या बुजवल्या, थोरांनी. खांदे पुस्तकांनी आणि डोळे स्वप्नांच्या ओझ्यानीं झुकत आहेत. बहुतांश वेळ हा वेगवेगळ्या क्लासेसनी खाऊन टाकलाय. मनोरंजनाचं एकंच माध्यम टीव्ही आणि व्हिडिओ गेम्स, त्याने डोळे खराब होतायेत.. लहान पण सुंदर असतं? ते कसं बुवा? कदाचित हा प्रश्न त्यांना पडत असेल... आपल्यासारख्या थोरांनी बर्याच गोष्टीची वाट लावली. भोगत आहे आपली पुढची पिढी... तसंही दिवसेंदिवस फटाक्याचं मार्केट कमी होतंच आहे, महागाईमुळे. आई सांगते त्यांच्या लहानपणी २ रुपयात दोन मोठ्ठ्या पिशव्या भरून फटाके आणायचे तिचे वडील. प्रत्येक फटाक्याच्या दुकानासमोर रांग असायची. मी लहान असताना तेव्हढे फटाके नाही बघितले. हजार रुपयात एक पिशवी भरून फटाके आणायचे बाबा. लहानपणी फटाके उडवायचा सोस जेव्हढा असतो मोठेपणी तेव्हढा रहात नसतो. मी अक्षरशः मार खाल्लाय फटाके उडवण्यावरून. आता गेल्यावर्षीचे फटाके ह्या वर्षी उडवले त्यात अजून काही राहिलेच आहेत. कदाचित पुढच्या वर्षी तेच उडवेन... मी लहान असताना दिवाळीच्या आधीच्या आठवड्यापासूनच फटाक्यांच्याआवाजाला सुरुवात व्हायची... आता ऐन दिवाळीत पण तसे आवाज ऐकले नाहीत.. कित्येक सोसायट्यात फटाके नाहीत उडवू देत. ज्यांना उडवायचेत ते बाहेर येऊन उडवताना दिसतात... फटाक्यांचं प्रमाण तसं कमीच होतंय कि... तसंही जसं वय वाढतं तसं फटाक्याची संकल्पना बदलत असतेच कि..... काय??...बरोबर ना? असो... अरे मग जो काही आनंद ज्या काही वयात घ्यायचाय घेऊ द्या कि... एवढीच काळजी असेल तर लावा झाडं खास दिवाळीसाठी. दिवाळीचं वाढणार प्रदूषण होईल त्या झाडांसाठी फराळ... अरे विसरलोच... विरोधकांनी वर सांगितल्याप्रमाणे आधीच ठरवलेलं आहे. त्यामुळे मी कोण पामर त्यावर बोलणारा... बिलेटेड दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...

प्रतिक्रिया द्या
17799 वाचन

💬 प्रतिसाद (95)
स
सतिश गावडे Tue, 11/01/2016 - 07:05 नवीन
पुढच्या वर्षी आमच्या आनंदनगर भागातील लोकांना तुमच्या घरासमोर फटाके वाजवायला पाठवू. संध्याकाळी सहा ते रात्री दहा असा कानठळ्या बसणार्‍या आवाजाचा अखंड आनंद लुटा.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 07:49 नवीन
आमच्या घराकडेही पाठवा. आम्ही आमचे पण थोडे फटाके देऊ करू त्यांना. सायकलने किंवा पब्लिक ट्रान्स्पोर्टने पाठवा. त्यानिमित्ताने पर्यावरण संवर्धनाचे हे ही उपाय आहेत हे कळले तर हे ही नसे थोडके असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वटवट Tue, 11/01/2016 - 07:14 नवीन
चालेल... बार्शीत भगवंत मंदिराच्या मागे पाठवून द्या... पण आधी किती जण येणार आहेत ते कळवा... त्यांच्या फराळाचं बघावं लागेल ना??
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 11/01/2016 - 07:31 नवीन
मोजून सांगतो. :) वटवटराव, प्रत्येक गोष्टीला "आमचे आणि त्यांचे" हा रंग द्यायचा नसतो. मी पुण्यात ज्या भागात राहतो त्या भागात फटाक्याच्या आवाजाने प्रचंड त्रास होतो. माझ्यासारख्या धडधाकट माणसाला जर त्रास होत असेल तर लहान मुलं आणि वयोवृद्ध माणसे यांना किती त्रास होत असेल याची कल्पनाही करवत नाही. यावर्षी माझे आईबाबा दिवाळीला कोकणातून पुण्यात आलेत. या त्रासाला कंटाळून ते म्हणत आहेत, पुन्हा दिवाळीच्या दिवसांत आम्ही पुण्याला येणार नाही. माणूस बहीरा होईल या आवाजाने. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे; आवाजाचा नाही. फार पूर्वी कुणाला तरी "आवाजाचे" मार्केट दिसले असणार आणि त्याने हे फटाके प्रकरण सुरु केले असणार. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी फटाके वाजवून किती लक्ष्मी विषारी धुरात आणि आवाजात फुंकून टाकली जाते. ही कुठली आनंद मिळवण्याची विकृत पद्धत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 07:52 नवीन
दिवाळी हा दिव्यांचा सण आहे; आवाजाचा नाही. फार पूर्वी कुणाला तरी "आवाजाचे" मार्केट दिसले असणार आणि त्याने हे फटाके प्रकरण सुरु केले असणार. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी फटाके वाजवून किती लक्ष्मी विषारी धुरात आणि आवाजात फुंकून टाकली जाते. ही कुठली आनंद मिळवण्याची विकृत पद्धत. बरोबर. हा आवाजाचे मार्केट सुरु करणारा कोणीतरी शिवकालीन असणार हे नक्की. कारण तेव्हापासून चंद्रनाळे आणि फुलबाज्या उडवल्याचे उल्लेख वाचलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 07:51 नवीन
लेखाच्या आशयाशी सहमत आहे. आजवर कोणत्याही शाळेने मुलांना मी कायम सायकल वापरून किंवा पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरून पर्यावरण संवर्धन करेन अशी शपथ दिल्याचे ऐकिवात नाही. तेरड्याचे रंग ३ दिवस सारखा पर्यावरण संवर्धनाचा उत्साह दिवाळीपुरते ४ दिवस, इतकाच.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 11/01/2016 - 08:01 नवीन
लेखाचा आशय काय असेल तो असो मात्र फटाक्यांच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजाने त्रास होतो हे मी सामान्य नागरीक म्हणून लिहीलं आहे. पर्यावरणवादी म्हणून नव्हे. एखाद दुसरा फटाका वाजवणे वेगळे आणि तीन चार तास सलग फटाक्यांच्या हजारांच्या माळा पेटवणे वेगळे. काही लोकांच्या आनंदाच्या विकृत कल्पनांचा त्रास इतरांनी का सहन करायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मराठी कथालेखक Tue, 11/01/2016 - 08:44 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
य
यशोधरा Tue, 11/01/2016 - 09:08 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वटवट Tue, 11/01/2016 - 09:12 नवीन
सरसकट फटाक्यांना विरोध करणाऱ्यांना उद्देशून हा लेख आहे... (तो संदर्भ लिहायचा राहिला..) फटाक्यांना निकष लावून त्याचे नियमन करणे वेगळे आणि सरसकट बंदी घालण्याचे बोलणे वेगळे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
भ
भालचंद्र_पराडकर Tue, 11/01/2016 - 10:52 नवीन
हे अगदी मान्य... फटाक्याच्या आवाजावर निश्चित मर्यादा याला कुणीच विरोध करणार नाही, तसेच फटाके वाजवताना घेण्याचे खबरदारीचे उपाय लहान मुलांना शिकणे सक्तीचे करणे इ. इ. मुद्द्याला कुणीच ना म्हणणार नाही. पण सरसकट फटाक्यांवर बंदीचा आग्रह धरण्याचे प्रयोजन काय? ते समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 09:26 नवीन
एखाद्याची सोय हि दुसर्‍यासाठी गैर सोय किंवा त्रास असू शकतो. चालायचंच भारतात सहिष्णुता कमी झाली आहे हे खरं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
वटवट Tue, 11/01/2016 - 09:37 नवीन
हे भारीये राव.... काही झालं कि लगेच सहिष्णुता धोक्यात... लैच अशक्त आहे राव ही सहिष्णुता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 09:45 नवीन
काय करणार ते मोदी सरकार आलं नाय. सगळीकडचीच असहिष्णूता संपली. आमच्या सोसायटीत्ले एक आजोबा असेच फटाक्यांवर चिडायचे. आम्ही लहान होतो तेव्हा. मोठे झाल्यावर आम्ही विचारले (म्हणजे प्रश्न विचारायचि हिम्मत आली तेव्हा) "अजोबा, तुम्ही नाही का उडवायचात फटाके?" ते म्हणाले "आमच्या वेळेला असले फटाके नव्हते, आम्ही फक्तं केपं आणि लवंग्या वाजवायचो आणि ते ही दुपारी नाही (बघायला कोण होतं तेव्हा)". मग म्हटलं मग " तेव्हाच्या म्हातार्‍यांना त्याचा त्रास नाही व्हायचा का? " त्यावर ते चिडून म्हटले "शिंग फुटलीयेत तुला". त्यातून काय ते उत्तर कळलं. असहिष्णुता कमी होते ती अशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
स
संदीप डांगे Tue, 11/01/2016 - 08:16 नवीन
बहुसंख्य लोक्स मिळून करतात तेव्हामात्र विकृतीला संस्कृती असे म्हटले जाते! दिवाली मुबारक!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 11/01/2016 - 08:44 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वटवट Tue, 11/01/2016 - 09:39 नवीन
+११११ हाच न्याय मग विरोधाला पण लागू करा कि राव.. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मराठी कथालेखक Tue, 11/01/2016 - 08:53 नवीन
लेख अजिबात पटला नाही. फटाके उडवणे ही धार्मिक गोष्ट नाहीच. मी BS-IV मानकांत बसणारं वाहन वापरतो. शिवाय त्याची नियमित देखभाल करतो. पुढे जावून CNG मध्ये अधिक पर्याय उपलब्ध होतील तसे CNG वाहन वापरेन. cng मूळे प्रदूषण अत्यंत कमी होते. फटाक्यांतून होणार्‍या धूराचे काहिच प्रमाणीकरण नाही. बाकी १००० रुच्या पेट्रोल/डिझेल मधून मी दहा-बारा दिवस थोडे थोडे प्रदूषण घडवतो. हजार रुपयांचे फटाके दहा-बारा दिवस थोडे थोडे करुन उडवणार का ? फटाक्यांमुळे एकाच वेळी एकाच ठिकाणी खूप जास्त प्रदूषण होते , ते बरेच घातक असते. 'मी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायची' प्रतिज्ञा नाही केली तरी वाहनाची नियमित देखभाल करण्याची प्रतिज्ञा केली आणि तसं वागलो (आणि इतर सगळेच जण वागलेत ) तर वाहनांनी होणारे प्रदूषण खूप आटोक्यात येवू शकेल. बाकी पंपावरील इंधन भेसळ रोखण्यासाठी मात्र सरकारलाच प्रयत्न करावे लागतील.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 09:32 नवीन
कुठलीही मानकं वापरा किंवा कुठलीही इंधनं वापरा. जळलं की प्रदुषण झालंच. अपवाद पब्लिक ट्रान्स्पोर्टसाठी केला जाऊ शकतो कारण ते थोडे प्रदूषण बरेच पोटेन्शियल प्रदूषन प्रीवेंन्ट करते. आमच्या कंपनीच्या रस्त्यावर असलीच कसली तरी भारी भारी मानकं असलेल्या गाड्या ये जा करतात. त्यामुळे प्रचंड ट्रॅफिक जाम आणि 'प्रदूषण' होत असते. त्याची तीव्रता आजिबात कमी नसते. त्यामुळे सायकल, चालणे, बैलगाडी सोडून सगळी वाहने प्रदूषकच आहेत. पब्लिक ट्रान्स्पोर्टला फक्त रस्त्यावर ट्रॅफिक कमी ठेवल्याबद्दल थोडीफार सूट देता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
अ
अभ्या.. Tue, 11/01/2016 - 09:36 नवीन
सायकल, चालणे, बैलगाडी सोडून सगळी वाहने प्रदूषकच आहेत
बाकी प्रदुषणापेक्षा ह्या तीन गोष्टींचाच उपद्रव जास्त आहे रस्त्यावर. कसा तो पाह्यचा असेल तर सोलापुरात या अन पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 09:41 नवीन
पुण्यात चौथ्या गोष्टीचा म्हणजे पब्लिक ट्रान्स्पोर्टचा पण भयंकर त्रास असतो. आणि पब्लिक ट्रान्स्पोर्ट सुधारला पाहीजे ही रड त्याचा अजिबात वापर न करणारे आणि स्टॉपला बस थांबल्यावर त्याच्या मागे थांबायला लागल्यांमुळे चरफडणार्‍यांची देखील असते हे विषेश. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
व
वटवट Tue, 11/01/2016 - 09:43 नवीन
मुळात कसंय माहिती का? पेठा म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
अ
अभ्या.. Tue, 11/01/2016 - 09:46 नवीन
हीहीहीहीही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 09:47 नवीन
पण पुण्याचे प्रातिनिधीक म्हणून उदाहरण घ्यायला हरकत नाही. आणि अजून वरती एका प्रतिसादकाने पुण्याचेच उदाहरण घेतलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
व
वटवट Tue, 11/01/2016 - 10:00 नवीन
अहो तेच म्हणतोय... पुण्याचे प्रतिनिधी म्हणजे महाराष्ट्राचे प्रतिनिधी नाहीत ना?? काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मराठी कथालेखक Tue, 11/01/2016 - 09:41 नवीन
CNG हा निव्वळ hydrocarbon आहे. तो जाळल्यावर फक्त पाणी आणि CO2(कार्बन डाय ऑक्साईड) निर्माण होते. कार्बन डाय ऑक्साईड विषारी वा घातक नाही, तो green house gas असून global warming वाढवतो पण विषारी नाही. (स्वयंपाकखोलीत LPG जळत असताना कधी प्रदूषणाचा त्रास वाटलाय का ? CNG चं ही तसंच आहे) झालंच तर वाहनातील सगळ्या प्रणाली catalytic convertor ई नीट कार्यक्षम असल्यास इंधनाचं अपुर्ण ज्वलन होवून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू तय्रार होण्याचा धोकाही खूप कमी होतो. फटाके उडवून सल्फर डायॉक्साईडसारखे घातक वायू उत्सर्जित होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मराठी कथालेखक Tue, 11/01/2016 - 09:41 नवीन
CNG हा निव्वळ hydrocarbon आहे. तो जाळल्यावर फक्त पाणी आणि CO2(कार्बन डाय ऑक्साईड) निर्माण होते. कार्बन डाय ऑक्साईड विषारी वा घातक नाही, तो green house gas असून global warming वाढवतो पण विषारी नाही. (स्वयंपाकखोलीत LPG जळत असताना कधी प्रदूषणाचा त्रास वाटलाय का ? CNG चं ही तसंच आहे) झालंच तर वाहनातील सगळ्या प्रणाली catalytic convertor ई नीट कार्यक्षम असल्यास इंधनाचं अपुर्ण ज्वलन होवून कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू तय्रार होण्याचा धोकाही खूप कमी होतो. फटाके उडवून सल्फर डायॉक्साईडसारखे घातक वायू उत्सर्जित होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 11/01/2016 - 09:51 नवीन
कार्बन मोनोक्साईडही निर्माण होतो. धोका कमी नाही हो. बाकीचे मुद्दे ठीक. खालील लिंकेवरचा तक्ता पहा. http://naturalgas.org/environment/naturalgas/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 11/01/2016 - 10:07 नवीन
अपुर्‍या ज्वलनामुळे कार्वन मोनॉक्साईड निर्माण होत असतो. catalytic convertor मध्ये या कार्वन मोनॉक्साईडचे ऑक्सिडेशन होवून कार्बन डाय ऑक्साईड बनते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
वटवट Tue, 11/01/2016 - 09:10 नवीन
चला... या नादाने खूपच जागरूक मंडळी आहेत हे समजलं.... ते तसेच असावेत...
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 11/01/2016 - 09:59 नवीन
बाकी लहान मुल ऐकत नसतील तर त्यांना उडवू द्यावे थोडे फटाके.. पण वीस-तीस-चाळिस वर्षांच्या माणसांनाही फटाके उडवल्याखेरीज रहावत नसेल तर काय म्हणावे. अवांतर : मी वयाच्या बारा किंवा तेराव्या वर्षी फटाके उडवणे सोडून दिले. त्यासाठी कोणी प्रतिज्ञा घ्यायला लावली नव्हती. पण 'फटाके उडवले नाहीतर आपण विडीओ आणून सिनेमा पाहू' या ऑफरमूळे फटाके सोडलेत.
  • Log in or register to post comments
व
वटवट Tue, 11/01/2016 - 10:03 नवीन
मी हे लहान मुलांच्याच अनुषंगाने लिहलंय ओ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Tue, 11/01/2016 - 10:11 नवीन
बरोबर आहे. पण निदान मोठ्यांनी तरी स्वतः फटाके उडवणं विनातक्रार बंद करावं ना... लहान मुले लवकरच अनुकरण करतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
म
मराठी_माणूस Tue, 11/01/2016 - 10:00 नवीन
गल्ली बोळात व सोसायटीत क्रिकेट खेळुन होणारे गाड्यांचे नुकसान, पतंगाच्या मांज्याने होणारी दुखापत, गणपती आणि दहीहंडी ला होणारे डीजेंचे कर्कश आवाज हे सुध्दा सहन करायलाच हवे
  • Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर Tue, 11/01/2016 - 10:34 नवीन
काय चाललंय काय या धाग्यावर? धागालेखक, विरोधक, समर्थक, परंपरावादी, सुधारणावादी सगळे चक्क "तुझ्या गळा माझ्या गळा" करीत एकमेकांना दुजोरे देताहेत? पूर्वीचं मिपा राहिलं नाही ब्वाॅ! ;) (कृ.ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Tue, 11/01/2016 - 10:41 नवीन
दिवाळी आहे.. होळी नाही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भालचंद्र_पराडकर
व
वटवट Tue, 11/01/2016 - 10:41 नवीन
हीच खरी सहिष्णुता ओ... तरी अजून काही लोकांची एंट्री झालेली नाहीये...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भालचंद्र_पराडकर
भ
भालचंद्र_पराडकर Tue, 11/01/2016 - 10:34 नवीन
काय चाललंय काय या धाग्यावर? धागालेखक, विरोधक, समर्थक, परंपरावादी, सुधारणावादी सगळे चक्क "तुझ्या गळा माझ्या गळा" करीत एकमेकांना दुजोरे देताहेत? पूर्वीचं मिपा राहिलं नाही ब्वाॅ! ;) (कृ.ह.घ्या.)
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 11/01/2016 - 10:40 नवीन
फेसबुकवरची माझी कालचीच पोस्ट इथे जशीच्यातशी देतो. लेखकाशी सहमत. फटाक्यांनी प्रदूषण होतं अशा ढोबळ वाक्यांचं टुमणं लावून धरणार्‍या प्रत्येकाला आत्मपरिक्षणाचा सल्ला. प्रदूषण फटाक्यांनी होत नाही, प्रदूषण विचारांनी, मानसिकतेने होतं. आज पैसे आहेत म्हणून चढाओढीच्या भावनेने २५,२५ हजारांचे फटाके माणसं आणतात, ज्यांनी एकेकाळी मिळालेल्या ५०० रुपयात बजेट आखून फटाके आणले होते. त्या बजेटमधल्या आनंदाने कधीच प्रदूषण होत नाही, प्रदूषण उन्मादाने होतं, बेफिकिरीने होतं, जी आज तरूण पिढी करतेय, आणि ज्यांना प्रदूषणाचा प्र'ही कळत नाही त्या लहान लहान मुलांना कुठल्या हक्काने हे असले फंडे दिले जातात? का? आपला अतिरेक आणि पुढचा विचार त्यांच्या माथी? त्यांच्या आनंदाचं कॅास्ट कटिंग? वा रे वा! यालाच म्हणतात डबल स्टँडर्ड्स.
  • Log in or register to post comments
व
वटवट Tue, 11/01/2016 - 10:42 नवीन
ज्जे ब्बात... अगदी सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
भ
भालचंद्र_पराडकर Tue, 11/01/2016 - 10:44 नवीन
+11111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
सतिश गावडे Tue, 11/01/2016 - 11:04 नवीन
मुद्दा प्रदुषणाचा नाही. विरोध चिमुरड्यांच्या आनंदाने फटाके वाजवण्याला नाहीच. विरोध आहे तो वीस-तीस-चाळीस वर्षांच्या सुजाण नागरीकांनी तीन चार तास सलग कानठळ्या बसवणार्‍या आवाजाचे फटाके वाजवून परीसरातील लोकांना त्रास देण्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Tue, 11/01/2016 - 12:56 नवीन
हो मग त्या व्यक्तीला नक्कीच ही समज द्या. मला नाही वाटत धागाकर्त्याचाही त्याला पाठिंबा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कपिलमुनी Tue, 11/01/2016 - 11:15 नवीन
मी दुसर्‍या मजल्यावर रहातो . खाली फटाके वाजवण्याच्या आवाजाचा आणि धुराचा प्रचंड त्रास झाला . मोठे आवाजाच्या फटाक्याचा तर अतोनात त्रास होतो . खिडक्या हादरतात. ल्हान बाळे तर रडतात. फटाके आनंद म्हणून उडवा पण सलग ४ तास एखाद्याच्या घरासमोर किंवा रस्त्यावर फटाके फोडणे चुकीचे आहे. ( त्यात वरच्या मजल्याच्या शहाण्याने "इतका त्रास होत असेल तर वरती फ्लॅट घ्यायचा असा टोमणा दिला , त्यावर उद्या मी ४० शॉट्सचा रॉकेट आणणार आहे असा जाहीर केल्यावर बिचारा मावळला =) )
  • Log in or register to post comments
प
पुंबा Tue, 11/01/2016 - 13:32 नवीन
शिवकाशीच्या फटाक्यांच्या कारखान्यात चिमुरडयांचं जे शोषण होतं त्याबद्दल वाचल्या-ऐकल्यानंतर फटाके उडवावेसे वाटलेच नाहीत. फटाके उडवणे हे आनंदाचे चांगले एक्स्प्रेशन नाही आणि दीपावलीमागचा मूळ मंगल हेतू त्यामुळे साध्य होत नाही. बाकी हवा, ध्वनी प्रदुषण फटाक्यांमुळे होतेच, त्यांना विरोध करणं म्हणजे हिंदू धर्माला विरोध असं वाटून घेऊन आपण उगाच इनसिकयुअरीटी दाखवतो असं वाटतं. फटाक्यांविना दीपोत्सव साजरा करणं लहानग्यांना शिकवणं हा संस्कारांचा भाग आहे, ते जमतं हे माझ्या पुतण्यांकडे पाहून पटतं. शाळेत आणि घरीही फटाक्यांच्या दुष्परीणामांबद्दल सांगितल्याने स्वतःहून फटाके आणायचे नाहीत असं ठरवलं त्यांनी.
  • Log in or register to post comments
व
वटवट Tue, 11/01/2016 - 14:15 नवीन
सौराजी .... चिमुरड्यांचं शोषण हा कधीच समर्थनाचा मुद्दा होत नाही... आणि होऊ नये... ह्याही मुद्द्यावर मला एक लेख लिहायचा आहे... जमल्यास लिहीन.. जवळपास गावाकडच्या हॉटेलमध्ये किंवा इव्हन शहरातल्या साध्या हॉटेल मध्ये बालकामगार असतात म्हणून तिथे जाणे टाळता? टाळत असाल तर चांगलंय. सिनेमात बरेच बालकलाकार असतात म्हणून ते बघणे टाळता? टाळत असाल तर चांगलंय (का तिथे पैसे चांगले मिळतात म्हणून ते चालतं?) बरेच कुरियर बॉय ही लहान मुलेच असतात म्हणून त्यांची सर्व्हिस डिनाय करता? करत असाल तर तेही चांगलं आहे. आजूबाजूला अशी असंख्य उदाहरणे आहेत... सिलेक्टिव्ह मत बनवणे सोपे आहे... जनरलायझेशन केलं कि अडचणी वाढतात... असो.... बाकी हवा, ध्वनी प्रदुषण फटाक्यांमुळे होतेच,त्यांना विरोध करणं म्हणजे हिंदू धर्माला विरोध असं वाटून घेऊन आपण उगाच इनसिकयुअरीटी दाखवतो असं वाटतं.>>> मी वैयक्तिक मानतो कि फटाके उडवणे आणि हिंदू धर्म ह्यांचा काडीचाही संबंध नाही. पण कसा सिलेक्टिव्ह टीका करणारे हे जाणत नाहीत आणि फटाक्यांमागून हिंदूधर्मावरच अनुल्लेखाने त्यांना बोलायचे असते. टीकाकारांची नावे बघा... पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र>> इतर धर्माच्याबाबतीत ह्यांचा स्टॅन्ड काय असतो कृपया सांगाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
संदीप डांगे Tue, 11/01/2016 - 14:21 नवीन
पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र>> इतर धर्माच्याबाबतीत ह्यांचा स्टॅन्ड काय असतो कृपया सांगाल? ^^^ तुम्हाला कशासाठी हवाय यांचा स्टॅन्ड? जर तुम्ही स्वतःच फटाके व धर्म यांचा संबंध मानत नाही तर...? आजकाल फ्याशन आलीये म्हणून वरील तिघांना झोडपणे चालू असते, तोच उद्देश आहे काय?₹
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
प
पुंबा Wed, 11/02/2016 - 11:59 नवीन
तेच तर. जर फटाके आणि हिंदू धर्माचा काही संबंध नाही तर, पर्यावरणवाद्यांनी फटाक्यांच्या विरोधात जागृती केली तर काय हरकत आहे. उलट आपण हिंदूंनीच असली जूनी त्रासदायक एक्स्प्रेशन्स सोडून द्यावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुंबा Wed, 11/02/2016 - 11:54 नवीन
१. तुम्ही या धाग्यावर प्रत्येक मुद्द्यावर व्हॉटबाऊटरी करताय. त्यामुळे तुम्हाला फटाक्यांचे दुष्परीणाम कळूनसुद्धा, केवळ विरोधक हिंदू धर्माला विरोध म्हणून फटाक्यांना विरोध करतात असा तुमचा समज झाल्याने तुम्ही फटाक्यांचं समर्थन करताहात. २. ज्या पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र आदींनी इतर धर्मांतील चुकिच्या गोष्टींवर आक्षेप घेतला आहे त्यांनी जर फटाक्यांना विरोध केला तर तुमचे उत्तर काय असेल? फटाक्याविरुद्ध लोकांना सजग करण्यास कधी तुमची हरकत नसेल. ३. बाल शोषण, पर्यावरण, सिव्हील सेन्सचा विचका आणि चांगल्या धार्मीक परंपरेची विकृत अभिव्यक्ती या कारणांनी फटाके दीपावलीच्या मांगल्याला उणेपणा आणतात असं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वटवट
प
पुंबा Tue, 11/01/2016 - 13:36 नवीन
पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र
ह्यांची इतकी हेटाळणी हिंदूत्ववादी करतात की काही कारण नसताना हिंदू धर्म या सगळ्यांच्या विरोधात आहे असा समज होतो.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा