फटाके आणि दिवाळी..
चला दिवाळी संपतीये... बरेच पर्यावरणवादी, धर्मनिरपेक्ष आणि प्राणीमित्र आता सुटकेचा निःश्वास सोडत असतील. मला माहितीये, नव्हे नव्हे खात्री आहे, कि ह्या दिवाळी नंतर ते सर्वजण पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरणार आहेत. स्वतःच्या गाड्या भंगारात टाकतील. आजूबाजूचा परिसर अजिब्बात घाण करणार नाहीत. थुंकणं तर सोडाच पण दुसरं जर कोणी थुंकताना दिसलं तर त्याच्या थूतरीत द्यायला मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांची जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे काही झालं तरी विकणार नाहीत कारण इलेक्ट्रॉनिक कचरा ही एक अतिशय भीषण समस्या आहे ह्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी आता पूर्णपणे शाकाहारी व्हायचं ठरवलं आहे. कारण कुत्र्या-मांजरांना होणार त्रास बघून कशाला कोंबड्या, बोकडं वगैरे वगैरे कापून खायचं असे विचार त्यांच्या मनात जोरजोरात घोळत आहेत. ते एसीत चुकूनसुद्धा बसणार नाहीत. सिनेमा हॉल मध्ये गेल्यावर एक तर आंदोलन करून एसी बंद करायला लावतील नाहीतर. मल्टिप्लेक्सवर आजन्म बहिष्कार टाकतील.. पुण्यातल्यांसाठी अलका, विजय, निलायम, लक्ष्मीनारायण आहेच कि आणि अगदी तिकीट नाहीच मिळालं तर बुधवारातलं वसंत टॉकीज जिंदाबाद म्हणतील. ज्याप्रमाणे दिवाळीतल्या फटाक्यांचा आणि हिंदुधर्माचा काहीच संबंध नाही त्याप्रमाणे गुरांच्या निरपराध कत्तलीचा आणि मुस्लिम धर्माचा, वेगवेगळ्या चमत्काराचा आणि ख्रिश्चन संत पदाचा काहीच संबंध नाही हेही त्यांनी मान्य केलंय...
पण त्यांच्या संदर्भातली लहान मुले जरा गोंधळातअसतील... त्यांच्यासाठी खेळायला मैदानं, शिवारं कोणी ठेवली नाहीत, तिथे सोसायट्या केल्या थोरांनी. पोहायला विहिरी ठेवल्या नाहीत. त्या बुजवल्या, थोरांनी. खांदे पुस्तकांनी आणि डोळे स्वप्नांच्या ओझ्यानीं झुकत आहेत. बहुतांश वेळ हा वेगवेगळ्या क्लासेसनी खाऊन टाकलाय. मनोरंजनाचं एकंच माध्यम टीव्ही आणि व्हिडिओ गेम्स, त्याने डोळे खराब होतायेत.. लहान पण सुंदर असतं? ते कसं बुवा? कदाचित हा प्रश्न त्यांना पडत असेल...
आपल्यासारख्या थोरांनी बर्याच गोष्टीची वाट लावली. भोगत आहे आपली पुढची पिढी... तसंही दिवसेंदिवस फटाक्याचं मार्केट कमी होतंच आहे, महागाईमुळे. आई सांगते त्यांच्या लहानपणी २ रुपयात दोन मोठ्ठ्या पिशव्या भरून फटाके आणायचे तिचे वडील. प्रत्येक फटाक्याच्या दुकानासमोर रांग असायची. मी लहान असताना तेव्हढे फटाके नाही बघितले. हजार रुपयात एक पिशवी भरून फटाके आणायचे बाबा. लहानपणी फटाके उडवायचा सोस जेव्हढा असतो मोठेपणी तेव्हढा रहात नसतो. मी अक्षरशः मार खाल्लाय फटाके उडवण्यावरून. आता गेल्यावर्षीचे फटाके ह्या वर्षी उडवले त्यात अजून काही राहिलेच आहेत. कदाचित पुढच्या वर्षी तेच उडवेन... मी लहान असताना दिवाळीच्या आधीच्या आठवड्यापासूनच फटाक्यांच्याआवाजाला सुरुवात व्हायची... आता ऐन दिवाळीत पण तसे आवाज ऐकले नाहीत.. कित्येक सोसायट्यात फटाके नाहीत उडवू देत. ज्यांना उडवायचेत ते बाहेर येऊन उडवताना दिसतात... फटाक्यांचं प्रमाण तसं कमीच होतंय कि...
तसंही जसं वय वाढतं तसं फटाक्याची संकल्पना बदलत असतेच कि..... काय??...बरोबर ना? असो...
अरे मग जो काही आनंद ज्या काही वयात घ्यायचाय घेऊ द्या कि... एवढीच काळजी असेल तर लावा झाडं खास दिवाळीसाठी. दिवाळीचं वाढणार प्रदूषण होईल त्या झाडांसाठी फराळ...
अरे विसरलोच... विरोधकांनी वर सांगितल्याप्रमाणे आधीच ठरवलेलं आहे. त्यामुळे मी कोण पामर त्यावर बोलणारा...
बिलेटेड दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
आणि हो, फटाके फुटणार, दर वर्षी फुटणार. काहीही झालं तरी फुटणार.वा! याला म्हणतात निष्ठा, जाज्वल्य की काय तो अभिमान. वरवर पाहता हिंदू असणं नेहमीचं सोपं आहे, तेच हिंदू धर्माचं बलस्थान आहे. पण प्रत्यक्षात ते इतकं सोपं नाही. बाकी जुन्या काळच्या सुधारकांना कशाला तोंड द्यावं लागलं असेल याचा नेमका अंदाज यायला आंतरजालाची मदत होते आहे.