नवीन फ्लॅटची रचना, बदल, व्यवहार इ. बद्धल माहिती, सल्ला हवा आहे
नमस्कार.
मी एका दोन बीएचके फ्लॅट ची नोंदणी केली आहे. स्टेट बँकेचे ८८% कर्ज घेतले आहे आणि दोन हप्ते झालेत. एकूण आठ माजले असलेल्या इमारतीत माझा फ्लॅट पाचव्या मजल्यावर व माझ्या भावाचा फ्लॅट पहिल्या मजल्यावर आहे. इमारतीचे बांधकाम सध्या चौथ्या मजल्यापर्यंत आले असून पाचव्या मजल्याचे कॉलम व छत पूर्ण झाले आहे.
फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन असा आहे:
खालील बाबतीत मला सल्ला, माहिती, अनुभव इ हवे आहेत.
अ. फ्लॅटच्या अंतर्गत रचनेविषयी:
१. देवघर ही एक स्वतंत्र (३*४ फुटाची) खोली बांधून घ्यावी की ते शोभिवंत लाकडाचे/ प्लायवुडचे असावे की संगमरवराचे असावे की अजून काही?
२. माझ्या भावाने त्याच्या फ्लॅटमध्ये किचन एरिया वाढवून घेऊन देवघर त्यामध्येच घेतले आहे पण मला किचन मध्ये देवघर असणे प्रशस्त वाटत नाही. (प्लॅनमध्ये किचनच्या बाजूला दिसणारा केशरी रंगाचा चौकोन ही देवघराची नियोजित जागा आहे.) आपला काय सल्ला आहे?
३. किचन मध्ये वूडवर्क करायचे आहे, पण प्लायवुडला कालांतराने वाळवी लागते असा अनुभव आहे. काय करावे?
४. दोन स्नानगृहां पैकी एकामध्ये पाश्चात्य शैलीचे आणि एकात भारतीय शैलीचे शौचालय असावे असे पत्नीचे मत आहे. भारतीय शैलीचे शौचालय खूपच जागा व्यापेल आणि नंतर गरज पडल्यास बदलणे फार अवघड होईल असे साईट इंजिनीअरचे मत आहे. भारतीय शैलीचे शौचालय (विशेषतः निमशहरी भागातील स्त्रियांसाठी) गरजेचे आहे का?
५. सध्या जिथे मी राहतो तिथे आम्ही गच्चीवर कपडे वाळू घालतो. नवीन फ्लॅटमध्ये गेल्यावर बहुधा गच्ची वापरायला मिळणार नाही किंवा ती वापराने गैरसोयीची असेल, अश्या वेळी काय करावे?
ब. खरेदी व्यवहार कर्ज इ. विषयी:
१०. कर्ज घेताना शाखा व्यवस्थापकाने खूपच मदत केली, अतिशय मैत्रीपूर्ण व्यवहार केला, आणि कमालीच्या झटपट वेळेत कर्ज मंजूर करून disbursement देखील केली. तथापि त्याने एसबीआइ ऋण रक्षा हा गृह कर्ज संरक्षण योजना या प्रकारचा विमा मी घ्यावा असा आग्रह केला. मला तो विमा फारसा पटला नाही आणि मी तो घेतला नाही.
माझा पुरेश्या रकमेचा टर्म इन्शुरन्स आधीपासून आहे. या घराच्या कर्जाला संरक्षण म्हणून अजून एक कर्जाच्या रकमेइतका आणि मुदतीइतका एसबीआइचा टर्म इंशुरन्स घ्यावा असा माझा विचार आहे.
असा विमा बँक तारण म्हणून ठेवून घेते का? कर्जाच्या मुदतीत जर कुठल्याही कारणाने माझा मृत्यू झाला तर बँक माझया वारसाला उर्वरित कर्ज न मागता त्या विम्यातून कर्जाची रकम वसूल करून घेऊन उरलेली रक्कम माझ्या वारसांना देईल याची खात्री आहे का?
११. माझा बिल्डर बऱ्यापैकी नामांकित आहे, पूर्ण व्यवहार केवळ चेकने व ऑनलाईन ट्रान्सफरने झाला आहे तरीही फ्लॅट खरेदी करताना बिल्डरकडून कुठे कुठे फसवणूक होऊ शकते?
अजून मुद्दे सुचले तर प्रतिसादांतून सांगेन.
विस्कळीत शीर्षक/धाग्याबद्धल क्षमस्व. प्रतिसादकांचे आगाऊ आभार.
💬 प्रतिसाद
(5)
प
पाटीलभाऊ
Fri, 11/04/2016 - 12:38
नवीन
१. देवघर ही एक स्वतंत्र (३*४ फुटाची) खोली बांधून घ्यावी की ते शोभिवंत लाकडाचे/ प्लायवुडचे असावे की संगमरवराचे असावे की अजून काही?
-- लाकडाचे उत्तम पण थोडे महाग पडेल.
२. (प्लॅनमध्ये किचनच्या बाजूला दिसणारा केशरी रंगाचा चौकोन ही देवघराची नियोजित जागा आहे.)
-- चांगली आहे कि जागा
३. किचन मध्ये वूडवर्क करायचे आहे, पण प्लायवुडला कालांतराने वाळवी लागते असा अनुभव आहे. काय करावे?
-- नियमितरित्या पॉलिश केली तर वाळवी लागत नसावी.
४. भारतीय शैलीचे शौचालय गरजेचे आहे का?
-- माझ्यामते हो नक्कीच
५. सध्या जिथे मी राहतो तिथे आम्ही गच्चीवर कपडे वाळू घालतो. नवीन फ्लॅटमध्ये गेल्यावर बहुधा गच्ची वापरायला मिळणार नाही किंवा ती वापराने गैरसोयीची असेल, अश्या वेळी काय करावे?
-- बाल्कनी आहे कि राव.
१०. तथापि त्याने एसबीआइ ऋण रक्षा हा गृह कर्ज संरक्षण योजना या प्रकारचा विमा मी घ्यावा असा आग्रह केला. मला तो विमा फारसा पटला नाही आणि मी तो घेतला नाही.
माझा पुरेश्या रकमेचा टर्म इन्शुरन्स आधीपासून आहे. या घराच्या कर्जाला संरक्षण म्हणून अजून एक कर्जाच्या रकमेइतका आणि मुदतीइतका एसबीआइचा टर्म इंशुरन्स घ्यावा असा माझा विचार आहे.
असा विमा बँक तारण म्हणून ठेवून घेते का? कर्जाच्या मुदतीत जर कुठल्याही कारणाने माझा मृत्यू झाला तर बँक माझया वारसाला उर्वरित कर्ज न मागता त्या विम्यातून कर्जाची रकम वसूल करून घेऊन उरलेली रक्कम माझ्या वारसांना देईल याची खात्री आहे का?
-- मला तरी एसबीआइ ऋण रक्षा हि गृह कर्ज संरक्षण योजना चांगली वाटल्याने मी ती घेतली आहे.
बाकी टर्म इन्शुरन्स बद्दल पास.
११. माझा बिल्डर बऱ्यापैकी नामांकित आहे, पूर्ण व्यवहार केवळ चेकने व ऑनलाईन ट्रान्सफरने झाला आहे तरीही फ्लॅट खरेदी करताना बिल्डरकडून कुठे कुठे फसवणूक होऊ शकते?
-- शक्यतो घराचा ताबा वेळेवर मिळेल हे बघा...हे बिल्डर लोक 5-6 महिने तरी उशीर करतातच. आणि बिल्डरने आश्वासन दिल्याप्रमाणे सर्व गोष्टी आहेत कि नाही ते बघत राहा.
बादवे ..5-10 मधले आकडे गायब झालेत वाटत :D
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Fri, 11/04/2016 - 15:09
नवीन
देवघरात संगमरवर नको... पण आपल्याकडे देवघरातील नक्शीकाम ग्रानाईट मधे मिळत नाही. तेंव्हा नाईलाजाने संगमरवर. जमले तर इटालियन मार्बल वापरा. त्याला डाग कमी पडतात.
नाईलाजाने बालकनी कपडे वाळत घालण्यासाठी वापरावी लागते व सगळा शो खलास होतो.वाळलेले कपडे ४ चे सुमारास काढून घेण्याची पद्दत ठेवावी.
आपल्या मनाप्रमाणे खोल्या बांधणे बेकायदेशीर च धोकाकादायक ही आहे.बिल्डर प्लानला महत्व आहेच.
प्लायावूड हार्डवूडचे वापरले तर वाळवी लागत नाही बहुदा.
- Log in or register to post comments
म
मनिमौ
Fri, 11/04/2016 - 15:10
नवीन
भारतीय पद्धतीचे शौचालय घरात जरूर असुदे कारण लहान मुलांना कमोड वर नीट बसता येत नाही
माझी मुलगी 4.५ वर्षाची आहे . आमचे घर घेण्या आधी च्या घरात कमोड होता आणी तिला अजिबात जामायच नाही.
दुसर म्हणजे ईझी राॅड गॅलरीत बसवून घ्या.कपडे वाळत घालायला सोप जाईल
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 11/04/2016 - 15:24
नवीन
चांगल्या कंपनीचे वाळवी आणि बोअरर किडे प्रतिबंधक प्लायवूड घेतले तर त्याला वाळवी लागू शकत नाही.
उदा. http://www.centuryply.com/brand/listing/plywood/centuryply-marine-plywood
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/06/2016 - 10:35
नवीन
ते तुमच्या इच्छेवर आहे. छोटी स्वतंत्र खोली असल्यास उत्तम. पूजेसाठी लागणारी शांतता छोट्या खोलीत मिळू शकेल.
त्यासाठी काहीसे महागडे, वाळवी न लागणारे लाकूड वापरावे लागेल. लाकडाला वाळवीविरोधी सोल्यूशनही लावता येते.
हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. जागेची फार काळजी करू नका. ८-१० स्क्वेअर फूट अधिक जागा व्यापल्याने फारच किरकोळ फरक पडतो. पाश्चात्यचे भारतीय किंवा भारतीयचे पाश्चात्य करणे हे खूपच सोपे काम आहे. त्यात काहीही अवघड नाही.
फ्लॅटमध्ये स्वयंपाकघराला लागूनच भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी व कपडे वाळत घालण्यासाठी ड्राय बाल्कनीची सोय करता येते. साधारणपणे जास्तीत जास्त ३० स्क्वेअर फूट जागेत (८ * ३.७५) ड्राय बाल्कनी करता येते.
या विम्याबद्दल फारशी माहिती नाही. परंतु भूकंप, आग, कच्च्या बांधकामामुळे इमारत पडणे किंवा अशा इतर कोणत्याही कारणामुळे सदनिकेची मोडतोड झाली तर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा मिळू शकतो. हा विमा अत्यल्प किंमतीत मिळतो.
कल्पना नाही.
बिल्डर अनेक प्रकारे फसवणूक करू शकतो. एका इंजिनिअरने 'घर पहावे बांधून' (किंवा अशाच काहीशा शीर्षकाचे) एक पुस्तक मराठीत लिहिले आहे. त्यातून बरीच माहिती मिळेल. जमल्यास एकदा ग्राहक पेठेच्या कार्यालयात चक्कर टाकून कोणकोणती खबरदारी घ्यायची याबद्दल मार्गदर्शन घ्या.
- Log in or register to post comments