NDTV : बंदीपुराण
देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती प्रसारणादरम्यान उघड केल्याबद्दल NDTV ह्या वृत्तवाहिनीला 9 नोव्हेंबर 2016 ह्या दिवशी प्रसारण बंद ठेवण्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
सामान्यपणे जनमानसात व मीडियात दोन स्पष्ट मतप्रवाह दिसत आहेत. एक मतप्रवाह म्हणजे ही बंदी योग्यच आहे असे म्हणणारे व दुसरा की ही मीडियाची मुस्कटदाबी आहे असे म्हणणारे.
काल अभिनव पद्धतीने रविशकुमार यांनी प्राईम टाईम शो सादर करून आपले मत मांडले. त्यांची चिडचिड त्यांच्याजागी योग्यच म्हणावी लागेल. त्यांच्या सादरीकरणात एक वाक्य ऐकले कि अशाच प्रकारचे (हल्ल्यासंबंधी वार्तांकन) सर्वच वृत्तवाहिन्यांनी केले पण कारवाईची नोटीस फक्त ndtv ला बजावण्यात आली आहे (व ही स्पष्टपणे अपारदर्शक, पूर्वग्रहदूषित कारवाई आहे असा त्यांचा गर्भित अर्थ दिसत होता.)
असे खरंच आहे काय किंवा सत्य काय आहे हे सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणाकडे बघून ठरवावे लागेल. किंवा सरकारी यंत्रणेने तसे तपासले असेल असे गृहीत धरावे लागेल.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य व देशाची सुरक्षा या दोन्ही संबंधात या घटनेबद्दल चर्चा होणे आवश्यक आहे त्यासाठी काथ्याकुटाचा प्रस्ताव.
ही बंदी योग्य आहे की अयोग्य?
लोकशाही आणि त्यातल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचं मूल्य आणि मुद्दा मान्य जरी केला, तरी देशहिताच्या संदर्भात कोणीही आडवं येत असेल तर तो देशद्रोह ठरावा. मग सरकारे कोणाचीही असू देत...!असे केले तर "आम्ही ठार चूक आणि तुम्ही एकदम बरोबर" अश्या अवस्थेतही तुम्हीच चूक हे सिद्ध करण्यासाठी व्यूहरचना करणे कसे जमेल बरे ?! प्राडॉ, तुम्ही भारतीय राजकारणाचा पायाच नष्ट करायचे म्हणत आहात आणि ७० वर्षे पुराण्या उद्योगांची दुकाने बंद करायला निघाला आहात, हे तुमच्या ध्यानात येत आहे का !? =)) तुमच्या अगदी अअअपुरोगामी मानसिकतेचा टीव्र णीषेध्ध ! ;)