प्रेम....?
भेटत....ती पण नाही,
भेटत....मी पण नाही...
निभवणे तिला जमत नाही,
आशेवर ठेवणे मला पटत नाही.
फसवत ती पण नाही,
फसवत मी पण नाही...
तिला रुसण्याचे दु:ख आहे,
मला एकटेपणाची भीती आहे...
समजत...ती पण नाही,
रागवत... मी पण नाही...
कुठल्यातरी वाटेवर
भेट होत असते नेहमी
बघत... ती पण नाही...
थांबत... मी पण नाही...
जेंव्हा पण बघतो तिला,
ठरवतो काहीतरी बोलेन तिच्याशी...
ऐकत... ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...
पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत.. ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...!
💬 प्रतिसाद
(54)
ज
ज्योति अळवणी
Wed, 11/09/2016 - 15:17
नवीन
वाचली आहे कविता अगोदर. आज कवयित्री कोण ते कळलं. खूप सुंदर आहे कविता. खूप आवडली. तुमच्यापर्यंत आवडलेली भावना पोहोचवता आली याचा आनंद आहे
- Log in or register to post comments
ह
हृषीकेश पालोदकर
Sun, 11/13/2016 - 07:07
नवीन
चांगली कविता
- Log in or register to post comments
र
राम राम मिपा
Tue, 11/15/2016 - 12:45
नवीन
मस्तच !
<< पण एक गोष्ट मात्र खरी आहे,
प्रेम माझे आजही आहे तिच्यावर
नाकारत.. ती पण नाही,
सांगत.. मी पण नाही...! >>>
- Log in or register to post comments
B
Bhagyashri sat…
Wed, 11/16/2016 - 15:46
नवीन
धन्यवाद :)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2