Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिल्ली

ज
जॉनी
Mon, 11/07/2016 - 19:13
🗣 1 प्रतिसाद
दिल्लीतील धुक्याची बातमी वाचून असं वाटतंय कि ज्याची भीती आहे तेच व्हायला लागलंय. दिल्ली राज्यसरकारने शाळांना सुट्ट्या दिल्या आणि काही प्रमाणात उद्योग बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अर्थात हे तात्पुरते उपाय झाले आणि जोपर्यंत ठोस उपाय योजना येत नाही तोपर्यंत अशी ठिगळं लावून काही उपयोग होईल असं वाटतं का? पॅरिस करार, शाश्वत विकास अश्या संकल्पनांबद्दल विचार करण्याइतके भारतीय लोक जागरूक आहेत असं दिसून येत नाही. पण ह्याचे परिणाम खूप गंभीर असणार आहेत. हे केव्हा लक्षात येईल लोकांच्या? दिल्ली ची परिस्थिती बघून बीजिंग प्रमाणे हालत होण्याच्या मार्गावर आहे असंच दिसतंय नाही का? आणि व्यापक दृष्टीतून बघायचं झाल्यास अमेरिका ब्रिटन हे देश प्रदूषणाची भारत आणि चीन ला जबाबदार धरतात. पण सुरवातीच्या काळात ह्या राष्ट्रांकडून झालेल्या प्रदुषणाबद्दल काही बोलत नाहीत. कसंही आणि काहीही असलं तरी दुष्परिणाम दृश्य स्वरूपात दिसायला सुरवात झालीये हे नक्की. बघूया केजरीवाल आणि मोदी कसं काय हाताळतायेत ते...

प्रतिक्रिया द्या
1063 वाचन

💬 प्रतिसाद (1)
क
कंजूस Tue, 11/08/2016 - 05:40 नवीन
दिल्लीत केवळ धुकं नाही तर धुळ (२४७ पार्टिकल) आणि विषारी वायु- Image removed. पुणे शिवाजीनगरजवळ एक हवामानखात्याचा बोर्ड असतो त्यावर किती दाखवतात?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा