ती....
ती फुलंराणी,
सुगंध वेचणारी.
ती स्वच्छंदी,
आनंद उधळणारी.
चंद्रताऱ्यांचं वेड तिला,
ती माझं आभाळ उजळवणारी.
ती पणती,
अंधार गिळणारी.
ती अबोली अबोल,
पण मनातले भाव टिपणारी.
ती थंड झुळूक वाऱ्याची,
नभाला पाझर फोडणारी.
ती मोती शिंपल्यातला,
ती अथांग सागर प्रेमाचा,
ती गुलमोहर,
ती रानफुलं,
ती सोनाली,
ती सोनफुलं.....
(Dedicated to my wife)
💬 प्रतिसाद
(4)
च
चांदणे संदीप
Wed, 11/09/2016 - 07:06
नवीन
कविता खूपच सुंदर आहे! धन्यवाद आणि अभिनंदन!! :)
Sandy
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 11/09/2016 - 08:49
नवीन
पत्नीसाठी इतकी सुंदर कविता लिहिणारा पती लाभल्याबद्दल तुमची पत्नी,
आणि जिच्यासाठी कविता लिहावीशी वाटावी अशी सखी लाभल्याबद्दल तुम्ही,
दोघेही नशीबवान आहात :)
- Log in or register to post comments
J
Jabberwocky
Wed, 11/09/2016 - 09:06
नवीन
धन्यवाद :)
- Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी
Wed, 11/09/2016 - 15:10
नवीन
सुंदर कविता
- Log in or register to post comments