Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ठाण्यातले भोजनालय

अ
अत्रन्गि पाउस
Sat, 11/12/2016 - 14:18
🗣 65 प्रतिसाद
अन्नाला नावं ठेऊ नये हा हाडीमाशी रुळलेला संस्कार आणि अतिशय भावलेले मूल्य ...एखाद्या अनुभवावरून एखाद्या नवीन उत्साही उद्योगाला नाउमेद करणे हा सुद्धा उद्देश नाही पण तरीही उपहारगृहातले अनुभव लिहिल्याशिवाय राहवत नाही तर ठाण्यात अलीकडेच सुरु झालेले नवीन पेंडसे भोजनालय, नामांकित शेफ चे नाव जोडून गाजावाजा करून अतिशय जोरदार जाहिरात करून सुरु झालेले. एकंदरीत खास ब्राम्हणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचे अजून एक नवीन ठिकाण म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि मोठ्या उत्साहाने आज गेलो आणि एकूण सेटप बघताच एक्स्टेंडेड पोळीभाजी केंद्राचा फील आला ... जेवणाचा मोजका मेनू कसलेही ऑप्शन्स नाहीत ....पण पानात आलेले पदार्थ खालीलप्रमाणे -घडीची चपाती (पोळी का म्हटले नाही कुणास ठौक)....अत्यंत जाड पोळी ..आधीच करून ठेवलेली समोर तव्यावर 'गरम' करून घडी करून वाढली (घडी हि कणकेची घालतात जेणे करून पोळी ४ पदरी होऊन सुद्धा लुशलुशीत होते) -तोंडली बटाटा भाजी : कुकर मधी अति शिजवलेली तोंडली (पांढरी दिसणारी)...कमालीची तिखट -चवळीची उसळ : उकडलेली चवळी, कांदा, मसाले स्वतंत्र शिजवून एकत्र केल्यासारखे ..हि वरच्या भाजीसार्खीच तिखट ..मिरच्या वेचून बाहेर काढाव्या लागल्या -अळूची पातळ भाजी : कसलीच स्पेसिफिक चव नाही ... -आमटी : त्यातल्या त्यात बरी ... -मक्याची कोशिंबीर : उकडलेले मक्याचे दाणे वर थोडेसेच लिंबू कोथिंबिरीचे १०-१५ अणू मोजून २ भजी, नैवद्याच्या एका वाटीत दही व दुसऱ्या वाटीत शेवयाची खीर (ठीक ठीक) ह्या सगळ्याचे वट्ट २०० रुपये मोजून ...बाहेर कुणी आवर्जून काही वेगळे अनुभव घेतलेले थेट सांगत नाही तोवर .....येथे पुन्हा जाणे होईलसे वाटत नाही
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
15393 वाचन

💬 प्रतिसाद (65)
य
यशोधरा Sat, 11/12/2016 - 14:22 नवीन
अर्र.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 11/12/2016 - 14:41 नवीन
ठाण्यात काय खाताय? पुण्यात या. ;-)
  • Log in or register to post comments
R
Rahul D Sat, 11/12/2016 - 19:32 नवीन
प्रचंड सहमत. मी मुंबईत आल्यावर MAC-D किंवा मित्राच्या घरी जेवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
R
Rahul D Sat, 11/12/2016 - 22:15 नवीन
अरे हाय काय नाय काय. .... मिसळवेडा राऊ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul D
ब
बोका-ए-आझम Sat, 11/12/2016 - 14:55 नवीन
कोण हो?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Sat, 11/12/2016 - 16:13 नवीन
पराग कान्हेरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 11/12/2016 - 16:52 नवीन
त्याने मुळात व्हेज हाॅटेल काढलंच कशाला? हा मेनू जेवायला बाहेर जाणं जरा कठीणच आहे. हेच पदार्थ घरी कितीतरी चांगले बनतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Sat, 11/12/2016 - 17:14 नवीन
ते माहीत नाही. हा इसम एकेकाळी आमचा सहठेलेकरी होता. तो सेलिब्रिटी शेफ वगैरे आहे हे बऱ्याच काळानंतर अपघाताने समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
उ
उदय के'सागर गुरुवार, 11/17/2016 - 05:47 नवीन
अरेरेरे, पराग कान्हेरे ! ह्या इसमाने पुण्यात देखील (कल्याणी नगर परिसर) 'कॅंडीज' नावाचं रेस्टॉरंट काढलं होतं (बर्याच लोकांना ते होतं आणि आता नाही हे काही ठाऊक नाही). आम्ही फार उत्सुकतेने गेलो होतो. एकही पदार्थ धड नव्हता. पीनट राईस अश्या काहीतरी नावाचा एक पदार्थ तेवढा आठवतो, रेशिपी काय तर अगदी साबुदाणा खिचडीच फक्त साबुदाण्याऐवजी शिजलेला भात त्यात घातला होता. बेक्कार वाईट होतं ते प्रकरण. शेवटी आमचे वैतागलेले तोंडं पाहून आम्हाला एक व्हाईट फॉरेस्ट पेस्त्री फ्री दिली, ती छान होती, अर्थात ती फुकट होती म्हणून छान ;) त्यामुळे आता असं झालं आहे कि, पराग कान्हेरे, अरेरेरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मार्मिक गोडसे Sat, 11/12/2016 - 15:02 नवीन
ठाण्यात कुठे सुरू झालेय हे भोजनालय ?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 11/12/2016 - 16:46 नवीन
कलानिकेतन च्या जवळ उषाकिरण हॉटेल च्या जवळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अजया Sat, 11/12/2016 - 17:00 नवीन
यावरून आठवण झाली ,मिपावर भलामोठा काकु झालेले ठाण्यातले हाॅटेल मेतकूट का? ते कसे सुरु आहे?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 11/12/2016 - 18:21 नवीन
२ मेतकूट आहेत, तुम्हाला नेमके कुठले म्हणायचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
प्राची अश्विनी Sun, 11/13/2016 - 05:34 नवीन
पण दोघांचे व्यवस्थापन, आचारी एकच आहेत ना? जेव्हा जावं तेव्हा गर्दी असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नरेश माने Mon, 11/14/2016 - 07:09 नवीन
मेतकुट बद्दल मिपावरील एक अनुभव. http://misalpav.com/node/29987 हा माझा अनुभव मायबोलीवर आधीच लिहीला होता. तुमची ही लिंक वाचण्यापुर्वीच मी काल ठाण्यातील घंटाळी कॉर्नरला असलेलया 'मेतकुट' या उपहारगृहात जाऊन आलो. अश्विनी के, यांनी लिहील्याप्रमाणे जागा खुप लहान आहे, माणशी प्रमाण पाहता एकावेळेस २० माणसेच बसु शकतात. पदार्थांचे मेन्युकार्ड जास्त भरगच्च नाही, मोजकेच आणि फक्त पारंपारिक मराठी पदार्थांचा भरणा आहे. त्यात कोकणी, वर्‍हाडी, खानदेशी आणि पश्विम महाराष्ट्रातील पदार्थ दर्शविलेले आहेत. दर जरा जास्तच वाटले, कारण यातील काही पदार्थ दादरच्या आस्वादमध्ये याहीपेक्षा कमी दरात आहेत. मी एकटाच असल्यामुळे माझ्याकडे जास्त पर्याय नव्हते, शेवटी मी झुणका भाकरीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरवलं. पण इथे झुणका भाकरी असा पर्याय नाही, म्हणजे तुम्हाला झुणका वेगळा घ्यावा लागतो आणि भाकरी वेगळी. झुणका १२०/- रूपये आणि एक भाकरी २०/- रूपये, तरी मी झुणका भाकरीच घेण्याचे ठरवलं. झुणका १२०/- रूपये का आहे हे माझ्या पुढ्यात झुणका आल्यावर कळले, कारण तो दोन/तीन माणसांना पुरेल एवढा होता. मी ज्वारीची भाकरी मागविली होती तिला भाकरी म्हणण्यापेक्षा ज्वारीची चपाती म्हटले तरी चालेल एवढी पातळ होती. माझ्या घरी माझी आई किंवा पत्नी बनवते त्याच चवीचा झुणका होता. झुणक्यासोबत मिर्चीचा ठेचा, चटणी किंवा कांदा देण्याचे सौजन्य वेटरने दाखविले नाही मी आठवण करून दिल्यानंतर त्याने फक्त कांदा(बारीक चिरलेला) एक वाटी आणुन दिला. दोन ज्वारीच्या चपात्या आणि थोडा झुणका खाऊन आणि एक ग्लास मठ्ठा पिऊन मी निघण्याचे ठरविले. निघताना उरलेला झुणका पार्सल घेतला. बाहेर आल्यावर मनातल्या मनात स्वत:ला दोन शिव्या हासडल्या कारण झुणका भाकरीपेक्षा नागपुरी वडेभात किंवा तुप मेतकुट भात मी मागवले पाहिजे होते असे मला वाटले. सकाळी ८ ते १२ यावेळेत फक्त न्याहारीचेच पदार्थ मिळतात आणि दुपारी १२ ते ३ यावेळेत फक्त जेवणाचेच पदार्थ मिळतात. ३ ते ५ उपहारगृह बंद असते, सायंकाळची वेळ आठवत नाही. थाळी आहे पण दर आहे रूपये २२५/- मात्र, अजुन आठवणारे दरपत्रकातील पदार्थ डाळिंबी उसळ रूपये १५५/-, काळ्या वाटाण्याचा रस्सा रूपये १३५/-, परतलेली भेंडी रूपये ९०/-, वाग्याचे भरीत रूपये १२०/-. पदार्थांचे प्रमाण मात्र जास्त असण्याची शक्यता आहे. यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ठ झुणका भाकरी मी स्वतः दादरच्या तांबे आरोग्य भुवन आणि शिवखेडापुरला खालेल्ली आहे आणि ती ही याच्या पेक्षा वाजवी दरात आणि ज्वारीच्या भाकरी सोबत जिला आपण भाकरीच म्हणु शकतो. इतर पदार्थांची चव घेतली नसल्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. अजुन कोणाचे ह्या उपहारगृहाबाबतीत अनुभव असतील त्यांनी जरूर कळवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पांथस्थ Wed, 11/16/2016 - 07:12 नवीन
यापेक्षा कितीतरी पटीने चविष्ठ झुणका भाकरी मी स्वतः दादरच्या तांबे आरोग्य भुवन आणि शिवखेडापुरला खालेल्ली आहे
तुम्हाला खेड शिवापूर म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेश माने
न
नरेश माने गुरुवार, 11/17/2016 - 06:09 नवीन
हो खेड शिवापुरच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 11/12/2016 - 17:30 नवीन
हाटिल कशाला हवं ?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 11/12/2016 - 19:17 नवीन
काय मिळत हे आत गेल्यावर, मेनू कार्ड नाही आणि फळ्यावर लिहिलेलेच मिळते हे समजले आणि एरवीही कधी कधी हॉटेलात साधं सोपेही बरं वाटते खाऊन ...मुख्य मुद्दा हा कि आहेत तेच पदार्थ नीट असते तरी चालले असते (अर्थात किंमत तरीही वाईट आहेच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
प
पिंगू Sat, 11/12/2016 - 17:36 नवीन
च्यायला हाच मेन्यू खायचा असेल तर घरातच सांगायला काय हरकत आहे. मुळात हॉटेलमध्ये घरची चव चाखायच्या इराद्याने कधीच जाऊ नये, तोंडघशी पडायची वेळ येते.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 11/17/2016 - 03:19 नवीन
वट्ट बोललास भावा! ऍग्रिड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/12/2016 - 18:39 नवीन
@ : उकडलेले मक्याचे दाणे वर थोडेसेच लिंबू कोथिंबिरीचे १०-१५ अणू ››› Image removed. अणूबॉम्ब! Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 11/13/2016 - 05:35 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गवि Sat, 11/12/2016 - 19:24 नवीन
बरं आहे कळलं. पैसे आणि मनस्ताप वाचला. स्वाद थाळी यापेक्षा चांगली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 11/13/2016 - 05:35 नवीन
+11
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
माझीही शॅम्पेन Sun, 11/13/2016 - 17:16 नवीन
स्वाद थाळी यापेक्षा चांगली.
स्वाद अप्रतिम आहे .. किती तरी वेळा खाल्लेलं आहे अजिबात कंटाळा येत नाही वर समाधान सुध्दा होत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मोदक Sun, 11/13/2016 - 03:54 नवीन
तुम्ही त्या हॉटेल मॅनेजर ला तुमचा फीडबॅक सांगितला का?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 11/13/2016 - 05:14 नवीन
तिथे तसं कुणी नव्हतंच ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Sun, 11/13/2016 - 05:17 नवीन
पैसे घेणाऱ्याला सांगायचे किंवा आता त्या शेफ ला ट्विट किंवा मेल करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ख
खटपट्या Sun, 11/13/2016 - 05:49 नवीन
बरे झाले सांगीतलेत. २०० रुपये वाचले.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 11/13/2016 - 06:13 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. रच्याकने स्वाद थाळी व्यतिरिक्त ठाण्यात इतरत्र कुठे मिळते का ब्राम्हणी पद्धतीचे जेवण?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sun, 11/13/2016 - 06:30 नवीन
कूट कूट मेतकूट त्या वरच्या २ पैकी एक थाळी आहे ....तथापि मी स्वत: चाखलेली नाही ... ठाण्यात ब्राम्हणी चवीची थाळी अन्य कुठे ठौक नै ब्वा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Sun, 11/13/2016 - 06:32 नवीन
मेतकूट थाळी चांगलीये असं सुचवायचंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
म
माझीही शॅम्पेन Sun, 11/13/2016 - 17:18 नवीन
मेतकूट हे नक्कीच चांगलं हॉटेल आहे , सुरवातीला उलट सुलट चर्चा झाल्याने हे दोन्ही हॉटेल मिपा वर थोडी बदनाम झाली आहेत पण मी दोन्ही चांगली वाटली
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 11/13/2016 - 17:32 नवीन
हे ठाणेकर असलेच. फक्त हे चांगलं - ते चांगलं असं सांगतात. लगे हाथ पत्ता द्या की.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Mon, 11/14/2016 - 03:32 नवीन
हा पत्ता घ्या Kamala Smruti, Sane Guruji Road, Near Santoshi Mata Temple, Naupada, Thane West सोप्प्या शब्दात सांगायचं तर बी-के-बिन वरून ब्राह्मण सोसायटी कडे एक आतला रस्ता जातो त्या रस्त्यावर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 11/14/2016 - 05:01 नवीन
शनिवारी चेकवण्यात येईल. कार्ड घेतात ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन
क
किसन शिंदे Mon, 11/14/2016 - 08:02 नवीन
कार्ड घेतात. तिथली डाळिंबी उसळ बरी लागते. रच्याकने पुढच्या शनिवारी आलात तर कट्टा करू तुमच्यासोबत, हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अत्रन्गि पाउस Mon, 11/14/2016 - 08:28 नवीन
मसाला साबुदाणा खिचडी (त्यात मिरची ऐवजी लाल तिखट वाप्ररतात)...थोडं बटाटा जास्त आणि बरोबर २-४ वाट्या दही अस मागवाव ... आणि स्वादसमाधी लावावी ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ब
बोका-ए-आझम Mon, 11/14/2016 - 09:13 नवीन
नक्कीच जमवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ट
टवाळ कार्टा Mon, 11/14/2016 - 09:38 नवीन
जा जा....माजी संपादक भेटतील...आम्च्याब्रोब्र येत नैत ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
माझीही शॅम्पेन Mon, 11/14/2016 - 08:04 नवीन
नक्की कल्पना नाही अगोदर विचारून घ्या नाहीतर भांडी घासायची वेळ यायची (कृ ह घ्या ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
वेल्लाभट Mon, 11/14/2016 - 09:26 नवीन
शी! असं असेल तर त्यापेक्षा मेतकूटही बरं म्हणायचं. नाहीतर सरळ दादरच्या जिप्सी कॉर्नर, आस्वाद, यांना भेट द्यावी.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 11/14/2016 - 10:54 नवीन
असं असेल तर त्यापेक्षा मेतकूटही बरं म्हणायचं.
होय अगदी, दुपारच्या शिळ्या भाकरी मायक्रोव्हेवमध्ये गरम करून देतात म्हणजे बरेच म्हणायचे. फक्त पोटात दुखल्यानंतर त्यांच्या नावाने शंख करायचा नसतो. अशा आणखी छोट्या मोठ्या गोष्टी सोडल्या तर मेतकूटसारखे दुसरे हॉटेल शोधून सापडायचे नाही ठाण्यात. हॉटेलच्या सुरूवातीच्या काही भेटीत "आम्ही आमच्या सर्व्हिसमध्ये अजून जास्त सुधारणा करू" असे सांगणारे सनी पावसकर मालक सध्या कुठे हरवलेत कुणास ठाऊक.?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Mon, 11/14/2016 - 12:37 नवीन
शंख करणारे आम्ही नव्हेच किसनभाऊ. बाकी इतक्यात जाणं नाही झालं तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
क
किसन शिंदे Mon, 11/14/2016 - 18:29 नवीन
अर्रर्र! तुम्हाला नाही म्हणत हो. ते भाकर प्रकरण स्वानूभवावरून सांगतोय. त्यामुळे शंख आम्हीच करतोय असं समजा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ब
बोका-ए-आझम Mon, 11/14/2016 - 19:04 नवीन
दादरच्या जिप्सी कॉर्नर, आस्वाद, यांना भेट द्यावी.
प्रकाश विसरलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
न
नूतन सावंत Tue, 11/15/2016 - 18:21 नवीन
आता प्रकाश आणि आस्वाद,जिप्सीच्या मध्ये एकादशीपण या तिघांना टक्कर द्यायला उभं राहिलंय,केतते भंडारी हॉलच्या तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नमकिन Mon, 11/14/2016 - 19:14 नवीन
पेंडसेत गेलो होतो ५+२ (५वर्ष वयाची मुल). भाजी ढब्बूस मिरची कुकरमध्ये शिजवलेली तिखट होती, चपात्या २, पसरट व मऊ तर गोड बासुंदी नैवेद्याच्या वाटीत होती (एका घोटात गट्टम ) पण पुन्हा वाढले नाहीं. भजी फक्त २ नग. १ पापड. वरण-भात/पुलाव (पैकी दोन्हीचा तांदूळ सारखाच व तुटका होता, त्यात पुलाव बेचव. ताक वेगळे २०/ग्लास. एरवी १६० असणारे ताट सणावारी २००/- विकतात. वाढपी नाहीं, पूर्ण ताट सजवून टेबलावर येते. मागाहून काही मागितले तर तेवढेच वाटीतून पुढ्यात, एसी वर असल्याने ये-जा करेस्तोवर बसा. आनंद नाहीं मिळाला पण एक नमूद करतो की बालकांना आमच्याच ताटातले जेवू घालण्यास मुभा दिली व त्याला वेगळा भार नाहीं लावला. राजधानी /पंचवटी/भगत इ थाळी पासून कोसो दूर. स्वाद ला पर्याय म्हणून गेलो पण स्वादला जाईन फिरुन. खूप मोठी स्पेस आहे मराठी -भट चवीत धंदा करायला
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 11/15/2016 - 19:15 नवीन
एक अत्यंत दुर्लक्षीत गुजराती भोजनालय आहे. स्टेशनजवळचे जे टीपटॉप आहे त्याच्या मागे. हॉटेल म्हणावे असे नाही. पत्र्याच्या खोलीत चालते. अनलीमीटेड थाली असते. तव्यावरुन गरम गरम फुलके येतात ताटात. अगदी तट्ट फुगलेले. चार प्रकारच्या भाज्या असतात. कीतीही पोळ्या मागवा. नंतर कीतीही भात मागवा. दोन प्रकारच्या डाळी/वरण असते. स्टेशन परीसरातील बहूतेक गुजराथी व्यापारी इथे येउन जेवतात. कट्टा करु शकत नाही पण एकदा अवश्य अस्वाद घ्यावा असे ठीकाण आहे. अप्रतीम स्वाद. मी दोन वेळा गेलो होतो तेव्हा १६० रुपये ताट होते. आता जास्त असावे. खूप भूक लागली असल्यास इथे जावे. अवांतर - मी माझ्या १३० कीलो मित्रास इथे घेउन गेलो होतो. पैसे वसूल केले त्याने :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा