ठाण्यातले भोजनालय
अन्नाला नावं ठेऊ नये हा हाडीमाशी रुळलेला संस्कार आणि अतिशय भावलेले मूल्य ...एखाद्या अनुभवावरून एखाद्या नवीन उत्साही उद्योगाला नाउमेद करणे हा सुद्धा उद्देश नाही पण तरीही उपहारगृहातले अनुभव लिहिल्याशिवाय राहवत नाही
तर ठाण्यात अलीकडेच सुरु झालेले नवीन पेंडसे भोजनालय, नामांकित शेफ चे नाव जोडून गाजावाजा करून अतिशय जोरदार जाहिरात करून सुरु झालेले. एकंदरीत खास ब्राम्हणी पदार्थांचा आस्वाद घ्यायचे अजून एक नवीन ठिकाण म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि मोठ्या उत्साहाने आज गेलो आणि एकूण सेटप बघताच एक्स्टेंडेड पोळीभाजी केंद्राचा फील आला ...
जेवणाचा मोजका मेनू कसलेही ऑप्शन्स नाहीत ....पण पानात आलेले पदार्थ खालीलप्रमाणे
-घडीची चपाती (पोळी का म्हटले नाही कुणास ठौक)....अत्यंत जाड पोळी ..आधीच करून ठेवलेली समोर तव्यावर 'गरम' करून घडी करून वाढली (घडी हि कणकेची घालतात जेणे करून पोळी ४ पदरी होऊन सुद्धा लुशलुशीत होते)
-तोंडली बटाटा भाजी : कुकर मधी अति शिजवलेली तोंडली (पांढरी दिसणारी)...कमालीची तिखट
-चवळीची उसळ : उकडलेली चवळी, कांदा, मसाले स्वतंत्र शिजवून एकत्र केल्यासारखे ..हि वरच्या भाजीसार्खीच तिखट ..मिरच्या वेचून बाहेर काढाव्या लागल्या
-अळूची पातळ भाजी : कसलीच स्पेसिफिक चव नाही ...
-आमटी : त्यातल्या त्यात बरी ...
-मक्याची कोशिंबीर : उकडलेले मक्याचे दाणे वर थोडेसेच लिंबू कोथिंबिरीचे १०-१५ अणू
मोजून २ भजी, नैवद्याच्या एका वाटीत दही व दुसऱ्या वाटीत शेवयाची खीर (ठीक ठीक)
ह्या सगळ्याचे वट्ट २०० रुपये मोजून ...बाहेर
कुणी आवर्जून काही वेगळे अनुभव घेतलेले थेट सांगत नाही तोवर .....येथे पुन्हा जाणे होईलसे वाटत नाही
💬 प्रतिसाद
(65)
स
सूड
Tue, 11/15/2016 - 19:30
नवीन
कट्टो प्लान कर मरे!! ;)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 11/15/2016 - 19:52
नवीन
दोन दीवस उपाशी र्हावन कट्ट्याक येउक व्हया... :)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 11/15/2016 - 19:43
नवीन
पुरोहित नाव आहे मला वाटतं त्याचं.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 11/15/2016 - 19:52
नवीन
बहूतेक
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 11/16/2016 - 07:09
नवीन
पुरोहीत भोजनालय आहे ते.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 11/16/2016 - 12:15
नवीन
पुढल्या भेटीत गोखलेऐवजी इथे जायचा प्लान करु.
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 11/16/2016 - 13:08
नवीन
वोक्के मालक.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Wed, 11/16/2016 - 17:43
नवीन
विसरू नका
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Wed, 11/16/2016 - 17:49
नवीन
हजर असेन तर मीही येइन
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 11/18/2016 - 14:48
नवीन
असं ठरवून नाय हो भेटत आम्ही, ते काम त्या मध्यवर्ती ठिकाणात राहणार्या लोकांचं. तरी प्रयत्न नक्कीच करु कळवायचा.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 11/15/2016 - 19:26
नवीन
थाळीच खायची असेल तर डोंबोलीत सुयोग, पुण्यात सुकांता आणि ठाण्यात स्वाद. एरवी काय मजा नाय.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Wed, 11/16/2016 - 12:47
नवीन
हे ठाण्यात कुठे आहे ?
- Log in or register to post comments
न
नमकिन
Wed, 11/16/2016 - 18:20
नवीन
ठाणे-आलोक हॅाटेल समोरील पॅरेडाइज टॅावर, १ माळा येथे अनलिमिटेड राजस्थानी थाळी चालु होती कैक वर्ष, कौपिनेश्वर मंदिर तर्फे. सद्या सुरु आहे की नाहीं माहित नाहीं.
गोगा भोजनालय पण असेच एक हरिनिवास परिसरात थोडे आत आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Wed, 11/16/2016 - 18:26
नवीन
पण आता नाही बहुतेक ...
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 11/17/2016 - 03:08
नवीन
//ह्या सगळ्याचे वट्ट २०० रुपये मोजून ...बाहेर//
तुलनाच केली तर बटाटावडापाव सात रुपये होता तेव्हा थाळी १२०रु होती हाटिलात, तर आता वडापावच १६-२० झाल्यावर थाळी कितीला असावी?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2