मुद्रा राक्षसाने पाडलेले प्रश्न
माफ करा ,सदाहरित धाग्या ऐवजी इकडे काही शंका टाकत आहे ,कारण प्रश्न आकस्मिक स्वरूपाचे असून एक अपॆक्षा अधिक आहेत
१) नोटा बदलायला ५० दिवसाची मुदत असताना लोक एवढ्या रांगा का लावून आहेत ? का एवढी घाई ?
२) समजा १५० ची खरेदी केली तर २००० चे सुट्टे मिळतील असे वतांतेय का ? १००० च्या किंवा ५०० च्या नोटा reluanch का केल्या नसतील ?
३) निर्णय तडक फडकी होता तर ATM अचानक एकाच दिवशी कसे बंद केले गेले ,कारण भारतात अजून एक क्लिक ने सर्व atm बंद ची सोय आजून नाहीये
४)३० decemeber ला काय वाढून ठेवले असेल ?
💬 प्रतिसाद
(8)
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 11/13/2016 - 01:21
नवीन
ए. ... पॉपकॉर्न... वेफर्स.. खारेदाणेवाला Ssssssssssssss
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 11/13/2016 - 05:03
नवीन
महान प्रश्न पडलेत तुम्हाला..
संशोधनं करून उत्तरं द्यावी लागणार ;)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 05:48
नवीन
1, कारण नोटा बंद झाल्यात, कोणीही स्वीकारत नाही, त्यांना नव्या नोटा किंवा शंभराच्या पाहिजेत. आपल्याकडच्या नोटा चालणार नाहीत तेव्हा ताबडतोब बदलून आणाव्या लागतीलच ना? यासाठीच गर्दी आहे. नोटा बंद न होता सगळं सेम असतं तर गर्दी नसती झाली.
2. पहिलं: कोणी देत नाही, दुसरं: माहित नाही
3. एका क्लिकवर बंद नै होत, पैसे नसले कि बंद होतं, लोकांनी सर्व काढून घेतल्यावर बंदच पडेल, कोणाच्या क्लिक ची गरज नाही,
4. तुका म्हणे उगे राहावे जे जे होईल ते ते पाहावे!
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Sun, 11/13/2016 - 05:58
नवीन
सुट्या नोटा सरकारने बंद केल्या नाहीत. त्या गायब होण्याचे कारण -लोकांनी केलेली जमाखोरी. जी वस्तू कमी घरात भरून ठेवायची. या वर्षी सेप्टेम्बर महिन्यात कुणीही ५ किलो कांदा लाईनीत उभा राहून खरीदी केला नाही.
माझ्या कडे पेतीएम आहे (जाहिरात करीत नाही आहे), काही हि फरक नाही पडला. मदर डेरी आणि आमचा भाजीवाला हि घेतो.
आपल्याला ३० डिसेंबरचा प्रश्न नाही, काय करणार मजबूर इमानदार सरकारी बाबू (सरकार बिना पूछे आयकर काटलेती ही कितनी ना इंसाफी).
गल्लीतला दुकानदार नेहमीच उधार द्यायला तैयार असतो. गरीब जनतेचा बँक खाता नसेल पण उधार खाता परमानेंट असतो. उधारी करायला शिका.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 11/13/2016 - 07:45
नवीन
उधारी वर देश चालत असेल तर करन्सी पाहिजेच कशाला! ;)
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 11/13/2016 - 08:30
नवीन
ही घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे ! उत्तरे बरोबरच असावीत असा आग्रह धरु नये :)
उत्तर १ : काही लोकांची नेहमी "मला मिळतं का कुत्र्याला मिळतं अशी मानसिकता असते" त्यामुळे ते घाई करतात.
उत्तर २ : काही लोकांकडे खरोखरीच खर्च करायला सुट्टे पैसे नाहित. त्यामुळे असे लोक मजबुरी म्हणून लाईनीत उभे आहेत. शिवाय सरकारी काम आणि ६ महिने थांब ही म्हण बरेच लोकांना अनुभवाने माहित असते त्यामुळे सरकार एखादे काम ३ दिवसात होईल असे म्हणते तेव्हा ते ३ महिन्यांत नक्की होईल हे लोकांना पक्के माहित आहे. त्यामुळे देखील काही लोक घाई करत आहेत.
ज्या लोकांकडे काही प्रमाणात सुट्टे पैसे आहेत , ऑनलाईन व्यवहार करु शकतात त्यांनी शक्य तितक्या दिवस थांबायचा प्रयत्न चालवला आहे.
वैयक्तीक अनुभव : माझ्याकडे देखील १०० च्या नोटा नव्हत्या. पण ७-८ तारखेला गावी गेलो होतो. तिकडे बायकोला / मुलाला दिवाळी भेट म्हणून ५०० रुपये (१०० च्या नोटांत मिळाल्या). शिवाय बायकोकडे ब्लॅक चे शंभर च्या चलनातील ५०० रुपये ( बायकोचे ब्लॅक चे पैसे म्हणजे नवर्यापासून लपवून ठेवलेले अडीअडचणीला कामाला येणारे पैसे) असे १००० रुपये मिळाल्यामुळे ७-८ दिवस निवांत आहे. शिवाय २-३ दिवस जाता येता कोणत्या एटीएममधे प्रथम पैसे भरले जाऊ शकतात याचा थोडा रिसर्च केला. त्याचे गोमटे फळ काल मिळाले. १०० च्या २० नोटा काल मिळाल्या. त्यामुळे आता आरामशीर बँकेत जाऊन पैसे भरुन येईन. जाण्यायेण्याचा खर्च मायबाप सरकारने पेट्रोल च्या रुपाने सोडविलेला आहे. अगदीच अडचण असेल तर लेकाने पिग्गी बँकेत अजून आठवडा निघेल इतकी श्रीशिल्लक ठेवलेली आहे.
उत्तर : १५० चे सामान घेऊन ५०० कोणीही सुट्टे देत नाही.
वैयक्तीक अनुभव : मला माझ्या नेहमीच्या किराणा दुकानदाराने १५० चे सामान घेतांना ५०० रुपये स्वीकारुन ३५० रुपये परत दिले. ऑफीस साफ करणार्या बाईंनी ५०० ची नोट स्वीकारुन त्यांच्या पगाराचे ३०० रुपये कापून २०० रुपये परत दिले. (आता माझ्याकडे अजून ५५० रुपयाचे सुटे पैसे आहेत. ) नेहमीच्या सलूनवाल्याने देखील ५०० ची नोट स्वीकारायचे कबूल केले आहे पण सद्या केस वाढलेले नसल्यामुळे लगेच पैसे घालवणार नाही.
उत्तर : वर संदिप डांगे यांनी उत्तर दिले आहे. त्यांना मम म्हणतो.
काही होणार नाही. घाबरु नका. आपण कसे २-४ धपाटे घातल्यावर मुलांना दम देतो की बघ, वेडावाकडा वागलास की अजून धपाटे खाशील. पण तसे आपण प्रत्यक्षात करुच असे नाही. कारण सुरुवातीचा जोर ओसरुन गेलेला असतो. मुलाचे अश्रू बघून आपल्याला अजून धपाटे मारण्याची इच्च्छा नसते. मुलही अगोदरच्या माराने घाबरुन गेलेले असते त्यामुळे लगेच काही वेडेवाकडे वर्तन करीत नाही.
इति धर्मराज बाबा !
- Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके
Sun, 11/13/2016 - 08:34
नवीन
अजून एक.
"सरकार के भरोसे ना बैठो ! का पता सरकार भी आपके भरोसे बैठी हो !
इति. मांझीबाबा, द माऊंटन मॅन !
- Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे
Sun, 11/13/2016 - 08:41
नवीन
१) मग काय सर्वांनी शेवटच्या क्षणी धावाधाव करायची काय? ठरावीक दिवशी ठरावीक बँकेत कीती जण येणार आहेत हे लोकांना कळवण्याची सरकारने काही व्यवस्था केली आहे का ? - मुर्ख प्रश्न.
२) पहिलं : अनुभव घेउन बघा. दुसरं : सध्या लोकांकडील १००,५० २०,१०, चे चलन व्यापारी जमा करत आहेत. जानेवारीनंतर २००० नोटेच्या बदल्यात हेच व्यापारी कमीशन घेतील.
३) पैसे संपले की ते मशिन आपोआपच बंद होते.
४)वाढून? खायची ईच्छाच संपलेली असेल.
- Log in or register to post comments