Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुभव नोटा बदल आणि पैसे काढणे (आपल्याच खात्यातून)

न
नाखु
Mon, 11/14/2016 - 05:30
🗣 218 प्रतिसाद
ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे. एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत. नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव. खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो. लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११). बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते. शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्‍ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या). आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२. माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण : दाखला क्रं १ : एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का? बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा. एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे. दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई. नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल. बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन. बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते) शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच. थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे) कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.
वर्गीकरण
अभ्यास
अभिव्यक्ती स्वातंत्र्
अर्थ व्यवस्थापन

प्रतिक्रिया द्या
46778 वाचन

💬 प्रतिसाद (218)
य
यशोधरा Mon, 11/14/2016 - 05:52 नवीन
पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! =)) मला कॉसमॉस बॅंकेत पैसे लगेच बदलून मिळले साधारण २० एक मिनिटांत. ही १० किंवा ११ तारखेची गोष्ट आहे. १०० च्या २० नोटा आणि २,००० ची एक. सर्वांना थोडे तरी पैसे मिळावेत ह्या कारणाने केलेली व्यवस्था.
  • Log in or register to post comments
द
दाते प्रसाद Mon, 11/14/2016 - 11:14 नवीन
बंगलोरच्या कॉसमॉस बॅंकेत विनासायास पैसे मिळाले . सकाळी गेलो तेव्हा कॅश आलेली नव्हती , चेक लिहून, सही करून बँकेत दिला , बाकीच्या कामाकरता बाहेर पडलो . एक-दीड तासांनी कॅश आल्यावर बँकेने फोन केला , बँकेत परत गेलो ५-१० मिनिटात पैसे मिळाले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 12:56 नवीन
पॅनीकता शब्द फारच लाइकला आहे! =)) बघा, इतर भाषांच्या शिरकावाने मराठी भाषा समृद्ध होत चालल्याचे नवीन पुरावे मिळले ! कोण रे तो स्वघोषित भाषाशास्त्री उगाच तक्रार करतोय ?! =)) अवांतर : या निमित्ताने माझ्या ऐकीव आवडीचा "वीकनेसपणा" हा शब्द आठवला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Mon, 11/14/2016 - 13:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 11/15/2016 - 16:31 नवीन
ह्याह्याह्या!! तसेच "परवडेबल" आणि "यूसलेसगिरी".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 05:52 नवीन
काल बॅंकेत गेलो, मोजून सहा सात लोक होते लायनीत, मी आठवा, उभा राहत बरोबर बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी नीट विचारपूस केली, नक्की काय काय करायचं आहे ते विचारलं ते कसं करता येईल ते सांगितलं, सर्व शंकांचे समाधान व उपाययोजना नीट सांगून तो बाजूला झाला, त्याने ओळ्खपत्राची झेरॉक्स लागेल म्हटल्यावर माझ्याकडे नव्हती, तेव्हा म्हणाला काळजी नको, इथे जागेवर मिळेल. बाजूला बॅंकेचे झेरॉक्स मशीन, त्यावर झेरॉक्स काढायला एक जण जात, एक इंटर्न मुलगी सर्व ग्राहकांना झेरॉक्स काढून देत होती, रांग सोडून जायचे कारण नव्हते. तीच आपले ओळखपत्र घेऊन झेरॉक्स काढून योग्य ते डिक्लेरेशन लिहून सही करायला हातात आणून देत होती. मी चेकबुक विसरलो, नोटा बदलून द्यायची वेळ दुपारी तीन नंतर होती, त्यामुळे सर्व नोटा खात्यात भरल्या, नंतर येऊन विड्रॉ करू असे ठरवले, एटीएम सुरु नव्हते, बँकेत फक्त 2000 च्या नोटा होत्या, दहाव्या मिनिटाला मी बँकेबाहेर होतो, माझी बँक हाय प्रोफाइल असल्याने सर्व सुख सुविधा मदत उपलब्ध होती. हाय प्रोफाइल असल्याने फारशी गर्दी नव्हती, ती कधीही नसते. कॅश भरणारे दोन-पाच लाख च्या गड्ड्या घेऊन किमान दोन चार जण होते लायनीत. नंतर वेळेत जायला शक्य झाले नाही, बँक बंद झाली, एटीएम बंद आहे, सर्व पैसे खात्यात, खिशात व घरात मिळून सुटे 500 आहेत. आजही सुटी आहे, एटीएम अजून सुरु झाल्याची काही बातमी नाही,
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 11/14/2016 - 08:19 नवीन
कोणती बँक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गवि Mon, 11/14/2016 - 10:38 नवीन
डोळे पाणावून पाझरु लागले. कोणती हो ही बँक.. ? सांगा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Mon, 11/14/2016 - 10:50 नवीन
हाय प्रोफाईल म्हणजे RBI तर नव्हे? ;) "...आणि मी स्वप्नातून जागा झालो" हे वाक्य टाकायचे विसरलात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद_१९८२ Mon, 11/14/2016 - 12:40 नवीन
खिक्क !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 13:30 नवीन
दोन दिवस आधी बँकेतून आलेला मेल नावासकट टाकला होता ट्रे मार्क च्या धाग्यावर, त्यातलं बँकेचं नाव संपादकांनी संपादित केलं, त्यामुळे आता नाव टाकलं नाही.. :)) तुम्हाला स्वप्न नगरीतून फिरून यायचं असेल तर या नाशिक ला, हाथ कंगन को आरसी क्या, नै काय कि आजकाल आम्ही गोळ्या देतो अशी आमची बदनामी सुरु आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ओ
ओम शतानन्द Tue, 11/15/2016 - 07:54 नवीन
खरे आहे कि स्वप्नरन्जन ? अशी ब्यान्क आस्तित्वात असेल यावर विश्वास कसा ठेवावा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चौकटराजा Mon, 11/14/2016 - 05:53 नवीन
८ तारखेला साडेदहा वाजता नोटा बद्द्ल बातमी समजली. सवा अकराला ए टी एम वर गेलो . गर्दी थोडी होती. रात्री पावणेबाराला ५०० ५०० असे करून सात वेळा एकून साडेतीन हजा॑र काढले. घरी काटकसर चा फतवा जारी केला. काही किराणा रोख ( १०० चा नोटा) व काही मॉल मधून खरेदी केला. गेले ४ देवस बाहेरून फळे वडापाव मिसळ, शाम्पू ई आणण्यावर वर बंदी आहे . पेट्रोल ७ तारखेलाच भरले होते. जर नसते तर॑ भागीदरीत २५० २५० चे भरले असते. ९ तारखेला. व त्याकडून १ दिसें नंतर २५० घेतले असते. चेकने बॅकेत पैसे काढायला पुरेशी कॅश असेल यावर विश्वास नसल्याने बॅकेत गेलोच नाही. १२ तारखेला लॉकरवाल्या बँकेत गेलो. बायकोचे ग्राचुएटीचे रोख मिळालेले पैसे रिटर्न भरताना कसे दाखवायचे याचा संभम असल्याने ठेवले होते. त्यात सुदैवाने १०० चे ४ हजार सापडले. त्यावेळी त्या॑च बॅकेत २००० देत होते पण पासबुक नसल्याने दुसरे दिवशी गेलो तर रक्क्म १००० झाली होती. तेथील बाईला विचारले मग मंगळावारी प्रत्येकी १० रू ची नोट का? ती हसून म्हणाली मंगळ वारी कॅश अपेक्षित आहे. लोकांमधे उधारीचा मामला जिथे आहे तिथे काही सवाल नाही. वहातुक व वैद्यकीय सेवा यांच्या बाबत खाजगी वर काही नियम ८ लाच जाहीर करून मोदीनी त्यांची उधारी सरकार वसूल करून देईल अशी हमी दिली असती तर या सेवा मस्त चालू राहिल्या असत्या. तिथे मोदी कमी पडले. बाकी चंगळबाजीला उत आला होता त्याला चाप बसलेला पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments
न
निराकार गाढव Mon, 11/14/2016 - 16:05 नवीन
तेथील बाईला विचारले मग मंगळावारी प्रत्येकी १० रू ची नोट का?
का हो, आपण पुण्याचे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
च
चौकटराजा Tue, 11/15/2016 - 08:33 नवीन
कॉमन सेन्स असेल तर हा प्रश्न पडणार नाही. २००० ची रक्कम १००० या हिशेबाने जॉमेट्रिकल प्रोग्रेशन ने १० रू हा अंदाज साधारण बरोबर आहे. त्यात पुणेकर असल्याचा वा नसल्याचा प्रश्न येतो कसा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निराकार गाढव
ब
बिहाग Mon, 11/14/2016 - 06:06 नवीन
काल बँकेत गेलो. माझ्या आधी ७ - ८ जन होते. आधार कार्ड घेऊन गेलो होत , बँकेतल्या लोकांनीच त्याची फोटो कॉपी काढली , मी सही केली , आणि पैसे भरले. सेल्फ चेक देऊन दहा हजार काढले. सगळे काम १५-२० मिनिटात झाले. बँकेतल्या लोकांचा aatitude खूपच चांगला होता
  • Log in or register to post comments
प
पिंगू Mon, 11/14/2016 - 06:08 नवीन
मी बँकेत पैसे काढायच्या रांगेत गेलो आणि माझा नंबर येताच बाहेर कॅश संपली, असा फलक लागला. हाय रे माझ्या कर्मा..
  • Log in or register to post comments
ए
एकनाथ जाधव Mon, 11/14/2016 - 08:51 नवीन
मी पण आज ATM मधुन पैसे काढायच्या रांगेत गेलो ४५ मिनीट उभा होतो आणि माझा नंबर येताच बाहेर कॅश संपली, असा फलक लागला. हाय रे माझ्या कर्मा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
ग
गणामास्तर Mon, 11/14/2016 - 06:13 नवीन
मी स्वतः अजून बँकेत गेलो नाहीये. जिकडे तिकडे कार्ड वापरून खर्च चालूये. हापिसबाहेरचा टपरीवाला पण कार्ड घेतोय. कार सर्व्हिसिंगला टाकली होती ती घ्यायला गेलो तेव्हा तिथले कार्ड मशीन चालत नव्हते. तिथला कॅशियर म्हणाला कि पेटीएम करा, दुसरा पर्याय नव्हता म्हणून करून टाकले. आता त्याचे हे उत्पन्न सरकार कसे ट्रॅक करणार हा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
ब
बिहाग Mon, 11/14/2016 - 06:14 नवीन
मी बराच वर्ष शक्य तितके व्यवहार कार्ड वापरून करतो . ( डेबिट आणि क्रेडीट ) . मला त्याचा फायदा मी किती आणि कसे पैसे खर्च करतो हे शोधण्यासाठी होतो , वर बरेच लाभ होतात ते निराळे ( कॅश back मिळते ). क्रेडीट कार्ड वर फुल ऑटो पेमेंट असल्याने आज तागायत कधी व्याज भरावे लागले नाही. नोटा बाद झाल्या तरी अजूनतरी मला काहीच फटका नाही.
  • Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे Mon, 11/14/2016 - 11:16 नवीन
मलाही अजुनतरी एकही रोख व्यवहार करायची वेळ आलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिहाग
म
मदनबाण Mon, 11/14/2016 - 07:10 नवीन
गेल्या दोन दिवसात अंदाजे रोज ४-५ तास विविध बॅ़कांच्या रांगेत उभे राहुन तिर्थरुपांबरोबर हा अनुभव घेतला, कुठलाही विशेष त्रास झाला नाही. एक गोष्ट मात्र लक्षात आली की २००५ पुर्वीच्या ५०० आणि १००० च्या २-३ नोटा तिर्थरुपा़कडे होत्या त्या १-२ बॅ़कांनी घेण्यास नकार दिला, पण इतर बँकेत त्याच नोटा घेतल्या गेल्या.माझे बरेचसे काम { पेट्रोल भरणे / बिल भरणे } हे कार्डानीच होत असल्याने मला काही त्रास जाणवला नाही. ५०० च्या २ नोटा होत्या त्या पैकी १ पेट्रेल पंपावर पहिल्या दिवशी खपवण्याचा प्रयत्न केला, पण १०० चे सुटे नसल्याने पेट्रोल भरणे झाले नाही, परंतु २र्‍या पंपावर दुसर्‍या दिवशी ती मो़कळी करण्यास यश मिळाले.उरलेली बँकेत बदलुन काम झाले ! :) वयोवॄद्ध लोकांना मात्र थोड्या फार प्रमाणात त्रास होताना जाणवले, यात स्लीप भरणे /नक्की कुठले डॉक्युमेंट ध्यायचे आहे या बाबतीत संभ्रम होणे इं... पुढील २ आठवड्यात हा ताण बर्‍यापैकी निवळेल असा अंदाजा आहे... कॄपया :- कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवु नका. सरकार / बँंकं आणि एकमेकांना सहकार्य करा... पोटदुखी / मूळव्याध / इं झालेल्या राजकारण्यांची विधाने ऐकुन, कशी यांची चांगली ठासली गेलीय याचा पुरावा आणि आनंद घ्या.गंगेत वाहुन गेलेले / कचराकुंडीत सापडलेले / पोत्यात सापडलेले अश्या अनेक बातम्यांवर नजर ठेवा आणि भ्रष्ट लोकांची कशी दुरावस्था झाली आहे ते आवार्जुन पहा. जनतेला त्रास होतोय असा गळा काढणार्‍या नेते मंडळींना तुम्ही रोजच्या ट्रॅफिक मधे अडकुन / खराब रस्त्यातुन प्रवास करुन / मुंबईतल्या प्रचंड गर्दीतुन रेल्वेने प्रवास करुन आणि इतके वर्ष भ्रष्टाचार आणि बाबु मंडळींच्या माजाला समारे जाउन त्रास भोगलात आणि भोगत आहात त्या बद्धल यांनी काय उपाय केलेत ? याचे उत्तर आधी ध्यावयास सांगा ! मोदींनी खर्‍या अर्थाने "करुन दाखवले" ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Daily currency exchange, ATM withdrawal limits increased as banks start releasing new Rs 500 notes
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 11/14/2016 - 07:13 नवीन
आइने ४३००० रुपये बँकेत भरले. जेष्ठ नागरीक असल्यामुळे रांगेतील लोकांनी पुढे जाउन दीले. दहा हजार रुपये सेल्फ चेकने तीनेच काढले. काहीही त्रास झाला नाही. नवीन नोटा मिळाल्या. २००० ची नोट खूपच पातळ आहे. आमच्या भागातील एटीएम केंद्रे अजून बंद आहेत. बाजूलाच रीलायन्स मार्केट असल्यामुळे भाजीपासून कपड्यापर्यंत सर्व सामान कार्ड वापरुन घेता येतेय.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Mon, 11/14/2016 - 07:13 नवीन
मी बातमी आल्यापासून कुठले एटीएम पहिले चालू होईल याचे आडाखे बांधण्यात मग्न होतो. सरकारने वर्दळीच्या ठिकाणची एटीएम्स सर्वप्रथम चालू करावी हे सुचविले पण बँक नेमके उलटे करील असा आडाखा होता. याचे कारण वर्दळीच्या ठिकाणी १०० च्या नोटांनी भरलेले एटीएम रिकामे व्हायला अवघे काही तास लागले असते. अंदाजानुसारच घोडबंदर रोडवर, मेन रोडवर असलेली पण दुकानांच्या गर्दीत पटकन दिसून न येणारी आयसीआय च्या एका एटीएम्समधे पैसे भरणारी व्हॅन येताना दिसली. पटकन बाईक साईडला घेऊन तिथे नंबर लावला. माझ्या अगोदर फक्त २ नंबर होते. अवग्या ५-७ मिनिटात दोन कार्डांवरुन २००० हजार प्रमाणे ४००० रुपये मिळाले. काल आयडीबीआय बँकेत गेलो. बँक नुकतीच उघडली असल्यामुळे अवघ्या ५ मिनिटात पैसे जमा करुन झाले. ५०० च्या दोन नोटा बदलून हजार रुपये घेऊ म्हटले पण बँकवाल्यांकडे फक्त "गुलाबो' च होत्या. त्यामुळे घेता आली नाही. एकंदरीत सुरुवातीच्या २-३ दिवसांपेक्षा कालची पॅनीकता कमी होती. मात्र पहिला धाग्यावर लिहिलेल्या प्रतिसादाप्रमाणे सरकारी बँकांच्या अंग चोरुन काम करण्याचा प्रवृत्तीचा फटका मात्र नक्कीच लोकांना बसतोय. (अपवाद क्षमस्व). आताच्या परिस्थितीत त्यांना जोमाने काम करायचेही असेल पण "पडीले वळण इंद्रिया सकळा" मुळे त्यांचा नाईलाज झालेला असावा. बँकेतील कर्मचारी, मॅनेजर यांची जातीने विचारपूस करुन ते गेले ३-४ दिवस सतत काम करत असल्याबद्द्ल अभिनंदन केले. व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांच्या चेहर्‍यावर एक सुखावणारे हसू आले. ते पाहून बरे वाटले. मात्र ३-४ दिवस मुद्दाम बर्‍याच बँका फिरुन कामकाज बघीतले. गर्दी होती पण लोक बर्‍यापैकी शांत होते (एखाद दुसरा अपवाद असतोच)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 11/14/2016 - 07:18 नवीन
"पडीले वळण इंद्रिया सकळा"
लोळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 13:02 नवीन
+११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अनुप ढेरे Mon, 11/14/2016 - 07:18 नवीन
http://atmsearch.in/ ही एक वेबसाइट सुरू झाली आहे. तुम्हाला हव्या त्या भागात कोणती ATM चालू आहेत हे त्यावर दिसेल. तुम्हाला कुठलं ATM चालू आहे असं दिसलं तर त्यावर प्लीज अपडेट करा.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 11/14/2016 - 07:25 नवीन
https://docs.google.com/spreadsheets/d/1BRa8ejPDHkPRscWNjvlKJCW1SU4R35arNtGPb6QR-0M/htmlview#gid=0 ही लिंक कामी यावी, ही एक गूगल डॉक्स स्प्रेडशीट आहे, लोकांनी सुरु केलेला इनिशिएटीव्ह आहे , भारतात कुठल्या बँकेच्या कुठल्या गावच्या कुठल्या शाखेत रांग कमी आहे हे रियल टाईम अपडेट केले जाते ह्यात , ह्याचा थोडाफार लाभ व्हावा, तसेच पैसे जमा करायला सीडीएम सोईचा लाभ घेतला तरी फायदा होईल अन वेळ वाचेल असे सुचवावे वाटते
  • Log in or register to post comments
न
नरेश माने Mon, 11/14/2016 - 07:37 नवीन
माझे ओरिएण्टल बँक आणि एस बँक या दोन बँकेत अकाउंट आहे. ओरिएण्टल बँक कार्यालया जवळ असल्यामुळे मी ११ तारखेला साधारण ११.१५ वाजता घरी असलेले पैसे भरण्यासाठी गेलो होतो. बँक पहिल्या मजल्यावर आहे पण रांग पार खाली तिसुध्दा कंपाऊंडच्या बाहेर. पैसे काढण्यासाठी, नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे भरण्यासाठी एकच रांग. बँकेचा कोणी कर्मचारी मार्गदर्शन करण्यासाठी नाही. सर्वत्र सावळा गोंधळ चालू होता. मी पाच मिनिटे रांगेत उभा राहिलो. नंतर माझ्यामागे उभे असणार्‍या एसमाला सांगून वरती बँकेत गेलो. तिथे सुध्दा अशीच परिस्थिती होती. आत मध्ये गेल्यावर पैसे भरण्यासाठी वेगळी रांग आणि नोटा बदलून आणि पैसे काढण्यासाठी वेगळी रांग होती. त्यात सुध्दा पैसे संपल्यामुळे जे चेकने पैसे काढण्यासाठी आले होते त्यांना टोकन देऊन दुसर्‍या दिवशी येण्यासाठी सांगितले गेले. पण कोणीही कर्मचारी बाहेर रांगेत उभे असणार्‍यांना हे सांगत नव्हते. सर्व्हर डाऊन होते त्यामुळे पैसे भरण्यासाठी सुध्दा खुप वेळ लागत होता. मी दिड वाजेपर्यंत उभा राहिलो. तरी त़ळमजल्यापर्यंत पोहचलो नव्हतो. उभे राहून पाय भरून आले होते. मग मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. जेवण उरकून मी दुपारी साधारण ३.०० च्या दरम्यान एस बँकेच्या शाखेत गेलो जी कार्यालयापासून थोडी लांब आहे. तिथे बँकेच्या बाहेर भली मोठी रांग लागली होती ती पाहून पोटात गोळा आला. बँकेच्या गेटवर दोन तीन बँकेचे कर्मचारी उभे होते. त्यांच्याकडे चौकशी करायला गेलो तेव्हा कळले कि ती रांग नोटा बदलून घेण्यासाठी होती. आणि बँकेच्या खातेधारकांना लगेच आत घेत होते. तिथे माझ्यापुढे एकजण पैसे भरण्यासाठी उभा होता. त्याच्यानंतर माझा नंबर होता. पाच मिनिटांमध्ये काम झाले. त्या तिथे नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या माणसांना सुध्दा त्या बँकेचे कर्मचारी सर्व समजावून सांगत होते आणि रांगेत शिस्त ठेवण्याचे काम करत होते. एकाच दिवशी एका सरकारी आणि खाजगी अश्या बॅंकांमध्ये मला दोन वेगवेगळे अनुभव आले.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 11/14/2016 - 07:48 नवीन
परवा HDFC बँकेच्या लायनीत दोन तास उभी राहिले.सर्व कामकरी मंडळींना पगार द्यायला हवा होता.त्यामुळे बँकेत जाणे अनिवार्य होते. लाइनीत पेइनस्लिप वाटत होते तसेच नोटबदल फाॅर्म पण. एक बँक अधिकारी लोकांना आत सोडायच्या कामावर होता.मी आरामात उभी होते व्हाॅट्स अॅपवर टिपी करत! पण त्याला आपला प्रिफर्ड कस्टमर असा उभा बघून उगाच गिल्ट येत होता! आत गेल्यावर मात्र माझी सर्व कामे मला बसायला सांगून कर्मचाऱ्यांनी एकत्र करून दिली. चेकने दहा काढले,चार बदली करुन मिळाले आणि काही डिपाॅझिट, पेशंट कडून घेतलेले चेक ही सर्व कामं पटापट करुन दिली.वर पुढच्या वेळेला तीन नंतर या लाइनीत नका उभे राहू सल्ला आणि चहा पण मिळाला! सर्व कर्मचारी लोकांना मदत करत होते.आणि शांतपणे गर्दी हँडल करत होते. काल IDBI बँकेत आधी फोन करुन गेले.तिथे अवघ्या दहा मिनिटात नवर्याचे काम झाले.
  • Log in or register to post comments
व
विशुमित Mon, 11/14/2016 - 08:00 नवीन
मी काल नैनिताल ला ऑडिटर्स लोकांना फिरायला घेऊन गेलो होतो. माझ्या कडे रु. ५०० च्या चार नोटा आणखी शिल्लक होत्या. तेथील एका बँके समोर चहा पीत असताना सहज बँकेत डोकावलं तर गर्दी थोडी कमी होती. मी सहज विचारलं नोटा बदलून मिळतील का? लगेच तेथील व्यवस्थापक पुढे आले आणि त्यांनी स्वतः माझा नोटा बदली करण्याचा फॉर्म भरून दिला. डांगेंजीनी सांगितल्या प्रमाणे माझ्याकडे ही ओळखपत्राची xerox नव्हती. तेथील कर्मचाऱ्याने ती पण आणून दिली. १०-१५ मिनिटांमधे मला रु.२००० ची नोट मिळाली आणि मी आनंदाने बाहेर पडलो. नंतर जो पर्यटकांचा लोंढा बँकेमध्ये घुसला ....सांगायला पारावार नाही.... बँकेतील अनुभव चांगला आला, (देशभक्ती सिद्ध करायला २-३ तास उभे राह्यला नाही लागले) पण समस्या एकच आहे--- रु.२००० सुट्टे कसे करू. (घरात माझ्या पिल्लाचा गुल्लक आहे त्यात टाकणार आहे).
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 11/15/2016 - 08:05 नवीन
मी काल नैनिताल ला ऑडिटर्स लोकांना फिरायला घेऊन गेलो होतो
एल्डेको सिडकुल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
आ
आदूबाळ Tue, 11/15/2016 - 11:18 नवीन
इथे कोकाकोला फॅक्टरी टाकणर आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
इ
इरसाल Tue, 11/15/2016 - 12:13 नवीन
ती उ. प्र. मधल्या डासणाजवळची ला काय झालं? नवा टाकयलेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
व
विशुमित Tue, 11/15/2016 - 12:20 नवीन
नाही नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/14/2016 - 08:00 नवीन
लय भारी नाखु ! मोदींच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आम्हीही घरभर धूंडाळुन काही काळा पैसा किंव्वा सावळा पैसा सापडतो का ते पाहिले, पण हा हन्त हन्त , चिक्कार शोधुनही फक्त ५०० च्या ४ नोटा निघाल्या :( बाकी आमच्या सगळा पैसा गोराच ! शिवाय सोडॅक्सोची लख्ख शुब्र चकाकणारी फुड कुपनं पाहुन तर आम्हला आमच्या मध्यमवर्गीय पापभीरुत्वाची अपार कणव दाटुन आली ! आणि ह्याही पुढे जाऊन इन्कम टॅक्स ने नुकतेच पाठवलेल्या इनकम टॅक्स भरल्याबद्दलच्या सर्टिपिकेटची प्रिंट पाहुन तर डोळ्यात टच्चकन पाणीच आले :( असो. त्या चार नोटांपैकी एकाचे पेट्रोल भरले आहे , उरलेल्या तीन नोटा इथेनॉल भरयला वापराव्यात असा मानस आहे, कोणी बारवाला ऑटडेटेड गांधी स्विकारत असल्यास कळवा ! नाहीतर आपले राजवर्धन आहेच ! लवकरच भेटु मग!! चीयर्स !!
  • Log in or register to post comments
भ
भाते Mon, 11/14/2016 - 08:06 नवीन
आठ तारखेला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एसबीआयच्या एटीएमवरून हजार रूपये (५०० च्या दोन नोटा) काढले होते. रात्री मोदींनी त्या नोटा रद्द झाल्याचे जाहिर केले. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास ते पैसे एसबीआय बँकेत (डोंबिवली, एमआयडीसी शाखा) जमा करायला, बदलुन घ्यायला नाही, गेलो होतो. माझ्याकडे ५०० च्या दोन नोटा, पॅनकार्ड आणि त्याची झेरॉक्स, स्लिप भरायला खिशात एक पेन होते. बँकेबाहेर १००-१५० लोकांची एकच भलीमोठी रांग होती. बाहेरच्या रांगेत टोकन घेऊन मग आतमध्ये जायचे होते. रांगेत ७०% लोक पैसे बदलुन घ्यायला आणि फक्त ३०% लोक पैसे भरायला आले होते. आतमध्ये दोन वेगळया रांगा होत्या. बाहेरच वेगळया रांगा केल्या असत्या तर पैसे भरायला आलेल्या लोकांना नक्कीच कमी त्रास झाला असता. काम पुर्ण व्हायला किमान दोन-तीन तास लागतील असे समजल्यावर उन्हात ऊभे राहण्यापेक्षा परत मागे फिरलो. १०-१५ दिवसांनी गर्दी कमी झाली कि पुन्हा एकदा प्रयत्न करेन. बाबा जेष्ठ नागरिक असल्याने सुदैवाने त्यांना बँकेतुन (एनकेजीएसबी मुलुंड पुर्व शाखा) पैसे लगेच बदलुन मिळाले पण ५०० रुपयांच्या चार नोटा दिल्यावर दोन हजारांची नोट मिळाली. सुट्टे पैसे नसल्याने ती नोट घ्यायला आता कोणी तयार नाही आहे. १,५ आणि १० ची जमवलेली नाणी मोजल्यावर ४०० रुपये निघाले. घरात अडीअडचणीसाठी एक हजार रुपये (१०० च्या १० नोटा) ठेवले होते ते सध्या वापरतोय. ३० डिसेंबरपर्यंत वेळ असताना सगळेजण जुन्या नोटा बदलुन घ्यायच्या इतके का मागे लागले आहेत ते कळत नाही. नंतर पैसे भरले तर कमी मिळतील किंवा त्या नोटा जवळ बाळगल्यास तुरुंगात टाकतील असे लोकांना वाटते का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 08:16 नवीन
30 डिसेंम्बर पर्यन्त वेळ आहे तरी जुन्या नोटा आता लगेच अवैध झाल्या, त्याच्या जागी नव्या नोटा हव्यात एवढं साधं लॉजिक का कळत नाही हे हि मला कळत नाहीये, गर्दी एक एक माणूस मिळून बनते, सगळेजण हे अशीच पैसे आताच हवी असणारी एक एक व्यक्ती आहे, गर्दी का करतायत हा प्रश्न अगदीच काहींच्या काही वाटतोय! या आधी 2005 च्या आधीच्या नोटा बदलायची सक्ती झाली होती तेव्हा अशी गर्दी का झाली नाही याचं उत्तर आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
म
मधुका Mon, 11/14/2016 - 12:51 नवीन
समजा, माझ्याकडे ५००० रु आहेत - ५०० व १००० मध्ये. आणि हजार एक रुपये इतर नोटांमध्ये आहेत. आणि जर यात दैनंदिन खानपान भागत असेल तर एटीएम चालू होताच पैसे काढले की काम झाले. दिसणारी घाई उगीचच आहे. जेन्युइन लोक्स सोडले तर बाकी काय आहे? तर ... हा "बस सुटेल, पळा पळा" सिन्ड्रोम (लक्षण) आहे. म्हणजे काय रे भाऊ? आपण जर धावलो नाही, चेंगराचेंगरी केली नाही तर बस सुटेल अशी मानसिकता आणि त्यासाठी पळत सुटणे, मग गर्दी होते, धक्काबुक्की होते. एस टी ष्ट्याण्ड किंवा इतरत्र दिसणारे हे चित्र. आणि हे सगळे कधी? जरी आपले रिझर्वेशन असले तरी जरी ही बस सुटली की दुसरी लगेच ५ मिनिटांत आहे हे ठाऊक असले तरी बसमध्ये ५० एक जागा असतात आणि खाली ३०-४० माणसांचाच घोळका आहे हे दिसत असले तरी ता.क. चुकून खाली टाइपले गेले होते आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
ख
खेडूत Mon, 11/14/2016 - 08:30 नवीन
कांहीच त्रास झाला नाही. नियम समजून घेऊन रांगेत उभे राहिल्यास त्रास नाही. स्वतः कार्ड पेमेंट करतोय. एक वृद्ध मावशी आहे, तिच्यासाठी प्रत्यक्ष गेलो होतो. गडबड कुठेही नव्हती. लोक्स चर्चा अन एकमेकांचे प्रबोधन करत होते, हा मला यात दिसलेला मोठा फायदा! मी सहा जणांना मजकडच्या शंभरच्या नोटा देऊन चार दिवस धीर धरण्यास सांगितले. माझे कार्ड वापरून सगळे कांही मस्त चाललेय.. एक विदेशी जोडपे उतरताच घेतलेले वीस हजार बदलायला आलेले. पण् त्यांना चारच हजार मिळाले. सर्व ब्यांका जोडल्याने धांदलबाजी चालणार नाही. फावल्या वेळात राजकीय मर्कट. लीला पाहून मनोरंजन होतंय ते वेगळंच.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 13:08 नवीन
मी सहा जणांना मजकडच्या शंभरच्या नोटा देऊन चार दिवस धीर धरण्यास सांगितले. स्पृहणिय काम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
त
तुषार काळभोर Mon, 11/14/2016 - 08:40 नवीन
कॅनरा बँकेत सकाळी आठला रांगेत उभा राहिलो. वडीलांचे खातं होतं, त्यांना ९.५५ ला यायला सांगितलं होतं. बँक दहाला उघडणार होती. पाचवा नंबर होता. दहापर्यंत २०-३० जणच होते रांगेत. उगाच आठला गेलो असं वाटलं. बँक उघडली. पाच मिनिटात भरणा करून बाहेर आलो. दुपारी १२ला बायकोला घेऊन परत गेलो. तिच्या खात्यात भरणा करायला. तेव्हाही २० मिनिटात बाहेर आलो. गोंधळ वगैरे काही नव्हता. ५-१० मिनिटाला व्यवस्थापकीण बाई राउंड मारून जात होत्या. कोणाला काही माहिती देत होत्या, रांग नीट करत होत्या. भरणा करायला मोठी रांग होती(२०-२५ जण). बदलून घ्यायला जरा कमी होती(३-४ जण). एकूण मीडीयावाले पराचा कावळा करतात व पॅनिक जनता वावहत जाते याचा अनुभव आला. (अडचणी नक्कीच आहेत. स्टेट बँकेबाहेर १००-१५०ची रांग होती. पण मी बँकेच्या कर्मचार्‍यांना शून्य दोष देईल. दोष आपल्या समाजातील आर्थिक निरक्षरतेचा आहे. व 'गर्दी' म्हणून 'आपण' सभ्येतेने व सुसंस्कृतपणे वागत नाही, त्याचाही दोष आहे.)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 11/14/2016 - 13:24 नवीन
कॅनरा बँक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
प
पाटीलभाऊ Mon, 11/14/2016 - 08:47 नवीन
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
अगदी सहमत
  • Log in or register to post comments
च
चारु राऊत Fri, 11/25/2016 - 17:10 नवीन
एकदम सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ
च
चारु राऊत Fri, 11/25/2016 - 17:10 नवीन
एकदम सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलभाऊ
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 08:56 नवीन
एकूण प्रायव्हेट बँकांत लगेच विनासायास काम होतंय तर तुलनेने कैक पटीने जास्त ग्राहक संख्या व निम्नवर्ग असलेल्या बँकांत असुविधा आहेत,
  • Log in or register to post comments
म
मोहन Mon, 11/14/2016 - 09:22 नवीन
काल (१३ ता.) आय डी बी आय ब्यांकेत ( खारघर ब्रांच) १५ मी. ४००० रु. बदलुन घेतले. १५ जण फक्त लायनीत होते. कर्मचारी लोक चांगली मदत करत होते. माझ्या काकांना ( ७० वर्षे) दु. ३.३० वा. या तुमच्या करता लायनीत उभे राहयची गरज पडणार नाही असे सांगीतले. काही काँग्रेसी कार्यकर्ते लोकांना फुकट पाणी वाटत होते. लायनीतला एक जण म्हणाला की भाजप कार्यकर्ते चहा घेवुनसुद्धा आले होते. एकंदर अनुभव खुपच सकारात्मक होता.
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/14/2016 - 09:37 नवीन
स्थानीक नगरसेवक अनंत कोर्हाळे यांनी पाणी वाटप केले, (सध्या मनसे) नंतर शिवसेनेत जाणार हैत.त्याच बरोबर श्री श्री रविशंकर यांचे अनुयायी आणि प्रांत संघटक यांनी पाणी+राजगिरा लाडू वाटप केले. विशेष म्हणजे स्टेट बँकेत गर्दी होती पण बाजूच्याच सारस्वत मध्ये अगदी तुरळक लोक होते. का ते कळाले नाही . काल नेम्के पैसे काढायचे असल्याने विचारणा करता आली नाही. सरव सहकारी बँकाही नोटा बदलून देतात काय? जाणकारांनी/अनुभवींनी माहीती द्यावी. देशभक्तीचा रांगेशी (बिनबुडाचा)संबध न जोडणारा नाखु
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 11/14/2016 - 10:03 नवीन
माझा स्वतःचा नोटाबदलीचा अनुभव नाही पण ओळखीतल्या अनेकांशी बोलून कळले की फार कंटाळवाणा किंवा त्रासदायक असा अनुभव कोणालाच आला नाही. बाकी मूळ अनुभवात उल्लेखलेली उदाहरणं वाचून हसावे का रडावे कळेना. बँकेत ५०,००० रुपये अथवा जास्त रक्कम भरायची असल्यास पॅन कार्ड दाखवणे आवश्यक आहे हा नियम येण्यास एक दशक तरी झालेच असावे. तरीही लोक पुन्हा तोच प्रश्न कसा विचारतात? बरं अनेक प्रकारची कागदपत्रे लागतील असे अफवांचे पेव फुटलेले असतांनाही लोक साधे पॅनकार्डही नेत नाही हे ही भारीच!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा