Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

प — पाषाणभेद, गुरुवार, 11/17/2016 - 06:40
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने या या मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ|| मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली या या मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||१|| भाजी पाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात मोठ्या नोटा सोडून सार्‍या सुट्टे पैसे नव्हते हातात दररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||२|| बँकेमध्ये नोटा बदलायला भली मोठी लाईन लाखो रूपये भरले तर इन्कमटॅक्स फाईन एटीएम झाले बंद पर्स माझी रिकामी केली मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||३|| हे मात्र छान झाले काळा पैसा बाहेर आला भ्रष्ट्राचार लाचखोरीचा एक मार्ग बंद झाला ह्या उपायांनी धनदांडग्यांची दातखीळ बसली मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली या या मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||४|| - पाषाणभेद

प्रतिक्रिया द्या
993 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
महासंग्राम गुरुवार, 11/17/2016 - 07:07 नवीन
paytm करो
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 11/17/2016 - 07:26 नवीन
मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली पहिल्याबाबत रोकडीचा प्रस्न समजू शकतो पण तिसर्या बाबत लोक अ‍ॅमेझॉन पासून स्नॅपडील कडे जात असावेत असे वाटते खखो तो वर्गच जाणे.. बाकी पाभे जरा इकडे लक्ष्य द्याच. शंभरातला एक नाखु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा