Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२०१७ नंतरच्या आर्थीक जडणघडणीसाठी आपण तयार आहात/आहोत ?

म
माहितगार
Sun, 11/20/2016 - 05:56
🗣 118 प्रतिसाद
२०१६ चे उर्वरीत नव्हेंबर डिसेंबर दोन महिने ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा जाऊन साजरे झाले. डिमॉनीटायझेशनचा अनुभव सुखद की दुख्खःद या बद्दल येता काळ बरेच चर्वित-चर्वण होत राहील. डिमॉनीटायझेशननी काळ्या पैशाचे सगळे मार्ग भले बंद होणार नसतील भारतीय बँकांकडची डिपॉझीटस अनेक लाख कोटींनी वाढत असल्याच्या बातम्या आहेत, पूर्ण आकडेवारी ३१ डिसेंबर नंतर कळेलच, पण वाढत्या डिपॉझीट्सच्या परिणामी बचतींवरील व्याजदर बँकांकडून लगोलग कमी केले जात असल्याच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत हे बँकांसाठी अर्थशास्त्रीय दृष्ट्या ठिक. पण बँकांकडे आलेला पैसा वस्तु व शेतकी उत्पादनात कमी व्याजदराने उपलब्ध करून देणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवणे याचे अर्थशास्त्रीय महत्व लक्षात घेणे आणि वस्तु आणि शेतकी उत्पादन वाढवीण्याच्या कृतीत सक्रीय सहभाग नोंदवणे यासाठी भारतीय समाज व्यवस्था म्हणजे तुम्ही आणि आम्ही म्हणजेच आपण तयार आहात/आहोत का ?

प्रतिक्रिया द्या
16677 वाचन

💬 प्रतिसाद (118)
प
पीके Sun, 11/20/2016 - 20:23 नवीन
ना S S S ही ...
  • Log in or register to post comments
ण
णरुअ Mon, 11/21/2016 - 22:11 नवीन
ते जाऊ द्या कष्टाच्या पैस्याने फ्लॅट घेतला ,आता त्याचा भाव उतरणार
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Mon, 11/21/2016 - 22:48 नवीन
जर आत्ता विकणार नसाल तर किमतीत वाढ होवो वा घट ती नुसती कागदावरच असते. जो पर्यंत तुम्ही तो नफा अथवा तोटा प्रत्यक्षात स्वीकारत नाही म्हणजेच फ्लॅट विकत नाही तोपर्यंत काळजी कशाला करताय? सर्वसाधारणपणे जमीन, फ्लॅट अश्या गुंतवणुकी लॉन्ग टर्म साठी असतात. तुम्ही जर गेल्या १-२ वर्षात घेतला असेल आणि आत्ता लगेच विकणार असाल तर ही शॉर्ट टर्म गुन्तवणूक आहे. त्यामुळे जर का विकायचा नसेल तर काळजी करू नका आणि विकायचाच असेल तर मग मार्केट रिस्क समजून तोटा पदरात पडून घ्या. रच्याकने - मिपावर तरी सगळे स्वतःच्या कष्टाच्या पैश्याने फ्लॅट घेतलेलेच मिळतील. त्यामुळे बहुतेक सर्व एकाच नावेतले प्रवासी आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: णरुअ
ण
णरुअ Tue, 11/22/2016 - 13:52 नवीन
आत्ताच विकायचा होता होम लोन फेडू वैताग आलाय
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 11/22/2016 - 16:06 नवीन
बोलाची कढी अन बोलाचा भात. पोटाची भूक काही मिटेना... काय करावं?
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 11/22/2016 - 16:21 नवीन
भारतीय बँकांकडची डिपॉझीटस अनेक लाख कोटींनी वाढत असल्याच्या बातम्या आहेत, पूर्ण आकडेवारी ३१ डिसेंबर नंतर कळेलच, पण वाढत्या डिपॉझीट्सच्या परिणामी बचतींवरील व्याजदर बँकांकडून लगोलग कमी केले जात असल्याच्याही बातम्या वाचनात आल्या आहेत
तुम्ही डिपॉझिट करायला भाग पाडून विड्रॉवलला लिमिट घालून दिलीत तर डिपॉझिट्स वाढणारच आहेत. त्या गंगाजळीतून १. बुडव्यांचे कर्ज राईटऑफ करणे २. अशांनाच नवी कर्जे देणे. (अडाणींचे ऑस्ट्रेलियन कर्ज झाले म्हणे सँक्शन) ३. सेव्हिंग्/लाँगटर्म सेव्हिंगवरील व्याज कमी करून व्याजावर जगणार्‍या रिटायर्ड म्हातार्‍यांच्या पोटावर पाय देणे, ४. इमर्जन्सी खर्चासाठी स्वतःच्याच पैशाला अ‍ॅक्सेस तोडणे. (उदा. अ. लग्नसमारंभासाठी पैसे काढायला मनाई. चेक/ डेबिटकार्डाने हुंडा घेणारे जावाई निघालेत तर बरं होईल. ब. बियाणं जुन्या नोटांत घ्यायला परवानगी, पण खतं, कीटकनाशके मात्र कॅश घ्या. पैसे कुठेत? : नो उत्तर. -याला कितिसे पैसे लागतात असं विचारणार्‍यांनी प्लीज किमती ठाऊक करून घेणे.) ५. पाऊसपाणी बरं झालं, तर हंगाम विकायला नेल्यावर आडते म्हणताहेत माल टाकून जा. जमेल तसे पैसे देऊ. या भाऊने खरीपाला ३% जो पैसा बी-बियाण्याला, खत-फवारणीला आणला होता, तो कसा फेडावा? सावकारी व्याजाचं चक्र कसं तोडावं? ६. पॉवरलूम, घर-बांधकामे, असले सेमिस्किल्ड लेबरला रोजगार देणारे उद्योग थंड पडलेत. त्यातला काही बेकार कामगारांना सध्या लायनीत उभं राहून नोटा बदलून आणायचा २०० रुपये रोजाचा नवा रोजगार उपलब्ध झालाय म्हणतात, पण तो २४ ता. ला बंद पडेल. पुढे काय? अशा अनेकानेक उत्तुंग अचिव्हमेंट्स सध्या साध्य झालेल्या आहेत. *** समाजपरिवर्तन करताना, माओ स्टाईल देशभरातल्या सगळ्या चिमण्या मारून टाकण्याचे, किंवा तुघलकासारखे अख्खी दिल्ली पॉप्युलेशनसकट दौलताबादला शिफ्ट करणारे निर्णय घेणे कितपत योग्य?
  • Log in or register to post comments
ट
ट्रेड मार्क Tue, 11/22/2016 - 18:25 नवीन
तुम्ही डिपॉझिट करायला भाग पाडून विड्रॉवलला लिमिट घालून दिलीत तर डिपॉझिट्स वाढणारच आहेत - विड्रॉवलला लिमिट हे अगदीच थोड्या दिवसांसाठी आहे. १. बुडव्यांचे कर्ज राईटऑफ करणे - राईटऑफ करणे म्हणजे नक्की काय हे समजून घेतले तर बरं होईल. तसंही मल्ल्याला कर्ज कोणी दिले हे पण बघा. २. अशांनाच नवी कर्जे देणे. (अडाणींचे ऑस्ट्रेलियन कर्ज झाले म्हणे सँक्शन) - अशांनाच म्हणजे कशांनाच? तुम्ही पण चांगलं बिझनेस प्रपोजल द्या, अर्ज करा मग तुम्हालाही मिळेल. ३. सेव्हिंग्/लाँगटर्म सेव्हिंगवरील व्याज कमी करून व्याजावर जगणार्‍या रिटायर्ड म्हातार्‍यांच्या पोटावर पाय देणे - जर सगळ्याच गोष्टींच्या किंमती कमी झाल्या तसेच व्याजदार पण कमी होतील. म्हणजेच कमी पैश्यात राहता येईल. ४. इमर्जन्सी खर्चासाठी स्वतःच्याच पैशाला अ‍ॅक्सेस तोडणे. - (उदा. अ. लग्नसमारंभासाठी पैसे काढायला मनाई. चेक/ डेबिटकार्डाने हुंडा घेणारे जावाई निघालेत तर बरं होईल. - हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे. ब. बियाणं जुन्या नोटांत घ्यायला परवानगी, पण खतं, कीटकनाशके मात्र कॅश घ्या. पैसे कुठेत? : नो उत्तर. -याला कितिसे पैसे लागतात असं विचारणार्‍यांनी प्लीज किमती ठाऊक करून घेणे.) - सगळ्या गोष्टी रोखीनेच घ्यायच्या हा हट्ट धरल्यावर अडचण होणारच. बँक खाती उघडायला पुरेसा अवधी आणि सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. ५. पाऊसपाणी बरं झालं, तर हंगाम विकायला नेल्यावर आडते म्हणताहेत माल टाकून जा. जमेल तसे पैसे देऊ. या भाऊने खरीपाला ३% जो पैसा बी-बियाण्याला, खत-फवारणीला आणला होता, तो कसा फेडावा? सावकारी व्याजाचं चक्र कसं तोडावं? ६. पॉवरलूम, घर-बांधकामे, असले सेमिस्किल्ड लेबरला रोजगार देणारे उद्योग थंड पडलेत. त्यातला काही बेकार कामगारांना सध्या लायनीत उभं राहून नोटा बदलून आणायचा २०० रुपये रोजाचा नवा रोजगार उपलब्ध झालाय म्हणतात, पण तो २४ ता. ला बंद पडेल. पुढे काय? - पुढे त्यांचा नेहमीच रोजगार चालू होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 17:32 नवीन
४. इमर्जन्सी खर्चासाठी स्वतःच्याच पैशाला अ‍ॅक्सेस तोडणे. - (उदा. अ. लग्नसमारंभासाठी पैसे काढायला मनाई. चेक/ डेबिटकार्डाने हुंडा घेणारे जावाई निघालेत तर बरं होईल. - हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे. ब. बियाणं जुन्या नोटांत घ्यायला परवानगी, पण खतं, कीटकनाशके मात्र कॅश घ्या. पैसे कुठेत? : नो उत्तर. -याला कितिसे पैसे लागतात असं विचारणार्‍यांनी प्लीज किमती ठाऊक करून घेणे.) - सगळ्या गोष्टी रोखीनेच घ्यायच्या हा हट्ट धरल्यावर अडचण होणारच. बँक खाती उघडायला पुरेसा अवधी आणि सोयी उपलब्ध करून दिल्या होत्या. ५. पाऊसपाणी बरं झालं, तर हंगाम विकायला नेल्यावर आडते म्हणताहेत माल टाकून जा. जमेल तसे पैसे देऊ. या भाऊने खरीपाला ३% जो पैसा बी-बियाण्याला, खत-फवारणीला आणला होता, तो कसा फेडावा? सावकारी व्याजाचं चक्र कसं तोडावं? ६. पॉवरलूम, घर-बांधकामे, असले सेमिस्किल्ड लेबरला रोजगार देणारे उद्योग थंड पडलेत. त्यातला काही बेकार कामगारांना सध्या लायनीत उभं राहून नोटा बदलून आणायचा २०० रुपये रोजाचा नवा रोजगार उपलब्ध झालाय म्हणतात, पण तो २४ ता. ला बंद पडेल. पुढे काय? - पुढे त्यांचा नेहमीच रोजगार चालू होईल. << तर, आत्ता वेळ मिळालाय. लय भारी उत्तरं दिलीत असं समजलात ते ठीकाय, पण आता मी काय म्हणतो ते वाचा. १. राईटॉफ म्हणजे काय, दिवाळखोरी कशी जाहीर करतात वगैरे शिक्षण द्यायचे मी पैसे घेतो. २. बिझिनेस व धंदा दोन्ही गोष्टी गेले पाव शतक करतो आहे. सरकारी लाचखोर व बिनडोक नियम सांभाळून. बँकेतून कर्ज कसे घ्यावे ते मला कृपया शिकवू नका. मी प्रिव्हिलेज्ड कस्टमर आहे, बँक माझ्या दारात येते कर्ज द्यायला. ३. जावाई,. हुंडा, कायदा, गुन्हा हे बोल्ड करून लिहिण्यापुरते ठीक आहे, वस्तुस्थितीचे काय? प्लस, मी जर माझ्या अकाउंटला माझ्या मुलीच्या लग्नात उडवायला ५० लाख व्हाईट जमा करून ठेवलेत, ते काढता येत नाहीत, असे का? किस खुशी मे? ४. बियाणे व खतांसाठी पुरेसा अवधी नसतो साहेब. घरात मुडदा झाकून ठेवून पेरणी वा कापणी करणे काय असते, हे तुमच्या आकलनापलिकडचे आहे. ५. सावकारी व्याजाच्या कर्जाबद्दल, हंगाम होऊनही भिकेला लागल्याबद्दल काही तारे तोडलेले दिसले नाहीत. बगल सुंदर दिसते बरं का तुमची ;) ६. "पुढे" रोजगार चालू होईल, आज फाके पडताहेत ते कुणाच्या कृपेने व का? फॉर व्हॉट फॉल्ट ऑफ देअर्स? त्यांची काय चूक? भजनाच्या नादात आपण किती गरीबांचे, किती हाल करतो आहोत याचा विचारही करायचा नाही??? हा कसला माज आहे? टॅक्स चोरांना पकडायचे इतर इमानदार मार्ग नाहीत का, की ज्यामार्गे गरीबाचा जीव जाणार नाही? आता झालेली ट्रँजॅक्शन्स चेक करणारेत म्हणे. अन हो, मला ठाऊक आहे की अडीच लाखा खालचीही ट्रॅजॅक्शन्स चेक होणारेत. माझी पाटी क्लीन आहे, अन अनेक टॅक्स "चोरां"चीही. अहो, सहकारमंत्र्यांच्या कारमधे ९१ लाख सापडले, त्यांचीही पाटी क्लीन झाली झटक्यात. पाट्या क्लीन फार चट्कन होतात आपल्या देशात. माझं डेली ट्रँजॅक्शन ७०-९० हजार मिनिमम असतं. मला शष्प फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
व
वगिश Wed, 11/23/2016 - 18:38 नवीन
50 लाख खात्यात असतील तर तर एक चेकबुक घेऊन टाका, झालच तर नेट बँकिंग चालु करा. पारदर्शक व्यवहाराची तयारी असेल तर मुलीच्या लग्नात मुळीच अडचण येणार नाही. अवांतर : आज नगर रोड ला हवा भरली, 5 रूपये paytm ने दिले. जे मार्ग शोधत आहे त्यांना मिळतोय. (If you need any wedding planner number I will search for you, I guess they will happily accept cheque or e-transfer)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ट
ट्रेड मार्क Wed, 11/23/2016 - 20:31 नवीन
एकूण तुमच्या प्रतिक्रियांवरून तुम्ही स्वतःला लै भारी (म्हणजे मी एवढा श्रीमंत पण मला कसा गरिबांचा कळवळा टैप) समजता हे तर सरळ सरळ दिसतंय. १. राईटॉफ म्हणजे काय, दिवाळखोरी कशी जाहीर करतात वगैरे शिक्षण द्यायचे मी पैसे घेतो. - लै भारी. म्हणजे पहिल्यापासूनच तुम्ही लोकांना पैसे कसे बुडवावे ईई वाममार्गावर जायचं शिक्षण, तेही फी घेऊन शिकवता. एवढं शिक्षण देताय पण विजय मल्ल्याला राईट ऑफ केलं म्हणजे नक्की काय केलं हे समजलेलंच दिसत नाहीये, कारण तुमचा प्रतिसाद. २. बिझिनेस व धंदा दोन्ही गोष्टी गेले पाव शतक करतो आहे. सरकारी लाचखोर व बिनडोक नियम सांभाळून. बँकेतून कर्ज कसे घ्यावे ते मला कृपया शिकवू नका. मी प्रिव्हिलेज्ड कस्टमर आहे, बँक माझ्या दारात येते कर्ज द्यायला. - पुन्हा लै भारी. एवढं करून अजूनही तुम्ही सरकारी लाचखोर तसेच असावे अशी इच्छा ठेवताय, आश्चर्य आहे. ३. जावाई,. हुंडा, कायदा, गुन्हा हे बोल्ड करून लिहिण्यापुरते ठीक आहे, वस्तुस्थितीचे काय? प्लस, मी जर माझ्या अकाउंटला माझ्या मुलीच्या लग्नात उडवायला ५० लाख व्हाईट जमा करून ठेवलेत, ते काढता येत नाहीत, असे का? किस खुशी मे? - व्हाइट पैसे ऑनलाईन ट्रान्स्फर करा, चेक द्या.. कोणी अडवलय? ४. बियाणे व खतांसाठी पुरेसा अवधी नसतो साहेब. घरात मुडदा झाकून ठेवून पेरणी वा कापणी करणे काय असते, हे तुमच्या आकलनापलिकडचे आहे. ५. सावकारी व्याजाच्या कर्जाबद्दल, हंगाम होऊनही भिकेला लागल्याबद्दल काही तारे तोडलेले दिसले नाहीत. बगल सुंदर दिसते बरं का तुमची ;) - आकलनापलिकडचे म्हणत आहात म्हणून आधिच बगल दिली आहे. ६. "पुढे" रोजगार चालू होईल, आज फाके पडताहेत ते कुणाच्या कृपेने व का? फॉर व्हॉट फॉल्ट ऑफ देअर्स? त्यांची काय चूक? - आज फाके पडत आहेत? तुम्हीच वर म्हणालात ना त्यांना लाईनीत उभं राहण्याचा नवा रोजगार मिळालाय. भजनाच्या नादात आपण किती गरीबांचे, किती हाल करतो आहोत याचा विचारही करायचा नाही??? ज्या गरिबांच्या नावाने तुम्ही एवढा टाहो फोडताय त्या गरिबांना मात्र सरकारचे हे पाऊल योग्य वाटतंय. उगाच फुकाचा कळवळा कशाला दाखवताय? हा कसला माज आहे? - तेच तर ना. सगळ्या भ्रष्टाचार्यांचा आणि खोट्या नोटा वापरून देशाला आणि अर्थव्यवस्थेला अपाय करणाऱ्यांना लै माज आला होता, तोच उतरवण्याचं काम चालू आहे. टॅक्स चोरांना पकडायचे इतर इमानदार मार्ग नाहीत का, की ज्यामार्गे गरीबाचा जीव जाणार नाही? - तुम्ही एवढे लै भारी ना मग तुम्हीच मार्ग सांगा. चांगला असेल तर लोक्स वर्गणी काढून तुमची फी देतील. पण नुसता ठणाणा करण्याऐवजी मार्ग सांगा. माझं डेली ट्रँजॅक्शन ७०-९० हजार मिनिमम असतं. मला शष्प फरक पडत नाही. - परत एकदा तुम्ही लै भारी. जाता जाता - मी तुमच्या मुद्द्यांना सरळ उत्तरं दिली होती पण तुम्ही उगाच वाकड्यात शिरलात. त्यामुळे तुम्ही कितीपण भारी असाल तरी ते फाट्यावर. उगाच फालतू वाद घालण्यात मला इंटरेस्ट नाही पण उगाच वैयक्तिक शेरेबाजी आणि नावं ठेवण्याचा प्रकार करू नका. सरळ प्रतिवाद करायचा असेल तर करा नाहीतर फुटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अर्धवटराव Tue, 11/22/2016 - 19:37 नवीन
अ‍ॅक्चुअल प्लॅन वेगळाच होता सरकारचा (खरं तर मोदिंचा). अदानि, अंबानी (लिस्ट कितीही वाढवता येईल) यांना पुर्वकल्पना दिली नोटबंदीची. त्यांच्या उद्योगसमुहातील कर्मचार्‍यांना एकदम तयार ठेवलं बँकेत खातं वगैरे उघडुन. शिवाय दलालांची फौज उभी केली ६ महिन्यात. काळ्याचे पांढरे करण्याच्या स्कीम तयार करण्यात आल्या. सोनं, रिअल इस्टेट, परकीय चलन वगैरेची चोख व्यवस्था केली गेली. मग अचानक नोटबंदी जाहीर केली. काळा पैसा बाळगणारे, पांढरा पैसा असुन वैतागलेले लोक अलगद जाळ्यात सापडले. त्या सर्वांचे पैसे गोळा करुन मोदि गँगने आपल्या तुंबड्या भरल्या. हवालदील शेतकरी, त्रस्त मध्यमवर्ग, बेजार शहरी नागरीक... सर्वांनाच एकसाथ छळण्याचा असुरी आनंद उपभोगायला मिळाला तो वेगळाच. काहि डॉ. मंडळींची किमान बुद्धीमत्ता हे सर्व प्रकरण चटकन ओळखते आणि काहि डॉ. ची कमाल बुद्धी याच्या आसपाससुद्धा भटकत नाहि. हेच ते अच्चे दिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
व
वगिश Wed, 11/23/2016 - 18:23 नवीन
माझ्या मामांचे खत, किटक नाशकांचे दुकान आहे, चेकने पैसे घेतात. तुमच्या जुन्या नोटा बँकेत जमा करून चेक घेऊन या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बोका-ए-आझम Tue, 11/22/2016 - 16:33 नवीन
भारतीय समाज क्वचितच कुठल्याही बदलाला हळूहळू तयार होतो. अजूनही बँक अकाउंट न उघडणारे आणि का तर ' उद्या बँक बुडली किंवा माझे पैसे घेऊन बँकवाला पळून गेला तर? ' असल्या मूर्खासारख्या शंका काढून विषयाला फाटे फोडणारे अनेक लोक आहेत. त्यांना बँक अकाउंट उघडा असं सांगूनही त्यांनी ऐकलं नाही. आता अशा लोकांना बँक अकाउंट उघडावे लागतील कारण यापुढे बँकेने केल्या जाणाऱ्या व्यवहारांची व्याप्ती वाढत जाणार आहे. बाकी आम्ही कॅशनेच पैसे घेतो असं म्हणणाऱ्या लोकांना असा दणका हवाच होता. जितक्या लवकर आपण तंत्रज्ञान आत्मसात करु, तितकं बरं आहे. आपल्या खेड्यांत स्मार्टफोन पोचले आहेतच. UPI आणि इतर गोष्टी पोचण्यासाठी वेळ लागेल, पण जिथे तरूण (नुसते वयाने नाहीत तर विचारांनी) जास्त आहेत तिथे हे इतर भागांपेक्षा झपाट्याने होईल. बाकी रडणारे काय - नोटा असतानाही रडत होते, नोटा नसतानाही रडताहेत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 11/23/2016 - 05:32 नवीन
सहमत आहे, प्रगतीच इंजीन पुढे जाईल हे पहावेच लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पुंबा Wed, 11/23/2016 - 18:59 नवीन
बोका भाऊ एक नंबर बोललात. साधने नाहीत म्हणून लोक तंत्रज्ञान नको म्हणताहेत. साधने पोचली आणि तंत्रज्ञान कसे वापरायचे हे कळले की अगदी सामन्यातील सामान्य माणूस त्याचा फायदा घेईलच. गरीब वंचितांचा कैवार घेणारे डायरेक्ट तंत्रज्ञानालाच विरोध करतात. गरिबांचा तंत्रज्ञानाला विरोध नाहीये, त्यांना त्याचा फायदा हवा आहे हेच यांना कळत नाही. UPI चे फायदे समजावून सांगितले तर नक्कीच लोक ऐकतील. माझ्या पिढीतील(LPG reforms नंतर जन्मलेल्या) लोकांचे आईबाप तर फार कासावीस आहेत, त्यांच्या मुलांच्या गतीशी जुळवून घ्यायला. माझी आई फक्त 10 वि शिकलेली आहे. Demonetisation नंतर आता ती मला paytm शिकव म्हणून मागे लागलीय. घरी गेल्यावर शिकवणार आहे तिला UPI. थोडक्यात काय, लोकांना नवीन गोष्टीची भीती वाटते पण उत्सुकता देखील असते, त्यांना सांगितलं नीट तर ऐकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Tue, 11/22/2016 - 16:35 नवीन
त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 11/22/2016 - 16:35 नवीन
त्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Tue, 11/22/2016 - 19:54 नवीन
माझ्यासारख्यांना तर काहीच फरक पडत नाही. सगळे व्यवहार बँकेतूनच करायची सवय असल्यानेव्यवसायावर शून्य परिणाम झाला आहे. कामगार वर्गाला फक्त एक-एक करुन एक दिवसाच्या पगारी सुट्टी तेवढी द्यायला लागली, काय करणार शेवटी त्यांचा पोटाचा प्रश्न.
  • Log in or register to post comments
क
कुंदन Wed, 11/23/2016 - 13:45 नवीन
२०१२ ते २०१४ या काळात नव नवीन गोष्टी शिकत राहिलो , जन्संपर्क वाढवला , अन ओन्साईट ला येवुन बसलो.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 17:42 नवीन
उदा. फक्त ओपीडीत ४० पैकी २० पेशंटनी २००० रुपयांची नोट दिली, तर माझी कन्सल्टिंग २०० असताना मी किती सुट्टे देऊ लागतो? मला माझ्या अकाउंतमधून किती कॅश काढता येते पर वीक? २० लोकांनी १०० च्या नोटा दिल्यात, तेही गृहित धरा. अन अठवड्याचा हिशोब करा. कैच्याकै बावळटपणा करून ठेवलाय. अन या सरकारी मूर्खपणातून मधला मार्ग मी काढावा अशी अपेक्षा. तीपण केव्हा? मला जुन्या नोटा घ्यायचं कंपल्शन. मी त्या नोटा बँकेत भरल्या तर माझ्यात इन्कम्टॅक्सचा बांबू. अन कल्हई. किस खुशी मे यार? भक्तगाणी म्हणणारे आमच्या ग्रूपातले डॉक्टरही लेजिटिमेट कारणांपायी ट्यून बदलताना ऐकू यायलेत आजकाल. अजून भरपूर चिमटे यायचे बाकी आहेत. येऊ देत.
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 11/23/2016 - 17:46 नवीन
मी त्या नोटा बँकेत भरल्या तर माझ्यात इन्कम्टॅक्सचा बांबू. अन कल्हई. इतरवेळी तुम्ही काय करता..? नोटा बँकेत भरत नाही का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 18:14 नवीन
सरकारी फतव्यामुळे यावेळी फारच जास्त भराव्या लागणारेत. व ते ट्रँजॅक्शन अडीच लाखापुढे भरपूरच असल्याने मला जास्त कल्हई फेस करावी लागणारे. "विंडफॉल प्रॉफिट"बद्दल इन्कमटॅक्स डिपार्टमेंटचा दृष्टिकोण समजवून घ्या. मी कितीही सांगितलं, की भाऊ, हे सरकारी नियमामुळे माझ्या गळ्यात पडलेलं खटलं आहे, तरीही, प्रत्येक नोट कुठून आली असले प्रश्न मला ते लोक विचारणार अन त्यांची तोंडं गप करायला त्यांच्या तोंडात गुलाब्बो कोम्बाव्या लागणार हे मला स्पष्ट दिसतं आहे. (कठीण शब्दांचे अर्थः गुलाब्बो = २००० ची नोट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 18:29 नवीन
वरील प्रतिसादात "तोंडात" हा सभ्य शब्दप्रयोग आहे, असे सखेद नोंदवितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
प
पिलीयन रायडर Wed, 11/23/2016 - 18:11 नवीन
नोटा बँकेत भरल्या "तर" म्हणजे? ते वाक्य कळाले नाही. आणि तुमची गैरसोय होतेय हे मान्य आहेच. अनेकांची होतेय. पण ह्यातुन जर रोख व्यवहार कमी होऊन बँकेतुन ट्रान्झॅक्शन होणार असतील तर त्यात वाईट काय? बरं ते ही असो.. तो वाद फार मोठाय.. तुम्ही सध्या कार्ड स्वाईप वगैरे करुन पैसे घेऊ शकत नाही का? इन जनरलच असं रोखीनं व्यवहार करणं अवघडच अजत असेल ना. आम्हालाही हॉस्पिटलमध्ये एक्झॅक्ट सुट्टे द्यावे लागायचे कारण ते तरी किती लोकांना सुट्टे देणार. तेव्हाही हे लोक कार्ड का घेत नाहीत असं वाटायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 18:19 नवीन
ते "तर" वाक्य महाराष्ट्र शासनाने, भारत सरकारने रद्द केलेल्या नोटा मला चलन म्हणून स्वीकारायला भाग पाडण्याच्या फतव्याबद्दल आहे. ह्या नोटा मी बँकेत भरेन/भरल्या, तर या ट्रँजॅक्शनचे पोस्ट मॉर्टेम कसे होते ते मला ठाऊक आहे. यार कम ऑन. तुम्ही लोक कधी कुणा इन्कम्टॅक्स ऑफिसरशी अ‍ॅक्रॉस टेबल बोलला तरी आहात का कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मोदक Wed, 11/23/2016 - 19:12 नवीन
तुम्ही लोक कधी कुणा इन्कम्टॅक्स ऑफिसरशी अ‍ॅक्रॉस टेबल बोलला तरी आहात का कधी? नाही बोललो, म्हणून प्रश्न विचारत आहोत. तेही सभ्य भाषेत. तुम्ही सांगा मग नक्की काय अडचण आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 11/24/2016 - 11:23 नवीन
तुम्ही लोक कधी कुणा इन्कम्टॅक्स ऑफिसरशी अ‍ॅक्रॉस टेबल बोलला तरी आहात का कधी? 'अ‍ॅक्रॉस द टेबल' म्हणजे काय म्हणायचे आहे नक्की ? तुम्हाला एवढा त्रास काय आहे. तुम्ही लई मोठे डॉक्टर आहात (दिवसाला ८० हजार मिनिमम असे तुम्हीच लिहिले आहे). म्हणजे तुमचे बँक व्यवहार करायला नक्कीच तुम्ही स्वतः जात नसणार. आय मीन तुमचे पगारी नोकर जात असतील. नक्की त्रास काय आहे ? की पैसे अकाउंटला व्हिजिबल होतात आणि ३०% द्यावे लागतात हाच त्रास आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
सामान्य वाचक गुरुवार, 11/24/2016 - 06:53 नवीन
दोघे हि डॉ एकजण नोकरी करतो अन एकजण ओपीडी परवापासून युद्धपातळी वर सगळ्यांना विचारात आहेत, आमचे पैसे तुमच्या खात्यात भरता का त्याच्या घरात 5 माणसे आहेत, आणि तरीही त्यांना 8 10 खाती हवी आहेत आणखी, म्हणजे किती कॅश असेल बघ आणि वर्षानु वर्षे किती कर चुकवला असेल बघ बर, हे मोठया शहरातले, मजबूत पैसे घेणारे नाहीयेत छोट्या गावातले आहेत त्या scale वर मोठ्या शहरातले चित्र रेखाट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
वगिश Wed, 11/23/2016 - 18:47 नवीन
अहो पण घेऊन टाका ना स्वाइप मशीन एवढा धंदा चालतो तर. आणि नोटबंदीमुळे जास्त नाही तर योग्य तो कर भरावा लागेल, जर खुपच जास्त करफरक येत असेल तर याआधी तुम्ही नजरचुकीने कर बुडवत असल्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 18:49 नवीन
बच्चू, कार्ड स्वाईप करायचं मशीन लय पूर्वीपासून आहे माझ्या कडे. "नजरचूक" नाही माझी. जितके चुकवाय्चे शक्य झाले, तितके तुम्हीपण चुकवलेत ते मला ठाऊक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
व
वगिश Wed, 11/23/2016 - 19:07 नवीन
आपला आदर आहे, भाषा सांभाळा. मी पगारदार आहे व माझे उत्पन्न अजुन तरी करपात्र नाही. नसते आरोप करु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:18 नवीन
तुम्ही नजरचुकीने कर बुडवत असल्याची शक्यता आहे.
नसते आरोप? तुम्ही लिहिलीत ती स्तुतीसुमने आहेत का? भाषेची सुरुवात कुणी केली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
व
वगिश Wed, 11/23/2016 - 19:24 नवीन
शक्यता आहे असे म्हटले आहे. तेही तुम्हाला उत्पन्न स्रोत दाखवायला अडचण आहे म्हणून, मी असा प्रश्न उपस्थित केला आहे का?? क्रुपया विचार करा. थोडे सबुरीने घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
व
वगिश Wed, 11/23/2016 - 19:29 नवीन
आणि थोडे सरकार ला सहाय्य करा, सुरवातीला खुपच अडचण होनार, पण भविष्यात थोडा जरी फायदा झाला तर चांगलेच. नाहीतर आहेच आपल रोजच मरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 11/24/2016 - 11:27 नवीन
जर ते कर चुकवत असतील तर आदर वगैरे देण्याची खरच गरज नाही. त्यांनी इतरांबद्दल कितीही अपमानास्पद लिहिले तरी एक डॉक्टर म्हणून पूर्वी त्यांच्याबद्दल आदर होता. आता काय म्हणावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वगिश
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 18:37 नवीन
पिरा, हे अति अवांतर आहे, या धाग्याच्या विषयाशी काहीच संबंध नाही. माझ्या गावात १% लोकांकडेही कार्डं नाहीत. कुणाकडून कार्डं स्वाईप करून घेऊ? ४-६०० रुपये रोजावर शेतमजूरी करायला जाणार्‍याकडून? २-३०० रोजावर वेल्डिंग वर्कशॉपमधे काम करणार्‍या मजूराकडून? ६-७०० रोज कलेक्शन (पेट्रोल्/मेण्तेनन्स वजा न करता) असणार्‍या रिक्षावाल्याकडून? १५-२० हजार रुपये महिना पगारवाल्या नोकरदारांकडून? ६-८ महिन्यांनी ९० हजाराचा मका विकणार्‍या शेतकर्‍याकडून? ३००० रुपये कॅश, वर्षभर रहाणे जेवणे, कपडे व ट्रीटमेंट फुकट या आशेवर शेतात राबणार्‍या सालदाराकडून? नवर्‍याने मारलं, अन दुखतंय, म्हणून मुठीत थोड्या नोटा गच्च धरून आलेल्या मुलीकडून? कुणा-कुणाकडून कार्डं स्वाईप करू मी? मुंबई पुण्यातच जग नाही. सगळ्यांनाच आयटीत पगार नाहीत. माझ्या खुर्चीत बसा एकदा. दाखवतो तुम्हाला.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 18:57 नवीन
असं कसं? आम्हाला आमच्याच खुर्चीत बसून जग बघायचंय, मी काय म्हणतो गोपाळराव.. काय उपयोग आहे काय इथे बोलून? तुम्ही समस्या सांगितली कि इथे उपाय तय्यार असतात, मग तेच उपाय तुम्हाला का सुचत नसावेत...? तुम्हाला सुचत नाहीत कारण एकतर तुम्ही देशद्रोही किंवा काळापैसावले.. म्याटर फ्यीनिस... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बोका-ए-आझम Wed, 11/23/2016 - 19:00 नवीन
देशद्रोही किंवा काळा पैसावाले होण्यासाठी आधी माणूस होणं आवश्यक आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 11/24/2016 - 11:17 नवीन
तुम्हाला सुचत नाहीत कारण एकतर तुम्ही देशद्रोही किंवा काळापैसावले.. म्याटर फ्यीनिस... ;) हॅ हॅ हॅ. उत्पन्नाचा स्त्रोत दाखवायला अडचण आहे असे गोपाळरावांनी स्वतःच लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वगिश Wed, 11/23/2016 - 18:59 नवीन
ह्याला जबाबदार सरकार आहे का?? का नाही ह्या लोकांनी आधीच खाती उघडली. आपल्या सारख्या लोकांनी जमेल तितकी जनजागृती करावी की सरकार च्या नावाने शंख करण्यात वेळ घालवावा?? स्वत वेळेला अभ्यास केला नाही आणि आता UNIVERSITY ला अक्कल नाही, मास्तर ला शिकवता येत नाही ई. ई. गळे काढून काय उपयोग??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ट
ट्रेड मार्क Wed, 11/23/2016 - 20:58 नवीन
या सगळ्यातले ५०% लोक्स २००० च्या नोटा आणतात होय? फारच प्रॉब्लेम आहे हो तुम्हाला. कसं काय म्यानेज करता ब्वा तुम्ही. बाकी तुमच्या खुर्चीत आम्ही काय बसणार? तुम्ही आपलं सांगत राहा आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
J
jp_pankaj Wed, 11/23/2016 - 18:37 नवीन
जल्ला मला काय कलत नाय.. पण.. बॅंकत आलेला पैसा ज्या वेगाने आलाय,त्याच वेगाने(किंवा कमी) बाहेर जाईल. लोक पयशे करंट/सेविंग/लोन खात्यात पैशै जमा करतात. कोणी एफडी केल्याच दिसल नाय.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 18:47 नवीन
बॅंकत आलेला पैसा ज्या वेगाने आलाय,त्याच वेगाने(किंवा कमी) बाहेर जाईल.
तात्यौ, मी ब्यांकत भरायलोय ते सफेद कमाईचं ५० लाख. ते सर्कार म्हंतंय एका हप्त्याले २४ हजार काड. जम्तंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jp_pankaj
J
jp_pankaj Wed, 11/23/2016 - 19:30 नवीन
एकदम 50 लाख भरायला इतके दिवस झोपले होते काय?? मी बॅंकेत काम करतोय आणी सफेद सोडा ब्लॅक वाल पण 50 लाख घेऊन येत नाय एका दिवसात भरायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 19:58 नवीन
मी बॅंकेत काम करतोय आणी सफेद सोडा ब्लॅक वाल पण 50 लाख घेऊन येत नाय एका दिवसात भरायला.
कोणत्या खेड्यातल्या कोणत्या बँकेत काम करता आपण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jp_pankaj
आ
आनंदी गोपाळ Wed, 11/23/2016 - 20:14 नवीन
पिंपळगाव बसवंत नामक खेडं नाश्कात आहे. इथली "पिंपेन" नामक शँपेन जगात विकली जाते. फ्याक्ट्री बंद करून वर्षं लोटली, उरलेली जुनी दारू महाग विकली जाते. इथे एकेका शेतकर्‍याची शे पाचशे एकर शेती आहे. त्यात द्राक्षं आहेत. कित्येकांची ग्रीनहाऊस आहेत, त्यात गुलाब पिकतात, स्ट्रॉबेरी होतात अन असंच अनेक काही. किती पैकं येतात, किती द्राक्षं, गुलाब, स्ट्रॉबेरी एक्स्पोर्ट होतात, किती लाखांची ट्रँजॅक्शन्स बँकेतून होतात ठाऊकेय का? भारतातली शेती हा स्पेक्ट्रम आहे. त्या करोडोंपासून (सुप्रिया सुळेंनी २०० कोटी क्लेम केलेत शेतीतून) ४०० रुपये रोजावर तण उपटायला येणार्‍या बाइ पर्यंत.. पाउस पडला तर वर्षभर खाता येईल इतपत ज्वारी पिकवणार्‍या शेतकृयापर्यंत.. मेजॉरिटी गरीबाचीच आहे. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 20:21 नवीन
=)) पिंपळगाव म्हणजे दुबई आहे राव! इथल्या शेतकऱ्यांच्या कमाईच्या गोष्टी ऐकल्यात तर तसाही विश्वास बसणार नाही, त्यात मी सांगतो म्हटल्यावर तर नाहीच... =)) असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अर्धवटराव Wed, 11/23/2016 - 22:08 नवीन
इतका 'सधन' व्यवहार करणार्‍या गावात बेसीक बँकींग सुद्धा रुजलं नाहि म्हणायचं... मग ते खरोखरच 'दुबई' ला वरताण असणार. आणि तिथे नोटबंदीचा फटका का बसतोय याचाही थोडाफार अंदाज येतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Wed, 11/23/2016 - 22:28 नवीन
शेती उत्पन्नाला कर नाही, कॅश व्यवहार खुप आहे, तिकडे बँकिंग नाही असं नाही म्हणाले कोणी... अनेक बँका हायेत कि.. चेक, कार्ड, पेटीयम असले लाड फार नाहीत.. बाकी, कोणी बँक वापरत नसेल तर तो गुन्हेगार असतो काय कोणत्या बाबतीत? एकुण रोख असाच दिसत आहे आजकाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Wed, 11/23/2016 - 23:02 नवीन
अनेक बँका आहेत, पण चेक, कार्ड चे 'लाड' नाहित. व्यवहार खुप आहेत (दुबई उदाहरणावरुन अगदी ठसठशीत म्हणावे इतके) पण हे लाड नसल्यामुळे बँकींगे सेवेचा (म्हणावा तसा) उपयोग नाहि. जेंव्हा उपयोग करायची वेळ आलि तेंव्हा (कुठल्याश्या कारणाने) जनता (सधन-निर्धन, सगळे) हतबल. बँकींग सेवा न वापरणे कायदेशीर गुन्हा तर नक्कीच नाहि, पण मुद्दाम ति सेवा कचर्‍यात फेकुन आयत्यावेळी बोंबा मारणे स्वतःची स्वतःविरुद्ध प्रतारणा नक्कीच आहे. बाकी अशक्यप्राय वाटणारे आर्थीक व्यवहार करणारं गाव सगळा व्यवहार कॅश देऊन करतं आणि त्यात काहिच काळबेरं नाहि... नसेलही. यु नो बेटर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा