Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

<पुरुष बायकांची बरोबरी का करतात>

र
राजेश घासकडवी
Sun, 11/20/2016 - 16:54
🗣 20 प्रतिसाद
प्रेरणा पुरुष बायकांची बरोबरी का करतात हा मला पडलेला एक प्रश्न आहे. गेली काही वर्षं मी आजुबाजुला बघतो की बायका ज्या गोष्टी करतात त्या केल्या की पुरुषांना आपलं मर्दानी सौंदर्य सिद्ध केल्याचा फील येतो. १. बायका दाढी करत नाही, मग करा त्यांचे अनुकरण. हल्ली बेफिकिरीत दाढी वाढवून पुरुष स्वतःला बायकांच्या बरोबरीत आणून ठेवल्याचा 'लूक' देत असतात. आता राहुल गांधी बरा दिसतो हाच एक त्याचा प्लस पॉइंट होता. पण नाही, बायकांची नक्कल करता करता त्याने तेवढंही गमावलं. २. बायका भरजरी कपडे वापरतात. मग पुरुषही त्यांचं अनुकरण करतात. शोभत नसेल तरीही लग्नसमारंभात भरजरी शेरवानी घालताना सर्रास दिसतात. बायकांना अशा जरीदार कपड्यानी शोभा येते. पुरुषांची ती 'शेर'वानी अगदी बकरीवानी दिसते. पण नाही, बायका करतात, तर आम्हीही करणार, हा अट्टाहास कशासाठी? ३. बायका अंगप्रदर्शन करतात, ते त्यांना जमतंही. पण बाजारत सगळं अंग झाकणारे कपड्यांचे ढीग असतानाही पुरुषांना आपली छाती, त्यांवरचे केस, आणि सहा नाही तरी दोनतीन पॅक आहेत असा समज करून सुटलेली पोटं दाखवायची असतात. या पुढेही जाऊन काही मर्दुटले पीकेसारखे फोटोही टाकतात,आमच्यासारखे पामर त्यांच्यापासून जीव वाचवायला ताबडतोब अनफॉलो करून टाकतात. ४. स्वयंपाक करणं हा खास बायकी प्रांत. पण घुसघोरी करणार नाही ते पुरुष कसले? आई, बहीण,आणि बायको यांना बकरी बनवून स्वयंपाकघरात शेजारी उभं केलं जातं. इतर वेळी इतर वेळी तांत्रिक बाबतीत पुढे असणारे पुरुष मात्र इथे गडबडतात. हळद टाकायला सांगितलं की मोहरी टाकतात आणि मोहरी टाकायला सांगितलं की हिंग टाकतात. आणि वर यांना तयार मसाला नको असतो, घरच्याघरीच वाटणघाटण करायची असते. मग दूध उकळायला लागल्यावर गॅस बंद करायचा सुचत नाही. आणि उतू जायला लागलं की नुसते बघत बसतात. अरे काय वेडेपणा आहे हा? मिपावर आणि फेसबुकवर फोटो टाकण्याची मात्र हौस. ५.गॉसिप ही खास बायकांसाठी बनवलेली गोष्ट आहे,पण आजकाल पुरुषांनीही त्यात प्राविण्य मिळवलं आहे. इतकं की एखाद्या बाईशी फेसबुकवर ओळख झाल्यावर 'J1 झालं का?' असले लेम मेसेज टाकून बघतात. जरुर बायकांची कॉपी करा, त्यात गैर काही नाही. पण ज्या गोष्टी मुदलातच आपल्यासाठी नाहीत त्याचा अट्टाहास धरु नका. कॉपी अशी करा की बघणारी बघत राहिली पाहिजे. आणि खूप जणी बघताहेत म्हणून फसू नका. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत 'हा काय चक्रमपणा चालू आहे?' असे भाव दिसत नाहीत ना, याची खात्री करून घ्या. तर पुरुषांनो, बायकांची कॉपी करणं म्हणजे आपण मेट्रोसेक्श्युअल झालो हा कन्सेप्ट मनातून काढून टाका.तुमची स्वतःची अशी exclusive क्षेत्रं तयार करा. बायकांना बेंचमार्क ठरवून भलतंच काहीतरी करण्याचा प्रकार सोडून द्या, after all, women are women. (दुर्दैवाने विडंबन करताना भाषेचं सुडंबन करावं लागलेलं आहे. कारण मुळातल्या तीनचारशे शब्दांच्या लेखात पन्नाससाठ चुका ठेवून देणं हे फारच हिणवल्यासारखं वाटेल असा संशय आला.)
वर्गीकरण
विडंबन

प्रतिक्रिया द्या
4537 वाचन

💬 प्रतिसाद (20)
ट
टवाळ कार्टा Sun, 11/20/2016 - 17:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पीके Sun, 11/20/2016 - 19:34 नवीन
या पुढेही जाऊन काही मर्दुटले पीकेसारखे फोटोही
म्हणजे कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पीके Sun, 11/20/2016 - 19:39 नवीन
संपादक मंडळि, इकडे लक्ष द्या, या सारख्या वैयक्तीक विडंबन करणारे धागे उडवावेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीके
प
पीके Sun, 11/20/2016 - 19:43 नवीन
अन्यथा प्रस्तूत लेखकावर अमच्याकडून वैयक्तीक बहिष्कार घालण्यात येइल ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीके
स
सच्चिदानंद Mon, 11/21/2016 - 02:07 नवीन
अरे पीके हो का ? रेफरेन्स तो समझो भइया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीके
प
पीके Mon, 11/21/2016 - 03:11 नवीन
ज्योक (पीजे) तो समझो भाइ.,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सच्चिदानंद
अ
अगोचर Sun, 11/20/2016 - 17:02 नवीन
खुसखुशित लेख. आवडला. (मी पयला हा म्हयला की पुरुष मिपाकरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न आहे हे माहित नाही)
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 11/20/2016 - 17:13 नवीन
हा हा हा! जमलय! शेरवानी-बकरीवानी वाचून फिस्स्कन हसलो.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 11/20/2016 - 17:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 11/20/2016 - 17:23 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 11/20/2016 - 17:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 11/20/2016 - 18:45 नवीन
काही लोक कचरा बिनकामाचा समजतात त्याकडे दुर्लक्ष करतात मात्र काही लोक कचर्‍यापासुनही नवनिर्मीती करुन दाखवतात आयुष्याने लेमन दिलं तर त्यापासुन लेमनेड बनवा व त्याहीपुढे जाऊन ज्याला आयुष्याने व्होडका दिलेली आहे असा नशिबवान शोधुन त्याच्यासंगे पार्टी करा असा महत्वाकांक्षेचा सकारात्मक विचारांचा उन्माद चढलेले वेडेच जग बदलतात ! तात्पर्य कुठलाच कचरा टाकावु नसतो त्यात अनेक शक्यता दडलेल्या असतात हवी केवळ एक प्रतिभा !! आणि श्रद्धा !!! सक्सेसफुल पिपल डोंट क्लीन द गारबेज !!!!!!!!!!!!!!!!!! दे रीसायकल इट डिफ्रंटली !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! लेखक- शिव व्हीलेज सत्यमेव जयते सेकंड सीझन
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 11/21/2016 - 00:07 नवीन
हा हा.. मस्त! 'J1 झालं का?' >> =))
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/21/2016 - 00:44 नवीन
लेख ( विडंबन )गंडलाय हे मान्य केलंच आहे आणखी काही सांगायला नको शैलीबद्दल. मुद्दांचा विदा कमी पडून घाइघाइने अनुमान काढलय. #दाढी फार वाढते ,कंटाळा येतो म्हणून करत नाहीत. #समारंभातले जेवण,स्वयंपाक पुरुषच करतात.झटपट उरकतात आणि सोवळ्याचं टेस्टींग करायला परवानगी नाही. #विनोदी कार्यक्रम स्त्रीवेषभुषेमुळे आणखीनच विनोदी होतात,टिआरपी वाढतो.शिनुमात मोठे खणखणीत आवाजाचे नट सोडले तर सर्वांनी बायकी कपडेपट ( वार्ड्रोब )ठेवलाय. त्यांच्या बायकांच्या (१)साड्या न वापरण्याचा पुरुषिपणा जपताहेत हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Mon, 11/21/2016 - 09:31 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/21/2016 - 04:59 नवीन
घासूगुर्जींच्या खास शैलीतले आम इडंबन. ! ;)
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Mon, 11/21/2016 - 05:44 नवीन
जमलय मस्त!!!!!
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Mon, 11/21/2016 - 06:24 नवीन
घासू गुर्जींनी फिलॉसॉफरशी बरोबरी करुन उगाच स्वतःला स्टेप डाऊन करुन घेणेच पटत नाही. असो.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Mon, 11/21/2016 - 07:49 नवीन
आई, बायको, बहीण यांची 'बकरी' आवडली :)
  • Log in or register to post comments
प
पद्माक्षी Mon, 11/21/2016 - 10:34 नवीन
मूळ धागा आणि विडंबन दोन्ही एकसारखेच गंडलय.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा