Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तत्वा, तुझी किंमत बघ!

व — वेल्लाभट, Mon, 11/21/2016 - 03:42
तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता चोरी, लबाडी यांच्या वाटा गजबजल्यात सार्‍या सत्याची तर वर्गवारी 'अन्य' झालीय आता आपली झोळी भरत जावं अगदी मनोभावे जावो बाकी खड्ड्यामधे आपण सुखी रहावे कर्माची ही नवी व्याख्या मान्य झालीय आता आदर बिदर लाड झाले, विचारणंही खूप आपलं अडल्यास बोंबाबोंब बाकी चिडीचूप वागण्याची ही तर्‍हाच 'सौजन्य' झालीय आता कोण तो लाकूडतोड्या सांग त्याचे काय झाले आज इतिहासातले आदर्शही ते चूक ठरले माणसांची ती प्रजाती 'वन्य' झालीय आता तत्वा, तुझी किंमत बघ शून्य झालीय आता जनता तुला टाकूनच धन्य झालीय आता - अपूर्व ओक

प्रतिक्रिया द्या
4324 वाचन

💬 प्रतिसाद (17)
च
चिगो Mon, 11/21/2016 - 07:09 नवीन
कविता आवडली..
  • Log in or register to post comments
ग
ग्रेंजर Mon, 11/21/2016 - 08:58 नवीन
मस्त!!!!!!
  • Log in or register to post comments
व
वटवट Mon, 11/21/2016 - 09:03 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Mon, 11/21/2016 - 11:55 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 11/21/2016 - 12:23 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 11/21/2016 - 13:16 नवीन
मस्तं!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 11/21/2016 - 13:43 नवीन
कविता आवडली! Sandy
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 11/22/2016 - 08:16 नवीन
तत्वाच्या खुंट्याखाली बसलेला नाखु
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 11/22/2016 - 09:03 नवीन
धन्यवाद नाखु, संदीप, पद्मावती, एस, कविमानव, ग्रेंजर, वटवट, चिगो.. अनेक आभार :)
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Tue, 11/22/2016 - 09:18 नवीन
तत्त्वानुसार जगणारे आजकाल दुर्मिळच :(
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 12/05/2016 - 12:37 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 12/05/2016 - 12:41 नवीन
धन्यवाद पाटीलभाऊ आणि रातराणी
  • Log in or register to post comments
भ
भारी समर्थ Mon, 12/05/2016 - 18:34 नवीन
!
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 12/05/2016 - 20:27 नवीन
कविता आवडली !
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 12/07/2016 - 07:10 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Wed, 12/07/2016 - 14:00 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Wed, 12/07/2016 - 14:00 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा