Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटा बदलल्यात आता व्यवहारही बदला

ब
बाजीप्रभू
Mon, 11/21/2016 - 08:09
🗣 21 प्रतिसाद
८० च्या जमान्यात दूरदर्शनवरील एका लघुकथा सिरिअलचा एक एपिसोड आठवतोय. त्या एपिसोडची स्टोरीलाईन अशी होती कि, हरियाणातल्या एका खाप पंचायतीच्या मिटिंगमधे एका प्रेमप्रकरणाचा निवाडा चालू असतो. हलक्या जातीच्या बाबुलालला त्याच्या प्रेमाची शिक्षा म्हणून खापपंचायत वाळीत टाकण्याची शिक्षा देते आणि बाबुलाची गावात परवड सुरु होते. बाबुलाल कसाबसा त्या गावात तग धरून असतो. इकडे काही दिवसांत पंचायतीच्या ऑफिसमधे जुने रॉकेलचे कंदील बाद करून जास्त प्रकाश देणारे गॅस बर्नरचे दिवे घेतले जातात(Gas mantle). पण हे दिवे पेटवायचे कसे हा मोठा प्रश्न असतो. गावातल्या कोणालाही या नव्या टेक्नॉलॉजिबद्दल माहित नसतं. कर्णोपकर्णी काही दिवसांनी पंचायतीला समजतं कि "बाबुलालला" हे दिवे कसे पेटवायचे ते चांगलं माहित आहे. शहरातल्या लग्नांत हेच दिवे घेऊन बँड पथकाबरोबर फिरायचं काम बाबुलालने केलेले असते. आता पंचायतीत बाबुलालची डिमांड वाढते. बाबुलालही परिस्थितीचा फायदा घेत स्वतःच्या डिमांड पंचायतीकडून कबुल करवून घेत आपल्या प्रेयसीबरोबर लग्न करून सुखाने गावात जीवन जगतो. (शाम बेनेगल डायरेक्टर असावेत बहुतेक) हा एपिसोड मला त्या वयात खूपकाही शिकवून गेला. माझा स्वतःचा बोध असा होता कि ज्या सर्कलमध्ये आपण वावरतो त्या लोकांपेक्षा आपलं ज्ञान एक पाऊल पुढे असल्यास आपलं महत्व आबाधित रहातं. वाघ मागे लागल्यास आपल्याला आपल्या मित्रापेक्षा फक्त पाच फूट पुढे पाळता आलं बस झालं. प्रोफेशनल जीवनात एका कंपनीत मॅकेनिकल ड्राफ्टमन म्हणून करिअरची सुरवात करत पुढे पार्टटाईम शिकत शिकत एका MNC कंपनीचा IT मॅनेजर होण्यापर्यंतचा माझा प्रवास हा वरील बोधावरच आधारित आहे. IT मॅनेजर म्हणून माझ्या कंपनीत मी तीन-चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केलेत (त्याबद्दल लिहीन कधीतरी). ‘मॅनेजमेंट डिसिजन’ किंवा ‘IT गाईड लाईन्स’ अश्या गोंडस नावाखाली कंपनी स्टाफला नवीन टेक्नोलॉजीकडे ढकलत असतो. रामा गड्याला राखुंडी ऐवजी डिशवॉशर दिला कि कसा गोंधळ होतो तोच प्रकार कंपनीच्या गो-लाईव्ह प्रकरणात होतो. १५-२० दिवस गोंधळ होतो पण नंतर परिस्थिती पूर्वपदावर येते. वरील सर्व उदाहरणांचा "नोट बंदिशी" तसा काही संबंध नाहीये पण हे सुचवायचं आहे कि स्वतःला अपडेट ठेवणे हा टिकून रहाण्याचा आणि गैरसोय टाळण्याचा राजमार्ग आहे. पैसा विनिमयाच्या नवीन डिजिटल पद्धती या वेळीच अंगिकारल्या नाहीत तर नोटबंदीच्या रांगेत परत उभे रहाण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. या नोट बंदीच्या धामधुमीत सर्वांत शांत होते ते ऑनलाईन व्यवहार करणारे. माझ्या बाबतीतही अगदी भाजीपाल्यापासून ते कामवालीच्या पगारपर्यंत ऑनलाईन पेमेंटची सवय लावून घेतल्यामुळे "नोटबंदीच्या" भूकंपात माझ्या मिसेसला बँकेत लाईन लावावी लागली नाही. हाथखर्चासाठी जावं लागेल पण तोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आलेली असेल. नोटा बदलीहि करायच्या आहेत पण घाई नाहीये. मोदींच्या कॅम्पेनच काय होईल ते येत्या काही वर्षांत कळेलच. पण सुज्ञ मिपाकरांना या सर्व अमृतमंथनातून एक गोष्ट लक्षात आली असेलच कि "ऑनलाईन व्यवहार, प्लास्टिक मनी" हे शब्द आता सतत आपला पाठपुरवठा करत रहाणार. नोटबंदी सारखे स्ट्राईक पुढेही होत रहातील. डिजिटल व्यवहारांकडे स्वतःला वळवणं हि काळाची गरज आहे. मात्र बऱ्याच मंडळींची ऑनलाईन व्यवहाराबद्दल एक भीतीची भावना असते. नेमकी कोणती भीती वाटते?, इच्छा आहे पण कसं करायचं?, कोणती काळजी घ्यायला पाहिजे? कोणत्या साईट्स खरेदीसाठी भरवशाच्या आहेत? याबद्दल बऱ्याच मिपाकरांना प्रश्न पडत असतील. मिपावर बरेच आयटी तज्ज्ञ आणि ऑनलाईन खरेदीचा अनुभव असणारी मंडळी देखील आहेत. तुमचे प्रश्न, शंका, अनुभव नेमक्या मांडल्यात तर माझ्यासकट इतर मिपाकरहि समर्पक उत्तरं देतील. उदा. (माझा अनुभव) गेली २ वर्षे मी "भाजीवाला डॉट कॉम" साईटवरून भाज्या खरेदी करतो. फ्री घरपोच डिलिव्हरीसाठी कमीतकमी ३०० रुपयाचं बंधन असतं, नारळ खराब निघाला, काकडी कडू निघाली तरीही परत करता येते. साईटवर असलेल्या वॉलेटमध्ये पैसे भरून खरेदी केल्यास कॅशबॅकहि मिळते. COD सुविधाही आहे. बाजारातील भाजीचे भाव आणि इथले भाव यात फार तफावत जाणवली नाही.(To be check). वर्षभराचा भाजीपाल्याचा रेकॉर्ड पहाता येतो. नोटबंदीच्या काळात या साईटवरून शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही मदत करता आली. (तूर्तास यांची सेवा ठाणे शहरापुरती मर्यादित आहे).
वर्गीकरण
आर्थिक नियोजन

प्रतिक्रिया द्या
4201 वाचन

💬 प्रतिसाद (21)
स
सचिन जाधव Mon, 11/21/2016 - 08:18 नवीन
डिजिटल व्यवहारांकडे स्वतःला वळवणं हि काळाची गरज आहे. "ऑनलाईन व्यवहार, प्लास्टिक मनी" हे शब्द आता सतत आपला पाठपुरवठा करत रहाणार. ़
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/21/2016 - 09:35 नवीन
भाजीवाला डॉट कॉम माझ्या मित्राचीच साईट आहे! :)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 11/22/2016 - 05:12 नवीन
असं अॅपवर स्पष्ट नमूद केलेलं आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बाजीप्रभू Tue, 11/22/2016 - 05:29 नवीन
तुमच्या मित्राला सांगा, खूप छान सर्व्हिस आहे त्यांची. ठाण्यातली लोकं खूप खुश आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/22/2016 - 05:35 नवीन
मी जेवढं त्याला ओळखतो, त्यावरुन कस्टमर सर्विसमधे तो 'बाप' माणूस आहे हे छातीठोक सांगू शकतो. त्यामुळे सर्विस चांगलीच असेल ह्याची खात्री आहे. तुम्ही त्यास दुजोरा दिला आहेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
ब
बोका-ए-आझम Tue, 11/22/2016 - 05:42 नवीन
हे पण सांगा की त्याला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/22/2016 - 05:54 नवीन
हा हा, नक्की पोचवतो, तुम्हाला त्याचा नंबर देतो, तुम्हीच बोला त्याच्याशी! हाय काय नाय काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 12:23 नवीन
सुंदर आणि प्रसंगोचित लेख ! स्वतःला अपडेट ठेवणे हा टिकून रहाण्याचा आणि गैरसोय टाळण्याचा राजमार्ग आहे. +१००० त्याचबरोबर... अनुचित लोभ टाळून आणि तोशीस पडली तरी, कायदेशीरपणे व नीतीमत्तेने वागले तर, रात्रीची झोप खराब होत नाही. रात्रीच्या उत्तम झोपेइतके* मोठे धन या जगात नाही, हा स्वानुभव आहे ! :) ====== * : तसेही, रात्रीची पूर्ण झोप झाल्यावरही, कधिही व कोठेही पाच मिनिटांत डाराडूर झोपू शकतो असा आमचा लौकीक आहे ;) :)
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Mon, 11/21/2016 - 12:58 नवीन
नोटाबंदी शासनाने कमालीची अनागोंदी आणि अकार्यक्षम पद्धतीने हाताळुनही आभासी चलनामूळे ( ऑनलाईन) परिस्थिती बर्यापैकी नियंत्रणात राहिली. ( मोदीजी श्रेय घ्यायला आयतेच तयार होतील, असो.)
  • Log in or register to post comments
प
प्रान्जल केलकर Mon, 11/21/2016 - 17:41 नवीन
मिपा काय माबो काय च्यायला एक आर्थिक धागा मुदिशेठच्या आठवणीशिवाय राहील तर शपथ. पु ल. देशपांड्यांच्या धर्तीवर जो धागा मुदिशेठ च्या आठवणींशिवाय चालेल त्या धागाकर्त्याला आपण (लाकडी पुलावर जाहीर मुका बिका काय घेणार नाय ) शतशः धन्यवाद देणार.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Mon, 11/21/2016 - 20:09 नवीन
चांगले-वाईट भोग तर येणारच, त्यात आपलं जगणं सुसह्य करावं.. किंबहुना आपला फायदा करुन घ्यावा ये उत्तम. त्याकरता डोळे उघडे ठेऊन बघायची सवय आवष्यक असते. ऑन-लाईन व्यवहारांची भिती/फोबीया घालवायचा एक नामी उपाय म्हणजे कुठलाही आर्थीक व्यवहार न करणारं तंत्रज्ञान प्रथम वापरुन बघायचं. साधं एक्सेलमधे महिन्याचं बजेट जुळवता आलं, आकडेमोड करता आलि तरी मजा येते. त्या बजेटच्या प्रत्येक प्रकारात सोयीच्या वेबसाईटची लिस्ट डकवुन ठेवायची. जसं, वीज बील भरायला, सिलेंडर ऑर्डर करायला, रेल्वे रिजर्वेशन वगैरे. एकदा त्या अधिकृत साईटवर एक-दोन व्यवहार केले, त्यानुसार एक्सेल अपडेट केलं आणि महिन्याच्या शेवटी ताळेबंद चेक केला कि आला कॉन्फिडन्स. मग शोधायची सवय लागतेच. कुठल्याही ऑनलाईन सर्वीससाठी आपलं क्रेडीट कार्ड ऑटो पेमेंटसाठे रजीस्टर न करता आपल्या बँकेच्या पेयीलिस्ट्मधे आपले देणेकरी रजिस्टर करत राहायचे. त्यामुळे क्रेडीटकार्ड गैरवापराचा धोका कमि होतो. शक्यतो घरात एक काँप्युटर असा असावा जो फक्त आर्थीक व्यवहारांसाठी वापरला जावा. जास्त शोधाशोध करायची इच्छा नसे तर सरळ आपल्या कॉम्प्युटर विक्रेत्याने रेकमेण्ड केलेले एण्टीव्हायरस वगैरे वापरुन हा स्पेशल संगणक सज्ज करावा. व त्यावर इतक कुठलंही सर्फींग न करता (मिपा वगळता :) ) केवळ आपले आर्थीक व्यवहार करावे.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 11/22/2016 - 05:19 नवीन
या निमित्ताने का होईना लोक किमान वीज बील्,पाणी पट्टी आणि इतर देणी रांगेत उभे राहण्यापेक्षा ई सेवा माध्य्मातून करतील तर चांगलेच आहे. दैनीक सकाळ दि १६.११.२०१६
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या चलनी नोटांच्या तुटवड्यावर "एटीएम- डेबिट आणि क्रेडिट‘कार्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे व्यावसायिकांकडूनही या कार्डच्या वापरासाठी "कार्ड स्वॅप मशिन‘ची मागणी बॅंकांकडे होऊ लागली आहे. चलनी नोटांऐवजी "कार्ड‘च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करणारा एक ठराविक वर्गच होता. कार्ड असूनही रोखीने व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. परंतु, गेल्या आठवड्यापासून चलनांचा तुटवडा निर्माण झाला असून पाचशे आणि हजार रुपयांची नोट कोणीही सहज स्वीकारत नाहीत. अनेक व्यावसायिकांनी तसे फलकही दुकानात लावले आहेत. त्याचा परिणाम "कार्ड‘च्या वापरावर झाला आहे. हॉटेल व्यावसायिक गणेश शेट्टी म्हणाले, ""शहरांतील उत्तम दर्जाच्या हॉटेलमध्ये "कार्ड‘च्या माध्यमातून पैसे स्वीकारण्याची यंत्रणा आहे. "कार्ड‘द्वारे होणाऱ्या "पेमेंट‘मध्ये तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.‘‘ व्यावसायिक पराग शहा म्हणाले, की "कार्ड स्वॅप मशिन‘ खुल्या बाजारात मिळत नाही. त्यामुळे व्यावसायिक, व्यापाऱ्यांना त्यांचे खाते असलेल्या बॅंकेतूनच ते मिळवावे लागते. यापूर्वी औषध विक्रेते, स्टेशनरी, कापड व्यावसायिक, सराफ आदींकडे ही सेवा उपलब्ध होतीच. पण, चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रोखीने व्यवहार होत नाही, उधारी देणे परवडत नाही, अशा व्यावसायिकांनीही बॅंकांकडे "कार्ड स्वॅप मशिन‘ची सेवा सुरू करण्याची मागणी करत आहेत. सुवर्णयुग सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष राहुल चव्हाण म्हणाले, ""व्यावसायिक, ग्राहक या दोन्ही घटकांच्यादृष्टीने "कार्ड पेमेंट‘ ही सुलभ गोष्ट आहे. कार्ड स्वॅप पद्धतीत ग्राहकाच्या खात्यातून थेट पैसे विक्रेत्याच्या खात्यात जमा होतात. त्यामुळे दोघांनाही प्रत्यक्षात चलन सांभाळत बसण्याची गरज राहत नाही. गेल्या आठवड्याभरात कार्ड मशिनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. चलन तुटवड्यामुळे या पद्धतीने पैसे हस्तांतरणाचे महत्त्व नागरिकांना समजेल आणि पुढील काळात याचप्रकारे आर्थिक व्यवहार करण्यास ते पसंती देतील.‘‘
इतकेच काय पिंपरीत चहावाल्यानेही/आणि भाजीवाल्यानेही कार्ड मशिन ठेवले आहे. ही एक चांगली सुरुवात आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 11/22/2016 - 06:49 नवीन
सर्व मासिक खर्चांना चेकने पेमेंट करत आहे. घरकामकरणारे, दुधवाला, शाळाव्हॅनवाला, पेपरवाला, सबको चेक फाडके.. करोडपती झाल्यासारखं वाटतंय. :)) (घरमालक अजून भाडं घ्यायला आला नाही, त्याला म्हटले होते चेक ने पेमेंट करतो म्हणून.. =)) )
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 11/22/2016 - 07:01 नवीन
दोनही बातम्याम्ची दुवा साखळी भाजी ही स्वॅप करून चहा प्या पैसे पेटीम करा
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Tue, 11/22/2016 - 09:31 नवीन
खरंय...स्वतःला अपडेट तर करत रहावेच लागणार. पण
वाघ मागे लागल्यास आपल्याला आपल्या मित्रापेक्षा फक्त पाच फूट पुढे पाळता आलं बस झालं.
हे विधान खटकले :(
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Tue, 11/22/2016 - 13:09 नवीन
माहितीपुर्ण लेख
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 11/22/2016 - 17:27 नवीन
एक शंका. गेल्याच महिन्यात ३.२ मिलियन अर्थात ३२ लाख डेबिट कार्डे कॉम्प्रोमाईझ झाली होती, अशी बातमी होती. डिजिटल चोरी ही तुलनेने सोपी असते. एटीएम लायनीत उभ्या अनेक लोकांना तिथले सिक्युरिटीवाले पिन विचारून टाईप करून पैसे काढून द्यायला मदत करत होते म्हणे... अर्थात घिसाडघाईने निर्णय घेऊन देशातली ८६% चलनलिक्विडिटी मारून टाकणार्‍यांनी या असल्या मायनर बाबी विचारात घेतल्या असतीलच ना? हो, २००० च्या नोटेसाठी आहेत तीच तुटपुंजी एटिएम्स कॅलिब्रेट करायलाही २ महिने लागणारेत म्हणे? सिक्युरिटी अपग्रेडेशनचं काय? जर्मन मशीन्स बसवणारे ना नोटा ओळखायला? त्यासाठीच नोटांवर लिहू नये असे व्हॉट्सॅपी आदेश ऐकू येताहेत. (जर्मन्=मेक इन इंड्या. ते पण रंग उडणार्‍या गुलाब्बो नोटेसाठी)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 11/22/2016 - 18:05 नवीन
देशद्रोही प्रतिसाद!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अभिदेश Tue, 11/22/2016 - 21:58 नवीन
कळलाव्या नारदी प्रतिसाद !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बोका-ए-आझम Wed, 11/23/2016 - 13:39 नवीन
सुचतं कसं एवढं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अनुप ढेरे Wed, 11/23/2016 - 13:43 नवीन
२००० च्या नोटेसाठी आहेत तीच तुटपुंजी एटिएम्स कॅलिब्रेट करायलाही २ महिने लागणारेत म्हणे?
कुठल्या पोपटाने सांगितलं तुम्हाला हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा