Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मान लो वो अब कागज के तुकडे है!! (खरंच??)

ब
बाजीप्रभू
Tue, 11/22/2016 - 05:17
🗣 11 प्रतिसाद
काल खुप विचार करत होतो कि नवीन धागा काढावा? कि नोटबंदीच्या इतर धाग्यात प्रतिसादात लिहावं? कि खरडफळ्यावर टंकावं?. शेवटी म्हटलं धागाच काढावा. इतक्या छत्र्या उगवल्यात त्यात माझी अजून एक. काय होईल जास्तीत जास्त? धागा उडवला जाईल किंवा शून्य प्रतिसाद येईल हरकत नाही. तर, काल मिसेसचा भारतातून मेसेज आला "अहो टिंब टिंब भाऊ तुम्हाला आठ-साडे आठला कॉल करणार आहेत, प्रकरण गंभीर आहे. काय आहे म्हाईत नाही पण तुम्ही या भानगडीत पडू नका". (या सगळ्या बायकांना आपले नवरे भानगडी करू शकतात हा कॉन्फिडन्स का असतो?) एनीवे, नोटबंदीच्या धामधुमीत नातेवाईक असलेल्या बिल्डरचा फोन येणार त्यात बायकोने दिलेली तंबी ऐकून काय प्रकरण असेल हे ऐकायला मीही उत्सुक होतो (जसे तुम्ही वाचायला). अपेक्षेप्रमाणे फोन आला. हाय-हॅलो झाल्यानंतर मी म्हणालो थांब जरा, फोनवरून नको मी तुला पीसीवरून VOIP ने कॉल करतो, हे फोन सहसा ट्रेस होत नाहीत. मग एक दोन मिनिटांत मी कॉल लावला. इकडचं तिकडचं बोलणं, नोटबंदी आणि मोदींना शिव्या देऊन झाल्यावर अचानक स्वर बदलले. अरे कामगारांना ३ महिन्यांचा ऍडव्हान्स पगार देऊनही बरीच कॅश उरली आहे. तुझी मदत हवी आहे. मी:- माझी? ती कशी? तो:- कॅश मी डॉलरमधे कन्व्हर्ट करून घेतो. मी:- अरे पण त्यात खूप नुकसान होईल. तो:- हो ना! अर्धेच मिळताहेत. पण तेव्हढे तर तेव्हढे. नाईलाज आहे. मी:- बरं. तो:- डॉलर तुला पोहोचवायची व्यवस्था करतो. तुही आलास कि थोडे-थोडे घेऊन जात जा? तो:- तुझ्या तिकडच्या बँकेत जमा कर आणि हळू हळू तुझ्या "NRI" अकाउंट ने पाठवत जा. मी:- अरे डॉलर माझ्या बँकेत घेणार नाही. ते प्रथम लोकल करन्सीत बदलून मग अकाउंट मध्ये भरावे लागतील. आणि मी ट्रान्सफर केल्यानंतर परत कन्व्हर्जन फॅक्टर लागून परत नुकसान होईल? तो:- किती? मी:- इंटरनेटवर एका डॉलरचे ३५ थाई बाथ दाखवतोय इकडच्या बँका जनरली २ थाई बाथ कमी देते. आणि परत ट्रॅन्स्फर होतील ते एका बाथला १.९ रुपये हिशोबाने मिळतील. मग आमचं बराचवेळ डिक्शन झालं. किती कॅश ते इथे डिस्क्लोज करत नाही पण मला आलेली ऑफर सांगतो आणि तुम्हीच अंदाज लावा किती असेल ती. ऑफर होती कल्याणमधे एक वन बीएचके तुझ्या नावावर करतो. मला बालकवींच्या कवितेच्या ओळी आठवल्या, चिमूताई चिमूताई, माझ्या पिंजऱ्यात येतेस, बाई? पिंजरा किती छान माझा! सगळा शीण जाईल तुझा. जळो तुझा पिंजरा मेला! त्याचे नाव नको मला! राहीन मी घरट्याविना! चिमणी उडून गेली राना. होय!! मी अगदी त्या चिमणीप्रमाणे वागलो. घरचं प्रकरण होतं. हडतूड करणं शक्य नव्हतं पण त्याचं “NRE” अकाऊंट बद्दल असलेल्या आज्ञानाचा फायदा घेत. डिप्लोमॅटिकली नकार देण्यात यशस्वी झालो. मोदींनी अश्या लोकांची चांगलीच बूच मारली आहे हे पाहून खूप बरं वाटलं, हि मंडळी लाईनीत दिसत नाहीयेत पण आतल्या आत तडफडताहेत हे बघून एक आसुरी आनंद झाला. पण तो फार काळ टिकला नाही. मी थोड़ा हिशोब मांडल्यानंतर विचार आला खरंच काळ्या पैशांची रद्दी झाली कि तो विभागला जातोय? आता हिशोब करूयात. समजा "एक लाख" काळं धन आहे आणि एजंट फक्त ५०%च डॉलरमधे देणार. म्हणजे, ५०,००००/६८ (रुपये) => ७३५ डॉलर. $७३५ x ३२(बाथ) => २३५२० थाई बाथ. आता, २३५२० - ११०० बँकेची फिज => २२,४२० थाई बाथ.(रेडी टू ट्रान्सफर) २२,४२० x १.९ (रुपये) => ४२,५९८ रुपये. म्हणजे जर फॉरेन रूट ने पैसे भारतात आले असते तर नातेवाईकाच्या एक लाखातले ४२,५९८ व्हाईट होऊन आले. "एक लाख" घेणारा एजंट सगळेच्या सगळे व्हाईट करणार पण त्याने डॉलर देण्यासाठी ५०,००० खर्च केले, बाकीचे ५०,००० त्याच्या खिशात. म्हणजे गोळाबेरीज केल्यास, ५०,०००-४२,५९८ => रु. ७,४०२(फक्त) नाहीसे झाले कन्व्हर्जन करण्यात. म्हणजे, माझ्या नातेवाईकाचा काळा पैसा जरी अर्धा झाला तरी तो अर्धा एजंटकडे गेला. एक लाख काळ्या पैशांतल्या फक्त ७,४०२ रुपयांची रद्दी झाली. काळा पैसा फक्त एका बदमाशाकडून दुसऱ्या बदमाशाकडे जातोय? तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे हे मत? जाता जाता, एक जागरूक नागरिक म्हणून माझ्या बँक मॅनेजरला फॉरेन रूटने पैसा भारतात आणण्याचे प्रयत्न चालले आहेत याबद्दल पत्र लिहिलं आहे. तो पुढे त्याचं काय करेल देव जाणे.
वर्गीकरण
आर्थिक
नोटबंदी

प्रतिक्रिया द्या
2358 वाचन

💬 प्रतिसाद (11)
न
नितिन थत्ते Tue, 11/22/2016 - 09:50 नवीन
>>एक जागरूक नागरिक म्हणून माझ्या बँक मॅनेजरला फॉरेन रूटने पैसा भारतात आणण्याचे प्रयत्न चालले आहेत याबद्दल पत्र लिहिलं आहे. तो पुढे त्याचं काय करेल देव जाणे. अभिनंदन. पण हा अमुक अमुक माणूस असा प्रयत्न करतोय असं प्राप्तिकर विभागाला कळवलं की नाही यावर देशाचं भवितव्य काय असणार हे ठरेल.
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Tue, 11/22/2016 - 10:06 नवीन
आधी रिप्लाय येतोय का त्याची वाट पहाणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मराठी कथालेखक Tue, 11/22/2016 - 10:57 नवीन
ऑफर होती कल्याणमधे एक वन बीएचके तुझ्या नावावर करतो
मजा आहे राव तुमची (म्हणजे ऑफर घेतली असती तर) . असो.. :)
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 11/22/2016 - 11:25 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ब
बाजीप्रभू Tue, 11/22/2016 - 11:33 नवीन
यात काही "जर-तर" देखील असावेत. मुळात ज्या गावाला जायचं नाहीये त्या गावचा रस्ता विचारण्यात मी वेळ घालवला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 11/22/2016 - 11:19 नवीन
या बाबतीत मी तसा अज्ञानीच आहे, पण एक प्रश्न मनात आला. हे जे कोणी रुपये डॉलर मध्ये बदलून देणारे आहेत, ते ह्या जुन्या (रद्द झालेल्या) नोटांच काय करणार? त्यांना कोण ह्या नोटा बदलून देणार?
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Tue, 11/22/2016 - 11:26 नवीन
हा प्रश्न खरंतर मला देखील पडला होता. पण तो एजंट जुन्या नोटा घेतोय म्हणजे कुठेतरी बँक आणि एजंट्स यांची भ्रष्ट युती झाली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/22/2016 - 11:45 नवीन
+१ याकरिताच, प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून "अश्या कारवायांत बॅंकेचा हात दिसल्यास बँक मॅनेजरवर कारवाई होईल" असा आदेश आरबीआयने काढला आहे. संगणकिय मदतीने मोठे व्यवहार वेगळे करणे व त्यांची पडताळणी करणे शक्य असल्याने यात फार मोठी रक्कम पांढरी करणे धोक्याचे असेल. पण, धनलोभ कोणाला किती धोका पत्करायला उद्युक्त करेल हे सांगता येत नाही, हे पण तितकेच खरे आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/22/2016 - 11:39 नवीन
एजंट जुन्या नोटा घेऊन त्या कशा वापरेल याबाबत उत्सुकता आहे ! काळा पैसा निर्माण करणार्‍यांच्या मागे ७० वर्षांचा भक्कम अनुभव आणि (गुन्हेगारी पद्धतीने वापरली जात असली तरी) उत्तम बुद्धी आहे. ते त्यांची कमाई वाया जावू नये यासाठी पराकोटीचे प्रयत्न करणार हे गृहितच आहे. मुळात गुन्हेगारी पैसा असल्याने तो वैध-अवैध मिळेल त्या मार्गांनी पांधरा करण्याचे मार्ग तीच उत्तम बुद्धी वापरून शोधले जाणारच. हे १०० % रोखणे व्यवहारात कोणालाच शक्य नाही. मात्र, ते कमीत कमी व्हावे व ते झाल्यावरही त्यांचा मागोवा घेवून शक्य तितक्या लोकांना कायद्याचा बडगा दाखवणे हे सरकारचे यशापयश ठरवेल. @ बाजीप्रभू, तुम्ही दाखवलेली मुल्यांची जाण नक्कीच स्पृहणिय आहे. त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद !
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 11/22/2016 - 11:47 नवीन
हेच आतापर्यंत कोणी स्पष्ट लिहायचे टाळत होते लोक. कसेही असो, पण ते पैसे संमांतर अर्थव्यवस्थेतून मुख्य व्यवस्थेत येणार आहेत. एकतर बजेटच्या हिशेबात यावेत किंवा नाहीसे व्हावेत. जसे सोनारांवर नजर आहे तशी या लोकांवरही असू शकेल. माहीत नाही. आपल्याला जे माहीत होते ते सरकारला कळत असणारच. आणखी काही उपाय योजले जातील असे जे म्हणत आहेत, त्यात अशा प्रकारांवरही घाला घालण्याची काही योजना असणार. सगळा काळा पैसा नाहीसा होणे शक्य नाहीच. जो काळा पैसा रिअल इस्टेट किंवा सोन्यात किंवा डॉलरात आधीच गुंतवला गेलाय तो ट्रेस करणे हे इनकम टॅक्सवाल्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. आताचा नोटा रद्द करण्याचा उपाय फक्त रोख स्वरूपात असलेल्या काळ्या पैशासाठी आहे. वाकड्या रस्त्याला न वळल्याबद्दल तुमचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ Tue, 11/22/2016 - 12:29 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा