गोष्ट तशी लाजीरवाणी..
कस आहे मला माझ्या केसांचा मला भलताच अभिमान आहे( आता होता असच म्हणावे लागेल)
लहान पणी आत्या लोक माझ्या केसावर वेणी घालायचा प्रयोग कराचा जावळ काढायच्या आधी.
पुढे जसजस मोठा होत गेलो..तसतस दाट केस लय भारी वाटायचे,मोठ्या दाताचा कंगवा पण मोठ्या मुशकिलीने केसात फिरायचा.
पुढे १० वीत गेल्यावर केसात एक चंदेरी मेंबर दिसला,त्याला उपटुन काढला,आणी सगळेच केस पांढरपेशे सारखे वागायला लागले.
मागी १० वर्षात मेंहदी,डाय,हेअर कलरचे नानाविध प्रयोग केले.केसांची शान अबधीत राहिली,,,पण...........
.
.
.
मागिल ६ महिन्यात केस मोर्चा सोडुन पळ काढत आहेत,एकच बाजु नाही तर सगळीकडुनच माघार घेत आहेत,
या हिशोबाने २-३ वर्षात रितीक ते राकेश रोशन होईल जाईल.बर बॉडी पण लै भारी नाहि की 'ते' चांगल दिसेल.
डॉक्टर वैगैरे करुन झाले स्थानिक पण गुण काय येईना,तर आता मिपावर सल्ला मागावा म्हणल..
तर आता काय कराव ?
********************************************************************************************
माझे खाणे -पीणे व्यवस्थीत आहे.
झोप रोजची ६ तास पुरेशी आहे, या पेक्षा जास्त येत पण नाही.
विडी काडीच व्यसन नाही,कधी मळायला लागते.
६ महिण्यापुर्वी कावीळ झालती,त्याचा काही परिणाम ??
********************************************************************************************
पहिलाच लेख आहे सांभाळुन घ्या.
And last but not the least..
उत्तर माहिती असुन.........
💬 प्रतिसाद
(23)
क
कंजूस
Tue, 11/22/2016 - 11:17
नवीन
आपल्या कवरचा पत्त्या नाय चालले दुसय्रांचं ......मैदान साप करायला!!
हीहीहीहाहाहाहा!
( केस पांढरे होतात ज्यांचे त्यांचे मैदान सोडून पळत नैत .तित्तच राऊन मिरवतात रडवतात. )
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 11/22/2016 - 11:35
नवीन
केसांचा एवढ्यात लाडू चिवडा? अजून जेपीचं लग्न व्हायचंय! बादवे टक्कल आनुवांशिक असते म्हणे! तुझ्या घरात बाबा, मामा, आजोबा वगैरेंची काय परिस्थिती?
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 11/22/2016 - 11:58
नवीन
केसांचं मग बघू, पहिले पोरगी बघ
...सगळं सैन्य मैदान सोडायच्या आत..! :)
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 11/22/2016 - 13:12
नवीन
सेम सल्ला.
केस आहेत तोवर लग्नाचे बघ!!
ती केस लवकर साॅल्व्ह कर ;)
बाकी काही लोक हल्ली लाडुत चिवडा मोड आॅफ करुन पूर्ण लाडू होतात.ते बरे दिसते.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Wed, 11/23/2016 - 20:45
नवीन
लाडूत चिवडा नव्हे. चिवड्यात लाडू. :))
बाकी टोटल लाडू होण्याशी सहमत.
- Log in or register to post comments
ओ
ओम शतानन्द
Tue, 11/22/2016 - 12:28
नवीन
Try hair transplant
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 11/22/2016 - 12:51
नवीन
"या आयडीने" हे शब्द मुद्दाम गाळलेत? =))
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 11/22/2016 - 13:17
नवीन
एकमेकांस सांभाळुन घ्या।
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/23/2016 - 08:21
नवीन
हेच्चं लिहायला आलेलो रे.
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Tue, 11/22/2016 - 13:04
नवीन
जेसन स्टॅथमसारखी बॉडी शॉडी बनवा . मग चांगलं दिसेल .
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Tue, 11/22/2016 - 13:15
नवीन
जाऊ द्या हो..." जानेवाले को कौन रोक सकता हे "
मलाही हि समस्या आहेच. पण माझे केस आधीच विरळ होते. आणि इंजिनीअरिंगपासून हळूहळू केसानी पलायन करण्यास सुरुवात केली. आणि आता केस थोडी हाताबाहेर गेली आहे :D त्यात लग्नाचा सीझन सुरु झाल्याने बघू आता काय प्रतिसाद येतात ते.
असो...तर बऱ्याच लोकांनी सल्ले दिले कि काहीतरी उपाय कर...डॉक्टर बत्रा वगैरे. (यांचे मला इमेल्स पण येतात...साल्याना कुठून माझा इमेल आयडी मिळाला काय माहित... :() पण मला फक्त केसांवर काही हजारो रुपये यावर खर्च करणे पटत नाही. केस काय आज आहेत उद्या नाहीत.
ठाण्याला कारखानीस यांच्या दवाखान्यात गेलो होतो, त्यांनी १-२ ट्रीटमेंट सांगितल्या होत्या पण बोलले कि त्यासाठी आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील...मग तो पर्याय तेव्हाच बाद.
डोंबिवलीत एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत...खरं तर त्यांनी सांगितलं होत कि गेलेले केस शक्यतो परत येत नाहीत..पण जे आहेत त्यांना जाण्यापासून थांबवता येईल. त्यांच्याकडे उपचार सुरु केले होते मागच्या वर्षी...३-४ महिन्यानंतर ते गोळ्या वगैरे घेण्याचा कंटाळा येऊ लागला मग ते पण बंद केले.
मी घरच्या घरीच काही नैसर्गिक उपाय करत असतो.
त्यात प्रामुख्याने योगा. जसे कि सर्वांगासन, उत्तानासन, वज्रासन, ससांगासन वगैरे (२-३ वर्षांपासून करतोय...पण काही खास फरक जाणवला नाही अजून :( )
शीर्षासन उत्तम...पण मला जमत नाही. सध्या बालायम सुरु केलय...बघू काही महिन्यांनी फरक पडला तर.
खाण्यात प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खात जा. जसे कि अंडे वगैरे.
कांदा हा हि केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतो. कारण त्यात भरपूर प्रमाणात सल्फर असत.
केमिकलयुक्त शाम्पू वापरणे टाळा. बाकी गूगलवर अजून माहिती मिळेलच.
मानसिक तणाव हे देखील केसांच्या गळतीचे एक प्रमुख कारण आहे.
शेवटी...हाय काय अन नाय काय.
- Log in or register to post comments
अ
अर्जुन
Tue, 11/22/2016 - 13:43
नवीन
रेविविगेन थेअरी घ्या.मी त्यांची मनी ब्याक ग्यारंटी ओफर असतांना वापरुन पाहिले होते. अतिशय उत्तम परीणाम आहे. अधिक माहितीसाठी
href="http://revigen.net/eng/revigen_vinifolin.html">
- Log in or register to post comments
अ
अर्जुन
Tue, 11/22/2016 - 13:50
नवीन
नाव रेविगेन थेअरी आहे. टायपोबद्दल माफी असावी.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 11/22/2016 - 14:05
नवीन
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 11/22/2016 - 14:09
नवीन
Vitamin b12 ची टेस्ट करा.. कमी झालं असेल. डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन घ्या.
टकलावर केस येवू शकतात. माझ्या एका मित्राला आले आहेत. थोडा खर्चिक आणि वेळखावू उपचार आहे. नंतर संपर्कासाठी तपशील देईन. तोवर काळजी घ्या. नारळ खात रहा.
- Log in or register to post comments
न
निनाद
Wed, 11/23/2016 - 05:40
नवीन
ई जीवनस्त्त्व आणि ब वर्गाची जीवनसत्त्वे कमी पडत असावीत.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Wed, 11/23/2016 - 06:45
नवीन
गोटा करा आणि मस्त फिट दिसाल असा व्यायाम करा. फॅशन म्हणून खपून जाईल. केसांचं काय एवढं नाही.. आहे ते चांगलं कॅरी करता आलं म्हणजे झालं..
- Log in or register to post comments
र
रघुनाथ.केरकर
Wed, 11/23/2016 - 07:11
नवीन
टक्कल पडणे ही काही लाजीरवाणी गोष्ट नाहीय, असं मला वाटतं.
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Wed, 11/23/2016 - 08:13
नवीन
नक्कीच नाहीये
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Wed, 11/23/2016 - 11:16
नवीन
त्याने केस दाट होतात
जास्वन्द च्या पानां चा लेप ( मिक्सर मध्ये करून) लावा
दोन्ही उपाय हमखास आहेत
- Log in or register to post comments
J
jp_pankaj
Fri, 11/25/2016 - 09:00
नवीन
लेख टाकलाय विसरुन गेलतो.
एक एक उपाय आमलात आणतो.
सबका साथ मेरे बालोंको विकास.
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 11/25/2016 - 09:34
नवीन
केस गॉन (गेले) असेल तर फार (गंभीर) या अर्थाने परिस्थीती नाहीये.
पण गॉन केस असेल तर फार मोठी समस्या आहे हे अलिकडच्या काही धाग्यांवरून/प्रतिसादांवरून तुला कळले असेल असे सम्जून मी खाली बसतो.
केस आणि फेस व्हॅलु शाबूत असलेला नाखु
- Log in or register to post comments
J
jp_pankaj
Fri, 11/25/2016 - 09:37
नवीन
समजल,त्याला आपण काय नाय करु शकत.
- Log in or register to post comments