Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लिहितो कविता तुमच्यासाठी...

अ — अत्रुप्त आत्मा, Tue, 11/22/2016 - 12:40
नाखु Tue, 22/11/2016 - 15:26 नवीन कवीता कधी ? लोक खोळंबून राहिलेत तुम्ची नवकविता वाचायला. लवकर टाकणे नवकविता. अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघाची संयुक्त मागणी
-------------------------------------- (खुला सा :- नाखु(न) ;) अंकल आणी त्यांचे मंडळाचे विनंतीस मान देऊन , आंम्हाला त्यांनी टाकलेल्या (वरील) ताज्या खरडीवरून हे काव्य शीघ्र प्रसविले आहे! धीराने घ्यावे! ) लिहितो कविता तुमच्यासाठी जमवून सारी सामग्री शब्द, कल्पना, यमके सारी करूनी त्यांची "ही" जंत्री! विषय कोणता घेऊ सांगा? प्रेमं?, निसर्ग? की दुर्घटना? की कवितेचा विषय होऊनी मांडू मी ती स्व वेदना? वाचुन किंवा दुर्लक्षुनंही पटलावरती येऊ मी? की पटलाचे होऊन स्पंदन बनू त्यातले बीजच मी? सांगा सांगा लवकर सांगा धीर मना तो मुळि न धरे! शब्दांचेही वाय्रासम हे येता अंती शांती उरे! विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी पुन्हा अवेळी वारा येईल उधळुनी लाविल पुन्हा मला ऐशी आमुची कविता सारी क्षणंभरांचा हा मामला! ==०==०==०==०==०== अतृप्त...

प्रतिक्रिया द्या
7590 वाचन

💬 प्रतिसाद (26)
क
कवि मानव Tue, 11/22/2016 - 13:21 नवीन
आवडली कविता !!! विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 11/22/2016 - 13:21 नवीन
एक तुतारि द्या मजला आणुनी फुंकीन मी xxx xxxx स्वप्राणाने आवडली सुलभ कविता.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 11/22/2016 - 17:17 नवीन
आवडली कविता. आणि विषय काय विचारता. अजरामर विषय आहेच ना जिव्हाळ्याचा वगैरे....तांब्या
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 11/22/2016 - 18:20 नवीन
@अजरामर विषय आहेच ना जिव्हाळ्याचा वगैरे....तांब्या. ››› ह्या ह्या ह्या! अजरामर विषय नाही.. जीवनविषय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रचेतस Tue, 11/22/2016 - 18:28 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Tue, 11/22/2016 - 18:31 नवीन
कविता आवडली. बाकी नाखुनअंकलचे विनंतीला मान देऊन काव्य जसे प्रसवलेत तसे आमच्याही विनंतीला मान देऊन भावंविश्वचे पुढील भाग मोकळे करावेत.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/23/2016 - 02:13 नवीन
@तसे आमच्याही विनंतीला मान देऊन भावंविश्वचे पुढील भाग मोकळे करावेत.››› अस्सं क्काय? ल्लुल्लुल्लुल्लु ! दू दू आगोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शार्दुल_हातोळकर Tue, 11/22/2016 - 18:46 नवीन
मस्त कविता !!
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/23/2016 - 04:22 नवीन
परिक्षण वजा समीक्षा वजा "सुलभी"करण
लिहितो कविता तुमच्यासाठी जमवून सारी सामग्री शब्द, कल्पना, यमके सारी करूनी त्यांची "ही" जंत्री!
कवीराज आपल्या रसिकांनाच विचारत आहेत की तुमच्या साठीच हे ऐवज्/जिन्नस जमा केले आहेत कविता करायला अता तुम्हीच तुमची आवड सांगा.
विषय कोणता घेऊ सांगा? प्रेमं?, निसर्ग? की दुर्घटना? की कवितेचा विषय होऊनी मांडू मी ती स्व वेदना?
उपहागृहात गेल्यावर कसे नुसते भाजी म्हणून चालत नाही तर तुम्हाला पनीर हवे का तंगडी कबाब्,कोफ्ता हवा का चिकन करी असे सांगावे लागते,तुम्हाला दिलेल्या माहीतीवरून आणि तुम्च्या (भोट) चेहर्यावरून तोच सुचवतो "दिल लजीज" घ्या आमची पेष्शल डिश आहे ती आणि तुम्हीही आनंदाने मान्य करता.
वाचुन किंवा दुर्लक्षुनंही पटलावरती येऊ मी? की पटलाचे होऊन स्पंदन बनू त्यातले बीजच मी?
क्षुधाशांती हे जरी प्राथमीक उद्दीष्ट असले तुमचे तरि तिथली चव जिभेला आणि दर खिश्याला अनुक्रमे आवडले व परवडले पाहिजेत ना. तेंव्हा दोन्हींचा ताळमेळ बसविणे आवश्यक्च संसारी मनुष्याला.तो ताळ्मेळ उर्वरीत महिन्याचे अंदाजपत्रकाला धक्का लावणार नाही याची खबदरदारी घेतलेला असावा.
सांगा सांगा लवकर सांगा धीर मना तो मुळि न धरे! शब्दांचेही वाय्रासम हे येता अंती शांती उरे!
अता उगा रेंगाळण्यासाठी उपहार्गृह म्हणजे काय बाग आहे का चहाचा कट्टा तिथे चटकन ऑर्डर देऊन मोकळे व्हा आणि पुढच्या कष्टमरकडे जाऊ देणेच उचीत आहे.
विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी
बर्याचदा आपल्या कुंडलीतील पापग्रहांच्या एकाचवेळी आलेल्या कट्ट्यामुळे "हे" नाही ते नाही असा पाढा बिचारा वेटर (वेट करायला लावणारा तो वेटर संदर्भ :आत्मुलिखित फुललेले दगड) वाचत असतो. मग अंगात त्राण असेल तर दुसरे क्षुधाशांतीगृह शोधावे किंवा मुकाट आहे त्यातच उदरभरण करावे लागतेच.
पुन्हा अवेळी वारा येईल उधळुनी लाविल पुन्हा मला ऐशी आमुची कविता सारी क्षणंभरांचा हा मामला!
पण कधी कधी अवचित योग येईल, कुठला कट्टेकरी कुठल्या गावाला, अनोळखी ठिकाणी खादाडीला घेऊन जाईल आणि वरची सारी बंधने सोडून एक यादगार मैफिल, चवदार खिलवण्याने संपन्न होईल. म्हटल तर अवघा तीन-चार तासांचा हिशोब पण त्याचे मिळ्णारे व्याज पुढे बरेच दिवस पुरेल इतके.
बुवांच्या कवितांचा चाहता. अखिल मिपा नवकवितांची हिवाळी भुईमूग लागवड व नवकाव्याची रब्बी पेरणी संघ या मंडळाच्या विनंतीला मान दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी हे कडवे खास आत्मुदा शैलीतले
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/23/2016 - 04:42 नवीन
आरा रा रा रा रा... ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस Wed, 11/23/2016 - 11:37 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सस्नेह Wed, 11/23/2016 - 11:53 नवीन
कवितेपेक्षा परीक्षण भारी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ट
टवाळ कार्टा Wed, 11/23/2016 - 05:18 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 11/23/2016 - 08:02 नवीन
विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी
या ओळी खास आवडल्यात जियो ....
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Wed, 11/23/2016 - 08:05 नवीन
खास 'बुवाटच' नाही जाणवला कवितेत ;)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 11/23/2016 - 09:27 नवीन
हां ना राव. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
प
प्रचेतस Wed, 11/23/2016 - 11:38 नवीन
'बुवाटच'म्हणजे नेमके काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
म
महासंग्राम Wed, 11/23/2016 - 12:47 नवीन
कळीचा प्रश्न विचारला तुम्ही... कळूद्या बुवा टच म्हणजे काय ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ग
ग्रेंजर Wed, 11/23/2016 - 09:54 नवीन
अर्रर्रर्र! मी विडंबन आधी वाचलं, असो हि पण मस्त!!!!!!!
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 11/23/2016 - 10:11 नवीन
चतुर्भुज झाल्यापासनं गुर्जींच्या कविता लयीत यायला लागल्यात.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 11/23/2016 - 11:53 नवीन
वाचतेय...
  • Log in or register to post comments
प
पुंबा Wed, 11/23/2016 - 12:12 नवीन
वाचुन किंवा दुर्लक्षुनंही पटलावरती येऊ मी? की पटलाचे होऊन स्पंदन बनू त्यातले बीजच मी? सांगा सांगा लवकर सांगा धीर मना तो मुळि न धरे! शब्दांचेही वाय्रासम हे येता अंती शांती उरे! विषय सत्वरी ना मिळता मज मिटुनि ठेवितो कविता मी संध्यासमयीचा पाचोळा वृक्षतळाशी जमतो मी पुन्हा अवेळी वारा येईल उधळुनी लाविल पुन्हा मला ऐशी आमुची कविता सारी क्षणंभरांचा हा मामला!
ही चार कडवी भारीच जमलीयेत.. आवडली
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Wed, 11/23/2016 - 15:56 नवीन
गणा, बुवाटच म्हणजे संध्यासमयच्या ऐवजी दूसरा शब्द ना रे..! म्हणजे कातरवेळ किंवा xxxx?? का अजुन काही अपेक्षित आहे?? खुलासा करावा
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 11/23/2016 - 18:26 नवीन
आलात आपण... ? मिळायला लागला वाटतं वेळ!? Image removed. असो. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
र
रातराणी Mon, 12/05/2016 - 12:33 नवीन
आवडली कविता
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 12/06/2016 - 20:24 नवीन
कविता चक्क वेगळ्या इशयावर! अवडलीच. अता विडंबनही द्या वाचायला म्हञ्जे मिळवली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा