Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"अर्थक्रांती" बोकिल को गुस्सा क्यों आता है ?

अ
अमर विश्वास
Wed, 11/23/2016 - 15:52
🗣 69 प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटाबंदीचा मार्ग सुचविणाऱ्या अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. अशी बातमी सध्या जोरात आहे.. सर्व वृत्तपत्र यास ठळक प्रसिद्धीही देत आहेत अर्थक्रांती आणि बोकिल गेले सोळा वर्षे यावर काम करत आहेत त्यांची चिकाटी स्तुत्य आहे.... मोदींनी नोटाबंदी केल्यापासुन बोकिलांना बरे दिवस आले आहेत.. त्यातून आत्ता मोदींवर टिका केल्याने त्यांचा TRP बराच वाढला आहे ...चांगल आहे ... पण गम्मत अशी आहे : बोकीलांच्या म्हणण्याप्रमाणे "सरकारने माझ्या प्रस्तावातील पाच मुद्द्यांपैकी केवळ दोनच गोष्टी उचलल्या" आता बाकीच्या तीन का उचलल्या नाहित यावर ते फारसे भाष्य करीत नाहीत. त्यांच्या प्रस्तावात थेट आणि अप्रत्यक्ष कराबरोबर केंद्रीय कर रद्द करणे, बँक व्यवहारांवरील कर, पैसे काढण्यावर कोणताही कर नसणे, आर्थिक व्यवहारांवर कायदेशीर मर्यादा आणि मोठ्या रक्कमेच्या चलन रद्द करणे असे मुद्दे होते. आता थेट आणि अप्रत्यक्ष कराबरोबर केंद्रीय कर रद्द करणे, बँक व्यवहारांवरील कर हे मुद्दे अत्यंत अव्यवहार्य आहेत. सध्या एकूण transactions पैकी बँकेच्या माध्यमातून होणारी transactions किती? मग रोख रकमेच्या माध्यमातून केले जाणाऱ्या व्यवहारांचे काय ? असं प्रकारे बँक व्यवहारांवरील कर आकारणे म्हणजे रोखीच्या व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासारखे नाही का? अशा सामान्य प्रश्नांचे उत्तर द्यायच्या भानगडीत ते फारसे पडत नाहीत. सध्या थेट आणि अप्रत्यक्ष कराबरोबर केंद्रीय करांचे उत्त्पन्न किती? आणि तेव्हढे उत्पन्न मिळवण्यासाठी बँक व्यवहारांवरील कर किती टक्के ठेवावा लागेल ? उत्तर नाही सध्या आपल्या इकॉनॉमीचे नवसाचे पोर .. GST (गुड्स & सर्विस टॅक्स) त्याचे काय करायचे ? भृणहत्या ? तेंव्हा अर्थक्रांतीला बरे दिवस आलेत म्हणुन बोकील आनंदी .. बोकीलांनी मोदींवर टीका केली म्हणून माध्यमे आनंदी ... नोटबंदी केली म्हणून भक्त आनंदी ... सामान्यांच्या गैरसोयीचा मुद्दा मिळाला म्हणून विरोधक आनंदी मोदींनी वरील अव्यवहार्य पर्याय स्वीकारले नाहीत म्हणून आम्ही आनंदी ... थोडक्यात काय तर आनंदी आनंद गडे .. जिकडे तिकडे चोहीकडे

प्रतिक्रिया द्या
11274 वाचन

💬 प्रतिसाद (69)
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 09:45 नवीन
हिंदूच्या बातमीत बर्‍यापैकी संतुलित रिपोर्टींग आहे, बातमीच्या शेवटी हे त्या गावाला का शक्य झालंय याचंही त्यांनी विश्लेषण केलंय, माझे विचार त्या विश्लेषणाप्रमाणेच आहेत. अशा एकांड्या गावाच्या खबरा आल्या की मला हमखास राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार आठवतो. जे या दोन गावांना शक्य झालंय ते अजूनही अनेक गावांना त्यांच्या आजूबाजूलाच असूनही शक्य झालेलं नाही. मनोवॄत्तीचा फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 11/24/2016 - 11:57 नवीन
हे दोन्हीही लोकांनी यशस्वी करुन दाखवलेले प्रयोग आहेत. शेवटी लोकसहभाग आणि अर्थातच मनोवृत्तीचा प्रश्न येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अमर विश्वास गुरुवार, 11/24/2016 - 09:37 नवीन
डांगे सर .. तीनही दुवे पहिले . काही दिवसांपूर्वी एक पोस्ट फिरत होती : People standing in AjjTak queue are happy People standing in ZeeNews queue are facing some problems People standing in NDTV queue are dying तिन्ही मथळे (headlines) याच प्रकारात आहेत : The Hindu : At Akodara, India’s first digital village Hindustan Times : Amid banknotes chaos, ‘digital’ village that turned cashless is an oasis of calm Times of India : Even ‘cashless’ digital village not unscathed पण शेवटी जर जनतेने मनावर घेतले व बँकेची (इन्स्टिट्यूशन) साथ मिळाली तर बऱ्याच चांगल्या गोष्टी घडू शकतात...
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 09:42 नवीन
बस, हेच आहे आजकालचे रिपोर्टींग. बाकी, जनतेला फायदे कळले की जनता मनावर घेतेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
व
वटवट गुरुवार, 11/24/2016 - 10:13 नवीन
तरीही हे असलं रिपोर्टींग लोकांची मते नाही वळवू शकत. पब्लिक हुश्शार होतीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वटवट गुरुवार, 11/24/2016 - 10:12 नवीन
तरीही हे असलं रिपोर्टींग लोकांची मते नाही वळवू शकत. पब्लिक हुश्शार होतीये.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 11/24/2016 - 14:19 नवीन
बाकी चर्चेमध्ये आदूबाळ यांच्याशी सहमत
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 11/24/2016 - 14:36 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
अ
अमर विश्वास गुरुवार, 11/24/2016 - 14:36 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 14:38 नवीन
;))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास गुरुवार, 11/24/2016 - 14:37 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 11/24/2016 - 14:38 नवीन
चर्चा आर्थिक गोष्टीवरून हेरगिरीकडे वाळू लागली ... जॉर्ज ऑरवेल , १९८४ आणि आपण असा वेगळा धागा काढावा का?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 11/25/2016 - 01:51 नवीन
कारण माझा हेतू आहेरे व नाहीरे यांच्या प्रव्रुती बद्द्ल काही लिहिण्याचा हेतू होता. हे प्रायव्हसी प्रकरण मधेच आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास गुरुवार, 11/24/2016 - 20:05 नवीन
आजही संसदेत गोंधळच घातला गेला ... यासगळ्यामुळे GST लांबणीवर पडता काम नये ... कारण गस्त खऱ्या अर्थाने Game Changer ठरू शकतो
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 04:52 नवीन
पंतप्रधान पूर्णवेळ हजर राहिले असते तर गोंधळ घातला गेला नसता, बातम्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्यक्ष कामकाज बघावे असे माझे मत आहे, कामकाज रटाळ असते व बातम्या सनसनिखेज...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Fri, 11/25/2016 - 07:25 नवीन
डांगे सर काल संसदेत घातलेला गोंधळ कुणामुळे होता ? संसदेत खासदारांनी कसे वागले पाहिजे ? संसद चालवणे ही फक्त सरकारची जबाबदारी आहे का ? ह्या सर्वांवर खरे तर वेगळा लेख होईल . (टीव्ही बातम्यांवरील माझे मत या आधीच दिले आहे :) ) काल सरकारने थोडी लवचिकता दाखवुन संसद चालू द्यायला हवी होती ... पण माझा मुख्य मुद्दा GST चा आहे .... नवीन आर्थिक वर्षात GST लागू होणे महत्वाचे आहे .. या सर्व गोंधळात त्यावर परिणाम व्हायला नको एवढीच अपेक्षा
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 07:49 नवीन
कालचा गोंधळः गोंधळ विरोधकांनी घातला. त्याला कारण पंतप्रधानांची चर्चेमधे अनुपस्थिती. पंतप्रधान उपस्थित होते तेव्हा भाषणं व्यवस्थित होत होती. विरोधी पक्षांची अपेक्षा होती की पंतप्रधानांनी चर्चेस उपस्थित राहावे व ही अपेक्षा पूर्ण करण्याची ग्वाही सत्ताधारी पक्षाने दिली मात्र पाळली नाही. खासदारांनी कसे वागले पाहिजे: भाजप खासदार विरोधात बसतांना जसे वागत होते तसे वागावे! ;) (२जी घोटाळ्याशी संबंधीत चर्चेच्या वेळी काय झाले ह्याची विरोधकांनी केलेली आठवण सद्यपरिस्थितीत रोचक होती) संसद चालवण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांची समसमान आहे पण सद्यस्थितीत पंतप्रधान विरोधी पक्षाला महत्त्व देत नाहीत असे दिसून येत आहे. सरकारने लवचिकता दाखवणे गरजेचे आहे. जीएसटी लागू होण्यास अडचण येणार नाही, जर पंतप्रधानांनी चर्चेस उपस्थित राहून संसदेच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत तर पुढच्या कामाला अडचण येणार नाही. समजा नाही ह्या अधिवेशनात झाले तरी त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची तरतूद घटनेत आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
अ
अमर विश्वास Fri, 11/25/2016 - 09:52 नवीन
डांगे सर विशेष अधिवेशन बोलावण्याची तरतूद आहे . तसेच हे अधिवेशन बंद न करता प्रलंबित (सस्पेंड) करून परत बोलावता येईल (Reconvene) पण एकंदर वेळेचा अंदाज घेता नवीन नोटांचा पुरवठा सुरळीत व्हायला किमान १ महिना तरी लागेल (या वर्षाअखेरीपर्यंत ) त्यामुळे तोपर्यंत अधिवेशन परत बोलावले तर .... पहिले पाढे पंचावन्न त्यानंतर फेब्रुवारीत अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होईल .... त्यात सरकारचा मानस आहे कि अर्थसंकल्प जानेवारीतच मांडावा (जानेवारीत का ? या वर परत केंव्हातरी ) त्यामुळे एकंदर GST साठी एकूण वेळ थोडा आहे ....
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 09:55 नवीन
बघूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा