Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऐक ना साजणे

स — सोहम कामत, Wed, 11/23/2016 - 16:45
('नाही कळले कधी' गाण्याच्या चालीवर आधारित) प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी.. तुच ती सुंदरी.. तुच ती सुंदरी.. ऐक ना साजणे हाक ती साजिरी तुच माझी सखी तुच ती सुंदरी.. प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी.. मंद ते हासणे.. धुंद ते बोलणे.. उतरले अंतरी.. लाजरे चांदणे.. संगतीने तुझ्या.. जडली प्रिती उरी.. तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी.. तुच माझी प्रिया.. तु असे तारिका.. गर्द तार्यांतली.. तु असे चंद्रिका.. पाहता सुर्यही.. लाजला अंबरी.. तुच माझी सखी.. तुच ती सुंदरी.. ऐक ना साजणे.. प्रित ही.. अंतरी.. उमलली साजिरी.. मोहरली गोजिरी.. पाहता ती परी..(

प्रतिक्रिया द्या
4424 वाचन

💬 प्रतिसाद (24)
प
पुंबा Wed, 11/23/2016 - 19:13 नवीन
*वरील कवितेची रेसिपी* साहित्य:साखर 2 वाट्या, एक वाटी गुळ, एक वाटी पिठीसाखर कृती: पाक एक तारी करून त्यात एक वाटी गुळ आणि 2 चमचे गुलकंद घालावे. हे मिश्रण परातीत काढून छान हलवून घ्यावे. यात एक वाटी पिठी साखर घालून त्याचे लाडू वळून घ्यावेत. कवितेचे लाडू तयार.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Wed, 11/23/2016 - 19:29 नवीन
ही पाकृ अंडे घालून करता येईल का? (घालून = वापरून) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Wed, 11/23/2016 - 19:41 नवीन
अंडं चालेल पण मग गोडपणा कमी होईल त्यासाठी आणखी एक वाटी पिठीसाखर घालावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
न
नाखु गुरुवार, 11/24/2016 - 10:56 नवीन
अर्धा वाटी मध आणि दहा बारा बेदाणे कसे विसरलात तेच कळेना !!!! पाकृ टंकताना सावधानता बाळगणे आवश्यक नाहीतर असे विसरायला होते. विसराळू विनु नाखु मनके बेदाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
न
नाखु गुरुवार, 11/24/2016 - 12:45 नवीन

<ऐक ना भवाने>

होतीच ती.. खातरी.. उगवली भुवरी.. आठवली खंजीरी.. पाहता ही सुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी.. ऐक ना भवाने हाक ही दबकी तुच माझी दावणी तुच ती नाटकी. होत ही.. खातरी.. खुपसली खंजीरी.. आठवली भिंगरी.. पाहता ही नुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी.. मंद ते सम्जणे.. फुंद ते बोलणे.. उमजले नंतरी.. काढते भांडणे.. संगतीने तुझ्या.. नुरली प्रिती उरी.. तुच गाजा पट्टी.. तुच ती डंगरी.. तुच माझी दशा.. तु भासे त्राटीका.. उच्च वादातही.. तु दिसे चंडिका.. पाहता दैत्यही.. लाजला अंतरी.. तुच गाजा पट्टी.. तुच ती डंगरी.. ऐक ना भवाने होतीच ती.. खातरी.. उगवली भुवरी.. आठवली खंजीरी.. पाहता ही सुरी.. तुच ती डंगरी.. तुच ती डंगरी..
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/25/2016 - 11:12 नवीन
नाखु काका जोशात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बोका-ए-आझम Fri, 11/25/2016 - 11:49 नवीन
तुच गाजा पट्टी..
नाखु काकांची गर्लफ्रेंड अरब अाहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Fri, 11/25/2016 - 11:53 नवीन
नाखु काकांची गर्लफ्रेंड अरब अाहे?
विडंबकांची गर्लफ्रेंड जरब अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Fri, 11/25/2016 - 16:19 नवीन
आणि आडनाव तिचे परब आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
J
jp_pankaj Fri, 11/25/2016 - 16:22 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पिलीयन रायडर Fri, 11/25/2016 - 15:23 नवीन
=)) फारच हसवलत आज!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
आ
आदूबाळ Fri, 11/25/2016 - 16:17 नवीन
याच डंगरीबद्दल चर्चा सुरू आहे का? Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/25/2016 - 18:16 नवीन
@डंगरी››› Image removed. लै दिसानी ऐकला हा शब्द! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
श
शार्दुल_हातोळकर Sat, 11/26/2016 - 20:36 नवीन
अगाबाबौ.... जबरदस्त हो नाखु भाऊ.... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
र
रातराणी Mon, 12/05/2016 - 12:29 नवीन
नाखुकाका रॉक्स!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
कवितानागेश गुरुवार, 11/24/2016 - 20:10 नवीन
हसू कि रडू?
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Fri, 11/25/2016 - 10:11 नवीन
पार चोता केला राव चांगल्या गाण्याचा @सोहम - छान गीत !!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/25/2016 - 12:50 नवीन
'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच ना हो ?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/25/2016 - 13:51 नवीन
@'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच ना हो ? ››› ह्या ह्या.. .. अजून २वर्षांनी हे हितेच नवकवींची विडंबनं पाडताना दिसतील बगा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/25/2016 - 14:38 नवीन
@'जीव आवळून' चिडणारे तुम्हीच ना हो ? ››› ह्या ह्या.. .. अजून २वर्षांनी हे हितेच नवकवींची विडंबनं पाडताना दिसतील बगा! =))
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 11/25/2016 - 15:34 नवीन
णवकवींना प्रोतसाहाण दिले पाहिजे. - (जूनकवी) एस.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 11/26/2016 - 20:34 नवीन
छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
स
सोहम कामत Mon, 11/28/2016 - 19:34 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/28/2016 - 20:12 नवीन
"नाही कळले कधी" हे गाणं आहे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा