Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कुण्या गावचा कोण?

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 11/24/2016 - 07:06
ते गाव मला माहित नाही, म्हणून बरं आहे. तिथल्या सावल्या, चांदणे, उन्ह .. सारं काही माझ्याकडे सहज येतं. कुठल्याही प्रकारच्या नात्याचा अडसर लागत नाही त्यात! मी ही त्याच्याच सारखा 'सहज' .., म्हणून त्याला सहजपणे सामावून घेतो माझ्यात. एकदा त्या गावाने मला विचारले, "अरे मुला.. , येत का नाहिस इकडे आत.. वेस ऒलांडून!? " मी म्हटले, "नको रे , कशाला उगाच गावकरी होऊ मी? त्यापेक्षा हेच चांगलं आहे." गाव म्हणते, " जे तुझ्याकडे न मागता सहज येतय, त्याच्याकडे तू नाही येणारं.. सहज... एकदातरी? " मग म्हटलं सांगावच याला सर्व, "अरे गावा... " तू ज्या गोष्टिंना 'तुझ्या गावातल्याच' समजतो आहेस.. त्या सावल्यांना, चांदण्याला, उन्हाला.. विचारून तर बघ एकदा.. ते 'तुझ्या गावचे' आहेत तरी काय? " गाव खट्याळपणे हसले.., म्हणाले, " पक्का लबाड हं तु.. तू बाहेरचा म्हणून फक्त तुझाच! .. ते सगळ्यांचेच.. म्हणून कुणाचेच नाहीत.. अता उमगले मला.. माझिही अवस्था बरिचशी तुमच्यासारखीच आहे! " ----------------------------------- अतृप्त...

प्रतिक्रिया द्या
7754 वाचन

💬 प्रतिसाद (30)
क
किसन शिंदे गुरुवार, 11/24/2016 - 07:08 नवीन
कळले नाही हो बुवा, जरा विस्कटून सांगता का?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/24/2016 - 08:16 नवीन
इथे. सरांनी (तेच ते आपले पांडुचे लाडके.. ). स्थितीवर भाष्य केलय... मी म्हटलं आपण परि'स्थितीवर करावं! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ब
बॅटमॅन Tue, 12/06/2016 - 20:29 नवीन
मायला इथेही पांडू आलाच का? =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
क
कवि मानव Fri, 11/25/2016 - 10:14 नवीन
माझी ही जवळपास हीच अवस्था आहे... मलाhi कळले नाही इथे कोणाला काई म्हणायचं आहे ते ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/25/2016 - 12:19 नवीन
तुम्ही एकदा फक्त कवी होऊन आणी एकदा फक्त मानव होऊन वाचून पहा.. . नक्की कळेल.. काय कळलय ते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवि मानव
व
विशाल कुलकर्णी Fri, 12/02/2016 - 12:17 नवीन
हा फाऊल आहे हा, असं नसतं कधी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
य
यशोधरा गुरुवार, 11/24/2016 - 07:20 नवीन
थोडं थोडं समजलं हो बुवा. ब्येष्ट.
  • Log in or register to post comments
म
मितान गुरुवार, 11/24/2016 - 07:26 नवीन
चांगली कविता बुवा !!! आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 11/24/2016 - 07:40 नवीन
नाही, हेच तुम्ही सिद्ध केले बुवा! 'अता' उमगले मला... असं म्हणणारं गाव विरळाच पण, नाही का? Sandy
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/24/2016 - 08:14 नवीन
@'अता' उमगले मला... असं म्हणणारं गाव विरळाच पण, नाही का? ››› सही पयचान्या. .. ते सर.. मात्र लोकांना ह्या अवस्थेत "जा" .. असं स्वत: जणू त्यातलेच असल्याचा आव आणत सांगत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/24/2016 - 08:36 नवीन
यात भरपूर कच्चा माल दिसतो आहे मला =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/24/2016 - 08:50 नवीन
वत्सा..., मग कशाला थांबतोस? त्यातला घे की काही तुला! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रचेतस गुरुवार, 11/24/2016 - 09:47 नवीन
सुरेख मुक्तक
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Fri, 11/25/2016 - 10:47 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सूड गुरुवार, 11/24/2016 - 11:48 नवीन
जल्ल्ला काय्येक कल्ला नाय.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 11/24/2016 - 12:37 नवीन
"कूट"कथा असू शकेल, एक तर टक्याच सांगू शकेल नाही तर डोंबोलीकर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 11/24/2016 - 13:05 नवीन
डोंबोलीकर !!!
मुवि?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Fri, 11/25/2016 - 04:24 नवीन
बुवांच नाव ज्याच्या प्रतिसादाशिवाय पुर्ण होत नाही तो अद्वैत पांडुरंग!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 11/28/2016 - 12:40 नवीन
ओह आय सी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ए
एस गुरुवार, 11/24/2016 - 19:27 नवीन
हम्म. भारी आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 11/25/2016 - 01:43 नवीन
काही कल्ला नाही यातच याकवितेचे यश आहे. बुवांच्या आयुष्यात एक नवीन गाव आले अतः त्यांंच्या कवितेने एक वळण घेतलेय. ती आता मुक्त होउ लागली आहे अता " बद्ध" कविताना रामराम केलेला दिसत्योय.म्हंजे पहा कवि " बद्ध" झालाआहे पण कविता मुक्त ! असेच असते. कविचे खाजगी आयुष्य व कविता याम्चा सम्बंध असतोच असे नाही ! ( इति पाडगावकर ).
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 11/25/2016 - 02:47 नवीन
दुष्ट दुष्ट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
कंजूस Fri, 11/25/2016 - 10:32 नवीन


Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.

  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 11/26/2016 - 10:51 नवीन
सुरेख आत्मकथन . कुठेतरी या गाण्याच्या अर्थाशी साधर्म्य जाणवले . " रंगुनी रंगात सा-या , रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सा-या , पाय माझा मोकळा "
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/26/2016 - 11:54 नवीन
बरोब्बर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
ज
ज्योति अळवणी Sat, 11/26/2016 - 19:12 नवीन
आवडली कविता. प्रत्येकाचा आपलाच असा अर्थ पडतो आपल्या वाचनात.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 11/27/2016 - 17:41 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/28/2016 - 07:03 नवीन
सर्व वाचक / प्रतिसादकांना मन:पूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Fri, 12/02/2016 - 12:18 नवीन
सुरेख जमलय मुक्तक, आवडलं !
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 12/05/2016 - 12:28 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा