मनाचा एकांत - सरोवरातील नाव
['मनाचा एकांत' ही शृंखला इथे संपत आहे.
सगळ्या कवितांना मनापासून दाद देणाऱ्या,
त्यातल्या काहींचे विडंबन पाडणाऱ्या सर्व रसिकजनांचे दिल से आभार! :)]
पहाडातला जख्ख दद्दू
सरोवरात नाव सोडून
पलीकडे निघून गेला
तेव्हापासून,
नाव हलत नाही, डुलत नाही,
पण जराशीही कुजत नाही!
सरोवरात कुणाला येऊ देत नाही,
सरोवरातून कुणाला जाऊ देत नाही!
सरोवरभर तिचीच प्रतिबिंबे खोलवर....
भरल्या सरोवरातल्या रित्या नावेसाठी,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!
शिवकन्या
Book traversal links for मनाचा एकांत - सरोवरातील नाव
💬 प्रतिसाद
(4)
च
चांदणे संदीप
Sat, 11/26/2016 - 08:33
नवीन
ही कविता आवडली!
Sandy
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Sat, 11/26/2016 - 09:27
नवीन
सुर्रेख! एकदम जमली आहे. :)
चित्र उभे राहिले डोळ्यांसमोर.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Sat, 11/26/2016 - 11:03
नवीन
सुरेख!
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 12/05/2016 - 12:26
नवीन
आवडले, नवीन कवितेच्या प्रतीक्षेत :)
- Log in or register to post comments