माझ्या अतिशय भित्रट आणि अतिहळव्या स्वभावाचे काय करावे???
माझं व्यवहार ज्ञान खूप कमी आहे ,आणि माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला माझा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे माझा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा.
झाडाचं पान अंगावर पडल्यावर ' आभाळ कोसळलं ' म्हणून जंगलभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील ससाही माझ्यापेक्षा धीट असेल इतका मी भित्रट आहे.आधीचाच असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा भित्रट स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील अडचणीत भरच टाकत असतो.या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्कींगमध्ये थोडा मॅटर झाला होता .मी लागलीच माफी मागितली ,पण त्या गुंडाने मला डोक्यात जबर फाईट मारली,काही दिवस मला त्यामुळे जिभ जड झाल्याचा अनुभव आला होता .माझं बोलणं sluggish झालं होतं.
तर असा हा भित्रा स्वभाव आहे,यातही भर म्हणून की काय ,मी अतिशय हळवा देखील आहे.कुणी जरा टोचून बोललं की माझ्या मनाला लागतं,बराच काळ मी त्या विचारात राहतो,रडायलाही येते.टिका सहन होत नाही.
आजुबाजुला काही घडले ,वर्तमानपत्रातल्या खून ,बलात्काराच्या बातम्या वाचल्या,रस्त्यावरच्या बेवारस प्राण्यांचे हाल बघितले की मी फार व्यथीत होतो.
तर माझे काही प्रश्न आहेत.आंतरजालावरच्या धुरीणांनी मार्गदर्शन करावे.
१. अतिशय भित्र्या व भिडस्त स्वभावाचे काय करावे?
२. अतिहळवेपणावर कशी मात करावी?
३. वैयक्तीक ,सामाजिक ,आर्थिक प्रगतीत अडसर ठरणार्या या अतिशय भित्रट आणि हळव्या स्वभावाचा मला कंटाळा आला आहे!
कृपया मार्गदर्शन करावे.
एक काम करा. पुढले सहा महिने सगळया आयडीने मिपावर येणे बंद करा. किमान आम्हाला तरी रोज असले फालतू धागे वाचावे लागणार नाहीत. तुमच्या वाचलेल्या वेळात पदरचे चार पैसे खर्च करून नियमितपणे मानसोपचार तज्ञाकडे जाऊन ऊपचार घ्या. त्याने तुमचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे.== सहमत !