Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भिकारी

श — शार्दुल_हातोळकर, Sat, 12/03/2016 - 07:08
असे एक वेडा तिथे तो भिकारी भुकेच्या आकांती जगाला पुकारी तमा न तयाला उन्हा-पावसाची दिसे भुक डोळी किती त्या दिसाची नसे आप्त कोणी तया पामराला जीवा साथ द्याया कुणी न घराला थकुनी कधीचा फिरे तो अभागी कुठे श्वान वेडे तयापाठी लागी अधु पाय त्याचा अधु लोचनेही नसे त्राण त्याच्या जराजीर्ण देही करुणा जगाची कुठे आज गेली दशा मानवाची खुलेआम झाली दिले हाकलोनी जया अन्न मागी अखेरी उपाशी बसे एक जागी आगीने भुकेच्या जणु अर्धमेला म्हणे तुच देवा पाहा लेकराला किती लोक आले किती लोक गेले तया पाहताही किती थेट गेले कुणी एक आला दिली त्यास नाणी दुवा देई त्याला अधु त्या हातानी असे वंचिताचे कि ते संचिताचे जिणे हे नशीबी जणु शापिताचे दशा त्या जीवाची अशी का हो झाली? कुणी दूर नाती अशी लोटलेली? - शार्दुल हातोळकर

प्रतिक्रिया द्या
6714 वाचन

💬 प्रतिसाद (24)
प
प्रचेतस Sat, 12/03/2016 - 10:21 नवीन
अतिशय लयबद्ध आणि विदारक.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/03/2016 - 10:42 नवीन
बुचकळ्यात टाकणारी रचना पण! कुठे असा भिकारी पाहून हे लिहावसं वाटलं तुम्हांला?? Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
श
शार्दुल_हातोळकर Sat, 12/03/2016 - 14:02 नवीन
शालेय वयात दोन-तीन भिकारी अतिशय दयनिय अवस्थेत नेहमी पाहण्यात यायचे. उनाड पोरे आणि मोकाट कुत्रे त्यांना त्रास द्यायचे. मोठी माणसेही भिकाऱ्यांच्या स्थितीचा विचार न करता त्यांना हाकलुन देण्यातच धन्यता मानायची. ते पाहुन वाटायचे कि यांना कोणी नातेवाईक का नसतील? यांच्या घरच्यांनी यांना का सोडले असेल? ते विदारक चित्र मनात घर करुन राहिले आहे. त्यांचे वर्णन प्रातिनिधिक स्वरुपात इथे कवितेतुन मांडले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/04/2016 - 02:36 नवीन
बरोबर. चित्रदर्शी वर्णन व काव्य .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 12/03/2016 - 10:43 नवीन
चित्रदर्शी कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Sat, 12/03/2016 - 11:25 नवीन
माझा "PF" संपल्यानंतर काय होईल याचा थोडक्यात अंदाज आला.
  • Log in or register to post comments
क
कवि मानव Sat, 12/03/2016 - 12:50 नवीन
एका दुर्दैवी / कटू सत्याचा छान वर्णन आहे... सादी न असरदार कविता !!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 12/03/2016 - 12:53 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sat, 12/03/2016 - 14:06 नवीन
प्रतिसादांबद्दल धन्यवाद मंडळी !!
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ Sat, 12/03/2016 - 14:18 नवीन
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ Sat, 12/03/2016 - 14:19 नवीन
मनाचा ठाव घेतला कवितेने. डोळ्यासमोर भिकारी उभा राहिला !
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 12/03/2016 - 14:24 नवीन
कविता अत्यंत भावस्पर्शी आहे. आजकाल मात्र धंदेवाईक भिकारी पाहून त्यांच्याबद्दल अजिबात आस्था वाटेनाशी झालीये.
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ Sat, 12/03/2016 - 14:28 नवीन
खरं आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ग
गौरी कुलकर्णी २३ Sat, 12/03/2016 - 14:27 नवीन
संवेदनशील मनाचा माणूस अन् बुद्धीधीनिष्ठ असे उपेक्षितांचे, दुर्लक्षितांचे आयुष्य समजून घेऊ शकते.त्यांच्या व्यथा शब्दबद्ध करु शकते !
  • Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३ Sat, 12/03/2016 - 14:30 नवीन
बुद्धीनिष्ठ*
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sat, 12/03/2016 - 19:04 नवीन
मनाला स्पर्शून गेली कविता
  • Log in or register to post comments
र
रातराणी Mon, 12/05/2016 - 12:25 नवीन
चित्रदर्शी कविता.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/06/2016 - 05:49 नवीन
खूप उत्कट, लयबद्ध रचना.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 12/06/2016 - 05:54 नवीन
अतिशय टोचून जाणारी कविता. सुरेख लय असणारी. शेवटची ओळ वाचून का कोण जाणे, संगीत दाते (अरुण दाते यांचा पुत्र) ची काही दिवसांपूर्वी बघितलेली बातमी वाचली. फार वाईट वाटलं होतं, अर्थात पडद्यामागचं आपल्याला कळत नाही, पण पडद्यावरचं चित्र मात्र विषण्ण करून जातं.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 12/06/2016 - 06:00 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 12/06/2016 - 17:18 नवीन
प्रचेतस, संदीपभाऊ, आत्मबंध, पैजारबुवा, बाजीप्रभू, कमा, यशोताई, गौरी, एस, ज्योति अलवनि, रातराणी, पैसा, वेल्लाभट, किसनदा, आपणा सर्वांचे मनापासुन आभार ! __/\__
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Wed, 12/14/2016 - 16:24 नवीन
चांगली लिहिलीय
  • Log in or register to post comments
द
देशप्रेमी Sun, 01/01/2017 - 16:29 नवीन
सुरेख वर्णन. अगदी डोळ्यासमोर भिकारी उभा राहतो.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Tue, 01/03/2017 - 17:03 नवीन
एक एकटा एकटाच आणि देशप्रेमी आपणा दोघांचेही मनापासुन आभार ! _/\_
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा