Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बस झालं की राव आता…

व
वामन देशमुख
गुरुवार, 12/08/2016 - 12:03
🗣 32 प्रतिसाद
नोटा, नोटाबंदी, कॅश, कॅशलेस, मोदी, डिमॉनिटाइझेशन, एटीएम, पेटीएम, १०००, २०००, ५०० १०० चिल्लर, रोख, ठोक, ब्ला, ब्ला, ब्ला… बस झालं की राव आता, किती तो काथ्याकूट, चर्चा, उप-चर्चा, प्रतिसाद, प्रति -प्रतिसाद, धागे-दोरे, चऱ्हाटं, गुंता, गुंतवळ… सर्वांनाच या नोटाबंदीत रस आहे असं नाही; रस नाहीच असंही नाही पण कुठल्याही गोष्टीची एक हद्द असते राव! मागच्या पंधरा दिवसांपासून मिपा उघडलं की सारखे तेच तेच विषय पुढे येताहेत. इतक्या धाग्यांमधून आता सर्वांचं सर्वकाही सांगून झालंय असं वाटत असताना नवीनच एक धागा तोच विषय घेऊन येतो आणि जुन्या धाग्यांबरोबर फेर धरून बोर्डावर नाचत राहतो. पुरे झालं आता हे सगळं! चला, नवीन काही लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया… - एक त्रस्त मिपाकर

प्रतिक्रिया द्या
8002 वाचन

💬 प्रतिसाद (32)
प
पगला गजोधर गुरुवार, 12/08/2016 - 12:12 नवीन
तुम्ही आराम करा बरं :)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/08/2016 - 12:12 नवीन
अहो तिकडे मोदी एवढी क्रांती करतायत आणि तुम्ही खायच्या प्यायच्या गोष्टी करताय !!!
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर गुरुवार, 12/08/2016 - 12:21 नवीन
क्रांती करणारे/ न करणारे खात पित नसतेत काय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/08/2016 - 12:55 नवीन
खातेत, पितेत आनी आरामबी करतेत ! ;) वर, अन्न सोडून इतर कायबी खातेत तेना लै तकलीफ देतेत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
आ
आदूबाळ गुरुवार, 12/08/2016 - 12:13 नवीन
तुम्ही एवढे त्रासलात आणि परवा आशु जोग तक्रार करत होते की या विषयावर मिपावर चर्चा झाली नाही म्हणून...
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर गुरुवार, 12/08/2016 - 12:13 नवीन
लाख वेळा सहमत. घरी दारी, हापिसात, कँटीनमध्ये सगळीकडे तेचं तेचं आणि तेचं. काही हलकंफुलकं वाचू म्हणून मिपा उघडले तर इथे सुद्धा परत तेचं. धागा बदलतो तरी विषय तोचं आणि प्रतिसाद, प्रतिसाद्क सुद्धा तेचं. काही तरी खाण्या गाण्याचं काढा राव काय तर.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 12/08/2016 - 12:33 नवीन
एकदम सहमत परवा जेवताना चर्चा झाली त्या विषयावर प्रस्ताव धागा टाकतो आज संध्याकाळी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ख
खेडूत गुरुवार, 12/08/2016 - 12:19 नवीन
छान लिहीलंय. कवितेसारखंच तर वाटतंय. विशेषतः ''लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…'' नंतर शांताबाय, फिट्ट बसतंय.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 12/08/2016 - 13:53 नवीन
=)) lol
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
च
चांदणे संदीप गुरुवार, 12/08/2016 - 14:17 नवीन
रच्याकने, धागालेखकाच्या भावनांशी सहमत! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
म
मारवा गुरुवार, 12/08/2016 - 14:34 नवीन
विशेषतः ''लिहूया, वाचूया, बघूया, भटकूया, व्यायामूया, शिजवूया, खाऊया, पिऊया…'' नंतर शांताबाय, फिट्ट बसतंय. मी एक ठेका घेऊनही बघितला परफेक्ट जमतयं, फक्त शेवटी शांताबाई ऐवजी मोदीभाई अमितभाई इतकाच बदल करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ब
बाजीप्रभू Fri, 12/09/2016 - 02:06 नवीन
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
इ
इरसाल कार्टं Fri, 12/09/2016 - 07:36 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
स
समाधान राऊत Sun, 12/11/2016 - 06:26 नवीन
ठ्ठो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
य
यशोधरा गुरुवार, 12/08/2016 - 12:20 नवीन
बाडीस हो! अगदीच बाडीस!
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 12/08/2016 - 14:03 नवीन
एक मार्ग आहे नुसते कार्टुन टाका नोटाबंदीचे किमान दोन घटका मनोरंजन तरी होइल. की नाही ? तापच होइल ?
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 12/08/2016 - 14:28 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 12/08/2016 - 14:37 नवीन
त्रासला मग कशाला धागा काढला, PMS साठीच न .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 12/08/2016 - 16:24 नवीन
सैराट चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी आणि नंतर अनेक आठवडे मिपा सैराटमय झाले होते. आता तसंच झालंय. भविष्यातही एखाद्या विषयावरून तसे होईलच.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 12/08/2016 - 19:58 नवीन
ह्या देशद्रोही पोस्टाचा धिक्कार असो. तिकडे सैनिकांनी "आमहाला कंटाळा आला बुवा पाकिस्तान कडे तोंड करून उभे राहण्याचा" असे म्हटले तर चालेल का ? पूजनीय मोदी साहेबानी अन्न पाणी त्याग करून हा महान यद्न्य चालवलाय त्यांत थोडी आहुती टाकायला काय जाते ?
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 12/08/2016 - 20:12 नवीन
खरंच बास झालं! :-|
  • Log in or register to post comments
स
सुज्ञ गुरुवार, 12/08/2016 - 20:20 नवीन
यानिमित्ताने लोक "किमान" अर्थसाक्षर होऊदेत .. लोकांना अर्थसाक्षर दृष्ट्या जग कोठे आहे हे कळूदे . लोक स्वतःहून भ्रष्टाचार करणे ( पैसे देणे घेणे ) थाम्बवूदेत अशी लोकांनाच प्रार्थना करतो . लोक स्वतः प्रामाणिक होवोत .. अर्थात आता झाले हा हंटर आहे इतके जरी झाले की पुढील काम सोपे होईल
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/08/2016 - 22:49 नवीन
हो हो, मलाही कंटाळा आलाय या विषयांचा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 12/09/2016 - 01:41 नवीन
फेसबुकमुळे लोक लेखक झाले। नोटाबंदीमुळे अर्थ शास्त्रज्ञ।।
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Fri, 12/09/2016 - 07:55 नवीन
कंकाका बोले तो तुमने एकैच मारा, लेकिन सोल्लिड्ड मारा बावा ......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रान्जल केलकर Fri, 12/09/2016 - 13:36 नवीन
हमारे मण कि बात बोली आपणे. च्यामारी जो उठतो तो पोष्टी डकवतोय यत्र तत्र सर्वत्र मुदी शेट आणि नोटबंदी. इथे कमी कि काय म्हणून बातम्यांमध्ये पण तेच. चार दिवस झाले बातम्या बघितल्याचं नाहीयेत चॅनेल वर. विरोध असू दे किंवा सहमती पण चावायची काहीतरी लिमिट असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ख
खटपट्या Fri, 12/09/2016 - 01:54 नवीन
धागाकर्त्याशी सहमत. रांगा कमी झाल्यायत. काही ठीकाणी रांगाच नाहीत. आता नोटा सहजासहजी मिळतायत तरीही बोंबाबोंब सुरुच आहे. प्रत्यक्षात जीतके दीवस त्रास होइल असे वाटले होते तेवढे दीवस त्रास झालाच नाही. आता नोटा मिळायला लागल्यावर "काळा पैसा निघाला ला बाहेर?" अशी विचारणा सुरु होइल. काही होवो, नोटा मिळोत न मिळोत, कोणाला त्रास होवो अगर न होवो फक्त "मोदी कसे चुकलेत" हे सीद्ध झालं पाहीजे बास... असो.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 12/09/2016 - 05:38 नवीन
सिरीयसनेस अपार्ट, एक खरोखर घडलेला किस्सा सांगतो. संता आणि कोलकात्याच्या रिक्षावाला हा जोक प्रत्येकाला माहीतच असेल. आम्ही चार मित्र मिळून, पाचव्या एका मित्राच्या लग्नाला जात होतो, चार-पाच तासांच्या त्या प्रवासात एकमेकांची मस्त खेचाखेची सुरु होती. तेंव्हा एकाने संता आणि कोलकात्याच्या रिक्षावाला हा जोक सांगितला. तेंव्हा हा जोक नवीनच होता आणि सर्वजण खूप हसले. त्यावर अजून एक जोक मारावा म्हणून मी गंमतीने म्हणालो, “अरे यार, मला दोन भाऊ आहेत, पण माझ्या बहिणींना मात्र तीन भाऊ आहेत, हे कसं काय?” एक मित्र लगेच म्हणाला, “ये साला वामन कुछ भी बोलता है, उसका कोई कझिन होगा!” हे दिव्य लॉजिक ऐकून सर्वजण हास्यकल्लोळात इतके बुडाले की कार चालवणाऱ्या मित्राचं नियंत्रण क्षणभर सुटलं आणि मग कार थोडावेळ बाजूला थांबवावी लागली! योगायोगाने तो मित्र कोलकात्याचाच आहे!
  • Log in or register to post comments
औ
औरंगजेब Fri, 12/09/2016 - 07:38 नवीन
चला कट्टा करुया ३१ डिसेंबरला
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 12/09/2016 - 12:07 नवीन
मिपावर काश्मीर, सैराट, आस्तिक-नास्तिक या विषयांबरोबरच मोठ्या प्रमाणावर धाग्यांचा पाऊस पडलेला हा एक विषय असेल.आपण सगळेच आंधळे आणि हत्ती या गोष्टीप्रमाणे या निर्णयाचे आपल्याला वाटत आहेत त्या आयामांवर भाष्य करत आहोत असे वाटते.हत्तीचे कान मोठे आहेत हे म्हणणार्‍याला हत्तीला लांब सुळे आहेत याचा पत्ता नव्हता त्याचप्रमाणे या महत्वाच्या निर्णयाशी निगडीत असलेल्या आपल्याला माहित नसलेल्याही अनेक गोष्टी असतीलच. तसेच या निर्णयाच्या सर्व पैलूंचा अभ्यास करून त्यावर सामाजिक/अर्थशास्त्रीय इत्यादी अनेक बाजूंनी भाष्य करण्याइतकी माहिती असली-नसली तरीही आपण आपल्या राजकीय समर्थनाच्या चष्म्यातून (मोदीसमर्थक/विरोधक) या गोष्टीकडे बघत आहोत असे वाटायला लागले आहे. एकूणच ८ नोव्हेंबरपासून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर अनेक ठिकाणी एकाएकी अर्थशास्त्रातील तज्ञांची भर पडली आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 12/11/2016 - 06:04 नवीन
लेखाच्या शेवटी आलेले " खाऊया, पिऊया " हे शब्द खूपच भावले. मग, कधी बोलावता मिपाकट्टा ?
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 12/11/2016 - 10:05 नवीन
भारतातले अर्थशास्त्रीय टॅलेंट बाहेर आलेय. लोक म्हणत होते भारताने फक्त माहीती तंत्रज्ञानातच प्रगती केलीय. गेली कित्येक वर्षे भारतातत्ल्या गलोगल्लीत जे अर्थशास्त्राचे धडे गिरवले जात होते त्याचे फळ या निमित्ताने बाहेर आले. कितीतरी विद्वान तयार झालेत. ट्रंपला म्हणाव बघ आता तुला हवे असेल तर घेउन जा काही. आजवर समाजशास्त्र आणि अध्यात्म याचेच अभ्यासक दिसत होते आता अर्थशास्त्राचे सुद्धा झाले. शेवटी जे होत ते भल्यासाठीच होत.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा