Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सय संद्याकाय

ऊ — ऊध्दव गावंडे, Sun, 12/11/2016 - 06:33
झाली सय संद्याकाय दिवे लाव्याचा वखतं वाट पायता राघुची तोंड चाललं सोकतं डोये फाळूनं फाळूनं काय वाटी नं पायतं धंदा पळला घरात जीव काहाले जायतं? चिळ्या रायल्या भऱ्याच्या झाला किती वारखोळं राघू साठी मैना तूहं कुठी अळलं व घोळं? अशी तिसऱ्या पायरी बस्तं धरूनं ऊंबठा तोही झिंजते घासूनं तूह्या पायाचा आंगठा नंदा ईचारती तव्हा होटं उलतच नाई आता काहाले दाठ्ठ्यातं ऊभी रायतं व बाई?

प्रतिक्रिया द्या
1959 वाचन

💬 प्रतिसाद (11)
ज
जव्हेरगंज Sun, 12/11/2016 - 06:48 नवीन
मस्त आहे कविता. ही भाषा वाचायला खूप गोड वाटते. एखादं ललित लिव्हा की!!
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 12/11/2016 - 07:51 नवीन
फार छान कविता! फार आवडली. काही शब्दांचा अर्थ सांगितल्यास अजून समजायला मदत होईल ही विनंती.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 12/11/2016 - 12:58 नवीन
कोणते समजले नाही ते सांगितलेत तर मदत करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
च
चांदणे संदीप Sun, 12/11/2016 - 11:34 नवीन
हा हा व्वा! मजा आ गया दोस्त!! Sandy
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sun, 12/11/2016 - 13:49 नवीन
सुरेख कविता!!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 12/11/2016 - 14:21 नवीन
सय संद्याकाय = संध्यासमय वखतं = वेळ सोकतं = सुकत, वाळत धंदा पळला घरात = कामे खोळंबून आहेत जीव काहाले जायतं? = जाळतेस. चिळ्या रायल्या भऱ्याच्या = चिळ्या म्हणजे रॉकेल चे दिवे, त्यात रॉकेल भरणे म्हणजे चिळ्या भरणे, अंधार पडायच्या आधीच करावं लागतं वारखोळं = उशीर, वेळ कुठी अळलं व घोळं? = घोडे अडणे दाठ्ठ्यातं = दाराची चौकट, प्रवेशद्वार
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 12/12/2016 - 09:30 नवीन
ओक्के, आत्ता कळली.धन्यवाद! मला वाटलं, चीरा भरणे. त्यानं अर्थ बदलून जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 12/11/2016 - 14:23 नवीन
आमच्या कडे चिमणी ला चिळी (चिडीया चा अपभ्रंश)म्हणतात रॉकेलचा छोटा वातीवाला दिवा म्हणजे रॉकेलची चिमणी
  • Log in or register to post comments
ऊ
ऊध्दव गावंडे Sun, 12/11/2016 - 15:56 नवीन
धन्यवाद! धन्यवाद मित्रांनो,धन्यवाद ! संदीपजी आपले विशेष आभार ...
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 12/13/2016 - 14:56 नवीन
कविता आणि भाषा दोन्ही आवडल्या.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 12/14/2016 - 05:49 नवीन
माझी प्यारी वऱ्हाडी :'( उद्भवभौ लै लै आभार देतो राजेहो तुम्हाले :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा