रोकडरहित व्यवहारांसाठी यूपिआय अॅप कसे वापरावे याची मराठीत माहिती.
कॅशलेस इंडिया - रोकडविरहित व्यवहारांची सध्या खूप चर्चा चालू आहे. वेगवेगळी मोबईल वॉलेट्स प्रचलित होत आहेत. त्यापैकी थेट बॅंकांशी जोडलेला, शासकीय मान्यता असलेला पर्याय म्हणजे यूपिआय (UPI).
यूपिआय अॅप हे वापरायला अतिशय सोपं आहे. जेव्हा याची सुलभता लक्षात येईल तेव्हा याचा वापर खूप वाढेल. पण यूपिआय कसं वापरायचं या बद्दल कमी माहिती आहे; विशेषतः मराठीत.
म्हणून मी माझ्या ब्लॉगवर यूपिआय अॅप कसे वापरावे याबाबत सोप्या शब्दात सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपणही ही सोपी कृती वापरून हे अॅप वापरायला सुरुवात करू शकाल. तरी ब्लॉगला नक्की भेट द्या. तुम्हाला ही ब्लॉगपोस्ट कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तुमचा अनुभव कसा आहे तेही जरूर सांगा.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/p/marathi-instructions-to-to-use-upi-app.html
प्रत्येक पासवर्डची वैधता वेगवेगळ्या कालावधीची आहे. यामुळे ते बदलल्यावर लक्षात कसे ठेवावे हे समजत नाही. याला कोणी उत्तर देऊ शकेल काय?सर्वात कमी मुदतीचा पासवर्ड बदलताना, त्याचवेळी सगळेच पासवर्ड बदला.