Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुघल्स

अ
अत्रन्गि पाउस
Sun, 12/11/2016 - 19:21
🗣 12 प्रतिसाद
नौपाडा पोलीस स्टेशन कडून हरिनिवास सर्कल कडे येतांना डावीकडे मुघल्स म्हणून नवीन रेस्त्र्रोन निघालाय ...मागच्या भोजनालयाचा अनुभव बर्यापैकी ताजा असतांना नवीन काही ट्राय करण्याचा उत्साह उणावलेला ...पण तरीहि गेलो ... अजून सगळे नीट स्थिर स्थावर होतंय तिथे ...नवीन संसार मांडलेला कळतोय आणि बऱ्याच बाबी खटकायला सुरुवात होते न होते तोच मेनू कार्ड समोर आले ... एरवी पेक्षा किंचित महाग डिशेश वाटल्या पण भुके पोटी इतरत्र जायचे त्राण नव्हते तेव्हा .. १ चिकन राजस्थानी, एक पनीर अद्र्की धनिया, रोटी, जीरा रैस आणि दही इतके मागवले (तिघांसाठी) आणि वाहवा .... पुलंनी म्हटल्या प्रमाणे मुर्गी घासाघासाला दाद घेत गेली ...पनीर अप्रतिम ...आणि जीरा राईस सारखा यक्ष्ट्रा पण भाव खाऊन गेला ... बिल ९७० अंमळ जास्त वाटले पण तरीही बऱ्याच दिवसांनी काहीतरी नवीन चाखले आणि ते इतके उत्तम निघाले ....त्यांची पुण्यात शाखा आहे म्हणे क्याम्पात ...कोणतेही पंजाबी चवीचे पदार्थ इथे दिले जाणार नाहीत असे चालक ठासून सांगत होते ... आहे तसे नीट राखले आणि शोर्ट कट्स मारले नाहीत तर भविष्यात खवैय्याना एक उत्तम पर्याय मिळेल ... तस्मात पुढील कट्टा तिथे व्हावयास हरकत नाही ....
वर्गीकरण
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
3227 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ल
लालगरूड Sun, 12/11/2016 - 19:52 नवीन
पत्ता द्या
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 12/12/2016 - 03:18 नवीन
हॉटेल मुघल्स एम जी रोड नौपाडा पोलीस स्टेशन च्या बाजूला ठाणे ४००६०२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
ट
टवाळ कार्टा Sun, 12/11/2016 - 20:37 नवीन
आमेन
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 12/12/2016 - 00:49 नवीन
काही फोटो टाकले असते तरी चालले असते...
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 12/12/2016 - 03:20 नवीन
अवस्थेत सुचले नाही... पण कट्टा करू तेव्हा हि कसर भरून काढू ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कंजूस Mon, 12/12/2016 - 01:22 नवीन
//...कोणतेही पंजाबी चवीचे पदार्थ इथे दिले जाणार नाहीत असे चालक ठासून सांगत होते ...// - अस्से आग्रही हवेत खानावळ मालक.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 12/12/2016 - 06:32 नवीन
चांगलं आहे! असंच होत राहिलं तर २१ व्या शतकाच्या शेवटी ठाणे शहर बनेल नक्कीच!;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 12/12/2016 - 07:33 नवीन
मामलेदार ची एक शाखा (काही महिन्यांपासून नवीन उघडलेली ) ह्या मुघल पासून हाकेच्या अंतरावर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
औ
औरंगजेब Mon, 01/09/2017 - 04:53 नवीन
ती मामलेदारची शाखा नाही. दुसरच कोणीतरी मामलेदार नावाने उघडल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
व
वरुण मोहिते Mon, 12/12/2016 - 10:35 नवीन
टेस्ट चांगली आहे.. बाजूची माम्लेदारची शाखा इतकी काही खास नाही अवांतर - मुलुंडला पण एक हॉटेल झालंय ग्रास अँड गॉसिप नावाचं . मामलेदार मिसळ , खोपोली वडापाव , गुरुकृपा सामोसा , आणि चौपाटी कुल्फी हि त्यांची स्पेशालिटी आहे . बाकी सॅन्डविच पिझ्झा मिल्कशेक पासून सगळंच मिळत . चांगला आहे ठिकाण .
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 12/12/2016 - 10:52 नवीन
मुलुंडला कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
न
नमकिन Sun, 01/08/2017 - 06:22 नवीन
मुघलांचा पाहुणचार तलवारीनेच! शिवशाहीत! एक मराठा, लाख मराठा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा