ट्रंपानॉमीक्स चे अमेरीकन आर्थीक हितरक्षणास्त्र
आमेरीकेचे नुतन अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप होणार हे निश्चित झाले. रिपब्लीकन पक्षाचे नॉमीनेशन असले आणि संसदीय व्यवहारावर रिपब्लीकनांचे नियंत्रण रहाणार असले तरी मुक्त अर्थ व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय सामरीक समतोलातील अमेरीकन भूमीका या बद्दलच्या आता पर्यंतच्या रिपब्लीकन भूमिकांपासून ट्रंप वेगळे असतील असा अंदाज येतो आहे, ट्रंपसाठी ते म्हणतात तसे पहिली आणि शेवटची बाब केवळ अमेरीका आणि अमेरीकनांचे आर्थीक हितरक्षण हा टॉप मोस्ट अजेंडा ठेवला आहे त्या साठी सर्व आंतरराष्ट्रीय सामरीक आणि व्यापारी आतापर्यंतच्या समतोलाची पुर्नआखणी व्हावी असे त्यांना वाटत असावे. त्यासाठी आमेरीकेच्या आतापर्यंतच्या आतरराष्ट्रीय संबंधांना धक्के देण्याची तयारी असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून जाणवते आहे; पण नेमके कोणते आणि किती धक्के बसतील ते येणारा काळ सांगेल.
भारतासाठी आयटी आणि पेंटंट वाद पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतात, ट्रंपरावांशी वाद घातला तर काश्मिरच्या बाबतीत नवाज शरीफच्या मांडीला मांडी लावतो अशी ब्लॅकमेलींग ते करु इच्छित असावेत असे वाटते. मोदी सरकारने येऊ घातलेल्या ट्रंप अॅडमिनेस्ट्रेशन सोबत कसे सामोरे जावे असे तुम्हाला वाटते ?
भारतासाठी आयटी आणि पेंटंट वाद पुन्हा एकदा उफाळून येऊ शकतात, ट्रंपरावांशी वाद घातला तर काश्मिरच्या बाबतीत नवाज शरीफच्या मांडीला मांडी लावतो अशी ब्लॅकमेलींग ते करु इच्छित असावेत असे वाटते.हे कोणत्या पुराव्यावर लिहिले आहे ?