रस - रस - रसायन
रस - रस - रसायन
[रसायनंसर्वत्रचआहेतअनादिकालापासूनमगमनुष्यआलामनुष्याचीप्रगतीझालीरसायनशास्त्राची देखीलपाळण्यापासूनसरणापर्यंतरसायनंमाणसाचीसोबतीझालीसुंदरकुरूपतरुणवयस्ककुठल्याही प्रकारच्यामाणसालाभूकलागतेतेव्हा जठरातकाहीरसायनंस्त्रवतअसतात ]
सकाळ पासून खोलीत कसलासा वास येतो
अर्धवट झोपेतच हा वास नाकात घुसतो आणि
ढिले पडलेले न्यूरॉन एकदम धावपळ करू लागतात
कसला हा उग्र वास , याचा शोध घेऊ लागतात
झोप चाळवते , स्वप्नं तुटतात
जिना धुताना कोणाकडून तरी
रसायनाची बाटली फुटते
बिल्डिंग भर त्याचा गन्ध भरून राहतो
फिकट हिरव्या रंगाच्या या बाटलीवर
मोगऱ्याची फुलं आहेत
पण भस्सकन रसायन सांडल्यावर
मोगऱ्याच्या फुलांचा मंद दरवळ वगैरे
एक्सपोनेन्शियली तीव्र होतो
न्यूरॉन मध्ये खळबळ माजवतो
ऑफिसातल्या चकचकीत वॉश रूम मध्ये
लखलखत्या बेसिनांवर
साबणांच्या बाटल्या आहेत
हात धुतल्यावर हातांना वास राहतो
सुगंधी रसायनांचा
दिवसभराच्या धावपळीत
मागे संथ साथ करीत राहतात रसायनं
तानपुऱ्यासारखी
बसमध्ये समोरच बसलेली स्त्री
लिपस्टिक लावते आहे मनोभावे
तिच्या मूळच्याच रसरशीत ओठांवर
रसायनाचा थर जाडसर होतो
छान चमकू लागतो
छोट्याश्या , गोलसर आरशात ते पाहिल्यावर
तिचे डोळे खुशीने चमकू लागतात.
डिओडरंट च्या स्प्रे मधली रसायनं
ऑफिसात कोणावर काय असर करतात
पक्कं माहिताय मला
डिओडरंट , अत्तरं वगैरे ची
अपडेटेड माहिती
घेतच असतो मी
पुरुषांच्या घामातून रसायनं स्रवतात
माद्यांना आकर्षित करू लागतात
एकमेकांना खाजगीत फारसं न ओळखणाऱ्या
नट नट्यांची पडद्यावरची केमिस्ट्री जुळली
की तिकीट बारी वर हाऊस-फुल्ल चे बोर्ड लागू लागतात
अवाढव्य मॉल मधून फिरताना
माझी नजर जाते
हिरव्या, निळ्या, लाल, तपकिरी
मेणबत्त्यांवर
त्यात फ्लेवर टाकलेत रसायनांचे
ज्योतीचा रंग बदलत नाही त्यानं
गंध मात्र बदलतो
खोलीत येऊन एक रंगीत मेणबत्ती लावतो मी
ज्योत तेवते
रंगीत रसायनं तत्परतेनं गंध सोडू लागतात
थकून भागून पलंगावर फेकून देतो शरीर
नीट पहा लक्ष देऊन
थकलेलं , घामेजलेलं हे शरीर एखाद्या
थिजलेल्या मेणाच्या थेंबासारखं दिसतंय
💬 प्रतिसाद
(2)
च
चांदणे संदीप
Mon, 12/12/2016 - 11:47
नवीन
शेवट हाही रसायनावरच आणून सोडला असता तर उत्तम झाली असती!
पुलेशु!
Sandy
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 12/12/2016 - 11:59
नवीन
असं झालं तर ते सगळं!
- Log in or register to post comments