बाकड्यावर येतांना
बऱ्याच उलथा पालथी नंतर कित्येक वर्षांनी (गेल्या २० २२ वर्षात बहुतेक पहिल्यांदाच) बाकड्यावर बसायची वेळ येतेय...पुढचे प्रोजेक्ट येऊ का नको येऊ का नको असं लाजतंय वाट्याला येतांना ...
अनेक सल्ले ऐकून / विचार करून डोक्याची मंडई किंवा डोक्याला कल्हई चाललीये ....सल्ला /विचार आणि प्रतिक्रिया ह्यांचे एक प्रातिनिधिक द्वंद्व म्हणा किंवा आत्मसंवाद
१. बाप रे बेंच वर ??? काळजी घे नवीन प्रोजेक्ट्स फारसे नाहीच येत आहेत त्यामुळे जे मिळतंय ते घे आणि गप पडून राहा ...
अरे हो रे बाबा मला कळतंय हे...
२. चाय्यला मस्त आराम कर रे १-२ महिने, पुष्कळ घासली आहे आत्ता पर्यंत काय फरक पडत नाही ...
आं आणि नंतर ?....पण हे खरे आहे ...कुठेतरी मस्त ट्रीप मारून यावी का पट्कन ??
३. अरे थोडे सर्टीफिकेशन वगैरे करून घे उपयोगी पडेल
कसली/ किती ? च्यायला एकेक सर्टिफाईड नग बघितल्यावर ह्याचा नक्की उपयोग कुणाला हा प्रश्नच आहे ...पण ठीक आहे बघू
४. नवीन जॉब बघ, इथून लवकर रिलीज मिळेल आणि थोडं चेंज
च्यामारी पुढचे वाक्य "पण मार्केट टाइट आहे" हे जरा नंतर टाकले असते तर नसते का चालले ???
५. आपल्या हातात काही असत का ...ठेविले अनंते तैसेची राहावे ...
नो कॉमेंट्स
६. जरा आत्मचिंतन कर (प्राण्या राम कथारस पी च्या चालीवर) आणि आपल्यात काय सुधारणा करायला हवी ते बघ
कसले डोंबलाचे आत्मचिंतन, इथे २ तास जीवाला स्वस्थता नाही ...आत्मचिंतन म्हणे ....
.....................अजून काही सुचतंय कुणाला ??
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coldplay - Hymn For The Weekend (Official video)मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Coldplay - Hymn For The Weekend (Official video)