Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटबंदी - कायमची बंदी

ध
धर्मराजमुटके
Wed, 12/14/2016 - 17:03
🗣 13 प्रतिसाद
नोटबंदी चे काय होणार , त्याचे परिणाम वगैरे सर्व चर्चांचा आता अतिरेक होऊ लागला आहे. मुळात काळा पैसा फारसा रोख स्वरुपात नाहीच. तो अगोदरच सोन्यात, जमिनित कन्व्हर्ट झालाय असेही बर्‍याच लोकांचं म्हणणे आहे. मात्र जादुगार आपल्या पोतडीतून वेगवेगळ्या वस्तू काढून समोरच्याला आश्चर्यचकित करतो तसे आपण देखील रोज कुठुन कुठुन आज अमुक करोड पकडले तर काल तमुक लाख पकडले अशा रोज बातम्या ऐकून आश्चर्यचकित होत आहोत. सरकार जेव्हा काळ्या पैशाचा हिशोब देईल तेव्हा देईल मात्र रोज बातम्यांमधून मिळणार्‍या माहितीवरुन साधारण आज किती बेहिशोबी पैसा जमा झाला याचा अंदाज बांधायला काय हरकत आहे ? कालपर्यंत ठाण्यात एक कोटी पकडले म्हणून माझी छाती ५६" ची झाली मात्र आज पुण्यात बँक लॉकरमधून १० करोडची बेहिशोबी रक्कम मिळताच माझा छातीचा फुगा फुटला. खरेच पुण्याचा नाद नाय करायचा बॉ ! अर्थात नोटबंदीच्या विषयावर वाचून आणि लिहून तुमचा दम आतापर्यंत नाकात आलाच असेल म्हणा ! फिर भी बचेंगे तो और भी बचेंगे ! तर चला बरं रोकडजप्तीच्या तुम्हाला माहित असलेल्या बातम्या इथे चिकटवा चटाचटा. :) :)
वर्गीकरण
अार्थिक - राजकीय - सामाजिक

प्रतिक्रिया द्या
2303 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ख
खटपट्या Wed, 12/14/2016 - 17:32 नवीन
सद्या मोठ्या प्रमाणात पकड्ल्या जाणार्‍या रकमा आश्चर्यचकीत करतायत खर्‍या. पुर्वी एवढ्या धाडी पडत नव्हत्या. आत्ताच कसे एवढे पैसे कसे पकडले जात आहेत? काहीतरी शक्कल लढवलीय सरकार ने...
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Wed, 12/14/2016 - 18:01 नवीन
नोटाबंदीचं यश प्रेझेंट करायला हवं ना !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अर्धवटराव Wed, 12/14/2016 - 18:06 नवीन
तसंही हे सरकार प्रेझेण्ट करण्याच्या बाबतीत जरा जास्तच सजग असतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
रामपुरी Wed, 12/14/2016 - 20:35 नवीन
काहितरी बरे करतात म्हणून प्रेझेंट तरी करू शकतात. नाहीतर पूर्वीच्या सरकारांचे कर्तॄत्वच असे काही असायचे की प्रेझेंट करण्यापेक्षा लपविण्याकडे कल अधिक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
संदीप डांगे Wed, 12/14/2016 - 20:58 नवीन
धागा काढा राव याच्यावर, तो श्रीगुरुजींचा एक वर्षानंतर वाला धागा काढला. नंतर कायच नाय... दोन वर्षानंतर, अडिच वर्षानंतर असा काही धागा आला पाहिजे. अभ्यासू व्यक्तिंनी घ्यावं मनावर जरा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामपुरी
स
सुखीमाणूस गुरुवार, 12/15/2016 - 02:24 नवीन
आधीच्या सरकार कडे टिमकी वाजवायला गान्धी बाबा आहेत आताचे सरकार त्यान्चे फोटो असलेल्या नोटा वापरतय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
ए
एस Wed, 12/14/2016 - 18:37 नवीन
सामान्य लोकांना २००० ची नोट मिळायला मारामार आणि या धेंडांना कोट्यावधी रुपये नव्या नोटांमध्ये कसे मिळतात साले! .....
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 12/14/2016 - 18:41 नवीन
बँक कर्मचार्‍यांबरोबर साटंलोटं असणार...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
संदीप डांगे Wed, 12/14/2016 - 18:51 नवीन
असं होत आहे हे मी सुरुवातीलाच बोललो होतो, पण इथले काही सदस्य असे होणे शक्यच नाही असे छातीठोक म्हणत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Wed, 12/14/2016 - 21:45 नवीन
कीतीही नियम केले तरी त्यातून आपले उखळ पांढरे करुन घ्यायचे ही भ्रष्टाचार्‍यांची सवय आहे. त्याला आता मोदी आणि सरकार काय करणार? नोटबंदीचा निर्णय तर चांगलाच आहे. कसे का होइना, नोटा मोठ्या प्रमाणात पकडल्या जात आहेत हे काही कमी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ए
एस Wed, 12/14/2016 - 19:33 नवीन
अवांतर - कॅशलेस हे एक दुष्टचक्र झाले आहे. मला केलेल्या कामाचे रोख पैसे कोणी देत नाहीत कारण त्यांच्याकडे कॅश नाहीये. माझी कॅशलेस व्यवहाराला मना नाही, पण माझ्याकडे कॅश नाही म्हणून मी इतरांना कॅश देऊ शकत नाही. सध्या सगळाच कारभार उधारीवर सुरू आहे. पण तातडीच्या आणि फक्त कॅशच मागितली जाते अशा खर्चासाठी पैसे जवळ नाहीत. कसा मार्ग काढायचा? हे एकट्यादुकट्याचे काम नाही. संपूर्ण समाज जर कॅशलेसच्या मार्गावर वाटचाल करू लागला तर ते शक्य आहे. पण मधलेअधले कोणी कॅशवर हटून बसले तर संपूर्ण साखळीला वा चक्राला ब्रेक बसतो.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 12/14/2016 - 20:28 नवीन
सहमत आहे. आज एका बॅन्केत गेलो होतो, एका मुलाला चौदा हजार कॅश काढायची होती. कॅशीयर कॅश नाही, फक्त चार हजार देऊ शकणार असे सांगत होता. तो मुलगा खूप टेन्शनमधे दिसत होता. बराच वेळ त्याची मिनतवारी चालू होती कॅशियरसोबत. शेवटी चार हजार तर चार हजार म्हणून तो सेल्फचा चेक लिहायला लागला. मी त्याला म्हटलं अरे हा चेक तू थेट त्या व्यक्तिलाच दे ना, ज्याला चौदा हजार द्यायचे आहेत. तो म्हणाला, ते चेकने नाही घेणार पैसे, कॅशच लागतील. तेव्हा मलाही हाच प्रश्न पडला की एखाद्याकडून मला काही घ्यायचे आहे आणि तो रोखशिवाय देत नाही, दुसरीकडे मला ते मिळत नाही तर नक्की काय करणार? ही वस्तू वा सेवा तातडीच्या गरजेचीही असू शकते. बर्‍याच भानगडी, बरेच पैलू आहेत. पण काय करणार, काही लोकांना पटतच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
आ
आजानुकर्ण गुरुवार, 12/15/2016 - 00:28 नवीन
आवो तिकडे दुनिया चंद्रावर गेली आणि तुम्ही थुक्की लावून नोटा मोजणाऱ्यांची कसली काळजी करता? पाणी नसलं की दगड मागणार तुम्ही. आम्ही बघा पाणी नसलं की पुसतच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा