Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?

M
mayu4u
Sat, 12/24/2016 - 18:15
🗣 147 प्रतिसाद
शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? मिपाकरांचे मत काय?

प्रतिक्रिया द्या
26916 वाचन

💬 प्रतिसाद (147)
ज
जयंत कुलकर्णी Mon, 12/26/2016 - 12:51 नवीन
डांगे, जर उद्या कम्युनिस्टांचे राज्य आले आणि त्यात त्यांनी खालच्या मजल्यावर कॅसिनो चालू केला तर मात्र खर्च वसूल होईल १० वर्षात.. काय राव... आयफेल टॉवरही विकायला काढला होता की... पर्यटक पैसे देत नाहीत म्हणून.... ही असली कामे विवेकानंद स्मारकासारखी लोकवर्गणीतूनच करावी या मताचा मी आहे... आता कम्युनिस्टांचे राज्य का हे मी सांगायला नको... :-) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/28/2016 - 20:04 नवीन
क्रमांक एकचे पर्यटनस्थळ असलेल्या ताजमहालला भेट देणार्‍यांची संख्या चाळीस लाख आहे वर्षाला.
ओके. काही अंदाज पंचे कॅल्क्युलेशन्स : लेट्स अ‍ॅझुम की सेम ४,०००,००० लोकांनी स्मारकाला भेट दिली त्यातील ३,०००,००० लोक भारतीय आणि १,०००,००० फॉरेनर भारतीयांना फी १०० रु अन फॉरेनर ना ५०० रुपये फक्त पर्यटकांकडुन टोटल कलेक्शन ८,०००,००० प्रति वर्ष टोटल खर्च ३६,०००,०००,००० भागिले ८,०००,००० = ४५ वर्ष ! म्हणजे फक्त पर्यटकांवर अवलंबुन राहिले तरी फक्त ४५ वर्षत सर्वच्या सर्व खर्च वसुल होईल ! पण तिथे शॉपिंग मॉल्स उघडतील बोटींच्या फेरी सुरु होतील त्या सर्वांच्या टेंडर मधुन येणारे उत्पन्न पकडले तर खचितच ह्याही पेक्षा किति तरी कमी काळात खर्च वसुल होईल ह्यात शंका नाही ! अवांतर : वरील सर्व अंदाज आहे , तुम्हाला पटत नसतील तर तुम्ही तुमची अ‍ॅझम्शन्स आणि तुमचे अंदाज द्यावेत अशी विनंती आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद गोडबोले Wed, 12/28/2016 - 20:05 नवीन
शुन्याचा काही तरी घोळ झाला :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
पद्मावति Sun, 12/25/2016 - 11:38 नवीन
अनुक्रमे १ मे १९६० आणि १५ आॅगस्ट १९४७ पासून प्रश्न आहेत. शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पैसे खर्च करण्यात काहीही वावगं नाही. हे स्मारक उभारलं नाही तर हे सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटणार असं थोडंच आहे? उलट अनेक लोकांना काम मिळेल. पर्यटनाला चालना मिळेल, मुंबईत अजून एक प्रेक्षणीय स्थळ निर्माण होईल.
+१ दुसरी गोष्ट म्हणजे शिवस्मारक आणि किल्ले संवर्धन या दोन इशूजची सरमिसळ होतेय असे मला वाटतं. धिस ऑर दॅट चा प्रश्नच नको पडायला. दोन्हीही गोष्टी व्हायला हव्यात.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Sun, 12/25/2016 - 11:53 नवीन
अरेरे. असो. टूडे मेणबत्ती कॅन्डल्सची लै मागणी हाय, तवा बॅक टू मेणबत्ती सेलिंग.
  • Log in or register to post comments
ण
णरुअ Sun, 12/25/2016 - 18:16 नवीन
पैसे वाया गेली नाही लोकांना तेवढा रोजगार मिळलंय
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 04:42 नवीन
संसदेचं अधिवेशन वाया गेल्यामुळे किती पैसे वाया गेले ते सोयीस्कररीत्या विसरतात आणि शिवाजीमहाराजांच्या स्मारकाचा खर्च काढतात तेव्हा मजा वाटते.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Mon, 12/26/2016 - 05:31 नवीन
साला, आय होप टुमच्या ह्या कळवळ्या मंदी, भाजप न वेस्ट केलेला पार्लमेंट टाईम सुद्धा इन्कल्युड असल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 05:44 नवीन
पण तुम्ही भाजपचा वेगळा उल्लेख करुन आपला bias दाखवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Mon, 12/26/2016 - 06:04 नवीन
णुसठा उल्लेख केल्याने बायस डिस्टो? गॉड ब्लेस यू माय सन. णुसठा उल्लेख केल्याबरोबर जर ठुमी बायस शोधत असाल तर इन अ वे, ठुमी भाजपला खिती sacrosanct आय मीन परमफवितर करून ठेवलंय हा विचार करा सन. णुसठे नाव घेटले तर बायस, हाऊ ज्युवेनाईल , असो. भाजप ने 'आधी' वेळ घालवला ह्याचा अर्थ काँग्रेस 'आत्ता' तीच चूकी करत हाय, असाही काढता आला असता हो, but then it would had left no scope to brand anyone as a biased one, about whom u don't know a dime, and satisfy a personal perversion of being a fence sitter.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 06:51 नवीन
मी असं म्हटलं होतं -
संसदेचं अधिवेशन वाया गेल्यामुळे किती पैसे वाया गेले ते सोयीस्कररीत्या विसरतात आणि शिवाजीमहाराजांच्या स्मारकाचा खर्च काढतात तेव्हा मजा वाटते.
यात कुठल्या पक्षाचा उल्लेख आहे? भाजपने वाया घालवलेला वेळ पण त्यात धरलाय का असं तुम्हीच विचारलंत पहिल्यांदा. त्यावरून तुमचा बायस दिसतोच. असो. तुमचा हा आयडी काही फार दिवस राहणार नाहीये. त्यामुळे वाद घालत नाही. आहात तितके दिवस enjoy करा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Mon, 12/26/2016 - 07:15 नवीन
ओके, पॉईंट नोटेड, बाय ड वे, हु गेव यु डी पावर टू दिसाईड अ फेट ऑफ एनी आयडी?, मला काय माहिती नाय हु आर यु मिस्टेकिंग मी फॉर, बट आय एडव्हाईस यु अदरवैज, इफ यु आर नॉट एन अपॉइंटेड लॉ इन्फोर्समेंट केरटेकर ऑफ द वेबसाईट बाय द ओनर. स्टॉप गेटिंग पर्सनल ऑन पेटी इश्यूज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 07:25 नवीन
मला जर तेवढी पाॅवर असती तर तुम्ही राहिला असतात का हा प्रश्न स्वतःला विचारा. Demonetization सारखं Defeatherweightization झालं असतं केव्हाच. बाकी तुम्ही कोण आहात ते ओळखायला फार काही करावं लागत नाही. बाकी तुमचा threshold of tolerance एवढा कमी आहे हे ऐकून बरं वाटलं. माणसाने असंच लिमिटमध्ये राहावं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
व
वरुण मोहिते Mon, 12/26/2016 - 06:04 नवीन
किंबहुना बऱ्याच वर्षांपासून मुंबईला आंतरराष्ट्रीय स्मारक किंवा काही गोष्टींची गरज होती. विदेशातून आलेली लोक दरवेळी रायगडावर नाही जाऊ शकत,इतिहास कळण्यासाठी हे महत्वाचंआहे त्यामुळे त्या खर्चाची तुलना अस्थानी आहे . आता वेळेत काम होणं गरजेचं आहे आश्वासन काँग्रेस ने हि दिला होतं आता भाजप पण देत आहे काम झालं ३-४ वर्षात तर ओक्के . असो अजून टेंडर पण नाही निघाले आहेत कामाचे. अवांतर _ मुंबई मध्ये कॅसिनो सेंटर असावेत गेट वे ऑफ इंडिया ला जिथे फक्त परदेशी लोकांना प्रवेश असेल जेणेकरून परकीय चलन अजून वाढवता येईल असा प्रस्तावही शरद पवारांनी मांडलेला . त्यावेळी तो काही कारणास्तव रद्द झाला. आता परत त्यासाठी पण निर्णय घेणार आहेत .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/26/2016 - 06:26 नवीन
यानिमित्त मी न्यू यॉर्क शहरातील स्वातंत्रदेवीच्या पुतळ्यासंदर्भात लिहिलेली काही माहीती आठवली. त्यातली इथे चपखलपणे लागू होणारी वाक्ये सहजसंदर्भासाठी ठळक केली आहेत... निओक्लासिकल शैलीतला हा जगप्रसिद्ध पुतळा ४६ मीटर उंचीचा आहे. जमिनीपासून (चौथर्‍यासकट) मशालीच्या टोकापर्यंत त्याची उंची ९३ मीटर आहे. या २४०,१०० किलो वजनाच्या या पुतळ्याच्या चपलांचा नंबर अमेरिकन परिमाणाप्रमाणे ८७९ आहे !

या लिबर्टास नावाच्या रोमन देवतेच्या पुतळ्याच्या उंचावलेल्या एका हातात मशाल व दुसर्‍या हातात ४ जुलै १७७६ ही अमेरिकन स्वातंत्र्यदिनाची तारीख कोरलेली पाटी (tabula ansata) आहे. हा पुतळा फ्रेंच जनतेकडून अमेरिकेला मिळालेली भेट आहे. तो ४ जुलै १८८४ ला पॅरिसमध्ये अमेरिकेला अर्पण केला गेला. मात्र त्याचा अमेरिकेतला पायथा बांधून पुरा झालेला नसल्याने तो जानेवारी १८८५ पर्यंत फ्रान्समध्येच होता. इतका मोठा पुतळा सलग वाहून नेणे शक्य नसल्याने वाहतुकीच्या सोयीसाठी त्याचे अनेक भाग केले गेले व ते २१४ खोक्यांत भरून बोटीने अमेरिकेला पाठविण्याची तयारी केली गेली. पैश्यांच्या समस्येमुळे वाहतूकीचे काम रखडलेल. तो खर्च फ्रेंच सरकारने उचलला आणि १८८५ च्या जूनमध्ये पुतळ्याचे सर्व भाग अमेरिकेत पोचले.

इकडे अमेरिकेत चालू असलेल्या आर्थिक मंदीमुळे, फ्रान्सवरून येणार्‍या या भेटीसाठी लागणारा पायथा बनविण्यासाठी अमेरिकने पैसे खर्च करण्याला लोकांचा विरोध झाला. पैसे उभे करण्यासाठी केलेल्या अनेक कार्यक्रमांनंतरही पुतळ्याचे काम करणार्‍या समितीच्या बँकेच्या खात्यात १८८२ साली केवळ $३००० होते. त्यात भर म्हणून, पायथ्यासाठी लागणारे $१० लाख देण्याला सरकारने नकार दिला ! त्यानंतर, १८८४ साली या कामासाठी $५०,००० देण्याच्या मसुद्याला न्यू यॉर्कच्या मेयरने व्हेटो वापरून विरोध केला. ही अवस्था पाहून केवळ न्यू यॉर्क शहरच नव्हे तर बोस्टन, फिलाडेल्फिया व इतर शहरांतील अनेक नागरिक संघटनांनी पुढे येऊन हा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. शेवटी त्यांच्या मदतीने २८ ऑक्टोबर १८८६ या दिवशी पूर्व न्यू यॉर्क गव्हर्नर व त्या काळचे अमेरिकन राष्ट्रपती ग्रोव्हर क्लिव्हलँड यांच्या हस्ते पुतळा अमेरिकन जनतेला अर्पण करून भेटीला खुला केला गेला.

तेव्हापासून हा पुतळा बोटीने एलिस बेटावर पोचणार्‍या स्थलांतरितांचे १९५४ पर्यंत स्वागत करत उभा राहिला. त्यानंतर, विमानवाहतूक सुरू झाल्याने स्थलांतरीत बोटीने येणे बंद झाले. त्यामुळे, ते पूर्वीचे महत्व आता इतिहासजमा झाले असले तरी जगप्रसिद्ध पर्यटक आकर्षणांच्या यादीतले या पुतळ्याचे स्थान आजही अबाधित आहे.

एकंदरीत, आपण समजत असतो की, हा पुतळा फ्रेंच आणि अमेरिकन सरकारांचा प्रेमाचा संयुक्त प्रयत्न असेल. पण, फ्रेंच सरकारने केलेला वाहतूक खर्च सोडला तर इतर बाबतीत, विशेषतः अमेरिकेत, या प्रकल्पाला विरोधच झाला होता ! तेव्हा खरी वस्तुस्थिती अशी आहे की हा प्रकल्प मुख्यतः फ्रेंच व अमेरिकन जनतेच्या खाजगी प्रयत्नातून आणि सरकारी विरोधाला न जुमानता, झालेला आहे !
"बर्‍याचदा, वस्तूस्थिती काल्पनिक लेखनापेक्षा जास्त विचित्र असते" असे म्हणतात ते काही उगाच नाही ! :)
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Mon, 12/26/2016 - 06:34 नवीन
सर, टुमची मेंबरशिप पेड हाय काय? ?? जेन्युइनली इचारथोय, बिकॉज, आय थिंक मी फ्री मेम्बर हाय हेन्स मला माझे पोस्ट संपादित करायचा ऑप्शन नाहीये, इफ यु मे प्लिज, आमाला थोडा गाईड करून पेड मेम्बरशीप खशी मिळवायची थे सांगाल काय? , इट वुड बी अ ह्युज हेल्प सर. थँक्स इन ऍडव्हान्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/26/2016 - 06:51 नवीन
ग्रामर खिंवा स्पेलिम्गच्या मिष्टेक टुमी संपादकांना हियर अँड नाऊ रिक्वेष्ट करून डुरुस्ट खरून घ्येवू शख्ता. परंतु, मुद्दाम खेलेल्या मिष्टेक्स डुरुस्त खरून मिळ्तीलच याची घॅरंटी नाय, त्या ईनोदात गणल्या जाऊ शख्तात ! ;) :) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 06:54 नवीन
मेंदूत असलेल्या मिष्टेक्स कोण सुधारतो तेही सांगा की त्यांना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
फ
फेदरवेट साहेब Mon, 12/26/2016 - 07:18 नवीन
ओ माय, इठे फण पॅक हंटिंग वूल्फ पॅक दिस्टो हाय, खुणाला येक जेन्युइन प्रश्न ईचारले असता डुस्रा येऊन लिव्ड पर्सनल कॉमेंट कश्यासाठी खरतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 07:27 नवीन
यू आर नाॅट दॅट इंपाॅर्टंट. चिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Mon, 12/26/2016 - 08:13 नवीन
मेंदूत असलेल्या मिष्टेक्स कोण सुधारतो तेही सांगा की त्यांना ;) म्हनुन सिरीयस घेतला मिस्टर बोका, आय एम ब्लेस्ड टू बी नॉट दॅट important . चिंता नसावी. BeSIDES टॉक ऑन पॉइंट्स इफ यु हॅव द गट्स, आयडी, खरे खोटे, महत्वाचे बिनम्हत्वाचे वगैरे चक्कलस सोडा , शोभत नाही तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 08:36 नवीन
त्याचा अर्थ तुमच्या मेंदूत मिष्टेक्स आहेत असा थोडाच होतो? एक्काकाकांना मी असं सुचवलं असं तुम्हाला वाटतंय. त्याला काही करु शकत नाही. बाकी ३ महिने जुन्या आयडीला मला काय शोभतं आणि काय नाही हे माहित असल्याचं पाहून मजा वाटली आणि खात्री पटली. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Mon, 12/26/2016 - 08:55 नवीन
बरोबर हाय, णथीतुण तीर मारायला अक्कल लागत नाहीच. सो बालिश ऍप्रोच, काय सुचले नाय की आयडीच्या वयावर घसरण्याची खोड काय टुमची मेल्या शिवाय जाणार न्हाय, देरफोर फाट्यावर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 10:00 नवीन
तुमचा आयडी मेल्याशिवाय माझी ही खोड जाणार नाहीच आहे काका! आतातर खात्रीच पटलेली आहे. रच्याकने तुम्ही आमची फक्त मतं फाट्यावर मारता. आम्ही तुम्हालाच फाट्यावर मारतो. तुमचा जन्मच आमच्याकडून फाट्यावर मारुन घेण्यासाठी झालेला आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Mon, 12/26/2016 - 10:19 नवीन
उगी उगी, टुमाला मुड्डे शुचले नाय का ठुमी वैयक्तिकच होणार, टुमची लायकी टिटकीच हाय, एन्जॉय, गुड डेज वोन्ट लास्ट फॉरएव्हर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 11:04 नवीन
तुम्ही असणं हेच चांगले दिवस. ते राहणार नाहीत असं तुम्हीच म्हणताय. आपला आयडी उडणार याबद्दल एवढा दुर्दम्य आत्मविश्वास! जबरदस्त!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
त
तुषार काळभोर Mon, 12/26/2016 - 12:35 नवीन
श्रीरंग जोशींचा मिनेसोटा स्टेट कॅपिटॉल हा लेख त्यावर मी दिलेली एक प्रतिक्रिया :
अवांतरः उगाच तुलना पैलवान - Sun, 14/06/2015 - 09:33 आपल्याकडे जर अशी इमारत प्रचंड खर्च करून बांधली वा त्यात अशी पेंटिंग्ज लावली तर पहिली टीका होईल, देशात करोडो लोकांना २ वेळ पुरेसे खायला मिळत नाही, हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत, लाखो मुले कुपोषित आहेत अन् हे स्वतःसाठी 'असलं' विधानभवन बांधताहेत. अशी टीका राष्ट्रपती भवनावर, परदेशी प्रतिनिधींना दिल्या जाणार्‍या मेजवान्यांवर आणि चंद्र-मंगळयानावरसुद्धा होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Mon, 12/26/2016 - 06:50 नवीन
स्वातंत्र्यदेवतेप्रमाणेच शिवस्मारकही असेच खाजगी प्रयत्नातून व स्मारक हवं असलेल्या लोकांच्य खिशातून पैसे वसूल करुन झाले असते तर खूप आनंद वाटला असता. हे ३६०० कोटी, शिवस्मारक हवं असलेल्या लोकांच्या खिशातून वसुल व्हावे अशी इच्छा आहे. ३६०० रुपये प्रत्येकी असे एक कोटी लोकांनी स्वेच्छेने दिलेत तर होऊन जाईल निधी गोळा, राज्याच्या तिजोरीवर (जिच्यात खडखडाट आहे असे कोणतेही चालू सरकार मागच्या सरकारवर आरोप करत असते) भार येणार नाही. 'सरकारकडे आपल्या कल्पना पोचवा, सरकार अ‍ॅक्शन घेतं' म्हणणार्‍यांनी माझी ही विनंती स्वतःची कल्पना म्हणून सरकारकडे पोचवावी. बघूयात कारवाई होते की नाही... ;) शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सबसिड्या, गरिबांना दिली जाणार्‍या सुविधा ह्यांच्यावर उठसूठ तोंडसुख घेणारे व ते घेण्याचा अधिकार केवळ आपण कर भरतोय म्हणून आहे असे म्हणणारे काही सोकॉल्ड प्रामाणिक करदाते यांनी आता तंतोतंत उलटी भूमिका घेतल्याचे पाहून आश्चर्य वाटत आहे. सरकारकडून केले जाणारे मतपेटीचे राजकारण ह्यावर पांघरुण घालायला रोजगारनिर्मिती, पर्यटनविकास इत्यादी कारणे देऊन धूळफेकही मस्त होत आहे. कॉन्ग्रेसने ही टूम काढली तेव्हाही ते मतपेटीचेच राजकारण होते, आजही आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 06:53 नवीन
तर काही करु शकत नाही. बाकी, लोकशाही असल्यामुळे मतपेटीचं राजकारण सगळेच करतात. विकास आणि पर्यटन वगैरे मुद्द्यांवरुन राजकारण करणं हे धर्म आणि जात यावरून राजकारण करण्यापेक्षा चांगलं की वाईट हे तु्म्हीच सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 12/26/2016 - 06:57 नवीन
शिवस्मारक हे धर्म व जातीचं राजकारण नाही असं तुम्हाला वाटत असेल तर असो बापडे! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 07:08 नवीन
असं माझं मत आहे. त्यांच्या स्मारकाबद्दल कोणी जाती-धर्माचं राजकारण करु पाहात असेल तर ते चुकीचं आहे. आता चष्माच पिवळा लावल्यानंतर सगळं जग पिवळं दिसायला लागतं. त्याला काही करु शकत नाही. रच्याकने ही कल्पना सगळ्याच राजकीय पक्षांनी मान्य केलेली होती. ती २००४ मध्येच मांडण्यात आली होती.तेव्हा त्याचा खर्च ₹१०० कोटी एवढा अपेक्षित होता. पण त्याचं साधं भूमिपूजनही झालं नाही. का नाही झालं, नक्की कोणते हितसंबंध आड आले ते माहित नाही पण तेव्हा महाराष्ट्रात कुणाचं सरकार होतं ते सगळ्यांना माहित आहे.आणि आता होणारा हा आरडाओरडा कोण करतंय तेही माहीत आहे. ते जर तुम्हाला समजत नसेल किंवा समजून घ्यायचंच नाही असा तु्म्ही चंग बांधला असेल तर अाम्ही बापडे काय करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 12/26/2016 - 07:15 नवीन
शिवाजी महाराज हे स्वतः जातीधर्मांच्या पलिकडे होते व त्यांचं स्मारक हे काही त्यांची स्वतःची इच्छा नाही. =)) शिवाजीमहाराजांचा वापर राजकारण्यांकडून कशासाठी केला आजवर? स्मारक बांधणारे, तीची आयडिया काढणारे सगळे राजकारणी शिवाजीमहाराजांसारखेच जातीधर्मांच्या पलिकडे आहेत अशी तुमचा विश्वास असेल तर असो बापडा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 07:29 नवीन
कशाबद्दल एवढी नकारात्मकता आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभिदेश Fri, 01/06/2017 - 22:01 नवीन
ते कॉम्युनिस्ट डांगे आहेत , कायम नकारात्मकच राहणार ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
U
Ujjwal Mon, 12/26/2016 - 12:17 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/26/2016 - 06:55 नवीन
माझी ही विनंती स्वतःची कल्पना म्हणून सरकारकडे पोचवावी. इतकी चांगली कल्पना दुसर्‍याने कशाला सरकारकडे पोचवायला पाहिजे ! तुम्हीच एक इमेल पाठवून, फार श्रम न पडता, ते श्रेय घ्यावे असे सुचवतो. मी अनुमोदन देईन याची खात्री बाळगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 12/26/2016 - 07:02 नवीन
तसं नाहीये हो. मी पोचवली आणि काही झालं नाही तर ते फक्त मलाच कळेल, मी कळवलं इथे तर लोक्स परत मलाच दूषणं देतील काहीतरी थातूरमातूर कारणं देऊन. सरकारबद्दल दुर्दम्य विश्वास असलेल्यांना हे चॅलेन्ज करत आहे मी स्पष्ट शब्दात. मी म्हणतोय तसं झालं तर सगळ्यांचीच विन-विन सिच्युएशन होइल की... तसंही काही चांगलं झालं तर त्याचं श्रेय घ्यायला पुढेपुढे करायला मी काही राजकारणी नेता नव्हे! कोणाच्याही केल्याने तांबडं फुटू देत... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/26/2016 - 07:13 नवीन
मोर्चा, बंद, रस्तारोको, इत्यादी नकारात्मक कारणांसाठी रस्तावर येणारे लोक माध्यमांत नेहमी दिसतात. तेव्हा काही सरकारची मदत मागितली जात नाही. उलट ते बहुदा सरकारला विरोध करण्यासाठीच केले जाते. तेव्हा, ज्यांचे नाव आपण प्रातःस्मरणीय समजतो अश्या शिवरायांच्या स्मारकासारख्या काही सकारात्मक कारणांसाठी, सरकारची मदत न घेता, जनता स्वयंस्फूर्तीने आणि स्वबळावर (पदराला खार लावून) एकजूट दाखवू लागली, तर त्या घटना भारताच्या इतिहासाला वेगळी उत्तुंग दिशा मिळवून देतील. महत्वाचे : स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याची निर्मिती आणि स्थापना सरकारच्या मदतीने झालेली नसून, सरकारचा विरोध पत्करून, बहुतांश खर्च जनतेने करून, केली गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Mon, 12/26/2016 - 07:17 नवीन
हेच म्हणायचे आहे. तुमच्या प्रतिसादात व्यक्त झालेला आशय जनतेत पसरो व तसे प्रयत्न होवो अशीच मनापासून इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 12/27/2016 - 07:15 नवीन
आपली जनता तेवढी सुजाण व्हायला जरा वेळ आहे. त्यामुळे, तोपर्यंत, कोणाच्या का हाताने, केवळ कागदी योजनांची पाने जनतेच्या तोंडाला न पुसता, खरोखरच असे भव्य स्मारक खरोखरच जमिनीवर उभे राहिले तर चांगलेच होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुंबा Tue, 12/27/2016 - 07:59 नवीन
आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न होता. तेवढे तरी ॠण फेडावे महाराजांचे महाराष्ट्राने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 12/26/2016 - 07:10 नवीन
हे ३६०० कोटी, शिवस्मारक हवं असलेल्या लोकांच्या खिशातून वसुल व्हावे अशी इच्छा आहे
हे तुम्ही विनोदाने म्हणत असाल तर ठीक आहे...नाहीतर... काहींच्या काही! बाकी राजकारणाचं म्हणाल तर भाजप ह्या राजकीय पक्षाकडून राजकारण नाही तर काय अपेक्षित असावं? जोपर्यंत जनता ह्या गोष्टींवर आधारित मतदान करत राहणार तोपर्यंत हे चालणारच! फक्त यातून जातीय वातावरण खराब न करण्याची काळजी राजकीय पक्षांनी घ्यावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
वरुण मोहिते Mon, 12/26/2016 - 07:33 नवीन
तत्व आणि मूल्य याना किंमत होती. आज इतके पैसे जनतेमधून कसे उभारणार ?कोणाच्या विश्वासावर ? काम कोणाला देणार ह्याची उत्तरे आहेत का?? अवांतर - राममंदिर साठी विटा जमा केलेल्या , वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यासाठी लोखंड जमा केलेले त्याचे काय झाले:) भाजप असो व काँग्रेस मतपेटीच्या राजकारणापासून बाहेर जाणार नाही. त्यामुळे एकटा स्मारक व्हावा मुंबईमध्ये इतकीच आमची इच्छा आहे .
  • Log in or register to post comments
श
शलभ Mon, 12/26/2016 - 09:49 नवीन
स्मारक व्हावेच. पण ते खांदेरी, उंदेरी सारख्या मुंबई जवळच्या जलदुर्गावर झाले असते तर अजून मस्त वाटले असते..
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Mon, 12/26/2016 - 11:04 नवीन
Ithe jorachi laagli tar vyavasthit shauchalaye naahit aani hi mandali putlyanche raajkaran kartayat. Mukhya samasyekade durlaksha vhav hech tar yana havay.
  • Log in or register to post comments
व
वाह्यात कार्ट Mon, 12/26/2016 - 11:05 नवीन
प्रत्येक गोष्टीला विरोध करायचं एक नवीन fadच आलंय हल्ली. प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या-वाईट बाजू असणारंच. पण गरे फेकून द्यायचे आणि बिया चघळत बसायच्या हे हल्लीचं सूत्र आहे. एखाद्या किल्ल्याला नव्याने योग्य ती डागडुजी करून, त्याला त्याचं गत-वैभव प्राप्त करून देणं हेच महाराजांसाठी उचित स्मारक झालं असतं. पण सरकार वेगळा मार्ग निवडून atleast काहीतरी करतंय तर थोडा support आपणही द्यायला हवा ना. महाराष्ट्रात गरिबी आहे, कुपोषण आहे, लोकांना खायला अन्न नाहीये या सबबीखाली स्मारकाला विरोध करणारी चेपू वरील "कॅन्डल मार्च" पब्लिक आता ३१ डिसेंबरला गरिबी, कुपोषण सोयीस्कररीत्या विसरून दारूवर हजारो रुपये उडवत अन्न वाया घालवतील. मुळात स्मारकांचा उद्देश काय असतो याचाच विसर पडलाय आपल्याला. हरितात्यांचं वर्णन करताना पुलं म्हणतात "हरीतात्यांनी आम्हाला प्रचंड अभिमान दिला. चिमुकल्या मनगटात कसल्यातरी जोमाच्या मनगट्या घातल्या. त्या वेळी दिसल्या नाहीत त्याच्या अदृश्य वळ्या. पण आज एखाद्या आघाताच्या क्षणी दिसायला लागतात. दुर्दैवाने दर वेळी मुठी वळाव्यात तश्या वळतातंच असं नाही. पण वेळप्रसंगी वळू शकतील हा आत्मविश्वास कुठे तरी दिला." शिव-स्मारकाचं कार्य देखील हेच आहे. !!!
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 12/26/2016 - 11:24 नवीन
+ १००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट
ब
बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 11:45 नवीन
अगदी योग्य आणि समर्पक शब्दांत मांडलेलं आहे. कार्टं वाह्यात असलं तरी हुशार आहे. (ह.घ्या.)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट
स
संदीप डांगे Mon, 12/26/2016 - 12:14 नवीन
सरकार वेगळा मार्ग निवडून atleast काहीतरी करतंय तर थोडा support आपणही द्यायला हवा ना. >> सरकारला सपोर्टची गरज नै हो. कुणी निंदा कुणी वंदा, सरकार आपलं राजकारण करणारच. "सरकार काहीतरी करतंय तर आपण सपोर्ट द्यायला हवा" ह्याचीही हल्ली टूम निघालीय. फक्त सरकार कोणाचं आहे ते बघून असले विचार प्रसवतात हे एक निरिक्षण. ते 'काहीतरी' करुन नक्की काय होणार ते ह्या अंधसमर्थकांपैकी कोणालाच माहित नसतं ते एक वेगळं. महाराष्ट्रात गरिबी आहे, कुपोषण आहे, लोकांना खायला अन्न नाहीये या सबबीखाली स्मारकाला विरोध करणारी चेपू वरील "कॅन्डल मार्च" पब्लिक आता ३१ डिसेंबरला गरिबी, कुपोषण सोयीस्कररीत्या विसरून दारूवर हजारो रुपये उडवत अन्न वाया घालवतील. >> तुमचा कॉन्फिडन्सला सलाम. जे विरोध करत आहेत ते दारूवर पैसे उडवतील व अन्न वाया घालतील हा केवढा विश्वास! ह्या स्मारकाला विरोध करणार्‍यांमधे ३१ डिसेंबरला विविध गडकिल्ल्यांवर जाऊन साफसफाई करणारे खरे गिरीप्रेमी, शिवप्रेमी आहेत ह्याचा आपणाला अंदाज नसावा. असो, शिव-स्मारकाचं कार्य देखील हेच आहे. !!! >> शिवाजी महाराजांच्य नुसत्या नावाने ज्यांच्या मुठी वळत नाहीत त्यांना अशी तोंडदेखली, घातल्या पाण्याच्या गंगेची गरज असावी. महाराजांवर मनापासून प्रेम करणार्‍या प्रत्येक भारतीयाच्या मनात महाराजांचे स्मारक कायमचे कोरलेले आहे. त्यास अशा बाह्य अवडंबराची अजिबात गरज नाही. ती फक्त मतपेटीचे राजकारण करणार्‍यांना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाह्यात कार्ट
A
amit१२३ Mon, 12/26/2016 - 12:30 नवीन
शिवरायांचे कर्तृत्त्व वादातीत आहे ..खरंच ???? काहीतरी चुकलंय असा वाटत नाही का ? वादातीत या शब्दाचा अर्थ बहुतेक लेखक महाशयांना समजला नसेल कदाचित
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा