इतिहासातील किस्से
💬 प्रतिसाद
(14)
आ
आदूबाळ
Tue, 12/27/2016 - 14:24
नवीन
सांबाराच्या उगमाची कहाणी खरी आहे, पण संभाचे म्हणून सांभार हे काहीही लॉजिक आहे.
- Log in or register to post comments
स
सांरा
Tue, 12/27/2016 - 14:36
नवीन
तामिळ येत नाही. कोणाला येत असल्यास कृपया प्रकाश टाकावा. मगच हे लॉजिक चेक करता येईल.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 12/27/2016 - 19:04
नवीन
मी वाचल्याप्रमाणे तो पदार्थ प्रथम संभाजी सारम म्हणुन प्रसिद्ध झाला.
कालौघात त्याचा अपभ्रंश होऊन सांभारम -> सांभर असे नाव प्रचलित झाले.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 12/27/2016 - 20:03
नवीन
:ऑ , खरेच ? ही स्टोरी खरी आहे ?
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 12/28/2016 - 07:51
नवीन
विकी तरी तेच म्हणतोय
Origins[edit]
One of the stories is that it originated in the kitchen of Thanjavur Marathas ruler Shahuji during the 17th century from the southern Indian state of Tamil Nadu.[1] Shahuji trying to make a dish called amti, experimented with pigeon peas instead of mung bean, and tamarind pulp for kokum and the court named it sambhar after the guest of the day, Sambhaji, second emperor of the Maratha Empire.[2]
Other sources point to origin as Karnataka where sambaru padartha in Kannada means mix of spices and condiments. There is also an alternate explanation that the origin of the name is from the old Tamil word, chaampu, meaning ground or paste, in the context of grinding coconut and spices to be dissolved in tamarind pulp. This word is also the root for the unrelated South East Asian dish sambol.[3]
- Log in or register to post comments
द
दि ग्रेट मराठा
Tue, 12/27/2016 - 17:54
नवीन
वा छान माहिती आहे सांगकाम्या राक्षस.
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 12/27/2016 - 18:10
नवीन
उत्तम धागा.
स्पेनचा प्रसिद्ध फ्लेमिंको या प्रसिद्ध नृूत्यप्रकाराचा उगम आपल्या कत्थक पासून झालाय अशी मान्यता आहे.
कित्येक शतकापूर्वी भारतातून भटके, दरवेशी जेव्हा मजल दरमजल करीत स्पेन मधे गेले त्यांच्याबरोबर त्यानी अर्थातच त्यांची कला, नृत्य हे ही आणले. त्यानीच कथक या नृत्यप्रकाराची स्पेन ला ओळख करून दिली.
- Log in or register to post comments
स
सांरा
Tue, 12/27/2016 - 19:55
नवीन
प्रसिद्ध असलेले रोमा जिप्सीच का ?
लिंक
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 01/02/2017 - 15:33
नवीन
लोकहो,
कराटे इत्यादि युद्धक्रीडाप्रकार चीन, जपान, कोरिया इत्यादि देशांतून इतरत्र पसरले असं समजलं जातं. मात्र या खेळांचं मूळ भारतात आहे. बोधिधर्म नामक भारतीय साधूने चीनमध्ये कुंग फू सुरू केलं म्हणतात. शाओ-लिन येथल्या मंदिरात त्याचा निवास होता.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Mon, 01/02/2017 - 22:39
नवीन
१.महाराष्ट्रात आणि तामिळनाडूत सध्या बहुधा आमटीसाठी तुरीची डाळ वापरतात . त्या ऐवजी सँभाजी राज्यांच्या काळांत दोन्ही कडे मुगाची डाळ वापरत असत असे म्हणायला काही पुरावा आहे का ?
२. चिंचेचा उपयोग भारतात फार पूर्वीपासून होत होता . तरी ती महाराष्ट्रात वापरली जात नव्हती पण तामिळनाडु मध्ये वापरात होती असे म्हणायला काही पुरावा आहे का ?
३. नागपूर कडे कोथिंबिरीला सांभार किंवा सांभारे म्हणतात . हे नाव सुद्धा सँभाजी राजांच्या आवडीवरून प्रचारात आले आहे का ?
एक माहिती पीजन पी म्हणजे तुर
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 01/03/2017 - 00:05
नवीन
>>नागपूर कडे कोथिंबिरीला सांभार किंवा सांभारे म्हणतात
नागपूरसह विदर्भात कोथिंबिरीला सांबार म्हणतात. सांभार किंवा सांभारे कधीच ऐकले नाही.
असो यावरुन पुडाची वडी अन सांबारवडी हे पदार्थ आठवलेत... :-) .
- Log in or register to post comments
र
रमेश आठवले
Tue, 01/03/2017 - 00:32
नवीन
दुरुस्तीबद्दल धन्यवाद श्रीरंग
- Log in or register to post comments
S
sneha1
Wed, 01/04/2017 - 04:53
नवीन
दाल माखनी आणि लोण्याचा काही संबंध नाही. ह्याच्यासाठी उडिद डाळ इतकी शिजवतात की ती लोण्यासारखी मऊ होते, म्हणून दाल माखनी. असे पंजाबी मैत्रिणीने सांगितले.
- Log in or register to post comments
S
sneha1
Wed, 01/04/2017 - 04:55
नवीन
माफ करा, चुकीची पोस्ट टाकली. ही काढायची कशी?
- Log in or register to post comments